Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 14, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » पगार किती म्हन्ता...? » Archive through April 14, 2006 « Previous Next »

Aschig
Thursday, April 13, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arvind Verma, The Indian Police: A Critical Evaluation (Regency Publications, New Delhi 2005) Pp. 287, Price Rs.750.

....
This was followed by its massive communalisation, leading up to the demolition of the Babri Masjid in 1992, the Bombay violence in 1992-3 and the Gujarat carnage in 2002, which witnessed the active participation and facilitation by the police in the mass violence against minority communities. ....

Arch
Thursday, April 13, 2006 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे resident doctors बद्दल कोणी लिहिल नाही. २४ तास call वर राहून वर्षानुवर्षांच शिक्षण घेऊन त्यांचे पगार किती कमी असतात. त्यांची responsibility, education कमी असत? मग त्यांचे पगार IT पेक्षा फ़ारच कमी असतात

Moodi
Thursday, April 13, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

US चे माहीत नाही आर्च. पण सध्या इथे UK मध्ये आलेल्या भारतीय डॉक्टरांचे जाम हाल आहेत. आता लंडनमधील अन जवळच्या देवळासमोर लाईनीत उभे आहेत जेवणाकरता. घरी परत जायला पण पैसा नाही.
अन एकीकडे यांच्या सरकारी मेडीकल सेवेत बर्‍याच शहरात डेंटीस्ट सुद्धा नाहीत, अगदी ३ ते ५ वर्षे वाट पहावी लागते. प्रायव्हेट मध्ये खुपच महाग आहे, विमा प्रकरणे आहेतच.


Boli
Thursday, April 13, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Unless I have IT salary, I will not be able to educate my kid in IIM. right?
Might be this is out of context.. But later this will boil down to the same in the coming generation. Is'nt it?

Zakki
Thursday, April 13, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक गोष्ट, नोकरदारांचे शोषण हे जागतिक आहे. कमी खर्चात जास्त काम करून घेणे, यावर मॅनेजरचे पगार, बोनस अवलंबूब असतात. त्यात पैसा खाणे हा प्रकार नसला तरी. फक्त, अमेरिकेत, एकंदरीतच अगदी सर्वसाधारण, कमी शिक्षित अशी जनतासुद्धा खूप जागृत आहे, असे मला वाटते. म्हणून, लाचलुचपतीची प्रकरणे कमी नि पोलिस, शिक्षक यांना पण अगदीच कमी पगार मिळत नाहीत. आता सगळेच पगार IT वाल्यांच्या तुलनेत इथे सुद्धा कमी आहेत. शिवाय, गेल्या तीस वर्षात prsidents, ceo इ. लोकांचे पगार average employees पेक्षा शेकडो टक्क्यांनी वाढले आहेत. त्याहि बद्दल ओरडा झाला नि निदान काही कंपन्यांच्या president, ceo यांनी आपले पगार कमी केले.

मला प्रश्न पडतो की भारतात आजकाल इतके श्रीमंत लोक दिसतात, निदान पुण्या मुंबईत तरी, त्यांच्याजवळ एव्हढा पैसा कुठून आला? बर्‍याच लोकांचे खर्च बघितले की आश्चर्य वाटते, की यांना हे सर्व परवडते तरी कसे? सगळेच काही IT मधे नाहीत.
अमेरिकेची गोष्ट अशी (नि मी १९७० सालाच्या आधीपासून बघतो आहे) की बर्‍याचश्या कंपन्या भराभरा computerization च्या मागे लागल्या, इथे सगळ्या कंपन्यांमधे बरीच वर्षे (१९६५-१९९५) कंपनीचे नोकरीदारच IT ची सर्व कामे करत. Outsourcing, canned programs, contracting या त्यामानाने अगदी अलिकडच्या गोष्टी. त्या मानाने भारतात आज, भारतातातल्या भारतात, भारतासाठी IT करणारे लोक किती आहेत? त्यांना काय पगार मिळतात? ही माहिती कुणाला आहे का?


Bsa
Thursday, April 13, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I think people working for IT department in Profitable Indian companies get decent salary. [My own experience, I worked for two Indian Clients, and they offered me almost same salary as my software company was paying me. Both those companies are good as far as profits/balance sheets are concerned.]



Arch
Thursday, April 13, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, मी भारतातल्या resident doctors बद्दल बोलत होते. बरेचसे MS, MD करत असतात. शिवाय super specialization चालू असत. त्यामुळे वय अशी असतात की लग्नपण झालेल असत पण त्या तुटपुंज्या पगारात घर चालवण मुष्कील असत. घरून जर मदत नसेल तर एवढ सगळ शिक्षण करून private practice वगैरेपण सुरु करता येत नाही आणि त्यानंतर general hospital मध्येच lecturer, prof म्हणून काम करायला लागल तरी पगार फ़ारच कमी असतो. माझ्या बहिणीमुळे मला ह्या सगळ्याची कल्पना आहे.

Moodi
Thursday, April 13, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सॉरी ग मला वाटल आता परदेशात पण हेच व्हायला लागल का.
डोनेशन, फी पण वाढल्याने हे शिक्षण आता किती महाग होईल देव जाणे.
इंटर्नशीप, परत पुढे स्वतचा दवाखाना, त्यात जम बसवणे यात तर किती काळ जातोय.



Muks77
Thursday, April 13, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arch,very true.specially resident doctors in maharashtra gets around 8000 pm and work for 24 hrs 7 days a week with 4-5 residents living in a single room and mostof them married,more than 26-27 .due 2 a strike last month the amt has increased now but still its not enough.its a common feeling that doctors earns 2 much.compare an IT professional of 30 yrs with a doctor of same age.we complete oyr PG (MD/MS}at 27-28 and it takes at least 2 yrs for a new doc 2 start full time private practice.till then most of them works as lecturer or part time consultatnts and doesnt earn enough.forget UK ,situation will be worst in india itself in nxt 5 yrs as more and more med colleges have started and few more r starting.this is only about MBBS doctors.BAMS,BHMS...situation is pathetic.these people work with as little as 4000 pm.
a PG doctor who spends 5 yrs for MBBS+1 yr int.+3 yrs in PG,almost 10 yrs and after that what he gets these days is....

Aschig
Thursday, April 13, 2006 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I think that the most motivated people in any occupation try to get to a comfortable position, or try to find a niche. It is quiet likely that people who are in an occupation due to the flow or peer pressure, or parental pressure, or lack of self-judgement are the ones who face the greatest difficulties. Some of them end up in the "right" occupation for their times (e.g. IT right now) but this can be a function of time (as was the case when IT professionals here were losing their jobs after the dotcom bust).

One long term solution is for us to ensure that we do not force our children into an occupation of our choice, or they do not get into one just because a million other are doing that or because it seems to have money today. They should be doing what they seem to be best at.

Zakki has a very good point about being awake to ones rights and responsibilities and being able to raise voice when necessary. By the old adages of being humble in front of elders and the "Yes, sir" part that seems to have entered our genes during the British Raj could be a small barrier.

The demand and supply principle also takes its toll. In my MSc Physics class of 25, 20 of the well trained students chose to do BEd. In fact their aim in doing MSc was mainly to get a PG degree required for a good teaching post then. Only a couple genuinely wanted to be teaching for the sake of teaching.

The bottomline: we should keep our children in mind when we think about these issues and train them accordingly. (Students here should also think on these lines).

Ekanath
Thursday, April 13, 2006 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राथमिक शिक्षकांचे पगार काही हास्यास्पद वगैरे नाहियेत. कामानुसार च आहेत. माझी जाऊ अगदी लहान गावाच्या ठिकाणे प्राथमिक शिक्षिका आहे, तिला १२ की तेरा अहजार म्हणजे चांगला च आहे की. प्राध्यापकांना पाचव्या वेतन आयोगानुसार २५ ह्cया आस पास मिळतो! हा काही वाईट नाही. आता multinationals शी तुलना करू नका. तिथे पेन्शन नसते. काम खरच करावे लागते, सरकारी सुट्ट्या नसतात आणि कामात कसूर

माफ करा, विरोधासाठी विरोध नाही. किंवा व्यक्तीच्या (खर्‍या) अनुभवांवर शंकाही घ्यायची नाहीये. परंतु, हे विधान वस्तुस्थितीला धरून नाहीये. कोणत्या गावाच्या कोणत्या शाळेत हे पगार आहेत सांगा. मीही अर्ज करून बघतो.

