Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 12, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पोळ्या » Chapati » Archive through October 12, 2006 « Previous Next »

Bee
Wednesday, October 04, 2006 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिभा, तुला जर फ़ुलके करायचे असतील तर चपाती लाटून झाल्यानंतर वरचा भाग तव्यावर खाली असायला पाहिजे.

चपाती भाजताना, दोन्ही भाग एकदा भाजून घ्यायचे असतात. आणि जो भाग पहिल्यांदा भाजतो तो भाग जाळावर आधी येतो. असे जर केले तर छान फ़ुलते पोळी.

मोहनची तशी गरम नाही. चपाती कोमट पाण्यानी भिजवून बघ. ज्यावेळी तू चपाटी लाटणार आहेस तेंव्हा तेलाचा हात लावून कणिक छान तिम्बून घे म्हणजे ती सैल राहीन.


Zpratibha
Wednesday, October 04, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी तुला असे म्हणायचे आहे का कि चपाती लाटुन झाल्यावर वरची बाजु तव्यावर खालच्या बाजुने टाकुन ती एकदा थोडिशी भाजुन घ्यायची नंतर उलटि करुन ती बाजु संपुर्ण भाजली कि परत पहिली बाजु पुर्ण भाजायची, कारण मी ह्याच प्रकारे चपाति भाजते. माझी पद्धत चुकिची असेल तर सांगा.

शिवाय आमच्याकडे तयार पिठ्ही वापरत नाहित.


Savani
Wednesday, October 04, 2006 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोळी भाजताना ती एकेकदाच फ़क्त उलटावी. एकदा इकडनं एकदा तिकडनं असं सारखं केल्याने पोळी पापडासारखी कडक होते. पोळी तव्यावरून काढली की हातावर दाबुन त्याची वाफ़ काढुन टाकायची.
मी तर बरेचदा घडीची पोळी न करता फ़ुलक्यासारखी लाटते पण भाजताना पोळीसारखी भाजते. पण माझ्या पोळ्या २ दिवस सुद्धा नरम राहतात.


Manuswini
Wednesday, October 04, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी चपाती(पोळी,आमच्याकडे पोळी म्हणजे पुरणपोळी :-)) ची पद्धत अशी आहे.
मी पदराची चपाती करते.

कणीक किंचीत गरम पाण्याने भिजवावी जर लगेच चपाती लगेच हवी असेल तर. नाहीतर मी सध्यापाण्यात भिजवते.
सुजाता आटा चांगला आहे हे मी recently discover केले.

पाणी एक्दम न घालता थोडे थोडे घालून करते.

१) मध्ये एक खड्डा करते,त्यात दोन चमचे तेल (परातभर पिठाला(मध्यम आकारची परात पिठ भरून), मिठ घालते, पिठाला नीट चोळते. मग हळु हळू पाणी घालून मळते. शेवटी तेलाचा हात लावून एक्त्र मळून झाकून ठेवायचे.
२) जवळपास अर्ध्या तासाने पुन्हा मळून छोट्या गोळ्या करून. आधी छोटापाती लाटून त्यात खड्डे करून तेलाचे बोट लावते(तेल ओतत नाही:-)). मग पिठ भुरभुरते, तो अर्ध चंद्र करून पुन्हा त्यात तेलाचे बोटे पिठ भुरभुरवणे प्रकार अशी त्रिकोणी घडी कडेकडेने लाटत गोल करते.
३)कडा साधारण जाड तर मध्य्ये त्यापेक्षा किंचीत पातळ अशी पोळी लाटून झाली की तो पर्यन्त तापलेल्या तव्यावर उलट्Yआ बाजूने टाकते. एक दोन मिनीटतच परतून मग कडेकडेने फिरवत भाजते. मग परतून पुर्ण फुलते माझी पोळी. gas वर अर्ध चंद्र करून दाबून शेकून भाजते मग पुन्हा त्रिकोणी घडी घालून आपटते. चांगल्या नरम रहातात मारल्यावर :-)


Nalini
Wednesday, October 04, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कडा साधारण जाड तर मध्य्ये त्यापेक्षा किंचीत पातळ अशी पोळी लाटून
अगं मनु, चपाती, भाकरी, पोळी ही काठात पातळ हवी आणि मध्ये त्या मानाने जराशी जाडसर.
चपात्या किंवा भाकरीचे काठ जरासे जाड राहिले की आजी नेहमी म्हणायची " की भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी ओठात". :-)
प्रतिभा, चपाती भाजताना तवा व्यवस्थित तापलेला असणे हे महत्वाचे आहे. तवा जर व्यवस्थित तापलेला नसेल तरीही चपाती कडक होते.


