Dineshvs
| |
| Thursday, January 19, 2006 - 5:27 pm: |
|
|
भाकरीवर चर्चा झाली होती आधी. पिठ जुने असेल तर गरम म्हणजे अगदी ऊकळते पाणी लागते. भाकरीच्या पिठात पाव पट ऊडदाचे पिठ मिसळले तर प्रथिनेहि वाढतात आणि थापणेच काय लाटणे पण जमते. नवशिक्यानी दोन प्लॅष्टिकच्या तुकड्याच्या मधे गोळा ठेवुन लाटुन प्रयोग करावा. जमतेच शक्यतो. भाजुन सोललेले वांगे, ऊकडुन कुस्करलेली गाजरे. वाटुन घेतलेले फ़णसाचे गरे, किसलेला कांदा व हिरवी मिरची हे सगळे ( वेगवेगळे ) घालुन म्हणजे यात भाकरिचे कोरडे पिठे मिसळुन छान चविष्ट भाकर्या होतात. या पदार्थांमुळे त्या नीट थापताहि येतात.
|
Ninavi
| |
| Thursday, January 19, 2006 - 5:30 pm: |
|
|
नवशिक्यांनी भाकरीच्या(कुठल्याही.. ज्वारी, बाजरी, तांदूळ्) पिठात थोडी कणीक मिसळून पहा. करायला सोप्या पडतात आणि छान मऊ होतात. (मी नाही हो घालत आता!)
|
Karadkar
| |
| Thursday, January 19, 2006 - 5:55 pm: |
|
|
भाकरिच्या पिठात जर गव्हाचे पिठ घातले तर भाकरीला डाग पडतात त्यामुळे ते तर नक्किच घालु नये. उडिदाचे पिठ मी कधी घातले नाही त्यामुळे त्याचा अनुभव मला नाही. तांदळाचे पिठ घालु शकता. त्याने पण चिकट पणा येतो पिठाला. गेले जवळपास १५-१७ वर्षे भाकरी करतेय .. त्यामुळे हे ठामपणे लिहु शकते.
|
Veenah
| |
| Friday, January 20, 2006 - 8:05 am: |
|
|
मिनोति तुझी भाकरीच्या पीठात गव्हाचे पीठ न घालण्याची टीप खरोखरच छान सान्गीतलीस कारण मी भाकरीत चिकट्पणासाठी थोडी कणीक वापरत होते त्यामुळे तु म्हटल्याप्रमाणेच भाकरी शुभ्र न होता डाग पडत असावेत. व थोडी वातड पण होते. भाकरी करताना मी शिकलेली महत्वाची गोष्ट म्हणजे पीठ चाळून घेणे खूप आवश्यक आहे म्हणजे भाकरीचे पीठ एकसन्ध येऊन भाकरीला विरी जात नाही
|
Zee
| |
| Thursday, July 27, 2006 - 7:11 pm: |
|
|
माझ्या तांदुळाच्या पीठाच्या भाकरीला खुपच चिरा पडतात. कोणी टिप्स देईल का?
|
Zee
| |
| Thursday, August 24, 2006 - 5:51 pm: |
|
|
कोणीच तांदुळाच्या पीठाची भाकरी करत नाही का? मी दर गुरुवारी करते या भाकर्या पण जमतच नाही.दुसरा प्रश्न असा आहे की ही भाकरी आपण पोळ्यांसारख़ी GAS वर भाजतो का?
|
Arch
| |
| Thursday, August 24, 2006 - 6:04 pm: |
|
|
Zee मोदकासाठी उकड काढतो न, तशी काढून घे आणि मग भाकर्या कर. अगदी छान लुसलुशीत होतात.
|
Chandrika
| |
| Thursday, August 24, 2006 - 6:09 pm: |
|
|
thodasa bhat pani ghalun blender madhun phirvun tyat tandalache pith ghalun bhakarya karate mazi maitriN. Khup chan hotat tya bhakarya. Karun bagha.
|
Zee
| |
| Thursday, August 24, 2006 - 6:12 pm: |
|
|
Thanks आर्च, पण आपण direct gas वर भाजतो का ग या भाकर्या की तव्यावर फ़क्त दोन्हीकडुन भाजायच्या? माझ्या भाकरीला चिरा जातत आणी थंड झाल्यावर खुपच वातड होतात.
|
Arch
| |
| Thursday, August 24, 2006 - 7:58 pm: |
|
|
Zee अग, एका बाजूला पाणी लाऊन दोन्ही बाजूनी तव्यावर भाजून घ्यायची आणि मग direct आचेवर परत दोन्ही बाजूनी भाजायची. उकड काढून कर अगदी चपातीसारख्या पातळ करता येतात आणि मुलायम पापुद्रे सुटतात. झाल्या झाल्या butter लाऊन ठेव. दोन दिवसपण छान मऊसुत रहातात.
|
Shmt
| |
| Thursday, August 24, 2006 - 7:58 pm: |
|
|
१) भाकरी तव्यावर टाकतान पिठाची बाजु वर ठेवायचि, त्यावर थोडे पाणी फ़िरवायचे. २) पाणी जरा सुकले की भाकरी उलटायची. ३) खालचि बाजु तांबुस झाली की, भाकरी तव्यावरुन काढुन, gas वर पाणी लावलेली बाजु ठेवायची भाकरी छान फ़ुगेल. ४) दुसरी बाजु पण gas वर भाजायचि. गरम गरम भाकरी तयार. चु.भु.द्या.घ्या
|
Bee
| |
| Friday, August 25, 2006 - 3:46 am: |
|
|
तुम्हा कुणाला हा problem आलाय का. जेंव्हा आपण भाकरी तव्यावर ठेवतो तेंव्हा भाकरीवरचे पिठ तव्यावर देखील उडते. कारण कितीही हळुवर भाकरी तव्यावर ठेवली तरी ती थोडी वरतून खाली पडते आणि मग कडेवरची पिठ तव्यावर सांडते. जेंव्हा आपण पाण्याचा हात फ़िरवतो त्यावेळी काठ अगदी कोरडे राहू नये म्हणून पाणी भाकरीच्या काठावर देखील फ़िरवतो. असे जर केले तर भाकरीची कडा तव्याला चिकटते. ती व्यवस्थित होते, निघतेही नीट. पण पिठाचा थर तव्यावर चिकटल्यामुळे तव्यावर तो थर जळतो. मग पुढल्या भाकरींवर काळे चट्टे पडतात. तसेही carbon पोटात जाणे चांगले नाही. हे असे पिठ लावून केलेल्या भाकर्या करताना होतेच. जर Foil वर थापून भाकरी केली तर पिठ आपण लावत नाही. तरीही पापुद्रा सुटण्यासाठी पाणी लावावेच लागते नाहीतर बिगरपाण्याचा पापुद्रा सुटत नाही. मग अशावेळी देखील थर तव्याला चिकटतो. जर चारपाच भाकरी करायच्या असतील तर पुढील भाकरींवर काळे डाग दिसतात. माझी आई एक भाकरी झाली की हाताच्या ओंजळीने तव्यावर पाणी सोडते आणि मग त्या पाण्यामुळे तवा धुतला जातो आणि सोडलेल्या पाण्याची वाफ़ होते. तवा परत स्वच्छ होतो. मला मात्र ही IDEA जमतच नाही. आई अगदी छान करते. तुम्ही कसे करता? की मी सांगितलेला प्रश्न तुम्ही अनुभवलाच नाही कधी? माझे असे नियमित न चुकता होते. मी एक भाकरी झाली की परत तवा धुवुन स्वच्छ करतो. पण खरच कंटाळा येतो. परत मग तवा गरम करा रे.. वाट बघा रे.. उभे रहा रे.. हे येतेच.
|
Dineshvs
| |
| Friday, August 25, 2006 - 4:05 am: |
|
|
बी, पिठ लावलेली बाजु तव्यावर टाकायची नसते.तसेच भाकरी तव्यावर टाकण्यापुर्वी किंचीत झटकायची असते. वर पाणी लावल्यामुळे वरचे पिठ भिजुन भाकरीत जिरते. तरिहि पिठ तव्यात जळले तर फडक्याने तवा पुसत जा, परत धुवु नकोस. असे केलेस तर तवा लवकर खराब होईल. गॅसवर भाकर्या डायरेक्ट भाजल्या तरी चालतात, पण त्या ज्वारीच्या पिठाच्या असाव्यात, कारण त्या मजबुत असतात. तांदळाच्या भाकर्या लवचिक असल्याने बर्नर झाकला जातो आणि गॅस विझतो. त्यापेक्षा त्यासाठी एक खास जाळी मिळते ती वापरावी.
|
Bee
| |
| Friday, August 25, 2006 - 4:17 am: |
|
|
दिनेश, मी पिठाची बाजू आधी वरच ठेवतो. मग पाणी लावून ती बाजू खाली घेतो. मी भाकरी तव्यावर टाकण्यापुर्वी फ़ुंकर मारतो म्हणजे पिठ थोडे कमी होते. भाकरी झटकणे मला कठिणच वाटते. ती हातात धरतानाच भेगाळते. भाकरी भाजताना मी इथे एक जाळी आणली. तिच्यामुळेच माझ्या भाकर्या आता फ़ुगतात छान. कापडाची टिप वापरुन पाहीन दिनेश..
|
Manuswini
| |
| Wednesday, September 20, 2006 - 12:14 am: |
|
|
आणखी एक टिप्स, भाकरीची सरळ उकडच करून घ्यायची. मी तांदूळाची अशीच उकड करून,लाटून भाकरी करते. मोदकासारखीच उकड करायची नी छान मळून लाटून भाकरी तयार. Atleast it works well for तांदूळ भाकरी. ज्वारी वगैरे मी नेहमी गरम पाण्यात भिजवते. छान होते.
|
Bee
| |
| Monday, October 09, 2006 - 9:10 am: |
|
|
तुमच्यपैकी कुणी मिसळची भाकरी करुन पाहिली आहे का? ही भाकरी सोपी आहे. एकतर ती पोळीसारखी लाटल्या जाते आणि पापूद्रा मात्र भाकरीप्रमाणे सुटतो. ह्यात जितक्याला तितकेच बाजरीचे आणि उडीदाचे पिठ घ्यायचे असते. जर बाजरं आणि उडीदं एकत्र दळून आणल तर आणखीच झ्याक. पण घरी दोन पिठं मिसळून केली तरी मिसळीची भाकरी छान होते. ही भाकरी खास करुन पौष महिन्यात करतात कारण त्यावेळी थंडी फ़ार असते. ह्या भाकरीत मात्र न विसरता मिठ घालावं लागत. ह्या भाकरीबरोबर तिळाची चटणी खाण्याची प्रथा अधिक आहे कारण तिळदेखील उष्ण असतात आणि पौष महिन्याच्या दिवसात छान अंगी लागतात. ही भाकरी अगदी पोळीप्रमाणे लाटल्या जाते. मी कालच करुन बघितली. पहिल्याच प्रयत्नात जमली :-)
|
पण बी ही करायची कशी ती सविस्तर कृती सांगा ना. म्हणजे उकड काढुन की नुसतीच पोळीची कणिक भिजवतो तशी?? मी भाकरी कधीच केल्या नाहीत पण मला खुप आवडतात. ] जरा सावकाश आणि सविस्तर सांगा म्हणजे माझ्यासारखीचा पहिलाच प्रयत्न असुनही यशस्वी होईल आणि ही भाकरी मऊ होते ना की कडक?[उडीद आहेत म्हणुन विचारले]
|
Samai
| |
| Monday, October 09, 2006 - 10:38 am: |
|
|
माझ्या भाकरीला विरी कधीच जात नाहीत, थापताना छान थापुन होते पण तव्यावर टाकल्यावर मात्र भाकरीला फोड येतात आणि मग सगळी भाकरीच बिघडते, काय चुकत असु शकेल मी ज्वारीची गार पाण्याची भाकरी करते
|
Bee
| |
| Monday, October 09, 2006 - 10:55 am: |
|
|
मनिषा, मी आधी भाकरीसाठी पाण्याचे आधण ठेवतो आणि मग ते कोमट होऊ देतो. नंतर मग मिसळीचे पिठं घेउन ते एकत्र भिजवितो. माझी बहिण म्हणते, भाकरीचे पिठ भिजवताना ते खूप वेळ एकत्र करत बसावे लागते तरच ते वळण्याइतपत चिवट होते. मी तसेच करतो. भाकरीचे कुठलेही पिठ एकावेळेस एकच भाकरी होईल इतकेच भिजवावे लागते. हे असे का ह्याचे कारण मला शोधून मिळाले नाही. ह्यात उडीद आणि बाजरी असल्यामुळे भाकरीला कणकेसारखा चिकटपणा येतो आणि भाकरी पोळ्याप्रमाणे लाटता येतात. असे समजायचे की आपण चपात्या करतो आहे, भाकरी नाही. मी ह्या भाकरी किंचीत जाड ठेवतो आणि भाजताना अगदी फ़ुलक्यांप्रमाणे भाजतो. छान टम फ़ुलतात. वासही छान खमंग येतो. मी तर म्हणेल की तू गिरणीतुनच भाजलेले उडीद आणि कच्चं बाजरं एकत्र दळूण आण आणि ह्या भाकरी करुन बघ. तुला नक्की जमतील. सोप्पा प्रकार आहे. अन चविष्ट देखील. कच्च बाजरं म्हणजे न भाजलेले.
|
>>>भाकरीचे कुठलेही पिठ एकावेळेस एकच भाकरी होईल इतकेच भिजवावे लागते. हे असे का ह्याचे कारण मला शोधून मिळाले नाही.<<< खरंच का? पण मग गावाकडल्या बायका [मी चित्रपटातच पाहिले आहे]केवढाल्या भाकर्या बडवतात[घरात खुप माणसे असतील तर] त्या प्रत्येक भाकरीला स्वतंत्र पीठ भिजवत बसल्या तर किती वेळ जाईल त्यांचा ह्याचं स्पष्टीकरण कोणी देऊ शकेल काय?
|