|
Rahul16
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:30 am: |
| 
|
Hi all.... Subject warun tumhala samajale arelach.. It is said that generally , human can read with a speed of 250 to 350 words per minute (wpm). but it is possible to read at 1000 wpm. You can imagine the benefits of reading 4 times faster. but can it really done?,at what speed do you read. can any one of you read at 1000 wpm or more than that. How you are able to do it?. I am not asking in info about speed reading. but asking personal exprience. There is one more important skill....'Observation skill'. The ability to see many things in one glance. more on that later.... now your turn
|
Raina
| |
| Tuesday, July 18, 2006 - 10:13 am: |
| 
|
मला स्वत:ला असे जाणवले आहे.. की Speed Reading हे सवयीने होते... जितके जास्त वाचू तेवढा वाचायचा वेग वाढतो... माझा अनुभव असा आहे- की डावीकडच्या पहिल्या ओळी पासून नजर फिरवली तर डोळ्यांच्या कडांमधून आपसूक उजवीकडचा मजकूर दिसतोजाणवतो... वाचायचा वेग वाढतो...
|
Bee
| |
| Wednesday, July 19, 2006 - 3:11 am: |
| 
|
माझ्या मते जर तुम्हाला अभ्यासपूर्वक वाचायचे असेल तर वेग कमीच ठेवावा लागतो नाहीतर बारीकसारीक गोष्टी लक्षात येत नाही. माझा वेग जास्त होता तेंव्हा मला काही गोष्टी म्हणूनच लक्षात येत नसत. मग मी वेग मंदावला आणि त्याचा खूप फ़ायदा झाला. फ़क्त मनोरंजन म्हणून वाचताना एखादा भाग कंटाळवणा वाटला तरच मी between the lines वाचतो नाहीतर एकेक ओळ मी निरखून पारखून त्यातील व्याकरण लक्षात घेऊन वाचतो.
|
रैनाने आधीच लिहिल्या प्रमाने जितके जास्त वाचन होईल तितका वेग वाढेल. परत हा वेग भाषे भाषे वर मंदावु शकातो असा माझा अनुभव आहे. मी जेव्हा प्रथमच ईंग्रजी पुस्तक वाचायला घेतले तेव्हा प्रति तास मी फक्त २० पाने (निट अर्थ वैगरे कळुन) वाचु शकत होतो. पण आता बरीच ईंग्लीश पुस्तके वाचल्यामुळे हा वेग खुप वाढला आहे. मराठी वाचन जेव्हा पिक वर होते तेव्हा मी बहुतेक ८० ते १०० पाने तासाभरात वाचुन काढत असे. माझा एक मित्र न्ररेंद्र तर ह्याही पेक्षा जास्त वेगाने वाचत असे. गम्मत म्हनजे त्याला ही सर्व लक्षात राहात असे. खास करुन कथा कांदबरी चा वेग जास्त असायचा कारण लेखकाला पुढे काय म्ह्ननायचे ते वाचता वाचता लक्षात येते. पण एखादे किल्ष्ट विषया वरिल पुस्तक वाचताना आजही दम लागतो. ( सध्या मी डैनीयल गोलमेन याने लिहिलेले डिस्ट्रक्टीव ईमोशन्स ए सांयटीफिक स्ट्डी विथ दलाई लामा हे पुस्तक वाचत आहे, प्रत्येक पान वाचल्यावर मला १० मिनिटे ग्रास्प करायला लागतात. बहुतेक पुस्तक वाचायला २-३ आठवडे लागतील BTW हा मानुस खुप छान लिहितो. याचेच ईमोशनल ईंटेलीजन्स नावाचे पुस्तक पण खुप छान आहे) पुस्तक खाने म्हनजे काय याचे जिवंत उदाहरन नर्या होता. आता त्याचा ही वेग कमी झाला. कारण वाचन नेहेमी करत राहीले तरच वेग कायम राहील. वेग वाढन्यासाठी वेगळे काय कष्ट घ्यावे लागतील (खुप वाचन करन्याशिवाय) हे मलाही जानुन घ्यायला आवडेल.
|
Rahul16
| |
| Wednesday, July 19, 2006 - 4:06 am: |
| 
|
In short information about how to improve reading speed. http://www.psychwww.com/mtsite/speedrd.html
|
Raina
| |
| Wednesday, July 19, 2006 - 5:47 am: |
| 
|
वाचनाचा वेग नक्की कशासाठी वाढवायचा आहे हे आधी नक्की करायला हवे.. आणि वेगापेक्षा आकलन शक्ति कडे ही लक्ष दिले पाहीजे.. नक्की कशासाठी म्हणजे परिक्षेच्या अभ्यासासाठी, PhD च्या तयारीसाठी वगैरे... वाचनवेग कमी असायचे अजून एक कारण म्हणजे- बरेच लोकं शब्द वाचताना तो मनात म्हणून पाहतात कधी कधी, किंवा शब्दा शब्दावर बोट ठेवून वाचतात- त्यात खरोखरच फार वेळ लागून वाचनवेग कमी होतो.. केदार- भाषेवर अवलंबून असते हे ही खरंच. मला मराठी आणि इंग्रजी वेगाने वाचता येते, पण हिंदी आणि जर्मन वाचायला त्या मानाने वेळ लागतो. ज़पानी वाचायला तर फारच वेळ लागतो. जपानी शिकताना- असे प्रकर्षाने जाणवले की- एक एक अक्षर मनात लावून/ ते उच्चारुन खूप वेळ लागतो वाचायला. पण ईलाज नाही- नविन भाषा आहे. शिवाय शब्दार्थ- किंवा शब्दसंग्रह नसणे हे ही वाचनवेग मंदावायला कारणीभूत ठरते.. उदा- दुस-या भाषेत वाचताना आपण नकळत त्या शब्दाचा मातृभाषेत अर्थ शोधत असतो. अर्थ लागेस्तोवरच बराच वेळ जातो..
|
केदार.. तुझा वेग १०० पाने तासाला म्हणजे छान आहे मी मोजला नाहिये पण एव्हढा नक्की नसेल माझा.. आणि मी कुठेतरी वाचलेय.. वाचन वेग जास्त असला तरी लिखाण समजुन घेण्यासाठी वेग कमी करु नये.. कारण हळु वाचनानेही पहिल्यांअदा जेव्हढे समाजाय्चे असते तेव्हढेच समजते. अजुन काही कोणाला महिती असेल वाचन वेग कसा वाढवावा तर सांगा.
|
Aschig
| |
| Wednesday, July 19, 2006 - 8:22 am: |
| 
|
I was amazed when I saw Jay (my son) read the 700 page Harry Potter book in 1 hour. He was thrilled. The next day he was again reading the book and now it took him 3 hours. Then he read it again taking almost an entire day.
|
Paul
| |
| Wednesday, July 19, 2006 - 8:38 am: |
| 
|
लोपामुद्रा - "नोरमन लुईस" यांच पुस्तक बाजारात मिळेल. स्पीड रीडींग साठी. सही पुस्तक आहे.
|
ति लिंक पाहीली. मस्त आहे. त्यातील ब्लॉक रिडीग जे सांगीतले आहे, तसेच माझे रिडीग आहे त्यामुळे डोळ्याला पण त्रास होत नाही व वेळ ही कमी लागतो. Ashish, 700 pages in one hour. Now, thats something! I wonder if I can achieve even 150 now. Best of luck to your Son. आपण जेव्हा आपण त्या भाषेत विचार करायला शिकतो तेव्हा स्पिड जास्त होते. हे अगदी ईंग्रजी बोलन्यासारखे आहे, मराठी मिडीयम मधे शिकलेल्या लोकंना इंग्रजी बोलने सुरुवातीला अवघड जाते कारण मराठी भाषेत तो विचार करुन आपण फक्त तो ट्रान्सलेट ईंग्रजीत करुन बोलायचो. ( माझा अनुभव, माझे शिक्षण मराठी मिडियम मधुन झाले आहे). पण नंतर नंतर ईग्रंजीतच विचार करन्याची सवय लागली व दोन्ही भाषा माझ्या दृष्टीने वेगळ्या झाल्या. तसेच ईतर भाषेतील वाचनाचे आहे.
|
thanks <paul> mii shodhate he pustak..!!!
|
Laalbhai
| |
| Wednesday, July 19, 2006 - 3:12 pm: |
| 
|
वाचनाबाबत केदार जोशी म्हणतात तसा माझाही अनुभव आहे. सवय असेल तर वेग आणि आकलन दोन्हीही उत्तम रहाते. मध्यंतरी काही कारणामुळे साधारण वर्षभर काहीच वाचन झाले नव्हते (वेळ नाही या सबबीखाली!). पण नंतर जेंव्हा पुन्हा प्रयत्नपूर्वक वाचायला सुरवात केली तेंव्हा बरेच जड गेले. म्हणजे वाचनात लक्ष न लागणे, मागच्या पानावर वाचलेल्याचा संदर्भ तुटणे, वेग मंदावणे. ईत्यादी. पुढे सवयीने हे दोष परत गेले. पण वेळ नाही म्हणून वाचन होत नाही आणि वेग मंदावतो, यावर मी माझा उपाय इथे देऊ इच्छितो. ज्यांना पटेल आवडेल त्यांनी जरूर प्रयोग करून पहावा. मी एका वेळेस (म्हणजे एक पुस्तक संपण्याआधी) बरीच पुस्तके वाचायला सुरवात करतो. दुसरे असे की, मी शक्यतो स्वतःच्या वाहनाने प्रवास करणे टाळतो. आपला दिवसातला मुख्य प्रवास घर ते ऑफिस, असा असतो. हा वेळ स्वतःचे वाहन चालवण्यात खर्च न करता वाचन केले तर तेवढाच कारणी लागतो. अशावेळेस सार्वजनिक वाहनाचा वापर करावा. (अर्थात गर्दी वगैरेचे समिकरण मान्य आहे, पण बहुतेक IT कंपन्या आजकाल cab पुरवण्याची व्यवस्था करतात, त्याचा फायदा घ्यावा.) पुस्तक आणि वेळेची विभागणी मी अशी करायचा प्रयत्न करतो.. १. वर उल्लेख केला तशा छोट्या प्रवासात, साधारण कविता संग्रह, मासिक / साप्ताहिक, विनोदी लेखन, लघुकथासंग्रह किंवा काही हलकेफुलके, ज्यात फार काही विचार प्रधान नसून मुख्यतः करमणूक हा मुख्य हेतू असतो. ही पुस्तके आकाराने छोटी असतात, त्यामुळे वागवायलाही सोपी असतात, ओझे होत नाही. २. संध्याकाळी घरी आले की तुमची इच्छा असो वा नसो, इतरांच्या इच्छेखातर TV चालूच असतो. अशावेळेस दुसर्या खोलीत जाऊन वाचत बसणे हेही पटत नाही कारण घरातल्या सगळ्यांच्या भेटीही संध्याकाळीच निवांत होतात. अशावेळेस, मुख्य गप्पा टप्पा झाल्या की आपण हातात वर दिलेल्या प्रकारातलेच पुस्तक घेऊन बसावे. आणि कार्यक्रम पहात असताना, जाहिरातींच्या वेळेत हे पुस्तक वाचावे. अनुभवाने सांगतो, हे व्यवस्थित जमते. नाहीतरी संध्याकाळी TV वर प्रदर्शित होणार्या कार्यक्रमात डोके लावून पहाण्याचा भाग कमीच असतो. त्यामुळे हेही जमते. ३. जेंव्हा सलग २,३ तास निवांत हातात असतात, तेंव्हा कादंबर्या, दीर्घकथा असे काही वाचावे. ४. रात्री झोपण्यापूर्वीचा एक तास हा गंभीर वाचनासाठी काढून ठेवावाच. अशावेळेस, दिवसात जे वाचले आहे, त्यापैकी महत्वाचा वाटलेला आणि आवडलेला भाग पुन्हा वाचणे श्रेयस्कर ठरते. म्हणजे एखादी लघूकथा, एखाद्या मासिकातला लेख वगैरे. नाहीच तर एक तासाच्या वेळेला suit होईल अशी लघूकादंबरी, निबंधमाला वगैरे वाचावेत. ५. weekend शक्यतो बर्याचजणांचा मोकळा असतोच. त्यावेळेस आवड असेल तर क्लिष्ट, गंभीर असे वाचन करावे. मूड छन लागतो आणि वाचन productive होते. ६. प्रवासात फार उपयुक्त आणि भरपुर वाचन होते. प्रवास छोटा दोनेक तासाचा असेल तर प्रकार एक मधली पुस्तके, थोडा मोठा असेल तर कादंबर्या, आणि २४ वगैरे तासाचा असेल तर विचारप्रवर्तक, असे काही वाचावे. याशिवाय मी काही पथ्ये पाळतो. कधी कधी काय होते की काहीतरी कारणे निघतात आणि आपण ठरवलेले वचायचे राहूनच जाते. मग अशावेळेस आठवड्यातला एक दिवस घेऊन ठरवलेले पूर्ण वाचून काढायचेच. वाचनाची सवय असणे मुख्यतः महत्वाचे आहे, असे वाटते. ती टिकवली की आपोआप एका मर्यादेपर्यंत तुमचा वेग आणि आकलन, दोन्ही संतुलित रहाते. वाचन मला वाटते गायीच्या चरण्याआरखे करावे. वेळ मिळेल तेंव्हा भर भर वाचून घ्यावे. पुढे त्यावर निवांत विचार करावा.. (विचार करण्यासारखे काही वाचले असेल तर!) वाचनाची सवय रहाणे फार महत्वचे आहे, असे वाटते.
|
एखाद्या नवीन भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्यातील अश्लील वाड.मय प्राधान्याने वाचावे असे काही भाषाशास्त्री म्हनतात....(हा विनोद नाही हे कृपया लक्षात घ्यावे)
|
प्रवासात फार उपयुक्त आणि भरपुर वाचन होते. प्रवास छोटा दोनेक तासाचा असेल तर प्रकार एक मधली पुस्तके, थोडा मोठा असेल तर कादंबर्या, आणि २४ वगैरे तासाचा असेल तर विचारप्रवर्तक, असे काही वाचावे.>>>>. ह्यामुळे माझेही बरच वाचन झाले.. तशा सगळ्याच उपयुकत सुचना आहेत तुमच्या..!!!
|
Bee
| |
| Thursday, July 20, 2006 - 8:51 am: |
| 
|
रॉबीनहूड, अश्लील पुस्तके वाचावयास सांगण्यामागे कदाचित त्यांचा वेगळा कल असेल. सहसा कुणालाही असल्या पुस्तकात रमता येते असे त्यांना वाटले असेल. त्यामुले आपोआप माणून पुस्तकाला चिकटून राहतो. पण हे आपल्या स्त्रिवर्गाविषयी खूप झालं. मला रैनाचा मुद्दा पटला. भरभर वाचन करताकरता आपल्याला त्यातल किती आकलन होते ह्यावरही लक्ष द्यावे. नुसते पुढे पुढे जाण्यात काय अर्थ आहे.
|
Shonoo
| |
| Thursday, July 20, 2006 - 1:59 pm: |
| 
|
लालभाई छान सूचना दिल्या आहेत.
|
Zakki
| |
| Thursday, July 20, 2006 - 3:07 pm: |
| 
|
स्वानुभवावरून सांगतो की अश्लील पुस्तके वाचून भाषा शिकण्यापेक्षा जी भाषा शिकायची त्या भाषेतील नावाजलेली मासिके, वर्तमानपत्रे वाचावीत. जसे इंग्रजीसाठी मी रीडर्स दायजेस्ट नि टाईम्स ऑफ इंडिया वाचले. शिवाय कदाचित् पन्नास एक वर्षे होइस्तवर अश्लील पुस्तके वाचूच नयेत असे माझे मत आहे, कारण त्यांचा मनावर फार म्हणजे फारच वाईट परिणाम होतो, नि पुढे पुरुषांना स्त्रियांशी बोलताना, वागताना त्रास होतो, नि जमत नाही!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|