|
Bee
| |
| Wednesday, October 25, 2006 - 10:10 am: |
| 
|
आता प्रिया, गिरिराज, मैत्रेयी, गजाननदेसाई, लालू, क्षिप्रा, महागुरु, चाफ़ा ह्या सर्वांना माझा एक प्रश्न आहे की इथे दोन दोन कविता देणारे बरेच जण आहेत. माझी 'हरणवाट' ही कविता तुम्ही घेतली नाही. ठिक आहे माझी काही जबरदस्ती वगैरे नाही पण निदान का नाही घेतली इतके कारण जरी कळवले असते तरी मला खूप बरे वाटले असते. आता पुढल्या वर्षी देखील दिवाळी अंक असणारच आहे. तेंव्हा मी कविता द्यायची की नाही ह्याचा अवश्य विचार करीन. दिवाळी अंकाला मी साहित्य दिले नाही तर काही फ़रक पडणार नाही हे मला चांगले माहिती आहे. उत्तर न देण्याचा तुमचा हा मख्खपणा मला बिलकुल सहन झाला नाही. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=2467&post=882508#POST882508 दुर्गाप्रसाद, तुम्ही वर जी प्रतिक्रिया इथे नोंदवली आहे तशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया फ़क्त एखादा प्रयत्न नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर असतात. ह्यातून चांगल असं काहीच साकारायला येत नाही. प्रत्येक विभात काहीतरी सुचवतो हे जर लक्षात आलं असतं तर ललित लेख आणि कथां एकत्रीत करण्यामागचा उद्देश लक्षात आला असता. पण इतरांना नावं ठेवण्याची उर्मी मनात दाटलेली असताना बाकी काय सुचणार तुम्हाला... इथे ADMIN ह्यांनी कुणालाही प्रतिक्रिया नोंदवता येईल ह्याची जी सोय केली आहे त्याचा सन्मान करा. मायबोलिकरांना जे नाव माहिती नाही ते नाव घेऊन इथे लिहिण्यामागचा तुमचा आनंद किती कुरुप आहे हे इथे सर्वांच्या लक्षात आलेले आहे.
|
बी, मी या आधी संपादक मंडळात काम केले आहे म्हणून हे सांगू इच्छितो. दिवाळी अंकासाठी साहित्य सर्वानुमते निवडले जाते. त्यात कोणाच्या किती कविता आहेत हा विचार केलेला नसतो. तुझी कविता येथे दिसली नाही तर त्याचा अर्थ ती सर्वानुमते येथे प्रकाशित करण्यायोग्य नव्हती. तेव्हा इतरांशी तुलना करणे योग्य नाही असे सांगावेसे वाटते. तेंव्हा मी कविता द्यायची की नाही ह्याचा अवश्य विचार करीन << हा आपला सर्वांचा अंक आहे, त्यात साहित्य द्यायचे किंवा नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे पण त्यात अशी धमकावणीची भाषा आणू नयेस असे वाटते. राहता राहिला प्रश्न कविता न निवडण्याचे कारण देण्याचा तर कामाच्या गडबडीमुळे तसे करता येत नाही. आणि येथे ही मी एक सामान्य युजर म्हणून पोस्ट करतो आहे तेव्हा जर काही लिहीणार असशील तर विचार करुन लिही. आणि अजून एक.. केवळ वरच्या युजर ने तिखट टीका केली म्हणून तू सुद्धा त्याचं पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहेस का? सर्व प्रकारची टीका सहन करता आली पाहिजे..काय?
|
Bee
| |
| Wednesday, October 25, 2006 - 10:38 am: |
| 
|
मिलिंदा ठिक आहे तू म्हणतो आहेस त्याप्रमाणे संपादक मंदळ कामात मग्न होते असा विचार करुन कधीतरी त्यांचा अभिप्राय मला वाचायला मिळेल अशी अपेक्षा मी करतो.
|
Bee
| |
| Thursday, October 26, 2006 - 4:49 am: |
| 
|
क्षिप्रा, माझी प्रतिक्रिया खूप वेगळी होती. जी प्रतिक्रिया गौरीप्रसाद ह्यांनी दिली ती मी देऊच शकत नाही. मला तरी तुझ्या कवितेत गैर असे काहीही वाटले नाही. इथे प्रतिक्रिया देण्यासाठी ADMIN ह्यांनी जी मुक्त सोय केली आहे ती चुकीची आहे म्हणूनच मी वर लिहिले आहे की ह्या सोयीचा सन्मान करा.
