|
Maudee
| |
| Thursday, June 08, 2006 - 7:24 am: |
| 
|
मला थोडसं मार्गदर्शन हवं होतं. माझी company पुण्यातील १-२ संस्थाना मदत करते. मदत म्हणजे तिथल्या मुलाना वेगवेगळे विषय शिकवणे. it may be computers, english, hindi, maths, science or even drawing. या शाळेत सगळी मुले ही काम करून शिकतात or handicapped आहेत. मुलं साधारण पहिली ते दहावी पर्यंतची आहेत. या वर्षी यासाठी मी volunteer म्हणुन स्वतःला nominate केलय. मला कोणी मार्गदर्शन करू शकेल का की मी या मुलाना जेव्हा प्रथम भेटेन तेव्हा त्याना approach कसं करु? त्याना साधारण कसं शिकवु? मला काय काळजी घ्यावी लागेल जेणेकरून kids will trust me fully? मी आतापर्यंत कधीच शिकवलं नाहीये पण इच्छा ख़ूप आहे काहीतरी करण्याची ज्याने मला याचं समाधान मिळेल की मी या समाजासाठी काहीतरीकरते आहे. आणि फ़क्त बोलत नाहीये. म्हणुन ही सुरुवात. तरी मला मर्गदर्शन करा ही विनंती.
|
Dhani
| |
| Thursday, June 08, 2006 - 9:25 am: |
| 
|
माउडी, फ़ारच चांगले काम करयला जात आहेस. तुला शुभेच्छा. मी कधी अशी interaction केली नाहि पण मला वाट्ते तु त्यांना नॉर्मल मुलांशी वागतेस तशीच वाग. सुरुवातीला थोडेसे मित्रासारखी वाग. त्यांच्या जीवनाशी निगड्ति असे काहि बोल, अगदि पहिल्या दिवसापासुन शिकव असे काहि नाहि.take your time to be cofortable with them. i think being friendly with them would make your work easy. i hope my suggestions are not wrong. all the best..
|
माउडी, अतीशय उच्च काम. जान्याआधी जमले तर शबाना आझमी- नसूरौद्दीन शाह चा स्पर्श पाहा. त्या पिक्चर मधुन खूप मदत मिळेल. BTW तु मूक्तांगन मधे जानार आहेस का?
|
Ninavi
| |
| Thursday, June 08, 2006 - 3:49 pm: |
| 
|
अभिनंदन, माउडी. आणि शुभेच्छा. तुझे अनुभव शेअर करशील ना आमच्याशी?
|
Milindaa
| |
| Thursday, June 08, 2006 - 5:20 pm: |
| 
|
क्षिप्रा ला विचारा.
|
Dineshvs
| |
| Thursday, June 08, 2006 - 5:25 pm: |
| 
|
माऊडि, त्या मुलाना ते वेगळे आहेत हे काधिही जाणवु द्यायचे नाही, हे पहिले पथ्त्य पाळायचे. त्याना जीवनाचा बराच अनुभव असतो, त्यामुळे त्यांची समज पण चांगली असते. त्याना अनेक शंका असतात, व त्या शंका आपल्यासाठी धक्कादायक ठरु शकतात, तरिहि कधीहि कुठलाहि प्रश्ण विचारला जाईल याची तयारी ठेवायची. त्याना विश्वासात घेणे हे मह्त्वाचे आहे. पण जास्त जवळीकहि धोकादायक ठरते. थोडासा धाकहि हवा. ती मुले समजुतदार असल्याने, आपण शिकतोय ते नेमके कश्यासाठी, त्याचा काय ऊपयोग होणार आहे, हे आधीच सांगायचे. त्यांच्यासाठी शिक्षण हि एक जीवनावश्यक गरज असते हे आपण लक्षात ठेवायचे आणि त्यानाहि त्याची जाणीव करुन द्यायची. शुभेच्छा आहेतच. अभिमानहि वाटतो.
|
Zelam
| |
| Thursday, June 08, 2006 - 6:03 pm: |
| 
|
माऊडी खरच अभिमानास्पद. दिनेश सांगतात त्याप्रमाणे ते वेगळे आहेत असे वाटू देऊ नकोस. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचाशी मैत्री कर, सूर जुळव (जसे छोटे खेळ खेळणे, त्यांचा वाढदिवस लक्षात ठेवून wish करणे) तुझ्या अनुभवांची वाट बघतेय.
|
Moodi
| |
| Thursday, June 08, 2006 - 6:12 pm: |
| 
|
माऊडी तुझ्या पुढील वाटचालीकरता मन : पूर्वक शुभेच्छा. आधी त्या संस्थेत जाऊन मुलांना चॉकलेटस देऊन सगळ्यांशी ओळख करुन घे, पहिला दिवस ओळखीत गेल्यावर मग सुरुवात कर, म्हणजे तुझ्यात अन मुलांमध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण होईल. 
|
Chiku
| |
| Thursday, June 08, 2006 - 7:11 pm: |
| 
|
माउडी तुझे खरच कौतुक आहे. दिनेश म्हणतात ते खरेच आहे, मुलांना त्यांच्यात काही कमी आहे, वेगळे आहे हे जाणवू द्यायचे नाही. ही मुले अत्यंत स्वाभिमानी असतात, त्याला ठेच पोचणार नाही असे बघायचे. प्रथम भेटशील तेव्हा तु त्यांची ओळख करुन घ्यायला आली आहेस, तुला पण त्यांच्या बरोबर शिकायला, खेळायला आवडेल असे सांगितलेस तर ती खुप खुश होतील. जी मुले अपंग असतात, त्यांच्यात नक्किच काही कौशल्य, कलाही असतात. त्या ओळखुन त्यांना प्रोत्साहन द्यायचे. त्यांना अस कोणीतरी हव असते की जे त्यांचा तिरस्कार करणार नाही, जसे आहेत तसे स्विकारतील, प्रेम आणि आपुलकी दाखवतिल. एकदा का त्यांनी तुला आपल मानल की इतका जीव लावतील की तुला ती संस्था सोडण अवघड वाटेल. हवी असल्यास त्या विषयावरची आधी पुस्तके वाच, त्यात अपंगत्व कसे असु शकते, अशी मुले कशी दिसतात, बोलतात ह्याची चित्रेही असतिल, ज्याने तुझ्या मनाची आधी तयारी होईल आणी तु प्रथम त्यांना भेटशिल तेव्हा तुझ्या चेहर्यावर त्यांना प्रश्न, आशचर्य न दिसता प्रेम, जवळीक जाणवेल. तुला मनापासुन शुभेछा.
|
Gurudasb
| |
| Friday, June 09, 2006 - 4:23 am: |
| 
|
माउडी , एका चांगल्या उपक्रमाबद्दल प्रथम तुला शुभाशीर्वाद . चिकुने आणि दिनेशने सांगितल्याप्रमाणेच माझे मत आहे . न कंटाळता मनस्वी कार्य करत रहा .
|
माऊडे, तुझा उपक्रम छानच आहे... कौतुकास्पद आहे... फक्त एक कर... अपंग मुलांशी बोलताना तुला त्यांचे अपंगत्व लक्षात घ्यावे लागेल... उदा. आंधळ्या मुलाशी बोलताना रंगाचा उल्लेख करू नये...(कदाचित आंधळी मुले नसतीलही..पण मला काय सांगायचे आहे ते समजून घे..) आपल्याकडून हे अभावितपणे बोलले जाऊ शकते... लहान मुलांना शिकवणे अंमळ अवघडच... त्यांच्या कलाने घ्यावे लागते... भरपूर स्तुती करून त्यांना प्रोत्साहन द्यावे... चुकल्यास त्याला जाणवू न देता त्याला त्याची चूक लक्षात आणून द्यावी.. अन् जर चूक सुधारली तर एक छानशी शाबासकी द्यायला विसरू नकोस.. पाठिवर, खांद्यावर प्रोत्साहनाचा स्पर्श महत्वाचा असतो.. तसा तू करायला शीक.. नक्कीच जमेल तुला हे.. जेवढे चटकन आठवले ते सांगितले.. थोडा बारकाईने अभ्यास कर... जमून जाईल तुला हे... परत एकदा तुझ्या प्रयत्नांना शुभेच्छा... स्वामी तुला यश देवोत...
|
Pinaz
| |
| Friday, June 09, 2006 - 9:08 am: |
| 
|
मस्तच गं.. तुला शुभेच्छा बरं का. तुझे अनुभव सांग नंतर
|
खरच हे अतिशय चान्ग ले काम आहे असे करायला मिलणे सुद्धा एक लक चा भाग आहे. माज्या तुला शुभेच्च्या Hey will somebody tell me aunswar kasa dyayacha ?
|
one more thing , in which company do you work , it is really great. that your company gives such good chance. congratulations again
|
Bee
| |
| Wednesday, August 01, 2007 - 10:14 am: |
| 
|
एखाद्या व्यक्तिने जर माझा (अर्थात इथे कुणाचाही म्हणा) अपराध केला असेल तर त्याला क्षमा करावी की शिक्षा? ह्या बाबतीत अध्यात्मिक भूमिका काय असावी ह्याबद्दल कुणाला माहिती आहे का?
|
Mandard
| |
| Wednesday, August 01, 2007 - 11:04 am: |
| 
|
काय बी, नवर्याचे घर ची खुन्नस काढायची आहे का? :-)
|
माऊडी, थोडेसे माझे अनुभव आणि झालेल्या चुका सांगते. मी एका NGO सोबत हौस म्हणून कामाठीपुर्यात शिकवायला जात होते. हल्ली अधून मधूनच जाणे शक्य होतं. त्याहीआधी मी घरच्या घरी शिकवण्ता घेत होते आणि अजूनही घेते. तीन ते पंधरा वयोगटातल्या मुलाना मी शिकवले आहे. अपंग विद्यार्थ्याना मात्र मी कधी शिकवले नाही. माझ्या कामाठीपुर्यातल्या वर्गात पहिल्याच दिवशी मी हबकले होते. चार वर्षाच्या मुलाच्या तोंडात अर्वाच्य शिव्या. बारा वर्षाच्या मुलाला नको ते सर्व माहिती. आठ वर्षाचा एड्स झालेला मुलगा. चौदा वर्षाची "नथ उतरलेली" पण शिकायची इच्चा असलेली मुलगी. पण अभावितपणे एक गंमत झाली. मी शिकवायचा म्हणून जो चार्ट बनवला होता. त्याचा खिळा इतक्या ऊंच होता की मला तो अडकवताच येईना. एक दोन ऊद्या मारून झाल्यावर मुलं मस्तपैकी हसली. मग त्यातला एक उंच मुलगा पुढे आला. मी करेन म्हणाला. "ठीक है. हर काम तो मै नही कर सकती ना.. " असं मी म्हणाल्यावर मुलं खुश. दिदीला काहीतरी येत नाही, याचा आनंद. या मुलाना आम्ही पुस्तकी विषय शिकवायचो नाही. त्याउलट दैनंदिन जीवनात गरज पडतील असे विषय आम्ही घ्यायचो. मात्र मुंबईचा भूगोल यानीच मला जास्त शिकवला. पण एकंदरीत न घाबरता त्याच्या वयाचे होऊन गेलं ना की काही प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी मी मुद्दम दिदी बोलो असं सांगते. मॅडम वगैरे शक्यतो नकोच. आणि एक.. त्याचं काही चुकलं मस्ती वगैरे केली तर त्याची चूक लगेच लक्षात आणुन द्यावी. उगाच जाऊ दे ही भावना नको. त्याना सहानुभूतीची गरज नसते. चांगले काम केल्यास शाबासकी जरूर द्यावी, त्याचबरोबर याहून चांगले कर हे सांगावे. तरच तो जोष टिकतो. माझ्या टुशनमधे टेस्टमधे पैकीच्यापैकी मार्क मिळवणार्या मुलाना जास्तीची पाच प्रश्न लिहावे लागतात. आणि त्याना जे काही शिकवलं जातय त्याचा रोजच्या जीवनात वापर करायला सांगायचं. उदा. आकडेमोड. विज्ञान. परिसर अभ्यास या विषयात मुलाची उत्सुकता वाढवावी. हे कशाचे झाड आहे? असं वेल दाखवून विचारावे, (एक तरी जण ही वेल आहे दिदी हे बोलणारच. "वेल? अशी असते का वेल?" आता दुसरा बोलेल. अशा संवादातून शिकवल्यास त्याना लवकर समजतं. भाषेसाठी त्याना आधी धडा वाचायला सांगून "तुला काय समजलं ते मला सांग." ह्या approach मधून वाचनाचा वेग आणि आकलन दोन्ही वाढतं. कॉम्पुटरसाठी मी शक्यतो फ़क्त गेम कसे खेळायचे ते शिकवते. त्यामुळे ते जाऊ दे. चित्रकला हस्तकला मीच मोठ्या मुश्किलीने पास व्हायचे. पोराना काय शिकवणार? नाही म्हणायला आम्ही डान्स क्लास मात्र अजूनही करतो.
|
Mansmi18
| |
| Wednesday, August 01, 2007 - 1:53 pm: |
| 
|
-------------------------------------------------- माउडी, सर्वप्रथम अभिनंदन आणि शुभेच्छा एका चांगल्या उपक्रमासाठी. मला वाटते नंदिनीचा मुद्दा १००% योग्य आहे. तुमच्या वागण्यात दया किंवा सहानुभुती जाणवु देउ नका. क्रुपया आपले अनुभव इथे सांगा, तुमच्यामुळे आणखी काहीना प्रेरणा मिळाली तर उत्तम.
|
Sayuri
| |
| Wednesday, August 01, 2007 - 2:56 pm: |
| 
|
माऊडी, खरच, अतिशय स्तुत्य उपक्रम. अनेक शुभेच्छा. तिथे तू कोणता विषय शिकवणार आहेस तुला नेमून दिलाय की तुझ्या आवडीचा विषय तू घेऊ शकशील? माझा असा अंदाज आहे की मुलांच्या अधिकाधिक जवळ जायला आणि त्यांची मनं जिंकायला सुरुवातीस डायरेक्ट भूगोल, गणित, सायन्स असा विषय सुरु करण्याऐवजी कला विषय घेतला जसं चित्र, कार्टून्स काढणे, कागदकाम, ओरिगामी, गाणी तर मुलांना ते जास्त अपील होईल. बहुसंख्य वेळेस मुलांना हेच जास्त आवडतं. याद्वारे मुलं खूप मोकळी होऊन तुमच्यातला संवाद, विश्वास खूप लवकर वाढीस लागेल. एकदा का खेळीमेळीचं वातावरण तयार झालं की हळूच ठरवून ठेवलेल्या एखाद्या नेहमीच्या विषयाकडे वळायला हरकत नाही. हे माझे अनुभवाचे बोल वगैरे नाहीयेत, फक्त अंदाज आहे. अवचटांची पुस्तके वाचून माझं असं मत झालंय. असो. तुझे अनुभव वाचायला खूप आवडतील.
|
Amruta
| |
| Wednesday, August 01, 2007 - 5:41 pm: |
| 
|
मी इथे US मधे येण्यापुर्वी वात्सल्य ट्रस्ट मधे शिकवायला जात होते. मी मुलींना हसत खेळत मधे मधे गप्पा मारत शिकवत असे. मुलांशी normal मुलांसारख वागल कि काहिहि problem येत नाही. चुकिच्या वेळि ओरडण आणी योग्य वेळि प्रोत्साहन आवश्यक आहे.
|
Bee
| |
| Thursday, August 02, 2007 - 1:35 am: |
| 
|
मार्गदर्शनासाठी मी हा बीबी activate केला आणि बघतो तर इथे माउदीला मार्गदर्शन पुर्वीच्या पोष्टसाठी
|
Maudee
| |
| Thursday, August 02, 2007 - 11:42 am: |
| 
|
तुम्हा सर्वांच्या मार्गदर्शनासाठी ख़ूप ख़ूप धन्यवाद. मी काही दिवस गेले होते तिथे शिकवायला... मराठी शिकवलं मी थोडसं. माझ्या आवडीचा विषय पण नंतर मी बाळाचा विचार केला and I had some problem in pregnancy अगदी bed rest नाही म्हणता येणार पण weakness मुळे मी कुठे जाऊ शकत नव्हते... त्यामुळे I could not continue this work तरीही सर्वानी जो मल पाठिंबा आणि मार्गदर्शन केलं आहे त्यासाठी धन्यवाद. हे सगळं मार्गदर्शन मला माझ्या मुलीसाठी उपयोगी पडेलच. धन्यवाद परत एकदा सर्वाना.
|
Maudee
| |
| Thursday, August 02, 2007 - 11:51 am: |
| 
|
बी, तू जर आध्यात्मिक दृष्टीने विचारत असशील तर मला वाटत हा प्रश्न "माझे अध्यात्मिक अनुभव" या bb वर लिहायला हवा. तिथे तुला बरेच चांगले मार्गदर्शन मिळेल. तरीही आपली चूक नसेल तर मुळीच ऐकून घेऊ नये अशा मताची मी आहे. अगदीच शिक्षा नाही करता आली तरी क्षमा ही करू नये...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|