प्राथमिक शिक्षक म्हणजे "कमी skill " असे मानत असाल तर ती घोड चूकच म्हणावी लागेल. किमान मी तरी माझ्या मुलीला सर्वोत्तम शिक्षक असावेत असाच आग्रह धरेन आणि माझ्या (फक्त एका मुलीच्या) संगोपनच्या अनुभवावरून, प्राथमिक शिक्षकांमधेच गांभिर्याची कमी असते, असे स्पष्ट दिसते.

दुसरे असे, की प्रत्येक काम हे आपापल्या दृष्टीने महत्त्वाचे असते. भंग्याने आपले काम केले नाही तर आपली रोजची पंचाईत येईल हे विसरू नये. आपल्याला दिसत नसले तरी हे काम आपल्या दृष्टीआड कुनी करतच असते.

हा व्यक्तीगत आक्षेप अथवा आकस नाही. मांडलेले काही मुद्दे अज्ञानमूलक वाटले म्हणून प्रतिवाद केला.

मला वाटते, व्यवसाय कोणता आहे हे आड न येता जगण्याच्या मूलभूत सोयी सर्वांना सारख्या प्रमाणात उपलब्ध असाव्यात. दोन वेळचे पोटभर जेवण आणि पुरेसा निवारा, वस्त्रे सर्वांना मिळावीत. ही विषमता (भारतीय समाजात) फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यावर उपाय योजलेच पाहिजेत, असे वाटते.

सगळी चर्चा वाचली नाहीये. काही मुद्दे उगाळले असतील तर माफ करा. शिवाय, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राशी माझा संबंध नाही, त्यामुळे त्यावर काय बोलणार?


Ekanath
Thursday, April 13, 2006 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पु. ल. देशपांडे यांचा "शिक्षकांच्या मोर्चा" की असाच काही लेख आहे. तो कुनाला आठवतो का? सुंदर आहे.
माझा पेशा म्हणून सहानुभुती किंवा पक्षपात नाही. पण प्राथमिक शिक्षण, जे देशाच्या तरुणाईचा, पर्यायाने देशाचाच पाया घडवते, त्या प्राथमिक शिक्षणाची अवस्था अतिशय म्हणजे अतिशय वाईट आहे. वर्षाला चाळीस पन्नास हजार फी घेणार्‍या शाळांबद्दल मी म्हणत नाहीये. पण अशा शाळा आहेतच किती? टक्कीवारी काढलीत तर फारच गंभीर चित्र दिसून येते. प्राथमिक शिक्षणाची अवस्था गंभीर आहे आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागताहेत, लागणार आहेत. हे विषयाला धरुन नसेलही कदाचित. माफ कारा.


Polis
Thursday, April 13, 2006 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येकनाथभाऊ, एकदम दोनशे टक्के बरोबर बोललात बघा.. एखाद दुसरे अपवादात्मक(तेही संशयास्पद हायेच..म्हने बारा हजार ग्रामिन भागात.आमला काय पेडगावचे समज्ल्या काय)उदाहरन सोडले तर सगलीकडे, IT/MBA सोडून येकच बोम्ब आहे.
अन रशिया पर्यन्त कशाला जातोय आपन,कमित कमि भारतातील आतल्या भागातील तरी सुधारना केली तरी पुष्कल आहे. वर कुनि म्हणलय ते मुलावर शिक्षण लादने तर तोही प्रश्ण नाहीये, शेवटी जिथे पगार अन पैसा जास्त त्याचह शिक्षन सर्वाना हव असत. मुद्दा यो आहे की कुठल्याही क्षेत्रातील शिक्षन घ्यायला बाहेर त्या क्षेत्रात तशा चान्गल्या decent सन्धि उपलब्ध आहेत का..? IT मदे हायेत तेच IIM/MBA च शिक्षन मुलाला देवू शकतील, हे एकदम बरोबर आहे.. अन हे दुष्टचक्र काही सम्पेल असे असे दिसत नाही. अन भाऊ, पोट सुटायच म्हनाल तर आजकाल भारत त्या बाबतीत लयीच अग्रेसर होतोय..तवा सर्वानाच कामावरून काढाव लागल
:-)


Zakki
Thursday, April 13, 2006 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरी एक गोष्ट अमेरिकेबद्दल. इथे पैसे मिळवण्यासाठी काम कुठले करता याबाबतीत dignity of labor हे तत्व मनापासून पाळले जाते. एकतर पटकन् पगार किती? हा प्रश्न कुणाला विचारणे हे असभ्य समजले जाते, त्यामुळे मला इतका पगार मिळतो नि तुला इतका कमी मिळतो, असले भेदभाव नाहीत. अगदी सुशिक्षित नि श्रीमंत लोकांची मुले देखील शाळा कॉलेजात, मजूरी, वेटर असली कामे करून, स्वत:च्या चैनीचे पैसे स्वत: कमावतात! त्यात त्यांनाहि लाज नाही, नि कुणालाच काही वाटत नाही! अगदी इंजिनियरची नोकरी सुटली म्हणून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणारी बाई, नि पुरुष मी पाहिले आहेत! त्यांना असे वाटत नाही की हे काम आपण कसे करायचे? कुणालाच त्याचे काही वाटत नाही, नि कुणि त्यांची हेटाळाणी करत नाही!

Storvi
Thursday, April 13, 2006 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे सगळे अगदी कुठलही काम करायला तयार असतात हे खरंय पण तरी पगाराची तफ़ावत इथेही आहेच.
job stats शिक्षक वगैरे मंडळींचा पगार पहा आणि computer मध्ल्या लोकांचा पहा....
अर्थात इथेही ते होतां म्हणून ते acceptable आहे असं मुळीच नाही. पण आपल्याच देशात हे होतं असा गैरसमज नसावा एवढेच.

>>मला वाटते, व्यवसाय कोणता आहे हे आड न येता जगण्याच्या मूलभूत सोयी सर्वांना सारख्या प्रमाणात उपलब्ध असाव्यात. दोन वेळचे पोटभर जेवण आणि पुरेसा निवारा, वस्त्रे सर्वांना मिळावीत. ही विषमता (भारतीय समाजात) फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यावर उपाय योजलेच पाहिजेत, असे वाटते>>
आपले सरकार ration card देतं आणि त्या कार्डावर जितकी माणसं आहेत त्यावर सवलतीच्या दरात काही item मिळतात. मी NDA मध्ये होते तेंव्हा, सर्रास लोकं आमचं रेशन कार्डावर मिळणर वाणसामान बाहेर विकायचे. बेसिकली काय आहे, की सरकारने काही गोष्टी सवलतीच्या दरात दिल्या तरी लोक त्याचा एक तर गैर्फ़ायदा घेतीलच मग काय करावं? खरय आहे, पोटापाण्याची आनि healthcare ची सोय सगळ्यांसाठि व्हायला हवी पण जोवर सगळे ही सोय responsibly वापरत नाहीत तोवर काय उपयोग? NDA जवळ कोपरे म्हणुन एक गाव होत, तिथली जागा सरकारने घेतली तेंव्हा तिथल्या ग्रामस्तांना वारजे माळ्वाडी इथे जागा दिल्या. या सर्व लोकांनी त्या जागा चक्क विकल्या आणि पुन्हा रहायला कुठल्या तरी कडम्ड्या जागेत गेले... अशी mentality असेल तर कशी कुठलीही योजना यशश्वी होणार?


Ekanath
Friday, April 14, 2006 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपाययोजना करणे म्हणजे काही फुकटात देणे, सवततीत देणे, असेच थोडी आहे?

आणि तुम्ही म्हणता तशा मानसिकतेकडे इतक्या वरवर पाहून चालणार नाही, असे वाटते. तुम्ही दिलेल्या उदाहरणातली मंडळी अशी का वागतात? तर जेंव्हा जमीन किंवा घर फुकटात मिळते तेंव्हा ते विकून मिळणारा भरमसाठ पैसा यांना मोहात पाडतो. इतका पैसा यांनी कधी पाहिलेलाच नसतो. त्यामुळे त्या स्तरावरची लोकं अशीच वागणार. त्यात त्यांचेही काही चुकत नाही. सद्वर्तन आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा उपाशी / अर्धपोटी लोकांकडून करणे, हेच त्यांच्यावर मोठा अन्याय करणारे आहे, असे वाटते.

अहो गंमत सांगतो. समाजाच्या तळागाळात काम करणारे लोक मारे खेड्यापाड्यात जाऊन सांगतात की पाणी उकळून प्या, अन्न पुरेसे शिजवून खा, वैगेरे. पण गंमत अशी असते की मुळात पाणीच नसते. पाणी असले तर ते उकळायला काही साधन नसते. ते असले तर उकळलेले पाणी साठवायला पुरेशी साधनेच नसतात. अशा वेळेस तुम्ही किती आणि काय अपेक्षा करणार?

महिन्याला लाखभर रुपये कमावणारा असो नाही तर दिवसाला ७० रुपये मजुरी करणारा असो, भविष्याची चिंता कुनाला सुटती आहे का? जो तो आपपल्या पद्धतीने जास्तीत जास्त पैसा मिळवण्याचे मार्ग शोधत असतो. म्हणूनच म्हटले की किमान गरजा आटापिटा न करता भागल्या पाहिजेत. त्या भागण्यासाठी पुरेसे काम उपलब्ध पाहिजे. (वरच्या एका उदाहरनात सुशिक्षित माणूस परदेशात पेट्रोल पंपावर काम करतो असे म्हटले आहे. तसे करण्यास लोक कचरत नाहीत कारण, पेट्रोल पंपावर काम करुनही किमान life style शी तडजोडी कराव्या लागणार नाहीत, याची खात्री, हे असू शकते का? निश्चितच हो! आपल्याकडे स्वखुशीने अशी कामे स्वीकारणारा वर्गच नाहीये. पेट्रोल पंपावर काम करणे कमी दर्जाचे असते कारण ते काम अगदीच क्षुल्लक पैसा देते.)

मागे BBC चे Mark Tully यांचे कोणतेतरी पुस्तक चाळत होतो. तेंव्हा प्रस्तावनेत कुणीतरी फार सुखे उद्गार काढले होते. The problem with India is that every problem has two sides and ironically both are correct. तसेच आहे. सुस्थितीतल्या वर्गातल्यांचे बहुतांश नियम / निकष / अपेक्षा या तात्विकदृष्ट्या चूक नसल्या तरी वस्तुस्थिती ह्या सगळ्यांना छेद देणारी असते.

तेंव्हा "आजकाल भारतातही सगळ्यांना बरे पगार आहेत, पाचव्या पंचवार्षि योजनेत चांगली पगारवाढ झाली, सरकारी नोकरांना पेन्शन असते" या मुद्द्यांमधे काही प्रमाणात तथ्य असले, तरी म्हणून आर्थिक विषमतेची दरी दिवसेंदिवस वाढतच आहे. एका वर्गाला किमान चांगली चार चाकी घेता येत नाही म्हणून दुःख आहे, देसर्‍या वर्गाला दोन वेळेस पोट भरत नाही म्हणून दुःख आहे. दोन्ही वर्गात मोडणार्‍या लोकांची संख्या लक्षणीय आहे, हे मात्र खरे.
तरीही, भारताची economy सुधारते आहे, असे जाणकार म्हणतात. तळागाळापर्‍यंत लाभ किती पोचतो ते बघायचे!

अनेक आर्थिक पातळ्यांवर विभागलेला आपला समाज आहे. पण जास्तीत जास्त लोकांना विनासायास काम मिळाले पाहिजे आणि त्या कामाचा किमान इतका मोबदला हवा की किमान मूलभूत गरजा पुरेशा भागल्या पाहिजेत. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा.

असो. विषयबाह्य असल्यास क्षमस्व.


Ekanath
Friday, April 14, 2006 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती मुद्दे एकमेकात गुंतलेले असतात पहा. दुसर्‍या एका चर्चा सत्रात बारबालांवर काही चर्चा चाललेली आहे.

डान्सबार मुळे तिथे जाणारी (काही) कुटुंबे धोक्यात येतात हे खरे, तसेच सगळ्याच मुली केवळ चैनीसाठी हा व्यवसाय स्वीकारतात असेही नव्हे. कोणाची बाजू घेणार? नैतिकतेची बाजू घेतली तर पोटासाठी घाणेरडे काम करणार्‍या मुलींवर अन्याय होतो आणि समष्टीची बाजू घ्यायची म्हटली तर अनेक पुरुष स्वतःच्या कुटुंबाची वाताहात करुन घेत आहेत, हेही खोटे नाही!!

बाजू घेणार कुणाची? एक प्रश्न, दोन बाजू, आणि दोन्ही बाजूत पुरेसे तथ्य. अशी सगळी गुंतागुंत आहे.


Gajanandesai
Friday, April 14, 2006 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेंव्हा जमीन किंवा घर फुकटात मिळते तेंव्हा ते विकून मिळणारा भरमसाठ पैसा यांना मोहात पाडतो. इतका पैसा यांनी कधी पाहिलेलाच नसतो. <<<

सरकार त्यांची जागा घेते आणि बदल्यात ही जमीन, घरे त्यांना दिली जातात तर त्याला फुकट कसे म्हणता येईल?

आणि इतका पैसा त्यांनी कधी पाहिलेलाच नसतो अर्थात त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यावर, असे घर, जमीन विकून त्यातून भविष्याची थोडीफार तरतूद करावी असा विचारही त्यांच्या दृष्टीने स्वाभाविकच म्हणायला हवा.

मी असा विचार केला की माझे आवडते घर, आवडती जमीन जी माझ्या मालकीची आहे ती जर सरकार घेत असेल आणि त्या बदल्यात मला दुसरी जमीन, घर देत असेल तर हा सौदा झाला. ही सरकारने दिलेली जागा मला आवडेल, सोयीची असेलच असे नाही. तेव्हा पुढे ती मी विकूही शकतो. त्यात काही गैर(सद्वर्तन किंवा प्रामाणिकपणाला सोडून) वाटले नाही.

शिधापत्रिकेवर मिळणारा शिधा बाहेर विकणे हा मात्र सरळ सरळ गैरफायदा उठवणे आहे असे मला वाटते.


Raja_of_net
Friday, April 14, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोलिस,
इथे प्रश्ण हा आहे कि एकि कडे IIT/IIM ना भरमसाठ पगार असताना सरकारी खात्यात बराच कमि पगार दिला जातो?
आगोदरच कुणितरी लिहिल्याप्रमाणे हि तुलना बरोबर नाही. एक तर तुलना करताना तुम्ही जे उदाहरण दिले तेच चुकिचे आहे असे मला वाटते. कारण माझ्या मते (मी IITan/IIMan नसल्यामुळे), हि मंडळी कुठल्यातरी खाजगी कंपनीत साधारणता उच्च पदावर काम करीत असतात compared to a polis constable. But if you compare the salary of a ASP/ACP along with all the benefits ( भत्ते ) and allowances he/she is entitled to get, with a private sector employee it will be almost the same . त्या व्यतिरीक्त, निव्रुत्ती नंतर मिळणार्‍या निव्रुत्ति वेतनाचा विचार ही केला पाहिजे.

ऊदा.
माझे वडिल केंद्र शासनाच्या नोकरीतुन Head Clerk पदाहुन रिटायर झाले आहेत. सध्या त्याना मिळणारी पेंशन हि INR १४,००० आहे आणी लागू होणार्‍या pay commision प्रमाणे वाढत जाइल. तसेच आजन्म मोफ़त वैद्यकिय सुविधा आहे. त्यांच्या निधना नंतर माझ्या आईला ह्या पेंशन चा काहि भाग ति जिवित असे पर्यंत मिळेल.

भले private sector मधे महिन्याचा पगार जास्त मिळतो पन निव्रुत्ति नंतर हे सगळे benefits नाहि मिळत. मग त्यासाठि निरनिराळ्या ठिकाणी गुंतवणुक करावि लागते, आणि जर का तो खर्च पगारातुन वजा केला तर मला वाटत कि दोंन्हिंचे पगार एकाच पातळिवर येतिल.

चुकत असलो तर माफि असावि.


Maanus
Friday, April 14, 2006 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी रशियामधे सगळ्यांना सारखा पगार देत होते. ते उदाहरन देन्यासाठी मी रशियाचा उल्लेख केलेला.

कालच्या Wall st. Journal मधे एक बातमी आहे. Exxon Discloses Raymonds Pay. News is in marketplace section रेमंडचा दर दिवसाचा पगार आहे $ 190,915 , मला वर्षालापन नाही मिळत हो तेवढे :-(.

माझ्या जुन्या कंपनीच्या COO चा पगार, 30 million $ , CEO ला त्या मनाने खुप कमी होता.



भंग्याने आपले काम केले नाही तर आपली रोजची पंचाईत येईल हे विसरू नये.>>>>
गरजच काय आहे माणसाने आपले आयुष्य अश्या कामामधे वाया घालवण्याचे. १६ व्या शतकात ब्रिटीशांनी लोखंडाचा शोध लावला आणि त्यापासुन बनवलेल्या औजारांनी सगळ्या जगावर राज्य केले, आपन २१ व्या शतकात आहोत आणि अजुनही असल्या कामसाठी आपल्याला एक आख्खा जिवंत माणूस लागतो.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators