|
Chaffa
| |
| Wednesday, October 25, 2006 - 7:22 am: |
| 
|
गाडी रुळावरुन घसरतेय जरा रुळावर आणू का.???? ह्या प्रकाराला वेंधळेपणा म्हणायचा की नाही ते तुम्ही ठरवा. फ़ोरव्हीलर घ्यायची माझी बरेच दिवसांची ईच्छा होती. मित्राला म्हणालो चल तुझ्या गाडीवर जरा ट्राय करुन बघतो (ड्रायव्हींग). सगळ्या उपलब्ध मित्र मंडळींना गाडीत घातले आणी निघालो, सुरुवाती पासुनच बर्यापैकी राडे झाले पण ते काही खास नाहीत. वाटेत एका ट्रकला ओव्हरटेक करताना झपकन गाडी त्याच्या शेजारुन काढली. पुन्हा डाव्या बाजुला येताना मागुन एक सामुदाइक किंकाळी.??????? अरे बापरे नेहमी टू व्हिलर चालवायची सवय असल्याने ओव्हरटेक झाल्यावर गाडी पटकन आत आणली की.!!!! आपल्या गाडीला मागे भरपुर जागा आहे हे पार विसरलेलो. गाडी जेमतेम इंच,दोन इंच जागा ठेउन ट्रकच्या पुढून पास झाली राव. मागे बसलेल्यांचे अनुभव मृत्युशी भोज्जा BB वर टाकण्यासारखे असतील. अर्थात गाडी थांबल्यावर त्यांनी माझी सामुदाइक हजामत केली तो भाग वेगळा. ..... आता दात काढतोय पण तेंव्हा..........
|
Chyayla
| |
| Wednesday, October 25, 2006 - 7:35 pm: |
| 
|
च्यायला शब्द मी पण सगळीकडेच ऐकला आहे, त्याला मुम्बेरि, पुणेरी किन्वा नागपुरी म्हणण्यात अर्थ नाही, मी काही दिवस पुणे, मुम्बई ला घालवले आहेत आयला, मायला, च्यायला ह्या सगळ्या शब्दान्ची चलती होती. चाफ़्फ़ा तुझ म्हणन एकदम पटल साध्या समीर शब्दात तेवढा ईब्लिस्पणा किन्वा वेन्धळेपणा शोभुन दिसत नाही जरी तो खुप चान्गला आहे. आता गाड्या रुळावर आणताय तर माझा पण वेन्धळेपणा सान्गुन देतो. मी आणी माझा मित्र त्याच नाव बहादुर आम्ही एका ब्रिटीष मित्राकडे Meditation ला जात असतो अर्थात आम्ही सगळे एका भारतिय सन्स्थेशी सम्बन्धीत आहोत. Meditation साठी तो आम्हाला एखाद्या दिवशी फ़ोन करुन सान्गायचा कि या म्हणुन, मग आम्ही माझ्या कार मधुन दोघे नेहमी जायचो. आमची तिघान्ची खुप छान मैत्री होति Allen आणी त्याची पत्नी Ruth त्यान्ना एका शनिवारी अपार्ट्मेन्ट शिफ़्ट करायच होते प्रचन्ड सामान त्यामुळे त्यानी आदल्या रात्री बहादुर ला फ़ोन केला की उद्या सकाळी तुम्ही दोघे पण मदतीला याल का म्हणुन, आणी बहादुरने मला फ़ोन केला, मी आपला Volleyball खेळण्यात गुन्ग होतो आणी घाई घाईत Meditation ला जायचे समजुन हो म्हटले. दुसर्या दिवशी सकाळी मी छान तयार होउन अगदी पान्ढरा शर्ट प्यान्ट वैगेरे ऑफ़िशियली तयार होउन गेलो. Allen च्या घरी त्यानी दार उघडल्या बरोबर समोर हा सगळा पसारा, सगळे सामान प्याक करुन ठेवलेले. ईतस्तता पसरलेले Ruth मला म्हणाली Where is your shorts, you suppose to be not come like this तरीही माझा वेन्धळेपणा खुप जोरावर होता माझ्या काही लक्षात नाही आले. मी आपला बहादुरला म्हणतोय "अरे यार आज मेडिटेशन नही रखना चाहिये देखो बिचारा ईतना काम पडा है और एलन को हमारी चिन्ता है, कैसे करेन्गे चलो हम चलते है उनको बोलते है फ़िर किसी दीन आयेन्गे" बहादुर माझ्या कडे पहातच राहीला त्याला कळेचना की मी असे का म्हणतोय. मग एलन आला आणी सामान हलवायचा प्लान सान्गु लागला मग तेन्व्हा कुठे माझी ट्युब पेटली आणी कामाला लागलो. मग मी बहादुरला म्हटले "ओह अछा: हम ईसके लिये आये थे, मेडिटेशन के लिये नही" त्याला ते ऐकुन ईतके हसु आले कारण त्याची पण आता ट्युब पेटली की मी असे का म्हणत होतो की नन्तर येउ म्हणुन मग काय आमच्या दोघान्ची पण ह. ह. पु. वा. एलन आणी रुथ दोघे विचारायले लागले एवढे काय हसताय पण आम्ही काही त्यान्ना सान्गितले नाही आमची जमाडी जम्मत.
|
येथील काही पोस्ट्स उडवली गेली आहेत
|
Durandar
| |
| Sunday, October 29, 2006 - 1:54 am: |
| 
|
वेंधळेपणे का.????? मनावर घेउ नका ७ नं चे modes
|
Pillu
| |
| Thursday, November 02, 2006 - 3:02 pm: |
| 
|
माझे काका वय वर्षे ५८ कधिही हॉटेल मधे गेले तर मिसळ पाव या पलिकडे काहिहि खाल्ले नाही. चुकुन ही वेगळा पदार्थ समोर आला तर तो ते खातच नसत या पेक्षा असे म्हणु की जिथे मिसळ मिळेल तिथेच ही स्वारी जायची. जेव्हा निव्रुत्त झाले त्या दिवशी ऑफिस मधल्यांनी त्यांना सेंडऑफ दिला. प्रथम दुसरे कसे खातात हे पाहुन हे खायचे जेवण संपत आले यांना लांब जायचे असले कारणाने पुर्व परवानगीने यांनी लवकर आटोपले. (सगळ्यांसमोर फजिती नको म्हणुन खरे तर लवकर आवरलेले) यांची डिश रिकामी पाहुन वेटरने काय हवे म्हणुन विचारले,माझे जेवण झाले आता काही नको असे म्हणल्यावर वेटरने त्यांना बाऊल आणून दिला ज्यामधे गरम पाणी आणि लिंबु होते. आता याचे काय करायचे हे त्यांना समजेना कारण सर्वांची जेवणं चालली होती यांनी काही न सुचल्या मुळे लिंबु घेतले मस्तपैकी पिळले आणी पिऊन टाकले.येव्ह्ढ्यात एकाची नजर त्यांच्या कडे गेलीच. जे काही तिथे झाले असेल ते सुज्ञास सांगणे न लगे.
|
Chaffa
| |
| Friday, November 03, 2006 - 2:33 pm: |
| 
|
ताजा तडफ़डीत वेंधळेपणा: लोडशेडींग परत चालु झालेय ( मारा बोंबा) रात्री लाईट गेले परत यायचे लक्षण दिसेना.!! शोधशोध शोधल्यावर मेणबत्ती मिळाली (आई घरी नाहीये न शोधुन सांगतो कुणाला.!!) पेटवायला गेलो तर वात फ़रऽऽफ़रऽऽ पेटायलाच लागली ना.!!!!! सगळा प्रकार उलगडला पहिल्यांदा मेणबत्ती खिडकीतुन बाहेर फ़ेकली ती फ़ुटली ना राऽऽव. काय झाले ते नको लिहायला मला वाटतं. दिवाळीतले राहिलेले फ़टाके फ़ेकुन द्यायला पाहीजेत एकदा शोधुन शोधुन.
|
पिलु सहिये! पण हा किस्सा घडतोच बर्याचदा! खुप ठिकाणी वाचलाय. चाफ्फा आता मात्र अती होतय हं
|
Chaffa
| |
| Saturday, November 04, 2006 - 7:56 pm: |
| 
|
पिलु सहिये! पण हा किस्सा घडतोच बर्याचदा! खुप ठिकाणी वाचलाय. मनिषा मान्यपण करतेस आणी पिलू पण म्हणतेस हा तुझा वेंधळेपणा म्हणु का.????????????
|
चाफ्फ्या तु काय म्हणतोयस ते नाही कळत मला ओहो!! पिल्लु का?? माझाच वेंधळेपणा हा!!
