|
Kedarjoshi
| |
| Wednesday, September 13, 2006 - 12:40 am: |
|
|
मराठी ही आपली मातृभाषा. ति आपण बोलतो. एके दिवशी मला वाटल की या भाषेचा उगम काय? कधी पासुन ही अस्तीत्वात आहे. ह्याचा शोध (माझ्यासाठी शोधच कारण नक्की माहीती न्हवती) लावन्यासाठी मी काही पुस्तक वाचली. त्यातील सारांश येथे देत आहे. ह्यात काही राहुन गेले असल्यास तुम्ही लिहा. भारतीय संस्कृती जितकी जुनी तितकीच आपली देव भाषा संस्कृत जुनी आहे असा सामान्य समज आहे. आर्य लोक भारतात येन्याआधी मात्र ती अस्तीत्वातच न्हवती. ही भाषा त्यांनी आणली. त्या काळी सुमेरियन भाषा हीच त्यावेळच्या मुळ भारतीय लोकांची भाषा होती. द्रवीडीयन संस्कृती ही आर्यांपेक्षा पुढारलेली होती. संस्कृत (ब्राम्ही) या भाषेचा उगम हा फोनीशीअन भाषे पासुन आहे. फोनीशिअन भाषेचा लिखित पुरावा देखील आहे. मोआब ह्या देशाचा राजा मेश ह्याने ८५० BC मध्ये आजच्या ईस्रायल मधे बंड घडवुन आणले ते त्याने लिखीत स्वरुपात फोनीशिअन मधे लिहिले. पुढे बहुतेक मेसोपोटेमिया द्वारे ( त्याकाळचा व्यवसायासाठीचा समुद्र मार्ग) ही भाषा भारतात आली. हिच ब्राम्ही भाषा आपली मुळ भाषा आहे. ह्यात ५२ अक्षरे आहेत. भारतातील विविध भाषा ह्या भाषेवर आधारित आहेत. ब्राम्ही ला संस्कृत करन्यासाठी मधे अनेक शतके गेले. आधी यस्क ऋषींनी ( काल ख्रिस्तपुर्व ६ वे शतक) यात बरेच बदल केले त्यांनतर ख्रिस्तपुर्व ४ थ्या शतकात पाणिनी त्याला मुळ संस्कृत चे रुप दिले व व्याकरणाला सर्वांगाने परिपुर्ण केले. पुढे पांताजलीनी महाभाष्य लिहीले. आणखी काही शतकांनी भ्रातीहरींनी हे सगळे एकत्र करुन ' वाक्यपद्य ' लिहीले. इंस २ रे शतक. ह्या पुर्ण काळात द्रवीडीयन संस्कृती व आर्यन संस्कृती एक झाल्या. द्रवीडीयन संस्कृतीचे अनेक ग्रंथ संस्कृत मध्ये रुपांतर झाले. (शैव समाज - स्कंध पुराण ई). अतिशय उच्च शब्द संपती मुळे बरेचदा संस्कृत भाषेचे रुपांतर ईतर यूरोपिअन भाषेत करणे अवघड झाले आहे. ( हीच खरी गंमत आहे. ईग्लीश च्या एका शब्दाच खेळ बघुयात. स्वताला ईंग्लीश मध्ये I,mee or self असे म्हणु शकतो पण स्वता:ला संस्कृत मधे ३० शब्द आहेत. जसे की sense of self, self consciousness, notion of self, individual self, universel self ई.ई. ( हे माझे उदाहरण नाही). सोन्यासारखी वाकनारी भाषा म्हणजे संस्कृत. संस्कृत नंतर अनेक भाषा भारतावर लादल्या गेल्या जसे पार्शीअन - अरामाईक, खारोश्ती व नंतर ईंग्लीश पण ही सर्वांना पुरुन उरली. संस्कृत पासुनच पाली, महाशस्त्री, मगधी ह्या प्राकृत भाषा जन्मल्या व त्यापासुन हिंदी, बंगाली, गुज्राठी अ मराठी अस्तीत्वात आल्या. आता तुम्ही म्हणाल मी नविन काय सांगीतल. काहीच नाही. ईतके वर्ष संस्कृत पुरुन उरली पण ईंग्लीश पुढे मराठी कच खाते की काय असे वाटत आहे. म्हणुन परत ऐकदा उगम सांगन्याचा हा प्रयत्न. संस्कृत कडे आधीच आम जनतेचे दुर्लक्ष होत आहे. फार तर ५ टक्के लोकांना संस्कृत येते. मराठी आज फक्त खेड्यातुन बोलली जाते. मोठ्या शहरात विंग्रजी चे फॅड आहे. जसे सुमेरियन विसरल्या गेली तशीच संस्कृत व मराठी विसरल्या जाईल काय?
|
Mrinmayee
| |
| Wednesday, September 13, 2006 - 12:47 am: |
|
|
केदार, छान लिहिलय. आणखी माहिती वाचायला आवडेल. ह्यासाठी वाचलेल्या पुस्तकांची नावं दिलीत तर इतरांनाही फायदा होईल!