Manuswini
Wednesday, October 04, 2006 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी,
मी भाकरी नेहमी काठाला पातळ करते कारण ती थापते.

पण माझी चपाती ही नेहमी मधल्यापेक्षा काठ किंचीत जाड असतो.

'किंचीत' ग पण छान फुगते नी नरम रहाते.

भाकरीची काठ नेहमी पातळ असतो....


Bee
Thursday, October 05, 2006 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी सहीच आहे तुझी आजी :-)

प्रतिभा, हो तुझे बरोबर आहे. असेच करायचे असते. ती वाफ़ धरुन ठेवणे वगैरे मी कधी केले नाही. मी एका वेळी एका वेळेसच्याच चपात्या करतो त्यामुळे त्या खाण्या इतपत तरी नरम असतात.

वाफ़ काढली नाही तर असे काय परिणाम होतात चपातीवर? मी कधीच काढत नाही. चटका बसला तर हाताला!

सावनी, चार पाच दिवस चपात्या नरम राहतात म्हणजे तू चपाती expert दिसतेस.. जरा तुझ्या टिपा दे..

माझी आई चपाती करुन झाली की ती उभी धरते आणि त्यावर दोन्ही हाताची खोपटी करुन आदळते. मग त्या पोळीला घडी घालून ती दुरडीत कापडात गुन्डाळून ठेवते.

आमच्या घरी ओसरीला लागूनच चुल होती. आई भाकर्‍या केल्या की त्या सर्व भाकर्‍या भिंतीला टेकून रचून ठेवायची.


Manuswini
Thursday, October 05, 2006 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,

अरे काविलता मार चपातीला वाफ़ निघून जाईल.
चपातीला असे मारल्यने जे माणसाच्या बाबतीत होते तेच होते चपातीच्या बाबतीत :-)
मारल्याने वस्तु नरम रहाते :-)
तुला कल्पाना असेलच :-)

दिवे घे


Bee
Thursday, October 05, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, आजकाल तू फ़ारच काव्यमय लिहायला लागली आही.

गॅस अर्ध चंद्र करते हे कळायला मला खूप वेळ लागला.. :-)

आणि हे कविलता एक नविन आहे कळायला.. :-)


Savani
Thursday, October 05, 2006 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अरे खरच माझ्या पोळ्या चांगल्या नरम राहतात. टीपा काय देऊ रे.
कणीक मळताना तेल योग्य प्रमाणात वापरायचे. रोजच्या पोळ्यांसाठी फ़ार घट्ट पण नाही आणि अगदी सैल पण नाही अशी मळायची कणीक. अर्थात हे प्रत्येकाच्यावर अवलंबून असतं. मी तरी जरा सैलसरच मळते.
आणि मग पोळ्या करताना घडीच्या असतील तर मनूने सांगितल्यासारखेच करते आणि फ़ुलके असतील तर मधे तेल लावत नाही. लाटताना मला तरी मोठी आणि पातळ लाटायची सवय आहे. आणि भाजताना नलू ने सांगितल्याप्रमाणे तवा चांगला तापलेला हवा. मला पोळी भाजायची म्हण्जे त्याचा असा एक छान वास येतो खमंग तो आल्याशिवाय भाजली गेली असं वाटतच नाही. आणि मग एका बाजूने चांगली शेकली गेली की दुसर्‍या बाजुने भाजायची असं दोनदाच करायचे आणि मग डब्यात ठेवायच्या आधी दोन्ही हातात धरून आपटायची की त्यातली वाफ़ निघून जाते.तू लिहिले आहेस ना तसच. मला ते expalin करता येत नाहीये रे. आणि मी डब्यात आधीच पेपर टॉवेल किंवा सुती कापड घालून ठेवते. मात्र मी एक करते, एकेक पोळी डब्यात टाकली की लगेच डब्याचं झाकण बंद करते. आणि मग शेवटी सगळ्या पोळ्याना तेल लावते.
पोळ्या झाल्या की त्या फ़ार वेळ वार्‍यावर ठेवू नये. मला वाटतं त्याने पण कडक होतात.


Megha16
Thursday, October 05, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, छान टीपा दिल्या आहेत.

Manuswini
Friday, October 06, 2006 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चपाती उलथायला तुम्ही काविलता नाही वापरत तर काय वापरता


Bee
Friday, October 06, 2006 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु काविलता काय आहे हेच मला माहिती नाही. पण आता लक्षात आलं की तू बहुतेक पोळी उलटविण्यासाठी वापरायचं उलथणं म्हणते आहेस. मला झर्कन हातानी पोळी काढायची उलटायची सवय झाली. उलट पोळीचा चटका कसा अगदी उबदार लागतो तो बसल्या शिवाय स्वैपाक केल्यासारखा नाही वाटतं. ऐवढी जर जिवाला जपशील तर कसे व्हायचे सासरी मनु :-)

सावनी, खरच सुंदर माहिती दिलीस. त्यातली बरीच माहिती होती. पण आत्ता एक नविन टिप मिळाली ती म्हणजे मी पोळीला तेल लावून ती वार्‍यानिशी ठेवतो. त्याचमुळे माझ्या टमटमाटम फ़ुललेल्या पोळ्या नंतर कडक होतात. thank u very much!!! .

प्रतिभा, वरच्या सर्व टिपा टापटिप रित्या वाचून ध्यानात घे आणि विचार कर आपले कुठे चुकते आहे.

सावनी तू by chance विदर्भाची अकोल्याची आहेस का?


Zpratibha
Friday, October 06, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मनु मलाहि बी सारखाच प्रश्न पडला होता कि कविलता म्हणजे काय? आत्त्ता कळल तुला काय म्हणायचय ते.
आमच्याकडे त्याला कलथा किंवा अगदि गावच्या भाषेत उलथणे म्हणतात.

बाकि सर्वांनीच चांगले सल्ले दिल्याबद्दल आभारी आहे.


Bee
Friday, October 06, 2006 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिला बहुतेक कलथाच म्हणायचे असेल पण तिने 'कविलता'मध्ये त्याचा अपभ्रंश केला.. :-)

बरोबर की नाही मनु तू न वाचलेल्या शब्दांचे अपभ्रंश करुन इथे ते शब्द वापरतेस की नाही :-)

दिवे घे :-)



Zakki
Friday, October 06, 2006 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो काही पण म्हणा पण उलटवा ती पोळी लवकर, नाहीतर जळून जाईल!

बी, झरकन हाताने पोळी उलटवण्याच्या गोष्टीवरून मला एका दुसर्‍या गोष्टीची आठवण झाली. टी. व्ही. वर दाखवत होते की कोरियात एका दुकानात एक माणूस उकळत्या तेलातील चिकन काढायला काहीतरी शोधत होता, ते न सापडल्याने त्याने सरळ शेवटी हातच आत घातले नि चिकन बाहेर काढली. त्यानंतर तो नेहेमीच उकळत्या तेलात हात बुडवून श्रिंप, चिकन करत असे. ते बघायला सगळे लोक त्याच्या टपरीवर जात, नि आजूबाजूच्या लोकांचा धंदा बसला!

हिंदी प्रोग्रॅमच्या आधी हा शो असल्याने आपो आप बघितल्या गेला!

पण तू टपरी टाकून पोळ्या उलटायला बसलास तर कुणि येणार नाहीत, कारण बहुधा बर्‍याच (आमच्या काळच्या तरी,) बायका हातानेच उलटवतात! (बहुधा त्या पण संभ्रमात पडल्या असतील, कालथा, कवीलता, की उलथणे म्हणायचे, म्हणून सरळ हातानेच उलटवतात!)


Manuswini
Friday, October 06, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तरी काविलता च म्हणते.

कोकणी भाषेत तरी काविलताच असावे. कारण तोच शब्द मी एकला आहे :-)
सासरची चिंता कशाला करू
आतापासून


Zpratibha
Monday, October 09, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला दोन दिवसापासुन तरी पोळ्या बर्‍या जमताहेत म्हणजे थोडा सुस्कारा सोडायला हरकत नाहि.
मी तुम्हा सर्वांची आभारी आहे आता अधिकाधिक चांगल्या कशा होतिल हे object ठेवले पाहिजे नाहि का?


Pia
Thursday, October 12, 2006 - 11:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कणकेच्या पिठात बारिक बारिक किडे होतात. ते तांदुळात पण जातात. त्या पासुन कसा सुटकारा मिलवायाचा

Prady
Friday, October 13, 2006 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिया कणीक आणताना मोठा पॅक नको आणूस. लहानच आणत जा.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators