|
Storvi
| |
| Thursday, July 20, 2006 - 6:54 pm: |
| 
|
>>लाडालाडीला>> हो महानोरांची कविता आहे नं? ' लाडा एकला मती जायजो...ऽशी काहीतरी. मुलाला लाडा आणि मुलीला लाडी म्हणत असावेत बहुतेक..
|
Megha16
| |
| Thursday, July 20, 2006 - 8:00 pm: |
| 
|
प्रज्ञा, अगदी बरोबर बोललीस. अग इथे माझ्या घराजवळ एक family आहे तमील आहेत ते त्या बाईला तमील शिवाय काही बोलता येत नाही. आता ती pregnant आहे तर तिला डॉक्टर कडे खुप प्रॉबलम होतो तिला काही समजत नाही किती तरी दिवस ती तिच्या मैत्रीणीला सोबत घेऊन जात होती नवरा ही होता सोबत तरी.
|
Zakki
| |
| Thursday, July 20, 2006 - 8:41 pm: |
| 
|
लोपामुद्राने लिहीले आहे त्या संदर्भात एक गंमत. नवरा पंजाबी नि मुलगी कोंकणी अश्या लग्नाला गेलो होतो. नवरा मुलगा मुहूर्ताच्या अर्धा तास आधी पार्किंग लॉटच्या एका कोपर्यात घोड्यावर बसला होता, अगदी लग्नाचा पोषाख नि मुंडावळ्या नि फेटा बांधून. पण मुलीकडचे ट्रॅफिकमधे वाईट अडकले! इकडे उन्हाळा अगदी रेकॉर्ड ब्रेक. आम्ही आपले सावलीत बसून कोल्ड ड्रिंक पीत गप्पा मारत मजा बघत बसलो होतो! मग तब्बल दोन तास उशीरा मुलीकडचे लोक आले. मग अक्षरश: घोड्याला ढकलत ढकलत, जवळ जवळ धावतच सगळी वरात, घाई घाईने गाणे म्हणत एकदाची लग्नघरात येऊन बसली. बिचारे पंजाबी! फार निराशा झाली असणार त्यांची! त्याच लग्नात, लग्न सुरू झाले. बर्याच बायका पुरुष लग्न 'बघायला' बसले होते, पण त्यांच्या इतक्या गप्पा नि इतक्या जोरात चालू होत्या, की भटजी ओरडले की तुम्हाला लग्न बघायचे नसेल तर मुकाट्याने उठून हॉलबाहेर जा, नाहीतर मला तुम्हाला ना इलाजाने बाहेर जायला सांगावे लागेल. तर सर्व निर्लज्ज लोक उठून बाहेर चालते झाले! बिचारे वधू वरांकडले लोक पडका चेहेरा करून बसले! आमेरिकेतले लग्न!
|
कान पिळणी हा एक छान प्रकार आहे मला तो खुप आवडला माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नात... एकतर माझा धाकटा भाउ खुप लहान होता तेव्हा (८-९ वर्षे) .. त्याला मी training देवुन ठेवले की जिजुचे कान जोरात पिळ लहान आहे ना काहे कळले नाही त्याने बिचर्याने trianing प्रमाणे चांगला पिळायच्या एवजी पीरगळलाच कान नवरीच्या बहिणीला असे काही करायची पद्धत असते तर मी तर चांगलेच केले असते. मला तर वाटते ही पद्धत लग्नात मुलिकडील सर्वांना entitled पाहिजे माझ्या तुल्लु मैत्रिणीच्या लग्नात काहीतरी काठीने मारायची पद्धात आहे नवर्याला जवळपास कान पिळणी सारखा प्रकार की बाबा ही मुलगी दीली आहे सांभाळ तिला
|
माझ्या नवर्याचं मराठी जरा funny आहे . आमच्या लग्नात मी दणादण उखाणे घेत होते , कोणी ' उ ' म्हणायचा आवकाश कि मी उखाणा म्हणून टाकायचे . नवर्याची मात्र काहीही तयारी नव्हती . अख्ख्या लग्नात एकही उखाणा धड जमत नव्हता , शेवटी घास भरवताना साल्यांनी आणि मैत्रीणींनी ऐकले नाही , याला काही जमत नव्हते म्हणून मझ्याच एका काकांनी एक उखाणा त्याच्या कानात सांगितला , तो मूळात असा होता , एक होती चिउ , एक होता काउ घास देतो दीपाली , बोट नको चाउ . नवर्यानी प्रत्यक्षात उखाणा घेतला तो असा , ' एक होती चिउ एक होता काउ दीपालीला घास देतो , बोट नका चाउ( आणि त्यातले बोट नका चाउ हे तमाम जेवायला बसलेल्या लोकांना उद्देशून !) 
|
आमचा जो कट्टा ग्रुप आहे त्यांना अचानक एक दिवस साक्षात्कार झाला की रुखवताला जे खाद्यपदार्थ ठेवले जातात त्याकडे लग्नानंतर कोणी ढुंकून बघत नाही. हा साक्षात्कार झाल्या झाल्या कुणाच्यातरी डोक्यात टुम निघाली की लग्नातील रुखवताचे पदार्थ जागेवर फस्त करायचे. (अन्न वाया जावु नये असा प्रामाणीक उद्देश!!) झाले, पहीले ज्याचे लग्न होते त्याच्या लग्नात हा उपक्रम राबवण्यात आला. त्याच्या व त्याच्या घरच्यांनी खूप नावे ठेवली. काय बाई पोरे आहेत, आमच्या मुलाचे मित्र म्हणजे ना! पासून लाज कशी नाही मेल्यांना वगैरे अनेक डायलॉग आम्ही त्या पदार्थांबरोबर पचवले. ज्यांचे रजिस्टर लग्न झाले त्याच्या बयकोला काही दिवस या वरून छळून सुद्धा झाले. :P अर्थात हा उपक्रम फक्त ग्रुप पुरताच मर्यादीत ठेवला. शेवटी `जनाची नाही तरी मनाची`.... यथावकाश सर्वांची लग्ने झाली. आता दूसर्या ग्रुपमधे या उपक्रमाची महती सांगावी म्हणतोय!!
हे वाचून, मायबोलीकर मला लग्नाचे आमंत्रण देतील की नाही शंकाच आहे. 
|
Lalu
| |
| Friday, July 21, 2006 - 3:11 am: |
| 
|
वा! धमाल चालू आहे. ही थोडी भर. 'नोंदणी पद्धतीने विवाह' म्हणजे 'रजिश्टर म्यारेज' का काय ते. पूर्वी हे रजिस्टर लग्न म्हणजे पळून जाऊन करायचे लग्न अशी (माझी) समजूत होती. तेंव्हा पळून जाणार्याना काही पर्याय नसावा त्यामुळे तशा घटना कानावर पडल्याने 'पळणे आणि रजिस्टर लग्न' असं डोक्यात बसलं होतं. पण नंतर ते बदललं. काही वर्षापूर्वी तर त्याची लाटच आली होती. तसं हे फार सोयीचं. एक तर त्या ऑफिसमध्ये जाऊन लग्न करता येतं नाहीतर रजिस्ट्रार लग्नाच्या ठिकाणी येतात. ज्याना सोपं झटपट लग्न करायचं आहे त्याना पहिला मार्ग बरा वाटतो. गंमत अशी की यात फक्त विधी टाळून बाकी मेन्दी, नाच गाणी, जेवणावळी हा प्रकार add करायचा असेल तर करता येतो. (हे कानाखाली आवाज काढायच तेव्हा माहित असतं तर... ) तेव्हा हॉलवर रजिस्ट्रार ना आणता येतं. पण ठराविक मुदती आधी काही कागदपत्र पूर्ण करुन द्यावी लागतात. आता ते डिटेल्स आठवत नाहीत. रजिस्ट्रार मुलाला आणि मुलीला शपथ घ्यायला सांगतात. काय म्हणायचे ते एका कागदावर लिहिलेले असते. ते वाचायचे. मग साक्षिदार म्हणून form वर इकडचे 'तिकडचे' २,२ लोक सह्या करतात. जोडप्याचीही सही घेतात. झाले लग्न! नंतर व्हिडिओ पाहून लोकाना मी लग्नाची शपथ घेत होते का मंत्रीपदाची असा प्रश्न पडला. ते शब्द काय होते आता आठवत नाही. तो कागद आहे कुठेतरी पाहिले पाहिजे. त्यात दुसर्या व्यक्तीने सही करुन पुन्हा ती खोडली असा मला संशय आला होता. नंतर पुन्हा एक दोन वेळा तशाच प्रकारे सही केलेली पाहिल्यावर मग माझ्या लक्षात आले की सहीच तशी आहे!
|
Rahul16
| |
| Friday, July 21, 2006 - 4:58 am: |
| 
|
ya gulti mulanmadhe lagna karanyacha aanand barechda hunda milanar ya karata asato. Maze mitra lagnaat hunda milanar mhanun khush hot asat.(ekdam waait mentality). Tyanna Hunda gheto yachi laj watat nahi.ulat aanandane sangatat ki itake lakh hunda milanar aahe mhanun. ya lokankade itaka paisa kuhun yeto kunas thauk. 'Reddy' madhe ha prakar khup aahe.
|
Tulip
| |
| Friday, July 21, 2006 - 5:06 am: |
| 
|
मी लग्नाची शपथ घेत होते का मंत्रीपदाची असा प्रश्न पडला.>> लालू . कदाचित होममिनिस्टरशिप मिळाल्यची खुषी असेल ती
|
Bee
| |
| Friday, July 21, 2006 - 9:23 am: |
| 
|
गुल्टी समाज म्हणजे नक्की कुठला.. नावावरुन काहीच कळत नाही आणि ८० लाखापर्यंत हुंडा देऊ शकणारा वधूपिता आपल्या मुलीला पदवीपर्यंत तरी शिकवणार नाही का? मला हे वाचून आजच्याकाळात तरी असे होणे शक्य नाही असे वाटले.
|
Rahul16
| |
| Friday, July 21, 2006 - 9:46 am: |
| 
|
'TELUGU'....che reverse...'GULT'.. mhanaje AP che lok. ase ka mhanatata mala pan mahit nahi. pan janun ghenyachi ichha aahe. 80 Lakh mhanaje 'ati' nahi....Bee mhanato tase logic te waparat nahi mhanunach tyanna GULT mhanatat. mala ajunhi aatahwate, mi 10 wi la asatnna TV war batamya pahat hoto. AP madhalya duskalachi batami hoti. eka atyanta garib garachi bai aani tichi mul dakhawat hote. Tyanna khayala pyayala kahi navhate. Ti bai sangat hoti ki mazya muliche lagna hot nahi aahe karan mulakadache 1 lakh hunda magat aahe. kuthun aanawe tya bai ne paise. aaj 12-13 warsha hounhi mala ti batami jashichya tashi aathawate
|
Moodi
| |
| Friday, July 21, 2006 - 10:36 am: |
| 
|
बी ही अतीशोयक्ती खरच नाहीये. प्रज्ञा म्हणतेय ते खरे आहे. आखातात जाऊन पैसा कमावणारे केरळी म्हणजे मल्लु लोक हुंडा म्हणून कितीतरी किलो सोने मुलीच्या अंगावर घालतात / हुंड्याच्या रुपात मागतात. मागच्या दिवाळीत मी बहारीनला उतरले होते, २ तासांनी माझे फ्लाईट होते. तर बहारीन ते मुंबई या विमानात चढलेल्या कित्येक जणांकडे( भारतीय बायकाच नव्हे तर पुरुष सुद्धा) सोन्याच्या अंगठ्या एवढ्या जाडीच्या किमान ३ साखळ्या गळ्यात, हातात मोठे सोन्याचे ब्रेसलेट, घड्याळ.. माझ्या शेजारी बसलेला मल्लु मला तेच म्हणाला की आमचे लोक सोने अन पैसा याबाबतीत प्रचंड हावरट आहेत. युकेत डझनाने सापडतील हे लोक. हा खालचा फोटो बघ. अन शक्य असेल तर जीवाची दुबई करुन ये. 
|
Bee
| |
| Friday, July 21, 2006 - 10:52 am: |
| 
|
लग्नात होणारी भांडणे पण काही कमी नसतात. माझ्या ताईच्या लग्नात आंदन आलेल्या वस्तू कशात बांधाव्यात ह्यावर खूप वाद झाला होता. आमच्याकडे जी पोती होती ती आम्ही त्यांना दिलीत. शेवटी आमच्याच मुलीलाच संसार आहे. पण सासरकडच्या लोकांनी नवी पोती कुठे गेलीत, आत्तापर्यंत तुम्ही काय केले... असा सुर काढला. त्यावेली खूप वाईट वाटले होते की किती लहानसहान कारणांनी वराकडची मंडळी वधुकडच्या लोकांना पिळतात. आता मात्र वेळ एकदम विरुद्ध आहे.. माझ्या आत्येबहिणीच्या लग्नाची गोष्ट. नवरदेवाला इतक्या आंघोळी असतात की कपड्यांचे किती जोड ठेवावेत. बनियनची नवी जोड नव्हती त्यावरुन नवरदेव अर्धा तास नविन बनियन येईपर्यंत टॉवेल गुंडाळून बसला होता आणि मुहुर्ताला उशिर झाला म्हणून सांसूबाई अगदी आपल्याच थाटात कल्ला करायला पुढे.. कोण बघत आत मध्ये बनियन नविन आहे की जुने... अगदी अलिकडे एका लग्नाच्या आधी नगरकडच्या मंडळींचा अट्टाहास की लग्नाचा बस्ता आम्ही फ़ाडणार नाही जोवर आमचे Doctor येत नाही तोपर्यंत इथेच थांबू. असे वाट बघता बघात तीन तास उलटले. घामाघुस होऊन doctor आलेत. नक्की doctor कोण म्हणून वधुकडची सगळी मंडळी त्याच्याकडे बघतात तर फ़क्त २० वर्षांचा BAMS करत असलेला खेळूत मुलगा. बारका.. मिसरुड फ़ुटलेला, मलीन कपडे घातलेला आणि चार दोन english शब्द फ़ेकणारा. तो जो रंग select करीन त्या रंगाचा कापड घ्यायचा. मी आणि माझी ताई आम्ही दोघे इतके हसत होतो की शेवटी आम्हाला बाहेर जावे लागले. सबंध लग्नात doctor ची पुढे किती खातिरदारी झाली असेल हे बघायला मी तिथे नव्हतो
|
Rahul16
| |
| Friday, July 21, 2006 - 10:53 am: |
| 
|
waril photo baddal Mid day madhe batami aahe ki ye chennai che couple aahe aani Mumbai TOI ne tyancha photo dubai cha don chi mulagi aani jawai mhanun chapala.
|
मूडी अगदी हाच फोटो मला नुकताच बघायला मिळाला. सोने बघुन आणी त्याच्या वजनाचा विचार करुनच छातीवर दडपण आले. ही बाइ अजून वाकली कशी नाही? 
|
Bee
| |
| Friday, July 21, 2006 - 11:00 am: |
| 
|
मूडी, तिची मान खाली पडेल की काय अशी भिती वाटते. सहीच ढापलाय फोटो हे अगदी नक्की आहे की तमिळ लोकांना सोन्याची फ़ार ओढ आहे. एकतर त्यांचा काळा रंग आणि त्यावर पिवळेधम्म अलंकार. माझ्या एका तमिळ रूमीने सोन्याची बारा बिस्कीटे मला दाखवली होती. भारतात जावून त्याचे त्यानी त्याच्या पसंतीनुसार अलंकार केले होते. भारतात जाताना त्यानी बुटाच्या खाली ती बिस्कीटे नेली होती. air port वरती कुणीच काही केले नाही त्याला. मला वाटते हवे तितके सोने नेऊ शकतो आपण भारतात. मी आईसाठी Bengali design च्या बांगड्या नेताना मात्र मला धस्स झाले होते हृदयात. मुंबईला किती चेक करतात ही लोक.. नुस्ता त्रास होतो..
|
Moodi
| |
| Friday, July 21, 2006 - 11:06 am: |
| 
|
अरे मी नाही ढापला रे, तो फिरत फिरत आला माझ्याकडे. हो रे केपी अन समजा उन्हाळ्यात लग्न झाले असेल तर काय वाट लागली असेल.
|
Rahul16
| |
| Friday, July 21, 2006 - 11:09 am: |
| 
|
yethe marathwadyadil koni aahe ka....tithalya lagnacha mala far wait anubhav aahe. 15 washyapurwi tithe ek lagan attend kele, te aatahwun aajhi aamche natewaik hasatat. Vidarbhamadhe Nawaryakadil lokancha chanagla man thewatat. haji haji kelele/ karawe lagalele mala pan aawadat nahi. pan eka changalya manachya pahunyacha jasa adar thewatat tasa navaryakadil lokancha thewatat. tar sangayache ase ki, aamhi vidarbhatle. Mazya mamache lagna Usmanabad la. Mulagi tithalich. Ya lagnat navryakadache kiti hal hou shakatat te pahayala milale. Apman nahi kela hach kay to man thewala mhanawe lagel. Lagna mdhe mulich soy navhati. Navarikadache kunich mulakadachyashi bolayala tayar navhate. sagale ythe lihine kathin aahe, pan ha aamchach anubhav aahe ase nahi tar baryach lokanni he sangitale.tya karanasathi vidarbhat barechda lok marathwadyatil mulagi nako mhanatat (ugach tethe jaun apman karun ghya). satya aahe. Rag manu naka. diwe ghya.
|
Moodi
| |
| Friday, July 21, 2006 - 12:08 pm: |
| 
|
ok ok! अगं मला जेव्हा मेल आली तेव्हा त्यात लिहीले होते की मल्लु किती मागे लागतात सोन्याच्या ते. अन बहारीनला प्रत्यक्ष बघुन तसेच वाटले ना. 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|