|
Gurudasb
| |
| Friday, March 16, 2007 - 1:01 pm: |
|
|
भारतीय नववर्ष सुखासमाधानाचे , आरोग्यदायी व भरभराटीचे जावो .
|
EBC radio वर कळलं की बी आणि आमीर खान चा वाढदिवस एकाच दिवशी आहे शुभेच्छा बर का दोघांना
|
Giriraj
| |
| Friday, March 16, 2007 - 2:54 pm: |
|
|
बा 'ब्या' (हे बी चे संबोधन आहे) तुझ्या आडदिवसाबद्दल शुभेच्छा रे
|
धन्यवाद झकासराव, सर्व मायबोलीकरांना गुढिपाडव्याच्या शुभेच्छा! तात्या. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=1&post=930388#POST930388
|
Dhulekar
| |
| Saturday, March 17, 2007 - 11:59 pm: |
|
|
हे नवीन वर्श तुम्हा सगळ्यन्ना आनंदचे, भरभरटीचे, सुखा समाधानाचे आणी आनंदाचे जावो. या नवीन वर्शात तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण होवोत. धुळेकर
|
Zakki
| |
| Sunday, March 18, 2007 - 12:30 pm: |
|
|
नविन वर्षात सर्व मायबोलीकरांना सुखसमाधान, समृद्धि व दीर्घायुरारोग्य लाभो.
|
Bee
| |
| Sunday, March 18, 2007 - 2:29 pm: |
|
|
गुढीपाडव्याच्या सर्व मायबोलिकरांना भरपूर शुभेच्छा!
|
Supermom
| |
| Monday, March 19, 2007 - 12:53 am: |
|
|
गुढीपाडव्याच्या सर्वांना अनेक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे जावो.
|
Jayavi
| |
| Monday, March 19, 2007 - 3:37 am: |
|
|
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.....! नवीन वर्ष सुखाचे जावो
|
Shyamli
| |
| Monday, March 19, 2007 - 3:56 am: |
|
|
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.....! नवीन वर्ष सुखाचे जावो
|
Dineshvs
| |
| Monday, March 19, 2007 - 4:07 am: |
|
|
नूतन वर्ष आपल्या सर्वाना आनंदाचे, आणि सुखसमृद्धीचे जाओ.
|
Dineshvs
| |
| Monday, March 19, 2007 - 4:10 am: |
|
|
Admin नविन उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा. याला मायबोलीकरांचा उदंड प्रतिसाद मिळो.
|
Neel_ved
| |
| Monday, March 19, 2007 - 5:26 am: |
|
|
हे नविन वर्ष मायबोलिला कमी Fake ID join होण्याचे जाओ... नविन वर्षाच्या शुभेच्छा....
|
Mahesh
| |
| Monday, March 19, 2007 - 6:06 am: |
|
|
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नविन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धिचे आणी भरभराटीचे जावो
|
राम राम, सर्व मायबोलीकरांना आणि मायबोली प्रशसनाला हिंदुनववर्षदिन गुढीपाडव्यानिमित्त तात्या अभ्यंकरच्या अनेकोत्तम शुभेच्छा! आपल्या सर्वांकडून उत्तम वाचनाची, लेखनाची, संगीत गायन-श्रवणाची आणि उर्वरीत १४ विद्या ६४ कलांची, सामाजिक बांधिलकीची गुढी उभारली जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. मायबोली प्रशासन, >>गेल्या काही महिन्यांपासून मायबोली स्वत:च्या पायावर उभी रहावी आणि एका व्यक्तिवर ती अवलंबून न रहाता एका संस्थेत तिचे रुपांतर व्हावे या दृष्टिने प्रयत्न चालु होते. माझ्या मते ही फार मोठी गोष्ट आहे. कुठलीही संस्था, वा संकेतस्थळ हे सुरू करण्याचे श्रेय नक्कीच एका व्यक्तिकडे असते. परंतु कालपरत्वे ती संस्था वाढल्यानंतर केवळ मालक म्हणून कुणा एका व्यक्तीच्या मर्जीपेक्षा, संबंधित संस्था हीच नेहमी मोठी असते. जिथे अनेक व्यक्ती मिळून एखादी संस्था मोठी होते, नांवारुपाला येते तेव्हा त्या संस्थेत संस्थापकांच्या बरोबरच इतरही अनेक व्यक्तींचा, सभासदांचा मोलाचा वाटा असतो. मायबोलीने मायबोलीचे corporatization करून या दृष्टीने एक आदर्श पाऊल टाकले आहे. मराठीतील इतरही काही संकेतस्थळंनी भविष्यातील स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी(!) मायबोलीने घालून दिलेला हा धडा अवश्य गिरवावा असे माझे मनोगत मी येथे व्यक्त करून मायबोलीचे मन:पूर्वक अभिनंदन करतो! >> मायबोलीच्या वाटचालीत इतरांचेही सहकार्य घेण्याचा आणि इतरांनी त्यावर लक्ष ठेवण्याचा मार्ग त्यामुळे सोपा झाला आहे. एखाद्या संकेतस्थळाच्या वाटचालीत, कामकाजात केवळ एका व्यक्तीची मर्जी, मुजोरी न चालता त्यात इतरांनाही काही स्थान आहे हेच मायबोलीने दाखवून दिले आहे, असे मला आनंदाने म्हणावेसे वाटते! >>गुढीपाडव्याच्या शुभदिवशी, मायबोलीचा पुस्तक विक्री विभाग सुरु करत आहोत. सदरच्या उपक्रमाबद्दल मायबोलीचे मन:पूर्वक अभिनंदन आणि उपक्रमाच्या पुढील वाटचालीकरता अनेकोत्तम शुभेच्छा! >>शेवटी मराठी वाचकांनी, कुठुनही का होईना त्याना हवे असलेले पुस्तक, विकत घेऊन वाचावे इतकेच. लाख मोलाची बात! मराठी भाषेच्या नांवाखाली गप्पा मारून, संकेतस्थळ सुरू करून त्यात फक्त स्वत:ची मर्जी चालवणे, आणि बघावं तेव्हा कुणावरही, कधीही प्रशासकीय नांगर फिरवत किंवा दिवसभर शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या नसत्या किचकट चर्चा करत बसणे यातच काही मराठी संकेतस्थळं मशगुल आहेत असे माझ्या पाहण्यात आहे. या संकेतस्थळांनीही मायबोलीने सुरू केलेल्या घरबसल्या पुस्तक मिळण्याच्या उपक्रमासारखे काही लोकोपयोगी कार्य करावे असे वाटते! धन्यवाद! आपला, (कोकणातला एक मायबोलीकर) तात्या अभ्यंकर.
|
Jhuluuk
| |
| Monday, March 19, 2007 - 7:12 am: |
|
|
गुढिची उंची, कडुनिंबाचे आरोग्य, साखरेची गोडी, चाफ़्याचा सुगंध, तुम्हाला लाभो!! सर्व मायबोलीकरांना गुढिपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!! - झुळूक
|
Jo_s
| |
| Monday, March 19, 2007 - 7:20 am: |
|
|
माझ्याही सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा गुढी पाडवा घेऊन आला वर्ष नवे हे आपले सुखात जाओ पुर्ण होवूनी स्वप्न मनी जे जपले
|
प्रत्येक भुकेल्याच्या पोटाला समाधानाचा घास मिळू दे. प्रत्येक रडणार्या डोळ्याला आनंदाचा दिलासा मिळू दे. प्रत्येक तहानल्या ओठाना शांतीचे थेंब मिळू दे आणि प्रत्येक जळणार्या हृदयाला प्रेमाचा पाउस मिळू दे... अजून नवीन काय मागायचे नवीन वर्षाकडून....
|
नंदिनी, तुझ्या सर्वच शुभेच्छा छान आहेत पण, >>प्रत्येक भुकेल्याच्या पोटाला समाधानाचा घास मिळू दे ही शुभेच्छा मला सर्वात जास्त आवडली! आपला, (खाऊनपिऊन समाधानी!) तात्या.
|
समस्त मायबोलिकरांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चैत्राचा महिना आला, मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला.. दिवस तो शुभमुहुर्ताचा, गुडी उभारुन मान उंचवण्याचा.. आता सारी मंडळी.. धुलवडीच्या नशेतून बाहेर आली.. नववर्षाची कशी जय्यत तयारी सुरु झाली.. सजायला लागली मंदीरे सजायला लागली घरे.. भिंतीवरी घराच्या चढवु लागली.. रंगरंगोटीची नव नवीन थरे.. साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून खरेदीचा बेत आखू लागले.. फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले.. आता सुरू झाली गुढीची तयारी तीला नेसवली साडी नवारी.. नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची.. मान उंचावुन सांगते ती गाथा शुरविरांची... चला गुळ खोबरं वाटूया.. गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया.. ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया.. मित्र मैत्रिणिनो गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुध्द्प्रतिपदा .. तुम्हाला या मराठी वर्षाची.. जाण राहुदे सदासर्वदा... आता उभारा गुढी समजूतीची उभारा ग़ुढी माणुसकीची.. पेटवा मशाल तारूण्याची.. मग चला तर ग़ुढीपाडवा साजरा करू.. आपल्या प्राणप्रिय मराठीभाषेच्या संवर्धनाचा विडा उचलु अन वाढवूया शान या विजयि महाराष्ट्राची.... गुढिपाडव्याच्या तुम्हांस हार्दिक शुभेच्छा! जय हिंद! जय महाराष्ट्र! }
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|