|
Prady
| |
| Thursday, November 08, 2007 - 7:40 pm: |
|
|
सावनी october 2006 चे आरकईव्ह वाच. आहेत ओल्या खोबर्याचं पण सारण वापरून बेक केलेल्या करंज्या.
|
Manuswini
| |
| Thursday, November 08, 2007 - 7:49 pm: |
|
|
अग सावनी, काही कठीण नाही, चोव जरा dry च करायचा तो रोजच्यासारखा न करता साखर मिश्र गूळ कर नी छान dry कर. ई पुर्ण काठोकाठ नको भरूस करंजी. कडा दाबून ती design काढ(काय त्याला म्हणतात मला कधी कधी मराठी शब्दच आठवत नाही.) माझी पाठारे प्रभु मैत्रीण तर दूधी हलवा भरून करंजी बेक करते. ही त्यांची पद्धत. चांगली लागते. मी तीला PP म्हणून चिडवते.
|
Dineshvs
| |
| Friday, November 09, 2007 - 1:21 pm: |
|
|
मराठीत त्याला मुरड म्हणतात. ते तसे जमणे कठिण आहे. पण जेवायचा काटा दाबुन चांगली नक्षी येते. करंज्याचे तंत्र एकदा जमले कि त्यात फ़्लॉवर वाटाण्याच्या भाजीचे सारण भरुनही छान होतात त्या.
|
Manuswini
| |
| Friday, November 09, 2007 - 6:42 pm: |
|
|
माझे ना धड मराठी नी कोकणी असे काहीसे झालेय. बरे झाले त्तुम्ही सांगीतले ते दिनेशदा.
|
Manuswini
| |
| Saturday, November 10, 2007 - 8:30 am: |
|
|
ह्या माझ्या baked करंज्या, दोन पद्धीतीच्या केल्या, सुका मेवा नी पंचसारण. झोपेने मला खाल्ले होते मग शेवटी दुसर्या आकारच्या केल्या.
|
Manuswini
| |
| Saturday, November 10, 2007 - 8:34 am: |
|
|
|
Jadoo
| |
| Monday, November 12, 2007 - 7:51 pm: |
|
|
Manuswini छान दिसत आहेत करंज्यांचे photo करंजी ला मुरड कशी घालायची हे लिहिशील का इथे?
|
Psg
| |
| Tuesday, November 13, 2007 - 8:56 am: |
|
|
मनू, हा बेक झाल्यानंतरचा फोटो आहे का, का आधीचा? बेक केल्याचा काहीच मागमूस दिसत नाहीये म्हणून विचारले रंग बदलत नाही का बेक केल्यानंतरही? तो 'सामोसा' पण छान दिसतोय
|
Manuswini
| |
| Tuesday, November 13, 2007 - 6:06 pm: |
|
|
पूनम, पहीले दोन फोटो बेक च्या आधी आहे, नंतरचा एक बेक केल्यावर. तश्या ह्या ज्यास्त brown सुद्धा होत नाही ग कारण तूप असते ना भरपूर, लवकर खुसखुशीत होतात. किंचीत लालसर छटा येते. जादू, मुरड कशी घालणे लिहिणे explain करने कठीण आहे. थोडे आरामात लिहीते. पण दीनेशदा करतील छान. सारण भरल्यावर दोन बाजूला दाबून मग साधारण अंगठा व तर्जनी( figner pointing ) बोटामधे चेपुन ती पाती वळवायची आत. पुन्हा बाजूची दाबून आत वळव. दिनेशदा, जमले तुम्ही जरा सांगा हो.
|
Manuswini
| |
| Tuesday, November 13, 2007 - 9:10 pm: |
|
|
पूनम, अग तो सामोसा नाही ग, आई त्याला काहीतरी म्हणते कोकणीत(त्या आकाराला). मला झोप आली होती मग करून टाकला त्या शेप मध्ये. कोण लाटत बसतेय, साठा लावत वगैरे वगैरे. ते शेप सगळे मला ठेवले...
|
Prady
| |
| Tuesday, November 13, 2007 - 9:57 pm: |
|
|
मनु किती छान सुबक आहेत गं तुझ्या करंज्या. शंभर पैकी शंभर मार्क.
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 14, 2007 - 5:41 pm: |
|
|
मनुस्विनी, मुरड घालणे हे वाचण्यापेक्षा बघितल्यानेच जास्त समजते, तरिही प्रयत्न करतो. नेहमीप्रमाणे करंजी भरुन झाली कि ती पुर्ण उचलुन डाव्या हातात घ्यायची. ( डावखोर्यानी उजव्या हातात घ्यायची. ) करंजीच्या एका टोकापासुन सुरवात करायची. त्यातला थोडासा भाग अंगठा आणि तर्जनीच्या सहाय्याने आतमधे वळवायचा. यावेळी अजिबात दाब द्यायचा नाही. चिमटायचेही नाही. मग आधी मुरडलेल्या भागाच्या किंचीत आधी सुरवात करुन परत थोडासा भाग मुरडायचा. असे करतकरत शेवटपर्यंत यायचे. वरती फोटो आहेच शिवाय हम आपके है कौन मधे, रेणुका शहाणे, तिच्या एंट्रीलाच मुरड घालताना दाखवलीय. करंजीला मुरड घालणे, याला एक खास अर्थ आहे. पुर्वी हे प्रकार काहि उठसुठ करत नसत. काहि खास प्रसंगानाच हे करत असत. तर असे प्रसंग लवकर परत यावेत, म्हणुन हि मुरड घालायची असते.
|
Manuswini
| |
| Saturday, November 24, 2007 - 12:24 am: |
|
|
ही घ्या bakes karanji recipe http://youtube.com/watch?v=SSjuT4NuDBA&feature=related आणि ही बघा मुरड अशी घालतात. मी सुद्धा अगदी एवढ्याच लहानपणी आवडीने आईच्या बाजूला बसून शिकले हो त्याशीवाय उगीच येत नाही, हात जरा आणखी नाजूक पद्धतीने वळतो.. http://youtube.com/watch?v=nOIMX870urM&feature=related
|
Jadoo
| |
| Tuesday, November 27, 2007 - 8:01 pm: |
|
|
ohh hoo Thanks Manuswini खरोखर बघितल्यावर कल्पना येते मुरड कशी घालायचि याची.. Dinesh thank you तुम्हि खरोखर try केले शब्दांमधे explain करायला I know it is difficult to explain ..मला आधी वाटले होते कि याचा सुद्धा साच असतो कि काय..
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|