|
Bhagya
| |
| Monday, November 06, 2006 - 12:20 am: |
| 
|
आयुष्यात घडलेला सगळ्यात मोठा वेंधळेपणा. आम्ही नवरा बायको एक महीना युरोपच्या ट्रेन्स मधून सतत प्रवास करत होतो. फ़्लश करण्यासाठी आणि बेसिन वापरण्यासाठी त्यात टच बटन्स होती, ती दाबली की काम होत असे. पण नंतर जपान ला कांदेपोहेच्याघरी गेलो. आणि तिथे टॉयलेट मध्ये नेहमीप्रमाणे असणारी फ़्लश सिस्टीम डोळ्यासमोर दिसत असूनही एक महिन्याच्या सवयीने शेजारी दिसणारे बटन प्रेस केले. आणि ते चक्क अलार्म चे होते! ठणाणत अलार्म सुरु झाला. बंद करायचे बटन दिसेना!! माझी पारच त्रेधा उडाली. शेवटी बाहेर येऊन गोर्या मोर्या चेहर्याने सांगितले की मी चुकुन बटन प्रेस केले........ पण माझी काही सांगायची आवश्यकता नव्हती, कारण गप्पा मारत बसलेल्या केपी आणि ह्यांच्या लक्षात आले होते की काय झाले असणार. एव्हाना केपी ने अलार्म बंद पण केला होता. आणि जपानी लोकांच्या वरताण सभ्यता त्याच्यात असल्याने या गोष्टीचा चुकुन ही त्याने उल्लेख केला नाही. नवर्याला माझा वेंधळेपणा माहीत असल्याने तो ही काहीच बोलला नाही, पण नंतर मात्र ३-४ वेळा 'बघून बटने दाब' असे शांतपणे सांगायला विसरला नाही.
|
Dinesh77
| |
| Monday, November 06, 2006 - 3:13 pm: |
| 
|
हा माझ्या मित्राचा वेंधळेपणा: हा माझा मित्र लग्नानंतर हानिमूनला चालला होता. जवळच माथेरानला जाणार असल्यामुळे रिझर्वेशन केले नव्हते. जायच्या दिवशी स्टेशनवर गेल्यावर बायकोला जरा लांब उभे करुन तिकिट काढायला गेला. तिकिट घेउन परत आला आणि दोघे प्लटफ़ाॅर्मवर येउन उभे राहिले. गाडी प्लटफ़ाॅर्मवर येत असताना हा पळत पळत परत तिकिट काढायला गेला. कारण नेहमीच्या सवयीनुसार "एकच" तिकिट काढले होते. नंतर काय धमाल आली असेल ह्याची कल्पना करुन आम्ही बाकी मित्रांनी भरपुर हसुन घेतले. ही सत्य घटना आहे, पुराव्यासाठी त्याच्या बायकोने ते अमुल्य तिकिट जपुन ठेवले आहे.
|
अहो दिनेशराव!! सहीच! ह. ह. पुरेवाट!! The enitre lab got a shock of their lives listening to my laughing! परवाचा किस्सा... दुपारच्या जेवणासाठी 'mess' कडे गेलो. कडाडून भूक लागली होती... नेहमी गोंगाटात बोलायच्या सवयीने थोड्या मोठ्या आवाजातच बोलत बोलत ' mess' मध्ये शिरलो.."अरे पूछ मत! बहुत भूख़ लगी है! आज तो दबाकर दाल मखनी खाऊँगा!!" सगळी ' mess' दचकून माझ्याकडे पाहत होती कारण मी चुकून खालच्या मजल्यावरच्या बॅन्केत शिरून गिर्हाईकांना माझ्या जेवणाचा तपशील न मागता दिला होता! मग जेवण संपेपर्यंत हसू दाबत तोंडातनं एक अक्षरही निघालं नाही!
|
Jhuluuk
| |
| Tuesday, November 07, 2006 - 7:05 am: |
| 
|
दिनेशने दिलेल्या हनिमून कपलचा किस्सा वाचुन, माझा एका कलीगने सांगितलेला हा किस्सा आठवला. या कलीगचा मित्र, नवीन लग्न झालेला. बायको बरोबर फिरायला निघाला होता. ते लोक पश्चिम बंगालचे.. तर ते लोक रेल्वेने निघाले होते. वाटेत एक मोठी नदी होती. तिच्यावरच्या पुलावर गाडी काही वेळ थांबली होती. सगळे भाविक नदीत पैसे टाकून, हात जोडून नमस्कार करत होते. हा मित्र आपल्या बायको समवेत दरवाज्यात आला. पैशाचे पाकिट काढले. काही सुट्टे पैसे हातात घेतले. आणि जोरात नदीत भिरकावुन दिले.... पण काय, तर आख्खे पैशाचे पाकिट त्याने चुकून सुट्टे पैसे डाव्या हातात घेतले होते, आणि सवयीने उजव्या हातातले पाकिट फेकले. पैसे तर गेलेच, शिवाय नव्या नवरीसमोर पोपट झाला.
|
... asa pan ghadu shakt..
|
Meggi
| |
| Tuesday, November 07, 2006 - 12:12 pm: |
| 
|
मी आणि आई एक दिवस दादर वरुन चर्चगेटला जात होतो. गप्पात इतक्या रंगलो की चर्चगेट कधी आल कळलचं नाही. ट्रेन चर्चगेटवरुन परत दादरच्या दिशेने निघाली तरी आम्ही गप्पाच मारतोय. बराच वेळ आला तरी चर्चगेट कसं आलं नाही म्हणुन बाहेर बघितलं तर चर्नीरोड स्टेशन दिसलं. अजुन २ स्टेशन आहेत असा विचार केला आणी आरामात बसलो. तेवढ्यात एक बाई आली आणि विचारल कि कुठे उतरणार, तर आम्ही ' चर्चगेट ' असं उत्तर देऊन मोकळे. ' काय लोक असतात ' असा look मिळाला. तेवढ्यात आईच्या लक्षात आलं कि गाडी उलट्या दिशेला चाललिये. मग उतरलो पुढच्या स्टेशनला आणि परत चर्चगेटची गाडी पकडली.
|
Mrinmayee
| |
| Tuesday, November 07, 2006 - 4:36 pm: |
| 
|
आजच सकाळी माझ्या हातून झालेला वेंधळेपणा!! एका मायबोलीकरणीशी चॅट करत होते आणि त्याचवेळी एका ओळखीच्या मावशींशी पण! त्यामुळे २ विंडोज उघड्या होत्या. मायबोलीकरीण 'आजकाल नवर्याबरोबर रोज चांगलं तासभर फिरायला जाते' म्हणून सांगत होती. दुसरीकडे मावशी मला 'तुझ्या काकांना या वयात पचत नाही तरी खूप फिश & चिप्स खाल्ल्या काल रात्री आणि रात्रभर ते बाथरूम मधे आणि मी बाथरूमच्या बाहेर काळजी करत बसले होते' असं सांगत होत्या. मी टाइप केलं .. " how romantic !!" पण मायबोलिकरणी ऐवजी मावशींच्या विंडोत!
|
सगळे लोक हनीमुन चा किस्सा सांगत आहेत म्हणुन माझापण. हा ईब्लीसपणा नाही पण. आम्ही दोघांनी हनीमुन साठी मांउट अबु व उदयपुर ईथे जायचे ठरवले होते. मी तेव्हा ओरंगाबाद ला राहायचो. तिथुन अबु जा जवळ जानारी डायरेक्ट लक्झरी बस आहे. मग काय काढले रिझरवेश्न. तयारी करुन बसलो दोघे गाडीत. प्रज्ञाला प्रवास करणे बिलकुल आवडत नाही. बसुन दोन तास झाल्यावर तिने सांगीतले की तिला आता पुढे जायचे नाही. उतर खाली असे फर्मान्च काढले. झाल मग मला तिच्या व सामाना सोबत खाली उतरावे लागले. नशीब तेव्हा ५ चच वाजले होते व वापय यायला गाडी लवकर मिळाली मग काय लाल डब्यातुन ओरंगाबादला वापस आलो. माझे अबु व उदयपुर राहुन गेले. दुसर्या दिवशी माझा साला आला त्याने काय जादु केली काय माहीत पण बाईसाहेब गोव्याला जायला अचान्क तयार झाल्या. लगेच त्याच दिवशी आम्ही गोव्याकडे रवाना तेही बस मधुन फक्त त्या स्लिपर कोच होत्या वा रात्री निघत होत्या. या घटने पासुन मी ठरवीले की प्रवास फक्त रात्री जान्यार्या गाडीतुनच करायाचा नाहीतर परत प्रज्ञा म्हणायची उतरुया म्हणुन नशीब ती विमानात तसे म्हणत नाही.
|
Arch
| |
| Tuesday, November 07, 2006 - 9:51 pm: |
| 
|
केदार, अच्छा तो इसे कहते हैं " बीबी का गुलाम. " 
|
बस क्या अब. नयी नयी शादी थी वर्णा मै गाडी मे से उतरताच नही पर फिर भी चक्कर चलाके हम लोग २४ घंटे के अंदर गोवा गये ही. आजही भरपुर हसु येते ह्यावर.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 08, 2006 - 8:59 am: |
| 
|
ह्म्म.. केदार.. gud husband ...!!!! ..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|