Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बाबा

Hitguj » Views and Comments » Relationships » पालक, आई वडील, मुले » बाबा « Previous Next »

  Thread Posts Last Post
  
  

Chaffa
Wednesday, December 20, 2006 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी या BB वर कधी लिहीले नाही याचे एकमेव कारण की माझे बाबा हा माझ्यासाठी एक फ़ार मोठा विषय आहे आणी हा BB फ़ार मर्यादीत पडतो. तरीही थोडेसे......
बाबा, फ़ार प्रखर विचारांचे होते कदाचित आर्मीत असल्याने असेल पण कधिही त्यांनी आपली मते माझ्यावर जबरद्स्तीने लादली नाहीत. लहानपणी भित्रा भागुबाई असलेला मी वयाच्या पंधराव्या वर्षीच स्वयंपुर्ण झालेला होतो तो केवळ त्यांच्यामुळेच. पोहोण्यापासुन ते अवांतर वाचना पर्यंत सगळ्या गोष्टी मी त्यांच्या छायेत शिकलो. समाजात वावरताना आज पदोपदी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग होतोय. छोट्याशा गोष्टीचा ईश्यु न करता आपल्या बुद्धीने त्याच्यावर मात करायला मी त्यांच्या कडूनच शिकलो. एक स्व्:त बाबा जाण्याचा धक्का सोडला तर बाकी कुठलाही धक्का आज पर्यंत मला फ़ारसा बसलेला नाही.
एकुण काय तर आपले वडील हा सगळ्यांचाच विक पॉंईट आहे पण आपण त्याला सहजा सहजी पुढे येउ देत नाही.

आता एक गंमत बघा.!!!! की कधी ठेच लागली की आपण म्हणतो आईऽऽगं पण आठवा कधी एखादा धक्कादायक प्रसंग घडला तर आपली प्रतिक्रीया बापऽऽरे अशीच असते. नाही का.??

नकळत आपणच आईचे नाते वेदनेशी आणी बाबांचे धक्कादायक प्रसंगाशी जोडलेय नाही.????????


Mrudultai
Thursday, December 21, 2006 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रोफ़ाईल मध्ली माहिती कशी काढायची मला महित नाही. दिशा मला माहित नाही.माणुसने सान्गीतल्यावर मी काढली होती.

Mrudultai
Thursday, December 21, 2006 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रोफ़ाईल मध्ली माहिती कशी काढायची मला महित नाही. दिशा मला माहित नाही.माणुसने सान्गीतल्यावर मी काढली होती.

Mrudultai
Thursday, December 21, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रोफ़ाईल मध्ली माहिती कशी काढायची मला महित नाही. दिशा मला माहित नाही.माणुसने सान्गीतल्यावर मी काढली होती.

Patilchintaman
Thursday, December 21, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाबांसम्बधी जरा गमतीशीर आठवन आहे. लहानपणी मी वडिलांना बीडी शिलगवून द्यायचो. एकदा बीडी शिलगवून दिली. ती मी माझ्या ओठानेच ओढून ती बरीच शिलगली. ते म्हणाले " अर्धी ओढून घेतली" मी म्हटले तुम्ही केव्हा बीडी ओढायला लागले?
ते म्हाणाले" वयाच्या १५ व्या वर्षी."
मी म्हटले, "मी आता २५ चा झालो मग का ओढू नको?
ते म्हणाले "तु खुशाल ओढ पण माझी नको, स्पेशल बन्डल घे."


Disha013
Thursday, December 21, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रुदुल, गेलीये ग माहिती. मी msg लिहिला तेव्हा होती. आता नाहिये. डोंट वरी.

Chyayla
Saturday, December 23, 2006 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राम राम पाटील... आपण अस्सल खानदेशी शेतकरी दिसता. बीडी म्हणजे अवश्य ओळख म्हणायची शेतकर्याची पण तुम्हाला या आन्तरजालाच्या ( Internet )दुनियेत पाहुन आनन्द झाला.

चाफ़्फ़ा, म्रुदुल, मनाली, स्वप्ना, राखाल, बी, वरदा, रचना, मनुस्विनी, प्रियाब तुमच्या सगळ्यान्च्या प्रतिक्रिया या कितीतरी लेक लेकिन्साठी प्रातिनिधीक आहेत. वाचताना मन अलगद हळव होउन जात.


Mrudultai
Saturday, December 23, 2006 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विषय तु खरच फ़ार छान निवडलास.कोणालाही मन मोकळ करायला मायबोली ही फ़ार छान जागा आहे. आपल्या भावना सान्ग्णे व दुसर्याच्या ऐकणे ही छान गोष्ट आहे.

Robeenhood
Tuesday, December 26, 2006 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

At age 8, your dad buys you an ice cream. You thanked him by
dripping it all over your lap.



When you were 9 years old, he paid for piano lessons. You
thanked
him by never even bothering to practice.



When you were 10 years old he drove
you all day, from soccer to
football to one birthday party after another. You thanked
him by jumping out of the car and never looking back.



When you were 11 years old, he took you and your friends to
the
movies. You thanked him by asking to sit in a different row.



When you were 12 years old, he warned you not to watch
certain TV
shows. You thanked him by waiting until he left the house.



When you were 13, he suggested a haircut that was becoming.
You
thanked him by telling him he had no taste.



When you were 14, he paid for a month away at summer camp.
You
thanked him by forgetting to write a single letter.



When you were 15, he came home from work, looking for a hug.
You
thanked
him by having your bedroom door
locked.



When you were 16, he taught you how to drive his car. You
thanked
him by taking it every chance you could.



When you were 17, he was expecting an important call. You
thanked
him by being on the phone all night.



When you were 18, he cried at your high school graduation.
You
thanked him by staying out partying until dawn.



When you were 19, he paid for your college tuition, drove
you
to
campus carried your bags. You thanked him by saying good-bye
outside
the dorm so you wouldn't be embarrassed in front of your
friends.



When you were 25, he helped to pay for your wedding, and he
cried
and told you how deep he loved you. You thanked him by
moving
halfway across the
country.



When you were 50, he fell ill and needed you to take care of
him
u thanked him by reading about the burden parents become
to
their
children.



And then, one day, he quietly died. And everything
you
never did came crashing down like thunder on YOUR HEART. If
you love
your dad, send this to all of u friends including me. If you don't...
then shame
on you!




Zakki
Wednesday, December 27, 2006 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाऊ द्या हो. तसे अजूनहि काही काही लिहिता येईल मुलांबद्दल. ते तुमच्याशी संवाद करत नाहीत. त्यांना वाटते तुम्हाला काही कळत नाही! वगैरे वगैरे. पण तरी 'बाबांना' आपल्या मुलांचा अभिमानच वाटतो, नि त्यांच्याबद्दल प्रेमहि. कारण बाबा शहाणे असतात.

काही (अति)शहाणे बाबा मायबोलीवर येतात नि इ-मित्र, मुले शोधतात!


Nandini2911
Wednesday, December 27, 2006 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे पप्पा हे माझे बेस्ट फ़्रेंड आहेत.. फ़ार कमी मुली असतील ज्याना असं सुख मिळालं असेल. पप्पाना हिन्दी गाण्याचा जाम षौक. तो मी पुर्णपणे घेतलाय. त्याच्यासारखी चित्रकला मात्र माझ्यात आली नाही. माझे सायन्सची जर्नल्स त्यानीच पूर्ण केली. मी कमावती झाले तरी अजूनही त्याना हजार रुपये द्या ना असं मागे लागते. (लहानपणी दहा रुपये मागायचे.. आत महागाई वाढली हो) आणि तेसुद्धा मला तू मागच्या जन्मी सरकारी ऑफ़िसर असणार असं म्हणून मला पाचशेच रुपये देतात.

माझं त्याच्याबरोबर प्रचंड वाद होतात. बरं आमच्या वादाला विषयाचं बंधन नसतं. पार सौरव पासून ते सोनिया पर्यंत सगळे विषय चालतात आम्हाला. त्यात देवाने स्वरयंत्र दोघाचीही मजबूत बनवल्याने शेजार्याना आम्ही भांडतोय असं वाटतं आणि ते आईला विचारतात"का हो, मुलीचं पटत नाही का बाबांबरोबर?"
आईपण इब्लिस....
"हो ना.. सारखे फ़टके उडतात. म्हणूनच घर सोडून गेलीये माझी पोर..मी म्हणून याच्याबरोबर टिकले. दुसरी कोणी असती ना तर ती ही अशीच सोडून गेली असती (हे आणि वर!)"

