Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 16, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » पाव - भाजी » Archive through May 16, 2007 « Previous Next »

Rachana_barve
Wednesday, February 08, 2006 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावभाजीसाठी भाजी शिजवली की सरळ मी मिक्सरमधून काढते. बर्‍यापैकी मिळून येते.
बाकी ह्यावेळी भारतात मी पावभाजी खाल्ली. इतके तिखट खायची सवय राहिली नाही म्हणून की काय कोण जाणे पण वाटल की मीच बरी करते की पावभाजी ह्यापेक्षा :-O


Saj
Saturday, February 11, 2006 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rachana,
tu kharech mhantes ithe rahun aaplya jevnat tikhatache praman khup kami zalele aste.karan mi magchya varshi gele hote tar saglyana mhantale mulinsathi thode fikke kara,tar ho ho pan te aamhala suddha far tikhat hote.

Iravati
Tuesday, February 14, 2006 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुम्बईत fashion street जवळच्या खाऊ गल्लीतली पावभाजी प्रसिद्ध आहे. तुम्ही order दिल्यावर तुमच्या समोरच तो पावभाजीवाला पावभाजी तयार करतो. ते बघत असताना असे लक्षात आले की तो त्यात जो मसाला घालत होता तो ओला मसाला होता. तिकडे सतत जाऊन तो पावभाजीवाला आता ओळख़ीचा झालाय. so त्याला विचारले की या मसाल्यात कुठले मसाल्याचे पदार्थ वापरले आहेत. तो सान्गयला तयार नव्हता. पण फारच कटकट केल्यावर त्याने आम्हाला तो मसालाच थोडासा pack करुन दिला. घरी आल्यावर पावभाजी करुन पहिली. अगदी बाहेरच्या सारखीच झाली होती. आता कधी पावभाजी करायची असली की सरळ त्याच्याकडून मसाला आणते आणि करते.

Shubhashish_h
Tuesday, February 14, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावभाजी करताना मी लसुण-आल्याची पेस्ट घालतेच....त्याशिवाय मि कोल्हापुरहुन आणलेली कांदा लसुण चटणीहि घालते. छान चव येती

Arch
Thursday, February 23, 2006 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावभाजीतल्या भाजितले मटर मॅश केलेले नसतात न? का असतात?

Moodi
Thursday, February 23, 2006 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च ते काही ठिकाणी अर्धवट ठेचुन घालतात अन तव्यावरच पटापट परततात चायनीजसारखे, त्यामुळे शिजतात लवकर. मी मायक्रोव्हेवला आधी अख्खे मटार अन भज्यांची मिर्ची कापुन ४ मिनिट उकडुन घेते अन मग मॅश करते.
इथली सिमला मिर्ची जाड अन कडु आहे त्यामुळे मी भज्यांची मिर्ची घालते, ती पण चांगली लागते. पण १ च बास होते.


Preetikole
Tuesday, May 15, 2007 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाव भाजि मिक्षेर मधु काधल्यमुले खुप बरिक होते म्हनुन पाव भाजि स्मशेर वापरावे त्यामुले भज्य ओबद्धोबद राहतात अनि तेअस्त चन येते.
फ़ोद्नि बतर मधे करवि अनि बरिक कन्द पर्तवुन मग मसल तकव अनि मग भाज्य तकव्य. थोद्य वेलने थिखत मिथ अनि थोद मसल परत ताकव. पाव भजि सथि फ़्लोवेर, कोबि, मतार, सिम्ल मिर्चि, तोमतो, कन्द, बताता, आले, लसुन वप्रवे.
एवेरेस्त पाव भजि मसल सर्वत चन असतो


Sharmila_72
Tuesday, May 15, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रीति काय हे? मी हसत सुटले वाचता वाचता... चेक नाही केलस का पोस्ट करायच्या आधी?

Disha013
Tuesday, May 15, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रीती,:-)
अगदी लहान मुलाचे बोबडे बोल ऐकत असल्यासारखे वाटले!


Sms
Tuesday, May 15, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच मी पाव भाजी केली होती, पण ती Punyachya jayashrees pavbhaji सारखी नाही झाली. तरी मी लसुण घातले होते. cauliflower नीट mash होत नाही.इथल्या फ़्लोवर चे दाणे राहतात. एवरेस्ट मसाला वपरला होता. any tips?

Ameyadeshpande
Tuesday, May 15, 2007 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा, तिला आधी ते दिव्याचं चित्र का टाकलं आहेस ते समजावून सांग :-)
खरंच "पोस्ट ऑफ़ द डे" आहे हे पोस्ट :-)

प्रीती, तुझ्या पोस्टचं मायबोलीकरण केलंय बघ खाली.

पाव भाजी मिक्सर मधून काढल्यामुळे खूप बारीक होते म्हणुन पाव भाजी स्मॅशर वापरावे. त्यामुळे भाज्या ओबडधोबड राहतात आणि टेस्ट छान येते.
फ़ोडणी बटर मधे करावी आणि बारीक कांदा परतवून मग मसाला टाकावा आणि मग भाज्या टाकाव्या. थोड्या वेळाने तिखट मीठ आणि थोडा मसाला परत टाकावा. पाव भाजी साठी फ़्लॉवर, कोबी, मटार, सिमला मिर्ची, टोमॅटो, कांदा, बटाटा, आले, लसूण वापरावे.
एव्हरेस्ट पावभाजी मसाला सर्वात छान असतो.

paav bhaajI miksar madhUn kaaDhalyaamuLe khUp baarIk hote mhaNun paava bhaajI sma.cshar vaaparaave. tyaamuLe bhaajyaa obaDadhobaD raahataat aaNi TesT Chaan yete.
foDaNI baTar madhe karaavI aaNi baarIk kaa.ndaa paratavUn mag masaalaa Taakaavaa aaNi mag bhaajyaa Taakaavyaa. thoDyaa veLaane tikhaT mITh aaNi thoDaa masaalaa parat Taakaavaa. paava bhaajI saaThI flOvar, kobI, maTaar, simalaa mirchI, Toma.cTo, kaa.ndaa, baTaaTaa, aale, lasUN vaaparaave.
evharesT paavabhaajI masaalaa sarvaat Chaan asato.


Prady
Tuesday, May 15, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावभाजीत कोबी ऐकला नव्हता. असो. पण प्रत्येकाची वेगळी पद्धत. पावभाजीसाठी बटाटे उकडतानाच जर flower चे तुरे पण उकडले तर छान मऊ होतात. दाणे राहात नाहीत. flower अंमळ कमीच घ्यावा. आलं लसूण घालून पण त्याचा उग्रपणा जाणवतो. मी बटाटे किसून घेते. flower उकडला की नीट मॅश होतो. आणी हे दोन्ही परतायला टाकायच्या आधी थोडा मसाला आणी काश्मिरी मिरचीची पूड ह्यात मिसळून घ्यावी म्हणजे भाजीला छान एकसारखा रंग येतो. ईथे सुरवातीला एक दोनदा मला सर्वच्या सर्व भाजी टाकून द्यावी लागली होती. कडवट लागायची. आणी कारण कळत नव्हतं. मग कळलं की कांदा कच्चाच वाटून घातल्यामुळे कांद्याची कडवट चव लागली होती. आता कांदा आधी परतून घेते तेलावर किंवा बटरवर आणी मग mixer वर वाटून घेते. शिवाय एखादा कांदा बारीक चिरून पण परतते. आलं लसूण शक्यतो फ्रेश घ्यावं. पेस्ट वापरू नये. सिमला मिरची देखील जमत असल्यास अगदी बारीक चिरून घ्यावी. नसेल जमत तर mixer मधून काढून घ्यावी. मला पण everest चा मसाला जास्त आवडला. भाजी होता होता त्यात मटारचे दाणे घालते पण मटार मॅश करत नाही. मसालेदार भाजीत मधे मधे मटारचे हिरवे दाणे छान उठून दिसतात.

Sms
Tuesday, May 15, 2007 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<Thanks Prady! Mi karun baghen parat>

Disha013
Tuesday, May 15, 2007 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय,एवढी मेहनत घेतलिस तर ते दिव्याचे काम पण तुच करायचेस ना! :-)
प्रीती,दिवा दिसला की तो घ्यायचा म्हणजे जे काही लिहिलय ते LIGHTLY घ्यायचं.
मी पावभाजीत लसुन घालत नाहि. पण आले पेस्ट भरपुर टाकते. मी कोबी घालत नाही,पण ब-याच जणांना टाकताना पाहिलेय.
मी पावभाजी मसाल्याचे m.d.h ,बादशहा आणि एव्हरेस्ट एवढे brand वापरलेत. एव्हरेस्टच Best आहे. बाकीच्यांना जराही टेस्ट नाही.फ़ार फ़िके आहेत.
आता पावभाजी खावीशी वाटायला लागलिये.:-)


Ameyadeshpande
Wednesday, May 16, 2007 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोबी मीही पहिल्यांदाच ऐकला. आलं लसूण पेस्ट बरेच जण घालतात. मी तर काही जणांना दुधी भोपळा घालतानाही पहिलंय.

Prady
Wednesday, May 16, 2007 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाशकात एका हाटिलात वांगं घातलेली पण खावी लागली होती.

Ameyadeshpande
Wednesday, May 16, 2007 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पवई ला हिरानंदानी गार्डन्स मधे जे फ़ूड कोर्ट आहे, तिथे बसायला कॉमन जागा आहे आणि आजूबाजूला स्टॉल्स आहेत. तिथे गेल्यावरती तिथल्या स्टॉल्स मधले ऑर्डर घेणारे लोक अक्षरश: अंगावरती पडतात, आमच्या स्टॉल मधून ऑर्डर करा म्हणून. एकदा असेच आम्ही ४ जण गेलो असताना मग ४ स्टॉल्स मधून एक एक पाव भाजी ऑर्डर केली होती. प्रत्येकाचा वेगळा रंग आणि चव :-)

Sharmila_72
Wednesday, May 16, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताडदेव ला 'सरदार' ची पाव भाजी खूप फेमस आहे. तिथले पाव बटर मधे चक्क बुडवून काढले आहेत कि काय अस वाटत. माझ्या मते पाव भाजी ची खरी मजा अमूल बटर च्या टेस्ट मध्येच आहे. मला स्वत:ला भरपूर बटर फासलेले पाव आवडतात. आणि भाजीवर पण बटर चे गोळे टाकून. आहाहा..... बटर वितळायला लागत तेव्हा लगेचच खायची गरम गरम, लिंबू पिळुन, कांदा-कोथिंबीर टाकून. पावसात तर मजाच येते. पण Calorie conscious लोकांनी अजिबात जाउ नये ह्याच्या वाटेला.

Preetikole
Wednesday, May 16, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेय धन्यवाद
पहिलाच प्रयत्न होता..
पुढच्या वेळी काळजी घेयीन..
आता आयडिया आली.


Milindaa
Wednesday, May 16, 2007 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमिया धन्यवाद <<< अमेय, बघ, तुला काय हाक मारली आहे ते

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators