Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 03, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » भाकरी » Archive through November 03, 2006 « Previous Next »

Nalini
Monday, October 09, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मग गावाकडल्या बायका >>
मनिषा, हो. एका वेळी एकाच भाकरीचे पिठ भिजवले जाते आणि ती लगेच थापली जाते, अगदी शंभरावर करायच्या असल्या तरी. जरी समजा ४-५ भाकरीचे एकदाच भिजवले तरी ते भाकरी थापताना परत पाण्याचा हात लावुन मळावे लागते. का? ते माहितगार सांगतीलच.
samai , तुझ्या भाकरीला फोड येतात म्हणजे तव्यात आणि भाकरीमध्ये हवा रहाते. जर असे फोड येत असतिल तर उलथन्याने भाकरी उचलुन परत टाकायची.
बी, तुझ्याकडुन तव्यावर पिठ पडते. बहुतेक तु भाकरी एकाच हाताने तव्यावर टाकत असावा. भाकरी दोन्ही हाताने तव्यावर टाकलिस तर पिठ नाही पडणार. सरावाने एका हातने भाकरी टाकने जमते. आता तु म्हणशील की दोन्ही हाताने कशी टाकायची तर उजव्या हाताने भाकरी उचलुन ती डाव्या हातावर टाकायची आणि लगेच उजवा हात पण भाकरीखाली घालयचा. मग ही भाकरी अलगत तव्यावर टाकायची, हाताला चटका बसु न देता. बघ करुन जमतेय का.
samai , तुसुद्धा भाकरी तव्यावर टाकताना दोन्ही हाताने टाकुन बघ. फोड नाही येणार भाकरीला.


Karadkar
Monday, October 09, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाकरी करताना जर तवा खुप तापाला असेल तर असे फोड येतात भाकरी तव्यावर टाकली की. जर एक भाकरी भाजताना दुसरी भाकरी थापली नसेल तर तर ती थापुन होईपर्यन्त तवा ख्पच गरम होतो. एकदम बारीक करुन ठेवला तर तो पुरेसा तापत नाही. सवयीप्रमाणे adjust करावे लागते.

मी भाकरी करताना एकावेळेस ३-४ भाकर्याचे पिठ एकावेळेस मळते. पण एकदम थापण्याईतके मळात नाही. एकावेळेस एका भाकरीचे पीठ भर्पुर मळुन घेते.


Uno
Monday, October 09, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
या पिथालाच खन्देशात कळण्याचे पिथ म्हणतात. या भाकरी बरोबर मिर्चिचा थेचा पण छान लागतो.


Farend
Tuesday, October 10, 2006 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुम्बई, ठाणे वगैरे परिसरांत हॉटेल्स मधे माशांच्या पदार्थांबरोबर तांदुळाच्या पिठाच्या (बहुधा) भाकरी मिळतात. त्याला काय म्हणतात कोणाला आठवतय का? दशमी, आम्बोळी नाही, पण "असेच काहीतरी नाव होते", मी तिकडे असताना नेहेमी खायचो, पण आता जाम आठवत नाही.

Bee
Tuesday, October 10, 2006 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या भाकरीला कळण्याच्या भाकरी देखील म्हणतात.

मला आंबडीची भाकरी पण खूप खूप आवडते. पण ती कोण करतं हल्ली.. लोकांना अंबाडीची भाजीदेखील ओळखता येत नाही हो हल्लीच्या :-)


Bee
Wednesday, November 01, 2006 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तांदूळाच्या भाकरीची कृती मिळेल का? मी पिठ आणले आहे.

जी मला माहिती आहे ती कृती इथे लिहितो.

१) एक ग्लास पाण्याला एक वाटी तांदळाचे पिठे. हे झाले प्रमाण.
२) पाणी पातेल्यात खळखळ उकळी आले की आच मंद करुन पिठ त्यात सोडणे.
३) पिठ शिजून त्याची मऊसुत उकळ झाली ती गार होऊ देणे.
४) तांदळाचे पिठ भाकरी लाटायला घेणे.
५) भाकरी लाटून झाली ती तव्यावरच पोळीप्रमाणे शेकणे.

दिनेश आणि इथले अन्य कोकणस्थी बरोबर आहे का ही कृती. विदर्भात नाही बुवा हा प्रकार. आमच्याकडे ज्वारी बाजर हेच खूप चालत.

दिनेश, ज्वारीच्या पिठाची देखील उकळ करुन भाकरी करतात. त्यात 1:1 ज्वारीचे आणि तांदूळाचे पिठ घेतात. ही भाकरी छान लुसलुशीत होते.


Prady
Wednesday, November 01, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए बी त्याला उकड म्हणतात. आणी उकड गरम असतानाच मळायची चांगली. तुला चटका बसेल म्हणून भिती वाटत असेल तर वाटीने मळ पण गरम असतानाच मळायची. आणी भाजताना भाकरी सारखीच भाजायची. म्हणजे वरून पाण्याचा हात लावून.

Bee
Thursday, November 02, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्र, मला वाटलं उकळून केलेला उंडा आहे म्हणून उकळ म्हणत असावे. बरोबर शब्द लक्षात राहीन आता. धन्यवाद!

प्र, काल मी खूपच गोंधळ केला किचनमधे. मी एक वाटी ज्वारीचे पिठ आणि एक वाटी तांदूळाचे पिठ खळखळ पाण्यात उकळले. त्यात कालथा फ़िरवून ते पिठ एकजीव केले. गुठळ्या पण छान निघून गेल्यात. मग पोळपाटावर तांदळाचे पिठ घेऊन भाकरी थापायचा प्रयास केला पण सर्व गोळा गुळगुळीत झाला होता. तो वळतच नव्हता. मग मी आकार अगदी लहान ठेवला. तो तव्यावर एकतर चिकटून बसे आणि अगदी पाच मिनिटे जरी तव्यावर ठेवला तरी देखील भाजल्या जात नव्हता. उलटवायचा प्रयत्न केला तर ती भाकरी गोळा होऊन तवा खरकटा झाला होता.

काय चुकले माझे. तुला जर सवड असेल तर तुझी कृती लिही ना ह्या भाकरीची.


Bee
Friday, November 03, 2006 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pradya wrote - आधी उकड काढून घ्यायची गरम असताना मळून घ्यायची. मग तांदळाच्या पिठीवर लाटून घ्यायची. हलक्या हाताने तव्यावर टाकायची. वरच्या बाजूला पाणी लावायचं. पाणी सुकलं की लगेच भाकरी परतायची उलथण्याने. खालच्या बाजूने खरपूस झाली की परत परतून जरा दाबायची. म्हणजे ती फुलून येते. छान फुगली की खाली काढून तूप लावावं जर नाही जमलं तर ती उकड नेहेमीच्या कणकीत भरून गवसळ्या कर. कृती आहे बघ गवसळ्या किंवा गवसण्या म्हणतात. पोळीच्या बी बी वर मिळेल ह्याची कृती.
>>
प्रज्ञा, धन्यवाद. मला उकड केल्यानंतरची कृती पुर्णपणे येते. मुळ अडचण उकड नीट होत नाही त्याची आहे. परवाची उकड मी फ़्रिजमधे तशीच ठेवून दिली. आता आज नाहीतर उद्या मी उपम्याप्रमाणे त्या उकडीला फ़ोडणी देतो म्हणजे वाया जाणार नाही. मला पोळ्या छान जमतात. भाकरीची कधी कधी वाट लागते. ४ भाकरी केल्या की २ छान होतात बाकीच्या २ चे काय होते हे अवर्णनीय आहे. ते जाऊ दे मला फ़क्त उकडीची कृती हवी आहे.

Bee
Friday, November 03, 2006 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nalini Tai Wrote - गरम किंवा कोमट पाण्यात पिठ भिजवले तर भाकरी व्हायला हरकत नाही. असेल तर तांदळाचे पिठ मिक्स करुन केल्या तरी होतिल भाकरी.
ज्वारीच्या पिठाच्या भाकरी नाहीच झाल्या तर मग थालिपिठ करायचे त्याचे. ते असे.. डांगर(लाल भोपळा) किसुन घ्यायचे. त्यात लसुन, हिरवी मिरची, जिरे वाटुन घालायचे. हळद, मिठ घालायचे. असल्यास कोथिंबिर चिरुन आणि आवडत असल्यास कांदा चिरुन घालायचा. थालिपिठाला भिजवतो तसे पिठ भिजवुन तव्यावरच थालिपिठ लावायचे. मस्त दह्यासोबत खायचे.

Arch
Friday, November 03, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, ती उकड चपाती लाटताना आलू पराठ्यामध्ये जस आलूच मिश्रण ठेवतो तस त्या उकडीचा छोटा गोळा ठेऊन चपाती लाट. अगदी मऊसूत चपात्या होतील आणि उकडही फ़ुकट जाणार नाही.

Prady
Friday, November 03, 2006 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी मोदकाच्या बीबी वर आहे रे उकडीची कृती. सम प्रमाणात पाणी आणी पिठी घे. पाण्यात चवीला मीठ घाल. थोडं तेल घाल. उकळी आली पाण्याला की गॅस मंद करून पिठी घाल. मिनीटभर झाकण ठेव पातेल्यावर. मग डावाने नीट घोटून घे. ( रवी बरी पडते घोटायला). पुन्हा २ मिनिटं झाकण ठेव. लगेच खाली काढून मळून घे.

Bee
Friday, November 03, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोघींनाही धन्यवाद. मी मोदकाचा बीबी बघतो लगेच.

Prajaktad
Friday, November 03, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१) एक ग्लास पाण्याला एक वाटी तांदळाचे पिठे. हे झाले प्रमाण.>>>बी पाण्याचे प्रमाण जास्त वाटतय मला... बाकी जाणकार सांगतिलच.

Savani
Friday, November 03, 2006 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेवढं पीठ तेवढच पाणी. एक वाटी पीठ घेतलं तर एक वाटी पाणी घ्यायचं.

Sayonara
Friday, November 03, 2006 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाणकारांनी सल्ला द्यावा. माझं भाकरी करताना कुठे चुकतंय तेच कळत नाहीये.
काल मी बाजरीच्या भाकरी करता पीठ घेतलं त्यात एखाद दोन चमचे ज्वारीचं पीठंही मिसळलं. आणि कोमट पाण्याने पीठ भिजवलं आणि भिजवून झाल्यावर खूप मळलं. जरावेळ झाकून ठेवलं आणि मग भाकरी थापायला घेतल्या. त्यात आलेले प्रॉब्लेम्स :
पीठ खूप चिकट झालं त्यामुळे नीट थापताही येत नव्हतं आणि खूप चिकटत होतं त्यामुळे सहाजिकच मला छोट्या छोट्या भाकरी कराव्या लागत होत्या. आणि त्या तव्यावर टाकल्यावर फुगत वगैरे नव्हत्या. त्यामुळे भाकरी नाही तर थालिपीठ किंवा पराठे खातोय असं वाटत होतं. आता सांगा माझं कुठे चुकतंय आणि काय करावं.


Karadkar
Friday, November 03, 2006 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायो, भाकरीचे पीठ मळले की कधी ठेवायचे नाही लगेच भाकरी करायला घ्यायच्या. भाकरी करताना खाली पीठ टाकुन त्यावर चान मळलेला गोळा चपटा करायचा आणि ठेवायचा हाताला कोरडे पीठ लावुन घ्यायचे आणि मग थापायच्या म्हआणजे मग भाकरी हाताला चिकटत नाहीत. आणि पीठ झाकुन ठेवल्यामुळे भाकरी फ़ुगल्या नसाव्यात असा माझा अंदाज आहे.

Sashal
Friday, November 03, 2006 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीही स्वतः कधी भाकर्‍या केल्या नाहित पण मला बघून आणि ऐकून माहिती आहे ती अशी .. भाकर्‍यांचं पीठ भिजवून ठेवायचं नसत .. प्रत्येक भाकरीला लागेल तस भिजवायचं आणि लगेच भाकरी थापून (हाताला आणि परातीत किंवा पोळपाटावर कोरडं पीठ घेऊन) भाजायची .. आणि न फ़ुगण्याविषयी, जर फ़ार पातळ थापली गेली तरी नाहि फ़ुगणार .. आणि सायो, बाजरीची भाकरी करायला comparatively कठिण असते, तांदूळ आणि ज्वारीच्या तूलनेत बहुतेक ..

Karadkar
Saturday, November 04, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग सशल पातळ भाकरी पण छान फ़ुगतात ग. आमच्याकडे अगदी कागदासारख्या पातळ असतात भाकरी. ये घरी कधीतरी (पीठ घेउन ) करुन घालते.

Manuswini
Saturday, November 04, 2006 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कागदासरख्या पातळ?

थापता का लाटता तुम्ही भाकरी?
मी थापते पण फक्त आजीच नी आई थापून एवढ्या पातळ करु शकतात... माझ्या medium जाड्या होतात.

माझी एक bay area तील मैत्रिण, 'जेवायला ये मनु' माझ्या घरी
' मग मी हो म्हटले की हळूच दोन छान dish घेवून आलीस तर मज्जा.... तु छान करतेस मासे नी पुलाव
........ हे असे आमंत्रण :-), त्यात मोजून पाच भज्या तळणार नी चारदा विचारून एकदाच वाढणार
दिवे दिवे घ्या


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators