|
Yogy
| |
| Thursday, March 15, 2007 - 10:30 am: |
| 
|
हे देखील वाचा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1764216.cms
|
ही बातमी वाचा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1770043.cms राज ठाकरे काय किंवा बाळासाहेब ठाकरे काय, अधून मधून नुसत्या अमराठींच्या विरूद्ध फुसक्या डरकाळ्या फोडण्यापलिकडे त्यांनी काहीही केले नाही. नुसत्या प्रक्षोभक घोषणा करायच्या, प्रत्यक्ष कृती शून्य! तामिळ किंवा बंगाली लोकांप्रमाणे महाराष्ट्रीय लोकांनी गाजावाजा न करता गुपचुप मराठीचा वापर वाढविण्याची गरज आहे. सर्व शाळांमधून (कॉनव्हेंट, इंग्रजी माध्यम, भाषिक अल्पसंख्यांकांच्या इ.) मराठी हा विषय सक्तीचा ठेऊन हिंदी हा ऐच्छिक ठेवला पाहिजे. हे सरकारी पातळीवर करता येईल. नागरिकांनी आपल्या परीने अमराठी उमेदवारांना मत न देणे, शक्यतोवर व्यवहारात मराठीतच बोलणे इ. करून मराठीचा वापर वाढविता येईल.
|
Adi787
| |
| Friday, March 16, 2007 - 10:25 pm: |
| 
|
http://www.loksatta.com/lokprabha/20070323/good.htm हा एक छान लेख, मराठी माणसांनी काय शिकावे..
|
Yogy
| |
| Tuesday, March 20, 2007 - 11:32 am: |
| 
|
त्यांनीच लिहिलेला हा दुसरा लेखही पहा... http://www.loksatta.com/lokprabha/20070216/good.htm
|
Yogy
| |
| Tuesday, March 20, 2007 - 11:38 am: |
| 
|
राज ठाकरे काय किंवा बाळासाहेब ठाकरे काय, अधून मधून नुसत्या अमराठींच्या विरूद्ध फुसक्या डरकाळ्या फोडण्यापलिकडे त्यांनी काहीही केले नाही. नुसत्या प्रक्षोभक घोषणा करायच्या, प्रत्यक्ष कृती शून्य! ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी मराठी साठी काही आक्रमक पाऊल उचलले की त्याचा निषेध करायला आपलाच मराठी माणूस पुढे असतो. मराठी-अभिमानी पक्षांना मत देण्याऐवजी महाराष्ट्रद्वेष्ट्या-मराठिद्वेष्ट्या पक्षांना मते देतो, त्यामुळे अस्तित्त्वासाठी शिवसेन-मनसे यांना मराठी सोडुन हिंदुत्त्व हा मुद्दा घ्यावा वाटतो. आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत.
|
योगि तुमच्या मताशी मी पुर्णपणे सहमत आहे. मराठी माणसाची हिच तर खरी शोकांतीका आहे. ईतर भाषिक दुसर्या प्रदेशातुन महाराष्ट्रात येतात. स्वत स्थिरस्थावर झाले कि आपल्या भाऊबंधाना सुद्धा इथे आणुन काम धंदा मिळवुन देतात. मिळेल ते काम आणि पडतिल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. आता एक साधे उदाहरण ठाणेशहरा मधे पुर्वि जास्तीजास्त मराठी रिक्शाचालक होते पण सध्या चित्र बदलले आहे. हल्ली रिक्शाचे मालक मराठी आणि चालक बिहारी किंवा उत्तरप्रदेशिय असतात.समजा एखादा मराठि चालक असेल तर वेळिअवेळी फ़ार दुरचे भाडे घेण्यास नकार देतात आणि समजा यायची तयारी दर्शवली तरी भाडे दुप्पट मागतात पण हेच जर भैया असेल तर तो सहसा नकार देत नाहि. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि एकदाच नाहि बरेच वेळा. एखादा मराठी माणुस प्रगति करत असेल तर त्याचे कौतुक करण्यापेक्षा त्याचे पाय ओढण्यात आपलिच माणसे हिरिरिने पुढाकार घेतात. बरेच जण माझ्या या मता वर आक्षेप घेतिल याची मला पुर्ण खात्रि आहे. असो जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Mandard
| |
| Tuesday, March 20, 2007 - 12:47 pm: |
| 
|
योगि आपल्या म्हणण्याला काही पुरावा आहे का? शिवसेनेनी मराठी सोडली कारण मुंबई बाहेर महाराष्ट्रात या मुद्दावर मते मिळणे शक्य नाही हे त्याना माहीत होते. मला तरी दुसरे कोणतेही कारण असेल असे वाटत नाही. शिवसेनेकढुन मराठी व मराठीमाणसासाठी काही काम होइल असे वाटत नाही. कारण पैसे फ़ेकुन शिवसेनेचे तोंड बंद करता येते हे अमराठी लोकांना चांगले माहीत आहे.
|
योगि, तुमचं म्हणणं फारसं काही पटलं नाही बुवा. शिवसेनेवर अशी कोणती वेळ आली होती की ज्यामुळे त्यांना प्रीतीश नंदी, राम जेठमलानी, चंद्रिका केनिया, संजय निरुपम इ. अमराठी लोकांना राज्यसभेवर पाठवावे लागले. यातला एकही जण शिवसेबरोबर राहिला नाही. राज ठाकरे तर पूर्णपणे गोंधळलेला वाटतो. त्याला नक्की काय करायचे आहे ते अजूनही स्पष्ट नाही. उद्धवच्या रागातून त्याने कॉंग्रेसशी हातमिळवणी केली आहे. त्याने नवीन पक्ष काढला तो काही मराठी माणसांचे किंवा महाराष्ट्राचे भले करावे म्हणून नाही, तर उद्धवला अपशकुन व्हावा म्हणुन. आताची त्याची बिहारींच्या कानाखाली वाजविण्याची घोषणा अशीच पोकळ आहे. त्याला खरच मराठी माणसांचे हित जपायचे असेल तर कमीतकमी त्याने कॉंग्रेससारख्या नतद्रष्ट पक्षाला पाठिंबा दिला नसता. शिवसेनाही तसलीच. नुसती गुरगुर करतात. प्रत्यक्षात वेळ आली की शेपूट घालतात. मी तामिळनाडूच्या करूणानिधिला कधीही तामिळशिवाय इतर भाषेत बोलताना पाहिले नाही. पण मनोहर जोशी, स्वत: बाळासाहेब मात्र मराठीव्यतिरिक्त हिंदीचा बर्याच वेळा वापर करताना आढळतात. शिवसेनेला त्यांच्या राजवटीत निदान शाळांतून मराठी भाषा सक्तीची करता आली असती. ते सुद्धा त्यांनी केले नाही. थोडक्यात काय, शिवसेनावाले नुसती बडबड करतात, कृती नाही. कॉंग्रेसवाले बडबडही करत नाहीत आणि कृतीही नाही.
|
सेनेने मराठी माणसासाठी काय केले अथवा केले नाही या पेक्षा मराठी माणुस काय करतो? हे जास्त महत्वाचे आहे. सेनेने काय केले याचे पुरावे देवुन काय उपयोग कारण कितिहि झाले तरि सेनेला शिव्या घालायच्याच असेच ज्यांनी मनाशी ठरवलेले आहे त्यांना सेनेने केलेली कामे देखिल दिसणार नाही.पण शेवटी मुंबईकरांनी महापालिका पुन्हा सेनेच्या हाती देवुन सेनेशिवाय मराठी माणसाला पर्याय नाहि हे सिद्ध केले. जिथे मुंबईत मराठी टक्का कमी झाला आहे तिथेच सेनेला यश मिळाले हिच पोचपावति नव्हे काय.? बाबरी पाडल्यानंतर झालेल्या दंगली आणि बॉंबस्फ़ोटानी मुंबई हादरली असताना मुंबईचे आणि लोकांचे रक्षण सेनेनेच केले आहे.मुंबईतिल परिस्थिति किति भयानक होति हे आम्ही स्वतः अनुभवले आहे. सेनेची विचारधारा किमान प्रखर राष्ट्रवादातुन जन्मास आली आहे. कम्युनिस्टांसारखी ती इतर कुठल्या परक्या देशातुन आयात केलेली नाहि. पण कॉंग्रेसच्या(नसलेल्या) निधर्मवादाचा कर्करोग जडलेल्यांना हे कुठले कळायला.? सावरकरांचे हिंदुत्वच सेनेला पण मान्य आहे.परंतु हिंदु या शब्दाचि देखिल काविळ असलेल्यांना ते कसे उमजायचे? कुणाला काय समजायचे ते समजु द्या. पण सेनेशिवाय मराठी माणसाला पर्याय नाही हेच खरे! जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Mansmi18
| |
| Tuesday, March 20, 2007 - 2:21 pm: |
| 
|
मते द्या मते द्या मते द्या आपल्या राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना युतीच्याआघाडीच्या उमेदवाराना प्रचन्ड बहुमताने विजयी करा.
|
Zakki
| |
| Tuesday, March 20, 2007 - 6:11 pm: |
| 
|
राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना सेना नि भा. ज. प. असे दोन पक्ष का? कितीसा फरक आहे त्यांच्या विचारप्रणालीत? नि ते दोघेहि राष्ट्रवादी कांग्रेसशी कोणत्या मुद्द्यावर सहमत आहेत? या तिघांहून वेगळे विचार कुणाचे, नि काय? यांच्या जोडीला इतर सर्व काँग्रेस, कम्युनिस्ट, सोशालिस्ट, रिपब्लिकन, नक्षलवादी, DMK इ. सर्व पक्षांचे लोक एकत्र येऊन त्यांनी युति केली तर किती बरे होईल. म्हणजे मग एकच सत्ताधारी. कुणालाहि मत द्या! एकंदर ५८४ खाती निर्माण करून सर्व पक्षाच्या लोकांना मंत्री बनवता येईल. दररोज एक नवीन मुख्यमंत्री! गरज पडल्यास, सकाळी एक नि दुपारी एक असे दोन दोन मुख्यमंत्री. मज्जा येईल की नाही?
|
Yogy
| |
| Wednesday, March 21, 2007 - 3:04 am: |
| 
|
योगि आपल्या म्हणण्याला काही पुरावा आहे का? शिवसेनेनी मराठी सोडली कारण मुंबई बाहेर महाराष्ट्रात या मुद्दावर मते मिळणे शक्य नाही हे त्याना माहीत होते. मला तरी दुसरे कोणतेही कारण असेल असे वाटत नाही....... तुमचं म्हणणं फारसं काही पटलं नाही बुवा. शिवसेनेवर अशी कोणती वेळ आली होती की ज्यामुळे त्यांना प्रीतीश नंदी, राम जेठमलानी, चंद्रिका केनिया, संजय निरुपम इ. अमराठी लोकांना .................. कॉंग्रेसवाले बडबडही करत नाहीत आणि कृतीही नाही. शिवसेनेचा जन्म व वाढ झाली त्या काळात परप्रांतियांचा प्रश्न (त्या काळात दक्षिण भारतीय - बजाओ पुंगी हटाओ लुंगी ही शिवसेनेची घोषणा - आता उत्तर भारतीय) हा केवळ मुंबईलाच भेडसावत होता. पुणे, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाडा व विदर्भात तो इतका भेडसावत नव्हता. (आता पुणे-नाशिक-सोलापूर येथेही सुरुवात झाली आहे.) मात्र इतर पक्षांना मराठी-महाराष्ट्र या शब्दाची जशी ऍलर्जी आहे तशी शिवसेना-मनसे यांना नाही. शिवसेनेने सुरुवातीच्या काळात स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून बेरोजगार मराठी तरुणांना त्यांच्या हक्काच्या नोकर्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जे दुसर्या कोणत्याही पक्षाने केलेले नाहीत. दुर्दैवाने बाबरी मशीद प्रकरण उद्भवल्यामुळे शिवसेना-प्रमुखांनी हा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला व मराठी माणसाला वार्यावर सोडले हे देखील तितकेच खरे आहे. सतीशसाहेबांनी उपस्थित केलेले मुद्देही खरेच आहेत. शिवसेनेने मोठे केलेल्या नंदी-जेठमलानी-निरुपम या लोकांनी पुढे विश्वासघातच केला. पण मतांसाठी का होईना मराठी माणसांची शिवसेनेला आठवण होते. व इतर पक्षही लाजेकाजेस्तव मराठी लोकांना उमेदवार्या देतात. मुंबई महापालिकेतील विविध पक्षाच्या उमेदवारांच्या नावावरुन हे कळेल.(हेही नसे थोडके.) शिवसेना ज्या महाराजांचे नाव घेऊन लढते त्यांचा लढा होता तो सामान्यांच्या कल्याणासाठी. त्यातील हिंदू धर्माचा समावेश तत्कालीन राज्यव्यवस्थेमुळे त्यांनी केला. तिथे मुस्लिमांच्या ऐवजी हिंदू राज्यकर्ते असते, तरी महाराजांनी स्वराज्यासाठी लढा दिलाच असता! किंबहुना त्यांच्या हयातीत त्यांनी जितक्या लढाया मुस्लिमांशी केल्या, त्याहून अधिक त्यांना हिंदूंशी कराव्या लागल्या!) मात्र आता दख्खनचे राज्य दख्खन्यांच्या हाती सांगणार्या शिवरायांचे आपण ढोंगी पाईक झालो आहोत. आणि हिंदुसंस्कृती अशी काही एकजिनसी संस्कृती अस्तित्वात नाही, आसिंधुसिंधुहिंदुएकता वगैरे सावरकरांचे शब्द वापरुन मराठी माणूसच खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रात अतिरेकी हिंदीप्रेम, हिंदीच्या लिपीशी मराठीचे असणारे साधर्म्य यामुळे इथे गठ्ठ्याने स्थलांतरे होतात, स्थानिक संस्कृतीशी समरस होण्याचा प्रयत्न केला जात नाही व स्थानिक लोकांच्या सन्मानाचा मुद्दा कोणी उपस्थित केला तर त्याला शिव्या खाव्या लागतात. झक्की यांना काय म्हणायचे आहे ते कळले नाही. त्यांची प्रतिक्रिया व मराठी माणूस खड्ड्यात जाणे हा विषय याचा संबंध झेपला नाही.
|
Mandard
| |
| Wednesday, March 21, 2007 - 5:45 am: |
| 
|
जय महाराष्ट्र शिवसेनेबाबतीत आपले विचार खुपच भाबडे आहेत. जर काॅग्रेस व राष्ट्रवादी यांची युती झाली असती तर निकाल वेगळा दिसता असता. सेनेला विचारधारा आहे असे मला वाटत नाही. सावरकरांचे हिंदुत्व कळेल अशा कुवतीचा एक तरी नेता सेनेकडे आहे का. पण सेनेशिवाय मराठी माणसाला पर्याय नाही हेच खरे! --- वाक्यदुरुस्ती पण सेनेशिवाय मुंबईतील मराठी माणसाला पर्याय नाही हेच खरे! --- बाकीच्या महाराष्ट्राला सेनेची काही गरज नाही. बर मुंबई सोडुन इतरत्र मराठी माणसे आहेत हे तरी मान्य आहे का?
|
Rajankul
| |
| Wednesday, March 21, 2007 - 9:16 am: |
| 
|
काल बाळासाहेब म्हणे शरद पवारांनी आमच्याशी हातमिळवणी केली असती तर आज ते पंत्प्रधान झाले असते. यावर हसावे की रडावे?
|
Zakki
| |
| Wednesday, March 21, 2007 - 1:36 pm: |
| 
|
झक्की यांना काय म्हणायचे आहे ते कळले नाही. त्यांची प्रतिक्रिया व मराठी माणूस खड्ड्यात जाणे हा विषय याचा संबंध झेपला नाही. काही काळजी करू नका. मला वाटत होते की सेनेचा भा. ज. प. ला पाठिंबा असे, नि कुठलेहि काँग्रेस असले तरी या दोघांचे त्यांच्याशी पटत नसे. मग आत्ताच काँग्रेसशी युति का झाली? अर्थात् सत्तेसाठी, हे उघड आहे. पण केवळ सत्तेसाठी असले धंदे करायचे तर मी सुचवलेला मार्ग काय वाईट आहे? शेवटी मराठी माणसाचे कल्याण करायला निघालेल्या सेनेने हे असले चाळे करावे? म्हणजे शेवटी मराठी माणूस गेला खड्ड्यात. आम्हाला सगळ्यांना फक्त सत्ता पाहिजे असे दिसते. तर एक निष्कर्ष असा की मराठी माणसाच्या भवितव्या बाबत राजकारण्यांवर अवलंबून रहाण्यात काही अर्थ नाही! म्हणून मी राजकारणाची टिंगल केली. तर राजकारणाचा मुद्दा आता सोडून देऊन दुसरा काहीतरी मार्ग निघतो का याची चर्चा व्हावी.
|
Asami
| |
| Wednesday, March 21, 2007 - 3:32 pm: |
| 
|
शेवटी मराठी माणसाचे कल्याण करायला निघालेल्या सेनेने हे असले चाळे करावे?>> हे कोणी सांगीतले तुम्हाला ? सुरूवात झाली खरी मराठी माणसाच्या कल्याणासाठी etc, पण सध्य शिवसेना फ़क्त एक राजकिय पक्ष आहे नि हिंदूत्व , मराठी मनुष्य हे सगळे मतांसाठीचे विषय.
|
Zakasrao
| |
| Thursday, March 22, 2007 - 5:43 am: |
| 
|
http://sarjya.googlepages.com/dusaryaanchyaa.pdf ही लिन्क पहा. मला हा लेख मिळाला वाचायला. इथे उपयुक्त आहे असे वाटते म्हणुन दिली लिन्क.
|
Mandard
| |
| Thursday, March 22, 2007 - 7:14 am: |
| 
|
झकासराव लेख वाचला. त्यात काही विषेश नाही. जसे मुंबईतील उत्तरभारतीयांना मराठी लोक आवडत नाहेत तसेच मला पण येथील उत्तरभारतीय आवडत नाहीत. सगळे बाहेरील लोकांना लुटायला टपलेले असतात दिल्लीत. त्या मानाने मराठी लोक खुप चान्गले आहेत.
|
हा लेख वाचला. उत्तर भारतातील संस्कृती आणि महाराष्ट्रातील संस्कृती ह्यात फरक असणारच. अमुक एक मैलावर भाषा बदलते तशी संस्कृतीही. उदा. जेवणात आग्रह करणे वा न करणे ह्यात चूक व बरोबर ठरवणे अवघड आहे. त्या त्या जागेची संस्कृती ते ठरवते. पाश्चिमात्य देशातही जसे इंग्लंड अमेरिका इत्यादी, पाहुण्याला जोरदार आग्रह करत नाहीत. त्या त्या जागेचे यजमान व अतिथी ही प्रथा जाणून असतात आणि जेवणाच्या पद्धतीत त्यानुसार बदल होतो. जिथे आग्रह नसतो तिथे पाहुणा हवे तितके जेवतो जिथे आग्रह असतो तिथे थोडे कमी वगैरे. जेव्हा कुणी आपले गाव वा शहर सोडून शेकडो मैल दूर दुसरीकडे जातो तेव्हा त्याने तिथल्या प्रथा, पद्धतींचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे असले धक्के बसणार नाहीत. कुणी एखादा उप्रचा उपरा महाराष्ट्रात येतो म्हणून महाराष्ट्राने आपले वागणे बदलावे अशी अपेक्षा करणे हास्यास्पद आहे. उत्तरेत महाराष्ट्रापेक्षा कितीतरी जास्त जातिभेद आहे. स्त्रियांना दुय्यम दर्जा देणे, त्यांच्यावर अत्याचार करणे हे उत्तरेत कितीतरी जास्त होते. असल्या सांस्कृतिक फरकांना नाके मुरडण्यापेक्षा वरील मूलभूत गोष्टीत सुधारणा होईल का हे उत्तर प्रांतियांनी बघितले पाहिजे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|