पप्पानी मला आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट दिली ती म्हणजे निर्णय घायची क्षमता. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही ते आमचे मत विचारात घेतात.
(अमलात आणत नाहीत ती बाब निराळी.. जरासे माझे पप्पा हट्टी आहेत)
कितीतरी पालक शिक्षकाना विचारतात की अभ्यास कसा करतेय आमची मुलगी वगैरे...

माझे पप्पा माझ्या बॉसला विचारतात की काम नीट करते की नाही म्हणून....
असो सध्या एवढंच कौतुक पुरे..


Chyayla
Wednesday, December 27, 2006 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच आहे जर कोणत्याही नात्यात जर मैत्री असेल तर नात्याला योग्य न्याय मिळतो व त्या नात्याची गोडी वेगळीच केवळ बाप्-लेक यान्चच नात नव्हे तर सगळीच नाती म्हणायची आहेत मला.

Radhe
Saturday, December 30, 2006 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांचे बोट धरुन पहिले पाउल उचलले, ज्यांच्या खांद्यावर बसून शाळेत गेलो आणि ज्या बाबांमुळे स्वताच्या पायावर उभा राहिलो, त्या बाबांना कसे वीसरता येइल. सुख-दुखात मायेने गोंजारनारी आइ, तर धीर्-गंभीर प्रसगांत पाथीवर हात फ़ीरवून धीर देणारे बाबा प्रसंगी फ़णसाप्रमाने.

Rakhalb
Sunday, December 31, 2006 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक मजेदार phrase वाचली होती कुठेतरी:

We teach our children to stand up and speak.
And as they grow up, we ask them to shut up and sit down.

माझ्या बाबांनी जरी तसं केलं नसलं तरी माझ्या मुलाच्या बाबतीत माझ्या हातून तसं घडू नये, ह्याची जाणीव मला नेहेमी ठेवावी लागेल :-)

अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या मी माझ्या बाबांकडून नकळत शिकलो. जसे wallet मध्ये पैसे ठेवतना नोटा फ़ोल्ड नं करता ठेवाव्यात, म्हणजे त्या खराब होत नाहीत, टाय ची knot समोश्या सारखी कशी करावी, चष्मा दोन्हीं हातांनी काढावा म्हणजे खराब होत नाही, सही ( signature ) कशी करावी, सुट्या कागदावर पत्र लिहील्यावर तो कागद लांबोळक्या envelope मध्ये बरोब्बर मावेल असा fold कसा करावा इत्यादी, इत्यादी.



Aabha1
Sunday, December 31, 2006 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Khup chan wishay aahe, sarvanche posts wachun ekdam sentimental houn gele.

Sarva sankatanna dhirane tond detana baghitle aahe mi majhya babanna. Tyanchya sarvat mothya accident madhun khambir pane ubhe rahatana baghitle aahe mi tyanna. Swatahachya kutumbasathi khup kashta ghetle aahet tyanni. Buddhimatta aani mehenat hyanchya joravar manus kiti pragati karu shakto he tyanna baghun shikale mi. Tyanchya hya vayat tyanchi prachanda icchashakti(will power) baghitli ki achambit vhayala hote. Pan ase majhe kadhihi na dagmagnare baba aamha donahi bahininna aani tyanchya natavala jara jari tras jhala tari lagech halave hotat. Kadhi aamhi aajari padlo tar tyanna vedana jasta hotana baghitle aahe mi. Aaplya mulinchya savalila suddha dukkhhacha sparsha hou naye ashasathi prayatna karat astat. Dusryanchi kalaji kartana swatahacha wisar padun jato tyana.

Mala asha babanchya ghari pathavlya baddal bappache khup khup upkar. Aani sarva mulanna majhya baban sarakhech premal baba miludet ashi bappala prarthana.




मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators