|
Storvi
| |
| Thursday, May 18, 2006 - 10:28 pm: |
| 
|
मन्डळी मि जरा बु च क ळ्यातच पडलीये. माझी मुलगी ज्या डे केअर मध्ये जाते त्यांचेच पुढे प्रिस्कूल पण आहे. पण परवा एक मैत्रीण म्हणाली की montessori बघ. त्यांची शिक्षण पद्धत चांगली असते, आणि ते peaceful conflict resolution आणि environment बद्दल मुलांना शिकवतात वगैरे. आता ती जिथे आहे तिथे खुप खुष आहे. रोज घरी येतांना त्रास होतो कारण तिला तिहुन निघायचं नसतं Circle time तिचं अगदी लाडकं आहे. तिथल्या सगळ्या मुलांची शिक्षकांची नावं तिला पाठ झाली आहेत. तिथली गाणी वगैरे सारखी म्हणत असते, तर असे असतांना मला उगाचच तिला abruptly दुसर्या शाळेत घालायची इच्छा होत नाहीये, पण at the same time जर Montessori पद्धत खरच खुप चांगली असेल आणि मुलांच्या कला प्रमाणे असेल तर मला ते पहायच आहे. मी जे एक दोन पाहिले त्यांचा मला pomp जास्ती वाटला. basically बरेच नियम बियम दिसले आणि फ़क्त रयिसांच्या मुलांसाठी असेल असे वाटले, भरमसाठ फ़िया आणि ही एव्ढाल्ली नियमावली. पण तुम्हाला चांगले / वाईट अनुभव असतील तर मला सांगा प्लीज.
|
शिल्पा, अग माझा मुलगा प्रिस्कूल आणि मॉन्टेसरी दोन्हीकडे गेलाय. पण खरं सांगायचं तर मला काही major फ़रक दिसलाच नाही दोन्हीत!! ते peaceful conflict resolution वगैरे वाचून खरं मला हसूच आलं नियम काय अन शिक्षण पद्धती काय काही विशेष फ़रक नाही दिसले! फ़ी मात्र तू म्हणतेस तसे जरा जास्त होती मोन्टेसरीला. आणि हो बाकी कुणाला काही वेगळे अनुभव असतील तर मला पण माहित करून घ्यायल आअवडेल
|
मलाही अगदी तसंच वाटलं. भरपुर फ़ी आणि प्रतिष्टेला प्राध्यान्न दिल्यासारखं वाटलं. परंतु त्यांचा अभ्यासक्रम वेगळा आणि स्पर्धात्मक असतो असंही ऐकलं. आम्ही त्या ऐवजी आमच्या स्कुलडीस्ट्रिकमधली सर्वात चांगली शाळा होमस्कुल असलेल्या भागात रहायला गेलो. त्या शाळेतली जवळ्जवळ ८० टक्के मुलं एशिअन आहेत
|
Seema_
| |
| Thursday, May 18, 2006 - 11:42 pm: |
| 
|
मला योगायोगाच नवल वाटल एकदम . कारण exactly हेच type करायला मी इथ आलेले. माझ्या इथे मी ज्या day care मध्ये सध्या माझ्या मुलीला घातलय त्यात आणि montessory च्या फ़ी मध्ये काहीच फ़रक नाही आहे. आणि सध्याच day care मस्तच आहे एकदम.येताना माझ्या मुलीला अक्षरशहा ओढुन आणाव लागत . पण एकतर ते माझ्या नवर्याच्या office च्या शेजारीच आहे आणि घराच्याही जवळ म्हणुण मी तेच प्रेफ़र केल. पण परवा एक , दोघ जण म्हणाले कि एवढी फ़ी घालताच आहात तर montessori जास्त चांगला पर्याय ठरेल . मी सहजच मग जावुन आले तीथे. मला बाहेरुन setup मध्ये तरी काहीच फ़रक नाही दिसला. बरचस सगळ timetable वगैरे ही same आहे . पण मग त्यांची phillosophy वेगळी आहे म्हणजे नेमक काय ? जाणुण घ्यायला आवडेल. सध्याच्या day care मध्ये ती अगदी खुश आहे . पण भविष्यकाळाच्या द्रुष्टीने मी विचार करती आहे कि खरच montessori मुळ काही फ़रक पडेल का ?. ज्यानी मला suggest केल त्यानाही नेमक माहित नाही आहे . site वर तर सगळ same वाटतय . मी आणखी माहिती गोळा करतीच आहे . बघुया काय होत . sorry storvi तुझ confusion वाढवायचा उद्देश नव्हता ग .
|
Chiku
| |
| Thursday, May 18, 2006 - 11:58 pm: |
| 
|
मॉंटेसरी सिस्टिम मला तरी खुप आवडली. पुढे जेव्हा मॉंटेसरीची मुले १लीत जातात तेव्हा, त्यांची आधीच चांगली तयारी झालेली असते. माझा मुलगा ज्या शाळेत जातो, त्याच्या क्लास मधिल मुले (वय साडेतीन्-चार वर्षे) १-३० नंबर्स (कदाचित जास्त सुद्धा), छोटे ३-४ लेटर्स चे शब्द तसेच लिहिण्याची प्राक्टिस इ. करत आहेत. शाळेत मुलांना कोणतिही जबरदस्ती केली जात नाही, त्यांना स्वत:ला आवडेल ते काम निवडता येते. माझा मुलगा अडिच वर्षाचा असताना जवळ जवळ ९०% पॉटी ट्रेन झाला होता, उरलेला दहा टक्के मॉंटेसरीत जायला लागलयावर लगेच झाला, कारण त्याच्या शाळेने त्याला डायपर्स नका देऊ असे सांगितले. माझ्या माहितीत कुठलेहि डे केअर सेंटर नाही, जे बिना-डायपर मुले येऊ देते. डे केअर चे पण खुप नियम असतातच की मला डे केअरचा चांगला अनुभव आला नाही. तिथले लोक जास्त बेपर्वा वाटले.
|
Storvi
| |
| Thursday, May 18, 2006 - 11:59 pm: |
| 
|
नाही गं सीमा, उलट तुला नी मला दोघींना मदत झाली तर ब्येष्ट. मी जुजबी माहिती देते. मुळ कल्पना डॉ. मारिया मोन्टेसरी यांची. त्या ईटली च्या होत्या. त्यांनी गरिब आणि disabled मुलांन्च्या शिक्षणासाठी बराच रिसर्च केला आणि मग त्यांना लक्षात आले की हे तोडगे इतर मुलांनाही लागु पडतात. त्यांनी त्याच्या आधारावर teaching aids वगैरे बनवली आणि हि शिक्षण पद्धती त्यांचे मर्गाला धरुन आहे. पण मला मुळात problem कुठे झाला तर गरीब वगैरे मुलांच्या मदती साठी काम केलेल्या व्यक्तिच्या नावने निघालेल्या शाळा हल्ली फ़क्त प्रतिष्ठित उच्चभ्रु लोकांना परवडतील अश्या आहेत हा एक मुद्दा झाला, पण दुसरा असा कि हल्ली सगळ्या शाळा साधारणपणे तेच करत असतात असे वाटले. म्हणजे, वर्गात बसुन अक्षरं गिरवायला हल्ली कोणीच सांगत नाही. फ़क्त teaching aids चा कमी जास्त वापर हा issue असावा. माझ्य ओळखितला एक माणुस आहे त्याची मुलगी ३ वर्षांची आहे तिला computer वर स्वतःचे नाव टाईप करता येते, आणि इतरही बरेच काही येते. ती मोन्टेसरीला जाते. आता ह्याला प्रगती सम्जायचं की नाही हा भाग अलाहिदा. तसं तर काय आरोहीला alphabet ओळखता येतं पण ते ती घरीच शिकली . त्याला कितपत महत्व द्यायचं कळत नाही. शेवटि पुढे गेल्यावर सगळे एकाच पातळी वर येणार असे वाटते... anyways मी लिन्क देते थांब तिथे वाच म्हणजे कळेल. rainbow montessori
|
Storvi
| |
| Friday, May 19, 2006 - 12:01 am: |
| 
|
चिकु माझी लेक गेले कित्येक महिने बिगर डायपर्स ची डे केअर ला जाते. तिचे हे डे केअर मला त्या द्रुष्टीने फ़ारच सोयीचे पडले.
|
Arch
| |
| Friday, May 19, 2006 - 12:30 am: |
| 
|
शील्पा, मी लिहिते ग दोन्ही system बद्दल. माझा मुलगा आणि मुलगी montessori system मध्ये गेली pre-school ला. जरा वेळ काढून लिहिते.
|
Ashwini
| |
| Friday, May 19, 2006 - 2:31 am: |
| 
|
शिल्पा, मला गंमत वाटली की आपण सगळेच कसे या सारख्याच प्रश्नांना सामोरे जातो. ठराविक काळाने ठराविक प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. मी दोन वर्षापूर्वी याच द्वंद्वातून गेले होते. शेवटी निर्णय घेतला की montessori मध्येच मुलाला घालायचं आणि मी आज त्या निर्णयाबद्दल अतिशय समाधानी आहे. montessori system मध्ये मुलाला push करत नाहीत. हा कुणाला गुण वाटेल तर कुणाला दोष. पण ते मुलाच्या कलाने घेतात. मुलांना नविन गोष्टी try करायला encourage करतात पण push करत नाहीत. Actually अकॅडमिक्सवर जास्त भर देतच नाहीत. माझ्या पाच वर्षाच्या मुलाला सगळे खंड माहीत आहेत, पदार्थाच्या states , living, non-living things , गाण्यावरून कुठला पक्षी आहे ते ओळखणे, इतर देशांचं culture , भूगोल इ. असंख्य गोष्टी माहिती आहेत. Addition, subtraction , छोटी पुस्तके वाचणे हे तर आपल्या सगळ्याच indian मुलांना येत असते. सगळ्यात जास्त मला आवडली ती त्यांची toys आणि tools . इतका विचार करून बनवलेली लहान मुलांसाठीची खेळणी मी तरी आजपर्यंत इतरत्र कुठे पाहीली नाहीत. त्या toys चा उद्देश मुलांमध्ये independance, कुतुहल आणि आत्मविश्वास निर्माण करणे हा असतो. माझ्या मुलात मला या तिन्ही गोष्टी दिसत आहेत. आणखी एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे मॅनर्स. या दोन वर्षात ईशानच्या एकंदर मॅनरिझममध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते आहे. Practical life वर पण खूप भर देतात. प्रत्येक मुलाला एक plant लावायला देतात. त्याची काळजी त्याने घ्यायची. मागच्या आठवड्यात ते plant घरी घेऊन आला आहे कारण आता शाळा संपणार ना! अंड्यातून पिल्लू बाहेर येतं हे नुसतं शिकवण्याऐवजी त्यांच्या classroom मध्ये eggs hatch करायला ठेवली होती. आणि मग ती hatch होऊन पिल्लं बाहेर आल्यावर याच पिल्लांचा कलकलाट जास्त होता. सध्याचा नविन project म्हणजे classroom मध्ये caterpillar ठेवलय, butterfly बाहेर यायची वाट पाहात आहेत. माझ्या छोट्या सुरवंटाचं मात्र फुलपाखरू already झालय... 
|
अश्विनी तू जे लिहिलयस ते सर्व प्रिस्कूल मधे पण असते की! माझा मुलगा दोन्हीकडे एक एक वर्ष होता पण अगदी प्रामणिक पणे सांगायचे तर मला कळलेले नाहिये की दोन्हीत फ़रक काय!
|
Ashwini
| |
| Friday, May 19, 2006 - 3:04 am: |
| 
|
मैत्रेयी, montessori फक्त चांगली आणि preschools वाईट असं मला म्हणायचं नाहीये. बरीचशी preschools पण हे सगळं करत असतील. तुझ्या मुलाचे preschool त्यापैकी एक असेल. पण सगळ्याच preschools मध्ये असे असेल असे नाही. थोडे कष्ट घेऊन research केला तर अशी preschools सापडूही शकतील. माझा मोठा मुलगा daycare मध्येच preschool ला गेला. त्याचं काही वाईट झालय अश्यातला भाग नाही. पण दोन्हीच्या एकंदर कार्यपद्धतीत मला खूप फरक जाणवला. मी फक्त मला आलेला अनुभव लिहीला ज्याने कुणाला decision घेण्यात मदत झाली तर होवो. आणि ते म्हणतात की तुम्हाला जर montessori चा खराखुरा effect पाहायचा असेल तर किमान तिन वर्षे मुलांना तिथे ठेवणे आवश्यक आहे. मला अजून एक वर्ष ठेवायची खूप इच्छा होती. पण ते लोक सुट्ट्या खूप घेतात. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला baby sitter शोधा इ. गोष्टी करायला लागतात. Day care मध्येच preschool असेल तर मात्र तो एक फायदा आहे. Day cares कायम उघडी असतात. फक्ट मोठ्या सुट्ट्यांना बंद असतात. montessori schools इतक्या वेळा बंद असतात की ते फारच गैरसोयीचं होतं.
|
हं, असेल गं तू म्हणतेस तसेही असेल. आता मुलीच्या वेळी पुन्हा रिसर्च करेन च नव्याने
|
Lalu
| |
| Friday, May 19, 2006 - 3:39 am: |
| 
|
मी MT ने वर लिहिलंय तेच लिहिणार होते. बहुतेक Day care centers मधे हे सगळे असते. आपण सगळे सहसा शहराच्या किंवा गावाच्या चांगल्या भागात राहतो, तिथली Day care centers चांगलीच असतात, एखाद दुसरे सोडल्यास. शेवटी मूल जिथे आनंदाने राहील आणि वय वर्षे ५ पर्यन्त साधारण जे शिकावे ते शिकले म्हणजे झाले. आपण घरी मुलांना खूप वेळ देतो. एखाद्या गोष्टीत गती असेल तर ती गरज आपण पूर्ण करु शकतो. शिल्पाने म्हटल्याप्रमाणे भरमसाठ फिया आणि नियमावली, काही ठिकाणी तर academics वर जास्त भर आहे इथे. एका मुलीच्या आईने मुलीला न झेपल्याने काढून साध्या प्रीस्कूल मधे घातल्याचे एक उदाहरण मला माहित आहे. शेवटी कोणाला काय सूट होईल ते सान्गता येत नाही. कुठलीही एक सिस्टिम चान्गली किंवा वाईट नाहीच. कोणतीही निवडली तरी पुढे नक्की काय फायदा / तोटा होतो ते मला तरी माहित नाही.
|
Aschig
| |
| Friday, May 19, 2006 - 7:18 am: |
| 
|
shilpa, the montessory philosophy is great. But as has been amply pointed out, many pre-schools too follow it to an extent. So if you find a GOOD montessory, it is worh it - for a couple of years. Then, if you can afford to pay, it makes more sense to add a bit and send the child to a private school. In his first grade Jay tought his montesorry teacher how to play chess. In his third grade his report said that he had mastered trinomial theorem. I was more than curious and prodded his teacher as to what a trinomial theorem is. She could not answer and we promptly pulled him out. BUT if the philosphy is being properly followed, it is great. So shop around. Remember that California standards are not great. So be wary of schools that do not feel the necessity to complete even that. No matter how good thay are touted to be, they are unlikely to serve your child well. She may become a great world citizen, but she may have to have her own business or freelance operation.
|
Boli
| |
| Friday, May 19, 2006 - 1:25 pm: |
| 
|
मस्त discussion सुरु आहे. तरी आधी मला हे सांगा, जास्त fee म्हणजे किती ? The options available for my 18 month old daugther include a Child Care center, Rainbow academy. What can this be called, just a day care or pre-school ? They have classrooms, for different age groups. Is'nt a full day (10-12 hrs) activity too much for 2 - 5 yr old kids, when both parents are working? Sorry, if all this is out of context.
|
Ashwini
| |
| Friday, May 19, 2006 - 1:45 pm: |
| 
|
लालु, प्रत्येक montessory schools पण मग थोडीफार वेगळी पद्धत follow करत असतील. मला इतर schools चं माहीत नाही. पण माझ्या मुलाच्या शाळेत तर academics वर अजिबात भर नाही. मीच त्याच्या टीचरला म्हंटलं की बाई ह्याला जरा push करत जा. तिचं म्हणणं होतं Kids will learn when they are ready.
|
बहुतेक Montessory शळा शिक्षणावर भर देतात, आणि त्यातही एकाच वर्गात असणारी मुळं वेगवेगळ्या पातळीवर दिसतात... आमच्या इथल्या Montessory मधली काही मुलं गुणाकार, भागाकार करू शकतात तर काही बेरजेवर थांबतात. शेवटी त्या मुला मुलीवर अवलंबून असतं.. पण पुढे येते KG , पहिली दुसरी. तिथे सगळ्या मुलाना बहुतेक वेळा एकत्र म्हणजे एक दोन तीन पासून बेरीज वजाबाकी शिकवली जाते, मग Montessory तून आलेल्या मुलाना पुन्हा तेच करावं लागतं आमच्या इथल्या शाळांमध्ये A & E वैगैरे असतं, पण ते तिसरी पासून हुशार मुलांना वेगळं घेऊन शिकवतात... तेव्हा मुलांना लहानपणी थोडं खेळायला बागडायला दिलं तर फारसं काही नुकसान होत नाही असं मला वाटतं, पुढे पंधरा वीस वर्षं आहेतच की बेरजा, गुणाकार, भागाकार करायला? काही मुलांना लहानपणा पासून आवडच असते अभ्यासाची, त्यांना Montessory हवीच असेल तर प्रश्न मिटला, पण pre-school मध्ये फार शिकवत नसतील, तरी जायला हरकत नाही.. शेवटी 'बालपणीचा काळ सुखाचा' आपणच करून दिला पाहिजे ना? मुलांची प्रगती ही आईवडिलांची इतर पालकांबरोबर चढाओढ होऊ नये हे मात्र महत्वाचं
|
माझी मैत्रिणिचा मुलगा(वय ३वर्ष) मॉंटेसरीत जाईल....फ़ी आहे $1200 for 5 days a week for 4 hrs प्रिस्कुलचे नक्कि age काय?कधिपासुन सुरु करावे?प्रिस्कुलच्या आधी डे केअर सुरु करणे आवश्यक आहे का?
|
Ninavi
| |
| Friday, May 19, 2006 - 4:22 pm: |
| 
|
अरे! विनय, मी अगदी हीच पोस्ट लिहायला आले होते आत्ता. अनुमोदन. शिल्पा, आलीस का बुचकळ्यातून बाहेर? 
|
challenger, stratford ह्या Montessorys आहेत काय?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|