|
Bee
| |
| Monday, November 13, 2006 - 5:07 am: |
|
|
सीमाताई, मी भाकरीच्या पिठात एकदम वाटीभर पाण्याचे आधण कालवतो. मग ते पिठ चुरतो, पण ते इतके कमी असते की नीट मळता येत नाही. आता कमी पाणी घेत घेत करुन पाहीन. ही टिप छान आहे. शोनू खरच तुझी कल्पना एकदम भारी आहे. मनुस्विनी, नुसते फोटो नको. www.youtube.com वर file load कर.
|
Lalu
| |
| Monday, November 13, 2006 - 3:38 pm: |
|
|
lol PK, मग आता सगळे दादांचे पिक्चर पहायचे का? सावनी, त्या masa brosa मध्ये गरम पाणी घालावं लागणार नाही. ते जर चिकटच असतं. भाकरी करायला शिकायचं असेल तर हे पीठ बरं आहे. सहसा तुटत नाही, उचलायला पण सोपी.
|
Priya
| |
| Monday, November 13, 2006 - 4:03 pm: |
|
|
लालु, बहुधा तो संदर्भ 'मानिनी' चित्रपटामधला आहे. 'अरे संसार सांसार' या गाण्याच्या वेळचा. बघून सांगते नक्की. बाकी माझा आणि भाकरीचा संबंध वाचण्यापुरताच.
|
Prajaktad
| |
| Monday, November 13, 2006 - 8:26 pm: |
|
|
भाकरी coil वर कशा भाजणार? gas असेल तर जमते.. नुसत्या तव्यावर भाजुन होतिल का चांगल्या?
|
Prady
| |
| Monday, November 13, 2006 - 9:39 pm: |
|
|
देसी ग्रोसरी मधे स्टीलच्या जाळ्या मिळतात फुलके भाजायला. ती जाळी चालेल.
|
Bee
| |
| Tuesday, November 14, 2006 - 2:26 am: |
|
|
दुपानीतला तो लेख अनुदोननी दुर्गा भागवत गेल्यानंतर त्यांची आठवण म्हणून मायबोलिवर लिहून काढला होता. जर कुणाला दुर्गाबाईंचा तो लेख वाचायचा असेल तर खाली लिंक देत आहे, तिथे वाचा. /hitguj/messages/103385/37227.html?1077652997
|
Bee
| |
| Tuesday, November 14, 2006 - 3:02 am: |
|
|
मी नाचणीच्या भाकरीचे छायाचित्र इथे पोष्ट करतो आहे. दोन भाकरी छान पापुद्र्यासहीत होतात, उरलेल्या दोन कोरड्या, कडक होतात आणि बाजुला पिठाचे पांढरे वर्तूळ निर्माण होते. ते पाणी न लागल्यामुळे होत असावे का? हे असे पांढरे वर्तूळ का निर्माण होतात आणि ते काढून टाकावे लागतात. खालिल छायाचित्रात भाकरीला भेगा पडून ती उलल्यासारखी दिसते. हे असे का? नेमस्तक, मी साईझ कमी करुन इथे छायाचित्र पोष्ट केलेत. माझ्या रंगीबेरंगीच्या पानावर न टाकता इथे टाकले जेणेकरुन अधिक माहिती मिळू शकेल. शेवटी इथे काय अन तिथे काय, जागा तिच लागणार आहे. पण जर इथे नको असेल तर मी तिथे हे छायाचित्र पोष्ट करीन. धन्यवाद!
|
Manuswini
| |
| Tuesday, November 14, 2006 - 6:04 am: |
|
|
बी, तु काय एकदम पिठ भिजवुन ठेवतोस नी मग एकेक भाकरी करतोस? भाकरी टाकल्यावर पानी चोहो बाजुने लावले नाही तर अशी पांढरी कडा येते. पिठ झाडुन भाकरी तव्यावर टाक. भेगा पडली म्हणजे पिठ सुकलेले असेल थापताना असे मला वाटते.
|
Bee
| |
| Tuesday, November 14, 2006 - 6:10 am: |
|
|
मनु, मी ह्या भाकरी हातावर केलेल्या आहेत पोळपाटावर माझी भाकरी फ़िरत नाही तिथेच चिकटून बसते. आधी मी थोडी भाकरी पोळपाटावर थापून मग अलगद हातानी पिठ झाडून उर्वरीत भाकरी हातानीच करतो. मी सीमानी दिलेली वरची एक टिप वापरली आहे की थोडे थोडे पाणी लावून पिठ मळवायचे. मी तसेच केले, पुर्ण पिठ आधी भिजवून नव्हते घेतले. पाण्याचा चटका लागू नये म्हणून मी पाणी उकळून त्याला कोमट होऊ दिले. भाकरीलाही चहुबाजुने पाण्यानी सारवले होते.
|
Shonoo
| |
| Monday, November 20, 2006 - 12:51 pm: |
|
|
जमल्या! जमल्या! अनेक दिवस चालढकल करत पहिल्यांदा तांदळच्या भाकर्या केल्या आणि चक्क जमल्या! १ कप तांदळाचे पीठ विकतचे.( चांगले सुवासिक तांदूळ भिजवून, सावलीत सुकवून दळणे वगैरेचा स्कोप नाही!) १.२५ कप पाणी १ टी स्पून तेल .५ टी स्पून मीठ. एका स्टील च्या पातेल्यात पाणी, तेल आणि मीठ उकळले. मग गॅस मंद करून एक हाताने पीठ घातले आणि आणि दुसर्या हाताने( लाकडी उलथण्याने) भराभर ढवळले. मग गॅस वरून बाजुला घेऊन परत चांगले ढवळले. ओंजळ्भर कोमट पाण्याचा शिपका मारून, झाकून अगदी मंद गॅस वर ठेवले दोन मिनिटे. झाकणात थोडे थंड पाणी घातले. बरोबर दोन मिनिटांनी परातीत काढून वाटीच्या बुडाने मळले. मग थोडे हाताळण्याजोगे कोमट झाल्यावर आठ भाग करून, ओल्या कापडाखाली ठेवले आणि एकेक गोळा परत मळून, पिठी लाऊन पोळपाटावर पातळ लाटल्या आणि पाणी वगैरे न लावता दोन्ही बाजूनी तव्यावरच भाजल्या. पहिल्या ५-६ एकदम गोर्यापान, डाग न पडू देता भाजल्या. शेवटच्या दोन तीन नवर्याच्या फरमाइशीनुसार लहान मुलांच्या गालावर freckles असतात तशा दिसेपर्यंत भाजल्या. मनु आणि इतरांच्या रेसिपीने मालवणी चिकन केले होते. त्याबरोबर हाणल्या. शिळ्या कशा लागतील ते कळायला आता परत कराव्या लागतील :-) उगाच मी इतके दिवस बाउ करत होते. एकूण पंधरा मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला.
|
Prady
| |
| Monday, November 20, 2006 - 1:32 pm: |
|
|
१२ चमचे मीठ अगं काही व्रत वगैरे होतं का तुझं??
|
Shonoo
| |
| Monday, November 20, 2006 - 3:48 pm: |
|
|
I have fixed it now!
|
शोनू, करुन बघते गं मी पण आज. प्र, भारीच बाई विनोदी तू
|
Meeradha
| |
| Thursday, November 29, 2007 - 10:25 pm: |
|
|
तांदळाची भाकरी करताना उकड काढल्यावर पीठ ओल्या कापडात काढावे त्याची पुरचुंडी बांधुन ती नीट मळावी. हाताला भाजत नाहि.
|
Bee
| |
| Friday, November 30, 2007 - 6:31 am: |
|
|
ज्वारीच्या पिठाच्या भाकरी पिठ उकळून करतात ती पद्धत कुणाला माहिती आहे का?
|
Manuswini
| |
| Thursday, March 27, 2008 - 3:41 am: |
|
|
ही घ्या ज्वारीची भाकरी, हा रंगपंचमीचा बेत, चिकन साग,कटाची आमटी(आदल्या दिवशीचा कट),ज्वारीची भाकरी,
|
Princess
| |
| Friday, June 20, 2008 - 6:03 am: |
|
|
अहाहा, काय मस्त झाल्यात तांदळाच्या भाकरी. मला कल्पनाच नव्हती की तांदळाची भाकरी करणे हे इतके सोपे प्रकरण आहे शोनु, काय परफेक्ट प्रमाण दिलय ग... धन्यवाद बाय द वे मला ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी अगदी मस्त जमतात. तांदळाची भाकरी पहिल्यांदाच केली.
|
Dineshvs
| |
| Friday, June 20, 2008 - 11:43 am: |
|
|
गोव्यात तांदळाच्या भाकरीचा एक वेगळा प्रकार बघितला. तांदळाचे पिठ, नारळाच्या दूधात भिजवून घेतात. त्यात बारिक कापलेला कांदा आणि भोपळी मिरची घालतात. मीठ आणि थोडे कच्चे तेल घालून धिरड्याप्रमाणे तव्यावर ओतून करतात. पिठ डोश्यापेक्षा थोडे घट्ट भिजवतात. चवीला चांगला लागतो हा प्रकार, शिवाय करायला बराच सोपा आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|