|
Pha
| |
| Wednesday, May 24, 2006 - 4:18 am: |
| 
|
Tuesday, May 23, 2006 - 4:27 am:, Limbutimbu wrote: ता. क. अर्थ लावण्याचा एक भाबडा प्रयत्न! ववि = वधुवर विवाहनिश्चितीमेळावा! चु. भु. दे. घे. DDD
Tuesday, May 23, 2006 - 4:37 am:, Limbutimbu wrote: पीयस्जी, मला वाटल होतच कुणीतरी असला वकीली बालीष्टरी थाटाचा प्रश्ण विचारणार म्हणुन लगेच ता. क. टाकला! अग ववि मधे एक नाही तर दोन दोन जोड्या ठरल्या हेत, आहेस कुठ तू? चल चल तर मग तयारीला लाग... तू रुखवताच बघतेस? की मी कार्यालयाच बघु? तू तुळशीबाग पालथी घालशील? की मी किराणाभुसार अन मन्डई बघु? तू मुन्डावळ्या टोप बाशिन्ग वगैरे बघतेस? की मी आन्तरपाट बघु? तू रन्गिबेरन्गी अक्षतान्च बघतेस? की मी मन्गलाष्टके रचू? DDD
ऍडमिन, मॉड्स, सिंहगड रोड बीबीवरील लिंबूटिंबू या आयडीच्या कालच्या काही पोस्ट्स च्या अनुषंगाने हा फीडबॅक लिहीत आहे. या आयडीच्या आतापर्यंतच्या बर्याचश्या पोस्ट्समध्ये आक्षेपार्ह वाटण्याजोगी शेरेबाजी असूनदेखील मी संयम पाळला होता; परंतु कालच्या पोस्टमधील काही कॉमेंट्स सेन्सिटिव्ह / जास्त खासगी स्वरुपाचे आणि मायबोलीकरांच्या वर्षाविहार उपक्रमाची प्रतिमा विपर्यस्त करणारे वाटले म्हणून या संदर्भात आज फीडबॅक लिहावासा वाटतोय. लिंबूटिंबू याच्या पोस्टमधील आक्षेपार्ह मुद्दे : १.'वर्षाविहार = वधूवरविवाहनिश्चितीमेळावा' यासारख्या विधानातून वर्षाविहार उपक्रम हा मायबोलीकरांचे जीटीजी नसून विवाहेच्छु लोकांच्या सोयीसाठी आयोजित केलेला मेळावा आहे असं ध्वनित होतंय. वर्षाविहारसारखे जीटीजी उपक्रम आणि मायबोलीकरांचे एकमेकांशी विवाह जमणे / न जमणे या दोन गोष्टी पूर्णतः भिन्न आहेत. ज्या मायबोलीकरांनी आतापर्यंत एखाद्या वर्षाविहार जीटीजीला उपस्थिती लावली आहे त्यांना या उपक्रमाच्या उद्देशाची आणि स्वरुपाची कल्पना आहे; परंतु नवीन सभासदांना या विधानातून काय संदेश जातो?? २. यातल्या दुसर्या पोस्टमधील कॉमेंट माझ्या खासगी आयुष्यातील संदर्भ वापरून वैयक्तिकरित्या मला लक्षून केली असल्याचं वाटतं. मायबोलीसारख्या पब्लिक फोरमवर एखाद्याच्या ( पक्षी या बाबतीत माझ्या) खासगी आयुष्याबद्दल आडून - आडून शेरेबाजी करणं गैर आहे. एकतर लिंबूटिंबू याचे माझ्याशी घनिष्ट संबंध नाहीत. त्यामुळे निव्वळ चेष्टा / टीपी करण्याच्या उद्देशाने याप्रकारचे खासगी संदर्भ वापरण्यात आले अशी गोड गैरसमजूत होण्याचंही कारण नाही. केवळ माझ्याबद्दलच नव्हे तर इतरही मायबोलीकरांबद्दल या आयडीने सिंहगडरोड / अन्य बीबींवर तीरकसपणे, लपून - छपून शेरेबाजी केली आहे. त्या - त्यावेळचे खटकलेले संदर्भ आणि या आयडीने केलेल्या कॉमेंट्सचे उपद्रवमूल्य संबंधित लोकांना ज्ञात आहेत. प्रत्येकवेळी तत्संबंधित संदर्भ देऊन मॉडरेटर्सकडे असल्या आडून केलेल्या शेरेबाजीवर तक्रार करण्यापेक्षा संयम पाळला जातो. मीदेखील याप्रकारचे आडून - आडून केलेले, खासगी संदर्भ असलेले कॉमेंट्स गेले काही दिवस संयम पाळून पाहत होतो. पण आता सीमा झाली असल्याने आज फीडबॅक लिहिण्याची गरज वाटली. या फीडबॅकमध्ये मायबोलीवरच्या नेहमीच्या पद्धतीपलीकडे जाऊन नाइलाजास्तव वैयक्तिक स्वरुपाचं लेखन करावं लागतंय. पण या घटनांचं यथायोग्य गांभीर्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी हा पर्याय अवलंबावा लागत आहे.
|
श्रीयुत फ यान्च्या वरील पोस्टवर मी माझी प्रतिक्रिया देण्याचे राखुन ठेवत हे! वरील दोन्ही मुद्दे निरर्थक पणे पण वावदुक पणे घेतलेले आक्षेप हेत असे माझे स्पष्ट मत हे! माझा बचाव मॉड्स च्या प्रतिक्रिया व अनुमतीनन्तरच मान्डेन कारण येवढ्या गम्भिर स्वरुपाच्या आरोपान्ना उत्तर द्यायलाही मला वेळ लागणार! आणि या वीक मधे मी आत्यन्तीक बिझी हे! मुद्देसुद उत्तर तयार करायला मला वेळ लागेल
|
Pinaz
| |
| Wednesday, May 24, 2006 - 11:45 am: |
| 
|
माझ्यामते या प्रकाराची गंभीरपणे दखल घ्यायला हवीच. मीही इथे नवीन होते तेंव्हा एका id ने माझ्याविषयी असेच काही बोलले होते. मी तक्रार केली तर मिलिंदाने मला सांगितले की "ते" लिखाण वाहून गेले म्हणून आता काही करता येत नाही. ( म्हणजे अशाच अर्थाचे काहीतरी. ) मला प्रश्न पडतो ओळख देख नसताना दुसर्याच्या खसगी आय्ष्यातील वैयक्तित संदर्भ वापरून काही बोलण्याची आवश्यकताच काय असते? हा आगोचरपणा सांगितला आहे कुणी? अशीच तक्रार अनेकवेळा होत असलेली दिसलि. माझ्याबाबतीतही हाच प्रकार मी नवीन होते तेंव्हा झाला होता. म्हणून सांगावेसे वाटले. चुकले असल्यास क्षमा करा.
|
लिंबूटिंबू, इथे प्रत्यारोप, वाद अथवा प्रत्युत्तरे हे सर्व करण्यापेक्षा आपसात हा वाद का मिटवत नाही? इथे सर्वजण पुरेसे परिपक्व आणि सूज्ञ आहेत.प्रत्येकानेच, विशेषत एखाद्याची चेष्टा करताना हे लक्षात घ्यावे की आपण करतो ती चेष्टा, comments समोरच्याला आवडते का नाही! एखाद्याला नसेल आवडत तर त्या व्यक्तीपुरत्या त्या गोष्टी टाळायला काय हरकत आहे? बघा विचार करून. फ़, खरं तर indirectly ,उघड न दिसेल असे कुणी कुणाला बोलले तर MODs ना मुळात काही लक्षात येणे आणि त्यामुळे त्यावर कारवाई करणेही अवघड होते. इथे तुमची तक्रार रास्त असूही शकते, पण ती तुम्ही आपसात मिटवली तर बरे होईल.
|
Admin
| |
| Thursday, May 25, 2006 - 3:40 am: |
| 
|
फ यांचा पहिला मुद्दा >१.'वर्षाविहार = वधूवरविवाहनिश्चितीमेळावा' यासारख्या विधानातून वर्षाविहार उपक्रम हा मायबोलीकरांचे जीटीजी नसून विवाहेच्छु लोकांच्या सोयीसाठी आयोजित केलेला मेळावा आहे असं ध्वनित होतंय. १. वर्षाविहाराला वधूवर मेळावा म्हटले यात वावगे काही नाही. यापूर्वीही मायबोलीच्या वर्षाविहारांमधे लग्ने ठरली आहेत, पुढेही ठरतील आणि ठरावीत. एखाद्या व्यक्तिला दुसर्या व्यक्तीबद्दल नाजूक भावना कधी निर्माण होतील हे काही सांगता येत नाही. मग त्या वर्षाविहारांमधे होतील, बसमधे, ऑफीसमधे किंवा प्रत्यक्ष न भेटता virtual भेटींमधे होतील. आज पिढ्यानपिढ्या शाळा, कॉलेज, कचेर्या यांच्या सहलींमधे असे नाजूक धागे जुळत आले आहे त्याला मायबोली कसा अपवाद असणार. आणि काही जण केवळ तेवढ्यासाठी जरी वर्षाविहाराला येत असतील तर त्यात वाईट काय आहे? थोडक्यात यामुळे, ना GTG ला कमी लेखले जाते आहे ना वधूवरसूचक मेळाव्याला २. ज्या व्यक्तिंचे "ठरले" आहे त्यांचे कौतुक आहे. एकतर सध्याच्या व्यावहारीक जगण्यात नाजूक भावना स्वतच्या मनात येणे अवघड, तीच भावना त्या दुसर्या व्यक्तिच्या मनात येणे त्याहून अवघड, ती व्यक्त करायची संधी आणि साहस त्याहून अवघड, आणि या सगळ्यानंतर प्रत्यक्ष लग्न ठरणे अवघड. जी व्यक्ति या सर्वांमधून यशस्वी झाली आहे त्याना याची कल्पना असेलच. जर या नाजूक भावनेची कोणी टिंगल करत असेल तर "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" असे होते आहे का असा प्रश्न पडतो.
|
Admin
| |
| Thursday, May 25, 2006 - 3:50 am: |
| 
|
लिंबूटिंबू, >या वीक मधे मी आत्यन्तीक बिझी हे! मुद्देसुद उत्तर तयार करायला मला वेळ लागेल तुमच्या विधानामूळे, तुम्ही त्यांच्यावर वैयक्तीक चिखलफेक करता आहात असे कुणालातरी वाटते आहे. यापुर्वी असे कधी झाले, आणि अशी चिखलफेक अपेक्षित नसेल तर " मला असे म्हणायचे नव्हते, तुमचा गैरसमज होतो आहे" इतक्या एका वाक्यात हे मिटत असे आणि त्यासाठी फार काही वेळ लागू नये.
|
Arun
| |
| Thursday, May 25, 2006 - 4:05 am: |
| 
|
ऍडमिन : क्षमस्व, पण तुमच्या पहिल्या मताशी मी पुर्ण पणे सहमत नाही. व. वि मुळे कोणाची मन जुळली आणि त्याचे रुपांतर लग्नात झाले, तर ही आनंदाचीच गोष्ट आहे. परंतू माझ्या समजूतीप्रमाणे वर्षाविहार हा समस्त मायबोलीकरांच्या भेटीगाठींसाठी आयोजित केला जातो, फक्त लग्नाळू मायबोलीकरांसाठी नाही. निदान गेले ३ व. वि. तरी याचसाठी आयोजित केले होते. फक्त विवाहेछुक मंडळीच यात सहभागी होतात असे नाही. काही जण केवळ याचसाठीच व. वि. ला येत असतील, पण सगळेच जणं यासाठी व. वि. ला येत नाहीत. तुम्ही स्वतः जातीने ३ वर्षांपुर्वी सिंहगडावर हजर होतात, तेंव्हा तुम्हालाही असच वाटलं का? प्रश्न असा आहे की ज्या व्यक्ती व. वि. ला येत नाहीत, किंवा स्वतःची identity लपवून ठेवण्यासाठी duplicate id घेऊन, बाकीच्यांवर तिरकस शेरेबाजी करतात ते योग्य आहे का? काही उणे अधिक बोललो असेन, तर पुन्हा एकदा क्षमस्व. पण अगदीच राहावलं नाही म्हणून लिहिलं.
|
Admin
| |
| Thursday, May 25, 2006 - 4:15 am: |
| 
|
खरं तर moderator_5 यांनी योग्य ते लिहिले आहे आणि सहसा मी त्यावर काही लिहित नाही. परंतू मायबोलीवर ठरलेल्या लग्नांची आडून टिंगल करण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. ते पुन्हा होऊ नयेत म्हणून लिहितो आहेत. कुणाचेही कुणावरही असलेले प्रेम, मग ते कसेही ठरलेले असो, ही एक अतिशय नाजूक आणि वैयक्तिक गोष्ट आहे. याबाबत कुठलीही टिंगल झाली तर ती मायबोलीसाठीच नाही तर मायबोलीकरांसाठी ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणूनच अशा कुठल्याही प्रसंगाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.
|
Admin
| |
| Thursday, May 25, 2006 - 4:22 am: |
| 
|
अरूण, व.वि. सगळ्यांसाठी असतो हे तुमचे विधान पूर्णपणे मान्य. पण कोणी त्याला वधूवरसूचक म्हटले म्हणून त्याला लगेच कमीपणा येत नाही असे मला म्हणायचे होते. मी कधी कुठल्या वधूवरसूचक मेळाव्याला गेलो नाही. पण जिथे कोणाचे लग्न ठरते ती चांगलीच घटना असणार म्हणून GTG चा हा आणखी एक भाग असेल तर त्यात वावगे काय असे वाटले. GTG फक्त तेवढ्यासाठीच असावे असे माझे मत नाही.
|
ऍडमिन, माझे अरुणला अनुमोदन आहे. व वि ला वधूवरसूचक मेळावा म्हणणं पब्लिक BB वर योग्य आहे? जिथे जे कधी व वि ला आलेही नाहीत असले लोकही तो BB वाचत असतात आणि जे लोक members नाहीयेत तेही. त्यांच्या मनात HG च्या GTG ची काय प्रतिमा उभी राहील? हे असंच जर चालू राहिलं तर पुढे जाऊन लोक तक्रारी करतील वर्षा विहारच्या BB वर की " काय हे? नुसतेच GTG होतात पण वधूवरसूचक मेळावा यशस्वी होण्याच्या दृष्टीने लोक काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीत. " स्पष्टच बोलायचं तर HG वर खरोखर बर्याच जोड्या जमल्या आहेत, म्हणून काय HG ला उद्या कोणी ' बाकी काही खास नाही, पण वधूवरसूचक केंद्र म्हणून चांगलंय, देशविदेशातली स्थळं विनासायास मिळतात. ' असं म्हटलं तर तेही चालेल का? या सर्व GTG तून एकमेकांशी सूर जुळून लग्न जुळली तर चांगलंच! पण त्याचा मुख्य उद्देश तो नाही हे लोकांनी लक्षात ठेवायलाच हवं. आणि पब्लिक फ़ोरमवर केलेल्या असल्या बेजबाबदार विधानांमुळे त्याला बाध नक्कीच येतो. यात मी लिहिताना काही उणंअधिक लिहिलं असेल तर क्षमस्व; पण मला तुमचं मत नाही पटलं म्हणून हे सांगावसं वाटलं. आणि दुसरा मुद्दा. कुणाच्या जोड्या कुठे ठरल्या हेत हे त्यांनी जगजाहीर केलेलं नसताना आणि तो सर्वस्वी त्यांचा personal मामला असताना LT यांना त्यांची कल्पनाशक्ती लढवून अंदाज वर्तवण्याची काय गरज? जोडीतले दोघेही HG कर्स असतील तरी त्यांचं लग्न जमणं ही सर्वस्वी personal गोष्ट आहे आणि स्वतःचा काहीही संबंध नसताना त्यासंदर्भात LT सारख्या लोकांनी मतप्रदर्शन करू नये.
|
Psg
| |
| Thursday, May 25, 2006 - 5:37 am: |
| 
|
मुख्य मुद्दा असा आहे की duplicate id ला वैयक्तिक शेरेबाजी करण्यापासून थांबवावे. जो id लोकांसमोर कधी येत नाही, GTG आयोजनामधे ज्याचा सहभाग नाही, त्याला इतर हितगूजकरांच्या personal गोष्टीत बोलायचा अधिकार नाही. तो limits ओलांडत असेल तर त्याला थांबवायला हवे!
|
Pha
| |
| Thursday, May 25, 2006 - 5:40 am: |
| 
|
ऍडमिन, प्रत्यक्षात किंवा virtually कुठल्याही माध्यमातून नाजूक धागे जुळू शकतात; आणि मायबोली त्याला अपवाद ठरू शकत नाही हा मुद्दा रास्त आहे. पण म्हणून व.वि. या उपक्रमाला वधूवरविवाहनिश्चितीमेळावा असं लेबल लावणं बरोबर नाही; कारण ते या उपक्रमाचं उद्दिष्ट नसून मायबोलीकरांची एकमेकांशी गाठभेट होणं हा उद्देश असतो. मराठी माणसांकरता, संवादाकरता एक ऑनलाईन व्यासपीठ हा जसा आपल्या या साईटचा मुख्य उद्देश असून या साईटच्या माध्यमातून 'ठरणं' वगैरे घटना byproduct आहेत, तद्वतच व.वि. उपक्रमाच्या बाबतीत आहे. पण म्हणून (सर्वसाधारणपणे) कोणी व.वि. ला आणि या साईटला वधूवरसूचक असं लेबल लावत नाही. उद्दिष्टांचा विचार केला तर ' नामधेयेन किम् फलम्?' असं तत्व या केसेसकरता पाळून चिकटतील ती कुठलीही लेबलं मान्य करणं मला अनुचित वाटतं. दुसरं म्हणजे हे लेबल आणि नंतरच्या माझ्याशी संबंधित खासगी घटनांना लक्षून ज्या कॉमेंट्स आल्या त्यांचा हेतू - त्यामागच्या बर्याच दिवसांच्या कालावधीत लिंबूटिंबू यानी यासंबंधात केलेल्या कॉमेंट्स वगैरे पार्श्वभूमी लक्षात घेता - केवळ गमतीत केलेली थट्टामस्करी इतपतच सीमित होते असं मला वाटत नाही. त्याच्या वरच्या २ पोस्ट्समधून कदाचित तितकी इंटेन्सिटी तुम्हाला आणि मॉडरेटर५ यांना जाणवली नसेल, जितकी मला जाणवली. मॉड५ यांनी म्हटल्याप्रमाणे अशी indirectly केलेली शेरेबाजी मॉड्सना संदर्भासहित लक्षात येणं अवघड आहे, हे मी समजू शकतो. पण या बाबतीत मी(आणि वेगवेगळ्या इतर प्रसंगांमध्ये सिंहगड रोड बीबी व अन्य बीबींवरील इतर मायबोलीकरांनी) सुरुवातीला दुर्लक्ष करून, संयम पाळून, नंतर यथायोग्य शब्दात समजावून प्रयत्न करून बघितला आहे. परंतु त्याच स्वरुपातल्या प्रतिक्रिया वरचेवर येत राहिल्यावर माझ्या सहनशीलतेचा अंत झाला. कमी - जास्त लिहिलं गेलं असल्यास क्षमस्व. पण तुमच्या पोस्ट्समधले काही मुद्दे रास्त वाटले, काही नाहीत. जे पटले नाहीत त्यावर माझा दृष्टीकोन प्रांजळपणे मांडावासा वाटला म्हणून हे लिखाण.
|
मॉड आणि ऍडमिन, आपण केलेल्या पोस्ट्स शी मी सहम्त आहे व आशय मला मान्य हे! विषय दिपस्तम्भ या आयडीच्या पोस्ट मधुन निघाला! त्यात गिरिराज या आयडीचा उल्लेख आला! दिपस्तम्भ व गिरिराज दोघेही माझ्याशी न बोलणे किन्वा अनुल्लेख वगैरे प्रकार करीत नसल्याने ते वाक्य उचलुन केवळ आणि केवळ विनोद निर्मितीकरता "अरे तेव्हा जमल तर अजुन पर्यन्त काय करीत होता? आम्हाला कस कळल नाही" या अर्थाची माझी गिरीला उद्देशुन असलेली पोस्ट दुर्लक्षुन नन्तर बोलण्याच्या ओघात आलेल्या सोइस्कर तेवढ्या एका वाक्याला धरुन जो आक्षेप फ या आयडीने काढला हे त्याचे खर तर आपल्याच पोस्ट मधुन निराकरण झाल हे असे मला तरी वाटते! ववि च काय, एका लग्नात, कॉलेजेसच्या गॅदरिन्ग मधे वा इतरत्र जिथे जिथे समुह एकत्र येतो तिथे लग्न जमतातच म्हणुन ते कार्यक्रम किन्वा त्याला येणारे केवळ लग्नेच्छुक असतात म्हणुनच येतात अन तसे ते येत असतील तर तो कार्यक्रमाचा अवमान हे अशा पद्धतीचे ओढुन ताणुन आणलेले विचार मला सुचत नाहीत, सबब मी तो विचारच केला नाही, आपण म्हणता तसेच, तो फ, अरुण इत्यादिकान्चा माझ्या पोस्टचा अर्थ लावताना झालेला गैरसमज असु शकतो! मी इकडचे सन्दर्भ तिकडे देतो असा आक्षेप हे, पीयसजी या आयडीला दिलेल्या उत्तरात देखिल मी असाच एक उल्लेख केला होता... बॅलिस्टर थाटाचा... हा उल्लेख मला रॉबिनहुड यान्नी मला उद्देशुन केलेल्या पोस्ट वरुन सुचला! असे सुचणे गैर हे का? ववि मधे एक नाही दोन दोन जोड्या ठरल्या हेत हे म्हणताना कुणाचेच नाव घेतलेले नसताना फ या आयडीला ते स्वतःवर ओढवुन घ्यावेसे का बरे वाटले? आणि त्याच पोस्ट मधले ते एक वाक्य सोडले तर एक विचारपुर्वक केलेली पोस्ट या नात्याने त्या पोस्ट मधिल अन्य वाक्ये काय सुचवितात? पाल्हाळिकता? लक्ष वेधुन घेण्याची कृती? की लग्न ठरल्या नन्तर करावयाची गोष्टीन्ची ढोबळ यादी? माननीय ऍडमीन महोदय, वरील प्रत्येक पोस्ट मधिल प्रत्येक वाक्यावर प्रतिसाद देता येइल पण त्यामुळे वातावरण गढुळ होण्यापलिकडे काहीच होणार नाही! त्यामुळे आपल्या व मॉद्स च्या पोस्ट मधिल मजकुरास अनुसरुन वरील मन्डळीस मी इतकेच सान्गु इच्छितो, की तुमचा काहीतरी गैरसमज झाला असावा! त्या पोस्ट लिहिताना माझ्या डोळ्यासमोर किन्वा विचारात कुठेही फ ही आयडी नव्हती हे मी इश्वरसाक्ष स्मरुन सान्गण्यास सिद्ध हे! तो प्रकार केवळ विनोद निर्मितीकरिताच होता! मात्र ऍडमिन, या सर्वान्ना एक सुचनावजा विनन्ती कराविशी वाटते! मी माझे वैयक्तीक आयुष्याचे सन्दर्भ इथे फार क्वचित दिलेत! जे दिलेत ते शब्दश खरे आहेत, अन एकदा मी ते या जाहीर फोरम वर लिहिले तर त्याचा पुनरुल्लेख या ना त्या रास्त कारणाने कोणी केला तर त्यावर कोणास आक्षेप बाळगता येइल असे मला वाटत नाही! त्याचबरोबर "अनुल्लेख" नावाचा जाहीरपणे एखाद्या आयडीला शब्दश "वाळित" टाकण्याचा प्रकार अधिकृतपणे सुरु आहे तो या पब्लिक फोरम वर मला तरी योग्य वाटत नाही आणि या ना त्या प्रकारे मी अशा कृत्त्यान्चा कधी कोपरखळीतुन तर कधी प्रकटपणे निषेध नोन्दविलाच आहे! हे मी मान्य करतोच करतो! आणि त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मात्र मला त्यान्ची जरुर माफी मागितली पाहिजे! पुढे जे लिहित हे ते "सहानुभुती" मिळविण्याचा किन्वा लक्ष वेधुन घेण्याचा किन्वा आपण किती श्रेष्ठ होत असे दाखविण्याचा प्रयत्न नसुन मी या क्षणी शब्दश किती गडबडीत हे व त्यामुले मला सुसन्गत पोस्ट लिहिणे अवघड होत याचा फिडबॅक ऍडमिन आणि मॉद्स ना देण्याचा उद्देश हे! काल पाच वाजता मी पुण्यात असताना माझ्या सहकार्याचा फोन आला की लिम्बी गावाकडे (१०० कि.मी.) सिरीयस आजारी हे! तुला तत्काळ गाडि घेवुन जायला लागेल! मला ज़ेन ची सोय होवु शकली नाही तर एक खटारा कमान्डर जीप मिळाली तीतुन हिन्जवडीपासुन सन्ध्याकाळी साडेसहाला निघुन गावाकडे रात्री साडेदहाला पोचेस्तोवर बॅटरी डाऊन झालेली होती, गाडी उताराला लावुन ठेवली! पहाटे चार वाजता उठुन आवरुन सहा पर्यन्त गाडी धक्कास्टार्ट करुन निघलो ते हायवेला लागल्यावर गाडी बन्द पडल्यावर लिम्बोटल्या नी लिम्बोण्याना धक्का मारायला लावुन गाडी कशीबशी चालु केली ते एअर धरत असल्याने व चार सिलिन्डर्स पैकी एका इन्जेक्शन सिस्टिमच्या बोल्ट पासुन गळती असल्याने गाडी सहा वेळा बन्द पडुन पुन्हा पम्पिन्ग करुन व तीन वेळेस धक्का मारुन चालू करावी लागली! गाडीच्या स्टीअरिन्गला पाऊण फुटाचा प्ले, ब्रेक कमी व सर्व लिव्हर ऍक्सीलेटर सहीत ताकद लावुन चेपाव्या लागणार्या त्यामुळे पायात गोळे आलेले नि अशात आज कोणत्याही परिस्थितीत कामासाठी कम्पनीत हजर असणे अत्त्यावश्यक या परिस्थितित अकरा साडेअदराला घरी पोचुन लिम्बीला दवाखान्यात दाखवुन औषधपाणी करुन इथे हापीसात आलो हे ते पुन्हा मिनिटा मिनिटाचा हिशेब करीत कामास लागण्यासाथी! त्यात काल पाचशेच डिझेल भरताना दिलेल्या हजाराच्या नोटेची मोड परत घ्यायचे विसरुन गेल्यामुळे बसलेला पाचशेच्या फटक्याचे दुःख मला अधिक हे! असतात एकेक दिवस अन त्यान्चे रन्गढन्ग! तर कालचा अन आजचा दिवस माझ्या विशेष स्मरणात रहील तो वरील गडबडीच्या प्रसन्गामुळे त्याचबरोबर माननीय मॉड्स आणि ऍडमिन यान्च्या सन्युक्तीक प्रगल्भ उत्तरान्च्या वाचनामुळे! या पोस्ट मधे काही अधिक उणे असल्यास कृपया क्षमस्व! 
|
Admin's stand on this issue is totally unacceptable and unconvincing! Why there is such a huge reluctance from Admin-team to broadcast a message that such kind of misbehaviour is not acceptable and seriuosly condemned? And sny kind of such occurances in future will be treated seriously? This would have soothed guys. But Admin is only happy in announcing that परंतू मायबोलीवर ठरलेल्या लग्नांची आडून टिंगल करण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. But again, he or she supports Moderator_5! Moderator_5, in his statement, tries to put onus of this issue on members. That is supported by Admin. I strongly support Pha, Shraddhak and psg. The Admin-team's stand on this issue is exactly same as Arjun Singh! Refer the interview link provided by Saurabh.
|
Limbutimbu.. It is now "virtual" reality that people do not know who really you are! Just that people do not say anything does not mean that they do not know anything. I hope atleast now you will take a hint. Sorry for sounding like harsh. But I really am not! This is just my way of expressing opinions bluntly. But i sincerely hope that you could read between my lines.
|
>>>>>> Limbutimbu.. >>>>>> It is now "virtual" reality that people do not know who really you are! Just that people do not say anything does not mean that they do not know anything. >>>>>> I hope atleast now you will take a hint. पी कणेकर, या ऐवजी now it is "not a" "virtual" reality... & so on अस तर लिहायच नव्हत ना? माझ विन्ग्रजी कच्चहे म्हणुन विचारल! अन मला मराठीतल्या अन देवनागरीतल्या पोस्ट्स अधिक चान्गल्या समजतात!
|
I am sorry LT.. I am weak in writing Devanagari. Maybe, I will improve one day.. let me try. What I have written, surely does not have any typo in it. It is just exact what I wanted to say.
|
Kishya
| |
| Thursday, May 25, 2006 - 12:54 pm: |
| 
|
I would like to congratulate ADMIN for interpretating (the problem?) so nicely.
|
Deah Kishya, yes. Interpretation is quite good. Why would Admin fail to interpret it correctly? Where is the possibility? I am disappointed about the reaction/response.
|
"अनुल्लेख" नावाचा जाहीरपणे एखाद्या आयडीला शब्दश "वाळित" टाकण्याचा प्रकार अधिकृतपणे सुरु आहे तो या पब्लिक फोरम वर मला तरी योग्य वाटत नाही >>>>>> लिंबू, हे तू 'एखाद्या आयडीला' असे सर्वसाधारण शब्द वापरला आहेस म्हणून मीही ते तसेच गृहित धरतेय तर या बद्दल माझे मत : समजा एखाद्या आयडीने ( technically अक्षेपार्ह वाक्ये न लिहिता - जेणे करून मॉड काही बोलणार नाहीत!)मुद्दाम इतर आयडी(ज) ची कुरापत काढणे, अयोग्य टीका, शेरेबाजी असे चालू केले (किन्वा संबंधित आयडीज ना तसे वाटले)तर ते आयडीज काय करतील? त्या आयडी ला तसे सरळ सांगतील की बाबा तू बोलतोयस ते मला / आम्हाला आवडले नाहिये तर अशा comments बन्द कर! असे एकदा दोनदा अनेक वेळा होऊनही त्या आयडीने तसे चालूच ठेवले तर काय करावे इतरांनी? obviously जर वाद वाढवायचा नसेल तर त्या आयडीला अनुल्लेखाने मारणे, वाळीत टाकणे हेच करतील!! त्यात निषेध करण्यासारखे काय आहे?
|
Admin
| |
| Thursday, May 25, 2006 - 2:31 pm: |
| 
|
इथे दोन मुद्यांवर चर्चा चालू आहे. १) इथे ठरलेल्या लग्नांबद्दल आडून टिंगल / शेरेबाजी करण्याबद्दल. मला वाटले मी ते स्पष्ट केले. नसेल तर पुन्हा करतो. अशा कुठल्याही शेरेबाजीला, टिंगलीला (मग ती प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष) आमचा पूर्णपणे विरोध आहे. such kind of misbehaviour is not acceptable and any kind of such occurances will be treated seriously किंबहूना mod_5 यांच्या नंतर मी लिहिण्याचे कारण हेच होते की याची गंभीरपणे दखल घेतली जात आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|