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, September 13, 2006 - 1:28 am: |
|
|
धन्यवाद मृ. वरील लिखान मी Cambridge History of India Vol 1 व A Brief History of India ह्या वरुन केले आहे. दोन्ही पुस्तक ईंग्रज व फ्रेंच लोकांनी लिहीली आहेत. मराठीत असे पुस्तक उपलब्ध आहे की नाही हे मलाही ही माहीती नाही. जानकार लिहीतीलच.
|
Arun
| |
| Wednesday, September 13, 2006 - 4:20 am: |
|
|
केदार छान लिहिलं आहेस. या विषयावर अजून काही माहिती असल्यास, इथे जरूर लिही. वाचायला आवडेल .........
|
Peshawa
| |
| Wednesday, September 13, 2006 - 4:25 am: |
|
|
kedar ... brahmi was not a language but was a script .... semetic/phonetian influenced is the accepted mainstream opinion other opinions put forward are that it is derived from harrappan (Kak et al. iguess) put this is fringe opinion... devanagari the script used for marathi is modification of siddha/sharada script (12AD) and sharada/siddha are derived from gupta script... here is an interesting site http://www.cs.colostate.edu/~malaiya/scripts.html language marathi evolved from prakrit (maharashtri/sauraseni(?) prakrit). In 19th century marathi grammer was written and which is based on sanskrit grammer (Please confirm this as i am not recollecting exactly)
|
Bee
| |
| Wednesday, September 13, 2006 - 8:24 am: |
|
|
आजच्या काळात मराठी भाषेबद्दल हे असे फ़क्त प्रभाकर माचवेच लिहू जाणे. मी खाली एक URL आणि त्याच URL मधून घेतलेला फ़क्त पहिला परिच्छेद टाकतो आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी अधिक माहितीसाठी पुर्ण URL वाचुन काढावे. http://sanskrit.gde.to/marathi/documents/marathi1.html Marathi is the language of more than fifty million people mostly residing in Maharashtra, the region in western India with Bombay as its capital. However, the name Maharashtra does not occur in the Ramayana, nor in the Mahabharata. The Chinese traveler Yuan-Chwang referred to this area, in the seventh century as Mo-ha-la-cho. In tenth century Al Beruni mentions the Marhatta region with Thane as its capital. Till then Konkana was not included in this area; Soparak was its other name ( modern Sopara, the harbour) . There is no unanimity amongst scholars about the origin and antiquity of this language. The first written form is in Vijayaditya' s Copper-plate, dated 739 A.D., found in Satara. In 983 A.D., the stone inscription at the feet of Shravanabelgola Gomateshwar- Chavundarajen Karaviyalen ( Built by Chavandaraja, the king) , is considered to be the oldest. An interesting couplet in the Jain monk Udyotan Suri' s Kuvalayamala in the eighth century, refers to a bazar where different people speak differently, selling their goods: the Marhattes speak Dinnale, Gahille ( given, taken) . केदार, बीबीही छान सोबत तू दिलेली माहितीही छान!
|
Aschig
| |
| Wednesday, September 13, 2006 - 4:00 pm: |
|
|
bee, from your comment it is not clear if you are supporting Machwes writing, or criticizing it. You don't have to clarify, but I thought I would just mention it.
|
Bee
| |
| Thursday, September 14, 2006 - 3:54 am: |
|
|
आशिष, प्रभाकर माचवेंवर मी टिका करतो आहे असे कुणाला वाटू शकेल असे मला जाणवले देखील नाही वरील पोष्ट लिहिताना. पण आता परत एकदा वाचले तेंव्हा तसे होणे शक्य आहे. नाही मला त्यांचा तो लेख अतिशय आवडला. टिका वगैरे मुळीच करायची नाही. तुला जर प्रभाकर माचवेंबद्दल आणखी काही माहिती मिळाली तर मला नक्की सांग.. मला त्यांचा फ़क्त हा एकमेव लेख आजवर वाचायला मिळाला. brilliant person!
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|