Savani
| |
| Thursday, September 07, 2006 - 1:20 pm: |
|
|
अश्या छोट्या थालीपीठांना आम्ही चांदक्या म्हणतो. मला तशीच आवडतात.
|
Moodi
| |
| Thursday, September 07, 2006 - 1:24 pm: |
|
|
हो हो आठवले. माझ्या सासुबाई पण हेच म्हणतात.
|
Lopamudraa
| |
| Thursday, September 07, 2006 - 2:24 pm: |
|
|
तुझ्या वरच्या post मधे 'कांदे न पचण्याचा भाग कृपा करून काढून टाक! इतरांना तो भाग वाचून हे थालीपीठ खाण्याची इच्छा>>>......... मृण्मयी आम्ही कांद्याचे थालिपिठ.. कांद्याची चटणी.. वर तोंडी लावायला कच्चा कांदा... अस कितिही कांदामय खाउ शकतो.. आणि तुझी थालिपिठाची कृती तर नक्की करुन बघणार.. !!! रोज कमित कमी दोन कांदेखावे त्याने brain power चांगली राहते अस कुठेतरी वाचलय..
|
Amayach
| |
| Thursday, September 07, 2006 - 3:09 pm: |
|
|
वरिल थालिपीठात बेसन आणि कणकेबरोबर, ज्वारीचे पीठ भाजुन घातले तर आणखिन खुसखुशित होतील आणि पचायला देखिल मदत होईल. मी नेहेमीच ज्वारीचे पीठ मिसळते. आणि तसेही इतर पीठे (म्हणजेच कणिक आणि बेसन) भाज़ल्यावर पचायला हलकी होतात.
|
Supermom
| |
| Thursday, September 07, 2006 - 3:13 pm: |
|
|
मृ, खूपच छान रेसिपी. आजच संध्याकाळी करेन. पण माझ्याकडची धणेपूड संपलीय ग. चवीत विशेष फ़रक नाही ना पडणार? आवळ्याचं लोणचं मी नेहेमीच करते. कृती विशेष नसते माझी. नेहेमीच्या लोणच्यासारखीच. फ़क्त आधी उकडून घ्यायचे आवळे. माझा अनुभव आहे की फ़्रोजन आवळे जरा कमी उकडावे लागतात. अन उकडलेल्या आवळ्यांची चटणी तर.... अहाहा
|
Maitreyee
| |
| Thursday, September 07, 2006 - 3:44 pm: |
|
|
वा! मस्त वाटत आहे कांद्याचे थालीपीठ बी तुझ्या पोस्ट बद्दल इतरांनी जे सांगितलय त्यावर विचार कर! उडव बघू ते! रेसिपीचा बीबी आहे हा, तुझं ते वमन वगैरे इकडे नको बाबा!
|
Mrinmayee
| |
| Thursday, September 07, 2006 - 4:11 pm: |
|
|
तुम्हा सगळ्यांना हे थालीपीठ करून बघावसं वाटतंय हे पाहून बरं वाटलं! सावनी, तु म्हणतेस तश्याच छोट्या चांदक्या लावून छान होतात थालीपीठं. बीडाच्या तव्यावर ही थालीपीठं केली तर मंद आचेवर करूनही चिवट होत नाहीत. सगळ्यांकडे बीडाचे तवे नसतात, तेव्हा नॉनस्टिकवर करावी लागतात. मूडे, हो गं तेलापेक्षा पाण्याचा हात लावून जास्त सोपं पडेल! अमया, ज्वारीच्या पिठाची आयडीय छान आहे. करून बघायला हवं! सुपरमॉम, मला वाटंत नाही धणेपावडरीशिवाय काही अडेल! आवळ्याच्या लोणच्याची कृती आईकडे जरा वेगळी आहे. ती करते तेव्हा हे लोणचं ते नक्कीच कैरीच्या किंवा मिरचीच्या लोणच्यासारखं नसतं. ती रायावळ्याचं पण लोणचं करायची. पण ते पटकन संपवावं लागतं. सु. मॉ. तु तुझी रेसिपी टाक नं आवळ्याच्या लोणचाची.
|
Moodi
| |
| Thursday, September 07, 2006 - 4:16 pm: |
|
|
मृण्मयी इथे बघ मी दिली होती आधी ज्वारीच्या पीठाविषयीची कृती, पण फारच थोडक्यात. /hitguj/messages/103383/103679.html?1134058359 हे थालीपीठ करुन तर बघणारच कारण कृती खमंगच दिसतेय.
|
Chafa
| |
| Thursday, September 07, 2006 - 4:23 pm: |
|
|
५) मी वर जसे म्हंटले की पीठ थोडे पातळ झाले होते. त्यामुळे काय होते की, थालीपीठ लवकर भाजली जातात आणि आतला भाग कच्चा राहतो, अर्थात कांदापण कच्चा राहतो. मग तो असा वमन करुन बाहेर काढावा लागतो. जे प्रत्येकालाच जमत नाही. जर कांदा पचला नाहीतर गुंगी आल्यासारखे होते. ६) तू म्हणालीस की थालीपीठं गोड होतात. पण तसे नाही, उलट मला वरतून साखर घालावी लागली तेंव्हा चव आणखी छान आली. कांद्याची गोड चव तेंव्हाच येईल जेंव्हा कांदा छान खरपूस भाजल्या जाईल. >>> माफ कर हं बी, पण मला फार म्हणजे फारच हसायला आलं हे वाचून. त्याबद्दल तुला ठेंकू. ~~~D
|
Mrinmayee
| |
| Thursday, September 07, 2006 - 4:24 pm: |
|
|
Thanks मूडे! पुढल्या वेळी अशी भाजणी करीन!
|
Moodi
| |
| Thursday, September 07, 2006 - 4:36 pm: |
|
|
मृण्मयी आता मलाच प्रश्न पडलाय की भाजणी यावेळी आणता येईल की नाही.
|
Robeenhood
| |
| Thursday, September 07, 2006 - 6:11 pm: |
|
|
लोपे, रोज दोन कांदे खावेत त्याने ब्रेन पाॅवर चांगली राहते असे कुठेतरी वाचलेय... हे तूच कुठेतरी लिहिलेले पुन्हा वाचले असशील!!
|
Deshi
| |
| Thursday, September 07, 2006 - 6:34 pm: |
|
|
अर्थात कांदापण कच्चा राहतो. मग तो असा वमन करुन बाहेर काढावा लागतो. जे प्रत्येकालाच जमत नाही. जर कांदा पचला नाहीतर गुंगी आल्यासारखे होते. मला हे वाचल्यावर हसुन गुंगी आली. बी तुम्हाला पंचकर्मावर खुप माहीती आहे असे वाटते माझा एक प्रश्न आहे, असे बरेचदा खुप हसल्यावर गुंगी आली तर परत कांदा नाकाला लावल्यावर शुध्दीवर येता येते का?
|
Mrinmayee
| |
| Thursday, September 07, 2006 - 7:58 pm: |
|
|
चाफा, रॉबिन, लोपा आणि देशी, तुमच्या posts लई म्हणजे लईच entertaining !!!!!
|
Bee
| |
| Friday, September 08, 2006 - 1:43 am: |
|
|
जाउ द्या.. ज्यांना उडवायचे असेल माझे पोष्ट ते उडवू शकतात. मला वाह्यातपणा करायला जमत नाही आणि कुणी केलेला आवडत नाही. निरागसपणा देखील असतो एक तो कुणात नसेल तर असेच हसायला खिदळायला जमत त्यांना इतरांवर.
|
तू निरागस आहेस होय? बर बर....पण ते दुसर्यांनी म्हणले पहिजे..... दिवे घे बर का
|
Bee
| |
| Friday, September 08, 2006 - 3:35 am: |
|
|
मग आपण साधी माणसं आहोत असेही दुसर्यांनीच म्हणायला हवे स्वतःच असा शिक्का लावून का मिरवायचे. जसे तुम्हाला माहिती आहे तुम्ही खूप साधे आहत तसे मग मलाही माहिती आहे की काकणभर का असेना मी इतरांपेक्षा निरागस आहे बाकी इतर त्याला विचारशक्ती नाही असे म्हणतात तर म्हणून देत बापडे...
|
रोबिन्हूड... तुम्ही कांदे खात नाही हे माझ्या लक्षात आले बर का!!!.. पण (नाकाने) कांदे सोलण्याची practise चांगली आहे ह..तुमची..(दिवे दिवे दिवे.. मी ही घेतलेत थोडे तुम्ही पण घ्या..)
|
बी मी खरेच मजेने म्हणत होते...काही हेतु मनात ठेऊन नव्हे तुम्ही बरेच मनाला लावून घेतलेले दिसते... anyway...तुम्हाला तसे वाटले आसेल तर sorry
|
लोपे कळला बरं टोमणा! मी कांदे खात नाही म्हनजे मला ब्रेन पाॅवर नाही असे तुला सुचवायचे ना! न कळण्याइतका काही मी 'हा' नाही! (इतका नाही!!) यातलं थाळीपीठ वगळून सर्व पोस्ट उडवाव्यात. मूळ शब्द थाळीपीठ आहे. थाळीला पीठ थापून बनविलेले या अर्थाने...
|