(बायका म्हटल की पोळपाट लाटण्यावरच येतात शेवटी! ) माझ्याकडे संगमरवरी पोळपाट आहे. तो फार जड पडतो उचलायला. बाजारात जे प्लास्टिक चे पोळपाट मिळतात. उंच असतात. बाथरूम मध्ये ठेवण्यासाठी प्लास्टिक ची स्टुल्स मिळतात त्या प्रकारचे. कोणी वापरला आहे का असा पोळपाट? चांगला आहे का? मला घ्यायचा आहे होळीच्या आधी.
|
Psg
| |
| Friday, March 10, 2006 - 4:59 am: |
| 
|
हो मी रोजच वापरते! छान आहे अगदी, आणि अग अगदी plastic नसतो तो, काहीतरी वेगळच synthetic material असत, त्यामुळे तसा plastic पेक्षा जड असतो. एक बघ पण.. actual पोळपाट आणि त्याचे पाय हे जोडलेले असतात. तो joint व्यवस्थीत आहे ना ते नीट बघून घे, नाहीतर पोळपाट धुतल्यानंतर त्यात पाणी जाऊन बसते! बाकी छान आहे! recommended
|
Prady
| |
| Friday, March 10, 2006 - 1:40 pm: |
| 
|
शर्मिला शक्यतो असा पोळपाट न वापरलेलाच बरा. वर सान्गितल्या प्रमाणे त्यात पाणी जाऊन बसता आणी त्यामुळे ते खराब ही लवकर होत.
|
पूनम, आणला ग मी आत्ता तो पोळपाट. Fibre चा पोळपाट म्हणतात त्याला. ७० रुपये किंमत आहे. लाटणं पण fibre चच आहे. खूप उंच नाही अंदाजे ३ ते ४ इंच असेल उंचीला. आता वापरून बघते आणि मग सांगते कसा वाटला ते. प्रज्ञा, पूनम मला नक्की कळत नाही आहे कि पाणी नक्की कुठे जाऊन बसतं? joints मध्ये का?. कारण पूनम ने सांगितल्याप्रमाणे मी दुकानात पोळपाट उलटा करुन त्याचे पाय बघितले. ते जोडलेले नाहीत. अक्खा पोळपाट moulded आहे. पण पायांच्या तळाला रबर लावलेल आहे. त्यात पाणी जाऊन बसतं का (खूप चिकित्सा करतेय ना मी?)
|
Supermom
| |
| Friday, March 10, 2006 - 3:09 pm: |
| 
|
पोळपाटाचं तरी एक ठीक आहे,पण मी इकडे येताना तुळशीबागेतून आणलेल्या त्याच पद्धतीच्या लाटण्यात पाणी जाऊन बसतय. आता कोणीतरी भारतातून इतक्यात आले तर ठीक,नाहीतर
|
supermom, इथे लाटणे मिळते की! माझे भारतातून आणलेले कधीच खराब झाले, तेव्हापासून मी इथले wal mart मधलेच लाटणे (Rolling Pin) वापरते. काहीच प्रॉब्लेम नाही येत.
|
Milindaa
| |
| Friday, March 10, 2006 - 3:46 pm: |
| 
|
काहीच प्रॉब्लेम नाही येत << तुला कशाला येतोय प्रॉब्लेम, निराकार कोठे गेला रे..
|
आत्ता गं बया! लाटण्यात पन पानी जातं व्हय? अस कसं पाणी जातं सुपरमॉम? तुझा पोस्ट वाचल्यावर मी लगेच माझ लाटण तपासून पाहीलं कुठे पाणी जायला मार्गच नाहीये गं. मला वाटत तुमची ही पोळपाट लाटणी moulded नाहीयेत. माझ अखंड आहे लाटण.
|
Supermom
| |
| Friday, March 10, 2006 - 4:21 pm: |
| 
|
हो ग शर्मिला,खरच पाणी जातंय. माझ्या लाटण्याचं मटेरियल तू म्हणतेस तसंच आहे,पण दोन्ही टोकाला छोटा फ़िरकीसारखा गोल पार्ट आहे.तो उघडला की लाटण्याच्या आतला पोकळ भाग दिसतो. (याहून जास्त मला वर्णन नाही ग करता येत.) इतके दिवस ठीक होतं, पण आता त्यातल्या एका फ़िरकीला छोटासा तडा गेलाय.त्यातून पाणी आत जातंय. पुढच्या वेळी नवर्याच्या पाठीवर जरा हळू आपटीन म्हणते.
|
Moodi
| |
| Friday, March 10, 2006 - 4:27 pm: |
| 
|
एस एम तू महान आहेस.  
|
ओह ओके! got it now मी परत एकदा लाटण पाहील आणि यावेळेस उघडून पाहीलं. (आणून तीन तास पण नाही झाले, लगेच dismantle करून झालं). आता मला पोळपाटात पाणी कस जात तेही लक्षात येतय. म्हणजे धुवायलाच नको हा पोळपाट. काय गं बाई तरी! लाकडी पोळपाट कुजतो. संगमरवरी जड पडतो. आणि फायबर च्या पोळपाटात पाणी जातं. करायच्या तरी कश्या पोळ्या माणसानं? माझ्या लाटण्यात पाणी गेल तर मी नवर्याच्या पाठीत जोरात आपटेन म्हणजे पाणी निघुन जाईल लाटण्यातलं
|
Moodi
| |
| Friday, March 10, 2006 - 4:40 pm: |
| 
|
शर्मिला तू पण कहर करतेस, मी तर पोळपाटाची खालची फिरकीच तोडली खाली पाडुन. पण अग पोळ्या तू करणार ना मग माणुस ला कशाला बोलावतेस? मी मागे इथे पित्झाचे दमदार खुप जाड लाटणे आणले, पोळ्या लाटुन त्याने खांदे इतके दुखले की बस. आताचे बरे आहे, पोळपाट लाकडीच आहे अन लाटणे पण लाकडी. 
|
Supermom
| |
| Friday, March 10, 2006 - 4:43 pm: |
| 
|
बघ मूडी, माझ्यासारख्याच आणखीही महान स्त्रिया आहेत मायबोलीवर. शर्मिला, हा घे तुला मोठ्ठा
|
Prady
| |
| Friday, March 10, 2006 - 5:30 pm: |
| 
|
मला अस वाटता की मेटल चा पोळपाट च जास्त बरा. इथे सहा महिन्या पूर्वी आले तेव्हा कूकर, सुमीत चा मिक्सर आणी पोळपाट लाटण कुठल्याहि परिस्थितीत आणच अस नवरा म्हणाला. आमचा नवीनच सन्सार म्हणुन आई आणी मी अगदि भरपूर सन्शोधन करून ह्या वस्तू घेतल्या. आई तर अगदी प्रत्येक दुकानात लाटणा मगून ते पोळपाटावरून फ़िरवून पहायची बलन्स होतय का नीट. तेव्हा अस कळाल कि फ़ायबरच लवकर खराब होत.
|
Mita
| |
| Friday, March 10, 2006 - 6:01 pm: |
| 
|
अगदि अगदि प्रद्या..मी पण हेच सांगणार होते.मेटलच पोळपाट बेस्ट. स्वच्छ धुता येत साबण लावुन. आणि वर्षानुवर्षे चांगले रहाते.
|
Karadkar
| |
| Friday, March 10, 2006 - 6:35 pm: |
| 
|
US मधे लाकडाचे चाॅपिन्ग बोर्ड मिळतात ते मी वापरते पोळी लाटायला. गेले ७ वर्षे वापरतेय, रोज धुते काहिही झालेले नाहिये त्याला. अगदी दिशवाॅशर मधे पण घालते. त्याला उंची नसते पण इथल्या platform च्या उंचीमुळे मला ते बरे पडते. माझी एक मैत्रिण पराठे नेहेमी तेलावर लाटते का ते मला माहीत नाही आणि तिचा पोळपात इतका तेलकट झालाय की बास. तसे करणार असाल तर सरळ aluminium foil पोळपाटाला लावुन ते कय जे तेल लावायचे असेल ते लावा. पोळ्या करताना त्या पोळीला तेल लावा तव्यावर कडेने सोडु नका. ते तेल जळुन जळुन तव्याचा रंग नामांकीत होतो. मझ्या कित्येक मैत्रिणी ते circulon, calphalon चे महागातले तवे आणुन तेलाने खराब झाले म्हणुन ६ महिन्यात फ़ेकुन देतात. पण कडेने तेल लवणे सोडत नाहित.
|
Madhura
| |
| Friday, March 10, 2006 - 9:37 pm: |
| 
|
karadkar, agadi agadi . mi pan chooping board vaparate laTaayalaa. Mi tar plastic che chopping board miltat na kasehee roll vagere hou shaktat te vaaparate. Dishwasher madhe chaltat, patkan dhun vaaLat ghaalataa yetat. Majhya fiber chya polpaatachee ashich vaat lagli paani jaun mhanun mag haa upaay shodhalaa.
|
Psg
| |
| Saturday, March 11, 2006 - 5:25 am: |
| 
|
पाणी कुठे जाऊ शकत सांगते.. ज्यावर आपण पोळी लाटतो तो गोल हा एक भाग आणि अजून एक गोल आणि त्याला पाय अस दुसर भाग. हे दोन्ही चिकटवलेले असतात. पोळपाटावर नीट बघ, पाय्र्यांसारखे २-३ steps आहेत. तिथे पाणी जायची शक्यता असते. पण माझ्या fibre च्या पोळपाटाला कहीही झालेल नाही.. गेले ७-८ वर्ष तरी आहे. अगदी व्यवस्थीत आहे. आणि माझे लाटणे लाकडीच आहे, त्यामुले लाटण्यात पाणी जाते ऐकून मीही चाट पडले होते! शर्मिला आता तू हा पोळपाट आणला आहेसच तर हो जाओ शुरु.. बाकी सगळे पोळपाट माळ्यावर टाकलेस तरी चालतील
|
अगं पूनम, हसू नकोस. पण हे सर्व पोस्ट वाचून मी इतक्या वेळा त्या पोळपाटाची आणि लाटण्याची scrutiny केली ना काही विचारु नकोस. खरच सांगतेय. खालून, वरून, साईडने पोळपाट निरखून पाहीला. अगदी सोन्याचा दागिना बघावा तस. supermom म्हणाली कि लाटण्यात पाणी जात म्हणुन लाटण उघडुन पण पाहीलं. आता एक भन्नाट आयडीआ आलीये डोक्यात. जर पोळपाटात पाणी जातय अस लक्षात आल तर चक्क joints ला m-Seal लावायच. आणि त्यातून गेलच पाणी तर चक्क फेकून द्यायचा. ७० रुपये तर किंमत आहे. वर्ष गेलं तरी वसूल झाले पैसे. जास्त विचार नाही करायचा. आता हे sssssss फेकले मी जुने पोळपाट माळ्यावर...धाड्ड्ड... धुडुप्प्प!!!
|
Psg
| |
| Saturday, March 11, 2006 - 6:58 am: |
| 
|
ए बाई, अशी वेळ येणार नाही! पोळपाट धुवुन झाला की उघड्या जागी वाळायला ठेव, लगेच कपाटात/ कप्प्यात नको, म्हणजे सगळ पाणी जाईल सुकुन! आणि आता होळी आलीच आहे.. तो tuffware चा तवा आणि fibre चे पोळपाट-लाटणे! सही combination for पुरणपोळ्या!!
|
पुरणपोळ्या ना? करायच्याच आहेत. म्हणुन तर आणला मी पोळपाट होळीच्या आधी. आणि पूनम, माझा anodised तव्यावरचा अभिप्राय वाचून तु आणलास लगेच. आणि तुझा अभिप्राय वाचून मी पोळपाट. balance sheet tally झाली आपली आता दोघी मिळुन या सही combination वर पुरणपोळ्या करुया चल.
|
Psg
| |
| Saturday, March 11, 2006 - 7:43 am: |
| 
|
त्यापेक्षा ते combination आपण अस करू.. तु कर मी खाते! नाही ग जमत पुपो! त्या वाटेला जायलाच नको वाटत.. आणि सा.बाई आहेत ना..
|