|
क्षिप्रा, हे दुर्गाप्रसाद भाटवडेकर नक्की कोण हे न कळल्यामुळे आणि त्यांच्या पोस्टमधे खोडसाळपणा आणि तुच्छता याव्यतिरिक्त काहीच न दिसल्यामुळे त्यांना उत्तर द्यायची तसदी घ्यायची नाही असं मी ठरवलं होतं. पण तू (आकडेवारी देऊन) तुझी भूमिका स्पष्ट केलीस हे उत्तम झालं. दिवाळी अंकातल्याच काय पण मी आत्तापर्यंत वाचलेल्या तुझ्या कुठल्याच कवितेत विवाहबाह्य संबंधांचा संदर्भ आल्याचं मला आठवत नाही. मला दुर्गाप्रसादांचा हेतू आणि रोख समजलेला नाही, पण तू हे मनाला लावून घेणार नाहीस अशी आशा करते. बी, तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीस अजून. एकतर तुझी विधानं सिद्ध कर किंवा तुझे शब्द मागे घे आणि संबंधितांची जाहीर माफी माग.
|
क्षिप्रा, तु वादात पडायला नको होतस. तुझ्या वतीने मलाहि लिहिता आले असते. आणि स्वाती, या प्रतिक्रियांवर विचार करुन, तुझा अमुल्य वेळ का बरं वाया घालवते आहेस, त्यापेक्षा आणखी एखादा छानसा लेख लिही कि. तुझ्या अश्या प्रतिक्रियांमुळे, उलट वाचकाना ती प्रतिक्रिया शोधुन वाचायची ईच्छा होते.
|
मला एक खरच कळले नाही की हा वादविवाद का? एकदा संपादक मंडळानी ठरवले की झाले. त्यावर दुमत नको. शिवाय ज्यांचे साहीत्य आले आहे ते आता फायनल आहे मग चिरफाड का? मग माझाच लेख - कविता चांगली बाकीच्याची भावलीच नाही. ही कविता एकदम फालतु, ह्याला लिहीताच येच नाही अशा प्रतिक्रीया तरी का द्याव्यात हे कळले नाही. हेच लोक गुलमोहरावर त्या व्यक्तीनी लिहीलेल्या साहीत्यावर काहीच लिहीत नाहीत असे का? तिथेही अनेकदा टाकावु कविता, साहीत्य येत असते. मग तिथे का सांगत नाहीत. समीक्षा हा एक मुद्दा आहे पण ति समीक्षा सर्वचजण सारखी घेतात का? आणी तुम्ही आवाज, मटा, किस्त्रीम व ईतर दिवाळी अंक यांच्या संपादकाना व लेखकांना असेच धारेवर घरता का? अगदी त्या दिवाळी अंकातही बरेचदा फालतु साहीत्य असते. ऐनीवे मला वाद चालु करायचा नाही पण वरील सर्व वाचुन लिहावे वाटले.
|
>>क्षिप्रा, माझी प्रतिक्रिया खूप वेगळी होती. जी प्रतिक्रिया गौरीप्रसाद ह्यांनी दिली बी, अभिप्राय लिहिणार्या त्या वाचकाचे नाव गौरीप्रसाद नसून दुर्गाप्रसाद आहे. हवं असल्यास खातरजमा करून बघ.
|
Sameer
| |
| Thursday, October 26, 2006 - 6:45 pm: |
| 
|
दुर्गा झाली गौरी?
|
Paragkan
| |
| Thursday, October 26, 2006 - 10:49 pm: |
| 
|
केदार, त्या इतर सगळ्या अंकावर जिवंत प्रतिक्रीया देता येत नाहीत ... कौतुकाच्या किंवा टीकात्मकही. पण इथे त्या देता येतात हाच तर आपल्या अंकाचा वेगळेपणा आहे. लोकांना जे वाटलं ते त्यांनी लिहिलं ही चांगलीच गोष्ट आहे. जे पटेल ते लेखक / कवि / संपादकांनी घ्यावं, जे पटत नसेल ते सोडून द्यावं. आता लिहायला लागलोच आहे तर हेही लिहितो. प्रत्येक माणूस वेगळा. जशी लिहिणार्याची भूमिका वेगळी असते तशी वाचणाराही आपल्या स्वतःच्या काही अपेक्षा घेऊन वाचू शकतो. इथे Bee च्या प्रतिक्रीयांवर बरीच टीका झाली ती मला तरी अनावश्यक वाटली. वाचताना त्याच्या अपेक्षा वेगळ्या असतात, काही पूर्वग्रह असतो ... तसं असावं किंवा नसावं हा पुन्हा सापेक्ष मुद्दा आहे. कुणीतरी लिहिलं आहे की सदस्य नसणार्यांना इथे लिहू देऊ नये. तेही पटलं नाही. आपला अंक सर्वांना वाचायला खुला आहे मग त्यांच्या प्रतिक्रीयांना का नसावा?
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 2:39 am: |
| 
|
स्वाती, मला माफ़ी मागायची मुळीच गरज वाटत नाही. जर माझे कुठे चुकले असते तर मी नक्कीच इतका तरी समंजस आहे की त्या व्यक्तीच्या भावनांचा विचार करुन माफ़ी मागीन. मी अलगुज वर सर्वांच्या कवितांवर प्रतिक्रिया दिली आणि जर एखादी कविता मला आवडली नाही किंवा एखाद्या कवीच्या कवितेत मला काही बदल सुचवायचा असेल.. त्याला काही सांगायचा असेल तर त्यात काहीच चुक नाही. तुझा आवडता कवी वैभव आहे हे मला ठाम माहित आहे पण तू माझ्यावरती त्याच्या कवितेबद्दल मी जे लिहिले आहे ते शब्द मागे घेण्याची जबरदस्ती धमकी देऊन करू शकत नाही. तुझी ही प्रतिक्रिया वाचून माझा चांगुलपणावरचा एक विश्वास हरवला खरचं! तुला माझी प्रतिक्रियाच समजली नाही. तू फ़क्त बीला कसे गिळू आणि कसे नाही ह्याचाच अधिक विचार करते आहेस आणि इतरांची माझ्याविषयी असलेली विरोधी मत बघुन तुला अजूनच पेव फ़ुटलं की काय तस झालेलं आहे. असो.. मी ह्या वादात नक्कीच पडू ईच्छीत नाही. इथला broad minded group पुर्णपणे हरवला आहे. पराग, दिवाळी अंकावर जर सभासद नसलेल्यानी जर प्रतिक्रिया नोंदवली तर जसे क्षिप्राला आज ऐकावे लागले तसे अजून कुणाकुणाला ऐकावे लागू शकते.
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 3:17 am: |
| 
|
स्वाती, सर्वांच्या साहित्याला छान छान म्हणून झाले की आपणही छान होतो नाही.. खरच प्रतिक्रिया लिहिणे म्हणजे गम्मतजम्मत वाटते काही लोकांना.. स्वतःच्या पाठिवर थाप मारून घ्यायची ही एक चांगली युक्ती आहे. तू छान मी छान.. बरे आहे :-)
|
Paragkan
| |
| Friday, October 27, 2006 - 3:52 am: |
| 
|
Bee , आता तुझी दुसरी पोस्ट तुझ्या पहिल्या पोस्टला अनुसरुन आहे का?
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 4:21 am: |
| 
|
पीके, ज्या व्यक्तीने माझ्या प्रतिक्रियांचा इतका गवगवा केला त्या स्वातीसाठी माझे वरचे पोष्ट होते. एकतर अर्धवट साहित्यावर प्रतिक्रिया द्यायची आणि तिही फ़क्त चांगली. ह्याला काय अर्थ आहे? ह्याला प्रतिक्रिया म्हणता येणार नाही.. भित्रेपणा आहे हा..
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 4:32 am: |
| 
|
वर सावंत की कुणी म्हंटल आहे की संपादकांनी साहित्य का नाकारल ह्याच कारण सांगू नये. माझ्यामते ही पद्धत जुनी आणि चुकीची आहे. निदान मायबोलिवर तरी असे घडू नये. आता ह्या पद्धतीत बदल घडून यायला हवा. इतर दिवाळी अंकात MP3 असतात का.. नाही ना मग आम्ही नाही का हा बदल स्विकारला आहे. मला जर संपादकांनी सांगितले की बघ ही चुक होती तुझ्या साहित्यात.. ही त्रुटी वाटली आम्हाला तर नक्कीच मी पुढल्या वेळी सतर्क राहीन की तशा चुका परत करणार नाही. आता मात्र, माझे साहित्य नाकारले म्हणून माझ्या मनात अढी निर्माण झाली आहे.
|
बी, ही संपादनाचे धोरण याबद्दल चर्चा करण्याची जागा नाही. तुम्हाला हवे असल्यास V&C इथे नवीन BB उघडून लिहा परंतू त्याला उत्तर द्यायला संपादक बांधील नाही. संपादनाचे धोरण बदलायला काय हरकत आहे हा तुमचा मुद्दा योग्य असला तरी ते बदलले पाहिज़ेच असे नाही. कुठले धोरण ठेवावे आणि नवे घ्यावे याचेही धोरण संपादक ठरवीत असतात. कृपया कुणीही या ठिकाणी नवीन ऊहापोह करून वाद घालू नये. नेमस्तक तुम्हाला वेळ झाल्यावर कृपया इथले "प्रतिक्रिया" नसणारे संदेश V&C वर हलवाल का?
|
Milindaa
| |
| Friday, October 27, 2006 - 11:09 am: |
| 
|
ती मला तरी अनावश्यक वाटली <<< पराग, मुद्दा केवळ बी ने कवितांवर दिलेल्या प्रतिक्रियेचा नाहीये, त्यात त्याने त्याची 'इतरांच्या २ कविता घेतल्या गेल्या पण कविता घेतली गेली नाही' आणि संपादक मंडळ 'मख्ख' आहे इ. भाष्य केले त्याबद्दल पण आहे. त्याने लिहिलेल्या धमकावणी वजा भाषेचा ही आहे. एकदा तू बी ची शब्दार्थाच्या बीबी वर ची पोस्ट्स जाऊन बघ, ज्याला इतके सोपे शब्द कळत नाहीत (कोप = प्रणय, लोप = क्रोध), त्याला सर्व कविता कळल्या हे स्वीकारणे मला तरी अवघड जाते.. पण जाऊदेत, तो मुद्दा वेगळा आहे, त्याला कळल्या, नाही तरी मला फरक पडत नाही. आणि त्यातून बी दुसर्यांना म्हणतो आहे की तुमची प्रतिक्रिया बरोबर नाही प्रतिक्रियेबरोबरच वापरली जाणारी भाषा तितकीच महत्वाची असते हे तर तू मान्य करशील? वैयक्तिक मला, त्याने दिलेल्या प्रतिक्रियांवर काहीच बोलायचे नाही. ते पूर्णपणे त्याचे मत आहे, हे मान्य आहे. पण म्हणून एखाद्याची 'शब्दसंपदा सुमार' आहे असं म्हणताना वरील शब्दार्थांची उदाहरणे बघितली की व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे नक्की काय हे कळत नाही कालाय तस्मै नमः
|
Maitreyee
| |
| Friday, October 27, 2006 - 11:22 am: |
| 
|
बी, इतके झाल्यावर तुला 2+2=4 figure out करता यायला हवे होते!!संपादकांकडून कसले उत्तर अपेक्षित आहे तुला आता!! साहित्य reject झाले आणि ते अनुचित नव्हते, उशीरा पाठवले नव्हते याची जर खात्री असेल तर त्याचे सर्वात सोपे कारण संपादक मंडळाला ते अजिबात पसन्त पडले नाही या शक्यतेचा विचार केला आहेस का? त्या case मधे कितीही वेळा विचारलस तरी उत्तर कसले देणार! का नाही, काय चुकले वगैरे तुझे तू शोध! ते संपादकांचे काम नाही! तुझीच एक कविता अंकात आहे म्हणजे तुझ्याविरुद्ध personal आकस असण्याची शक्यता नाही एवढे तुलाही कळावे! बाकी ते अढी वगैरे घेऊन बसायचे का तो तुझा प्रश्न आहे.
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 12:21 pm: |
| 
|
मिलिंदा, १) मला फ़क्त शक्यता वाटली की २ कविता घेतल्या जात नसतील म्हणून मी ते 'इतरांच्या दोन दोन कविता घेतल्या माझ्या का नाही?' असे वाक्य लिहिले. २)आणि मी 'कोपा' ह्या शब्दाबद्दल तिथे बोललो 'कोप' ह्या शब्दाबद्दल नाही. दिनेशनी सांगेपर्यंत मला नव्हतं माहिती की ते दोन्ही शब्द एकच आहेत. ३)आणि माझी शब्दसंपदा भले कितीही सुमार असेल मी जेंव्हा इतरांच्या कविता वाचतो तेंव्हा त्या व्यक्तीच्या शब्दांवर मला जर काही बोलायचे असेल तर मी तसे बोलू शकतो. हा उपदेश नाही.. फ़क्त एक प्रतिक्रिया आहे. ४)मी नाही, स्वातीनी माझ्या प्रतिक्रियांवर आक्षेप घेतला आहे. ५)मी माझ्या कुवतीनुसार कविता चांगल्या बर्या ठरवल्या आहेत. कुणाला कुठली.. कुणाला कुठली कविता चांगली ठिकठाक वाटते. टोटली व्यक्तीसापेक्ष भाग आहे हा. मैत्रेयी, तू काहीही कारणे सांगते आहेस. माझी कविता अगदी वेळेवर पोचली होती आणि त्या कवितेची भाषा मुळीच अनुचित नव्हती. मला वाटतं तुम्हा संपादकांना माझी कविता मुळीच कळली नाही. तू लिहिलेल्या २न्ही बाबींचा मी विचार केला पण माझ्या कवितेला त्या लागू होत नाहीत. खरे कारण काहीतरी वेगळेच आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवू पाहता आहेत.
|
Asami
| |
| Friday, October 27, 2006 - 12:28 pm: |
| 
|
तूच म्हणालास ना कि कोणाला कुठली कविता कळते हा व्यक्तीसापेक्ष भाग आहे. तसेच संपादनाबाबत असते ह्हा मुद्दा लक्षात घे रे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|