|
Dineshvs
| |
| Friday, April 07, 2006 - 5:28 pm: |
| 
|
आपल्यातच एक अशी मानसिकता असते, कि बाबा लग्न म्हणजे देवाब्राम्हणांसमोर झालेला संस्कार, नातिचरामी वैगरे वैगरे, पण आता ते खरेच तसे नाही. तडजोडीला मर्यादा आहेच. पण हा निर्णय ज्याचा त्याचा. कारण ज्याचे जळते त्यालाच कळते. कितीहि प्रामाणिकपणाचा आव आणला तरी, कुणीहि सगळे सत्य सांगु शकत नाही, ( मीहि नाही. ) समाज वैगरे मला गौण वाटतो. ईथे मला एक एकसंध युनिट म्हणुन समाज म्हणायचे आहे. त्याच समाजातले, काहि जण आपल्या बाजुने ऊभे असतात. आपल्यापुरता तोच समाज म्हणायचा. बाकिच्यांचे आपल्याला काय करायचेय. बोलेनात बापडे. जोपर्यंत आपण आपल्या पायावर ऊभे आहोत, तोपर्यंत कुणाची का फ़िकीर करावी ?
|
Storvi
| |
| Friday, April 07, 2006 - 11:23 pm: |
| 
|
आशिष चा प्रश्ण योग्य आहे. या specific प्रसंगात तिने खरतर योग्य निर्णय घेतला होता, पण तो तडीस नेण्याच्या आत हे सगळे होऊन बसले. आधीच घटस्फ़ोट झाला असता तर ह्या जर तर च्या गोष्टी आहेत. तेंव्हाही असेच घडले नसते हे म्हणता येणार नाही. आणि तिचा नवरा violent प्रव्रुत्तीचा असताना तिने उशीर केला असेल तर त्याला कोण काय करणार. प्रत्येक बाबतीत समाजाला दोष देऊ नये असं वाटतं. कारण आशिष म्हणतो तसेच समाज म्हणजे आपणच, आणि रुढ पद्धती आपल्याला पटत नसतील आपल्या द्रुष्टीने धोकादायक असतील तर त्या आपणच बदलायला हव्या. ज्या प्रमाणे लग्न दुसरं करता येतं एकदा आयुष्य गमावल्यावर काय हा प्रश्ण पडला त्याच प्रमाणे, लोकांची उणीदुणी एकवेळ पेलता येतील पण जीवाचं बरंवाईट झालं तर काय हाही प्रश्ण मनात उभा राहिला पाहिजे. समाज घटस्फ़ोट कधी accept करेल ह्याचे उत्तर " बायका ( आणि काही अंशी पुरुष ) धोक्याची किंवा इतर त्रासदायक चिन्हे ओळखुन त्या लग्नातुन बाहेर पडायला कधी तयार होतील?" ह्य प्रश्नात दडलेलं आहे, असं माझं मत...
|
Mrinmayee
| |
| Saturday, April 08, 2006 - 1:14 pm: |
| 
|
storvi , तुम्ही माझ्या मनातलं लिहिलंत बघा! मला असं वाटत की समाजाची म्हणजे पर्यायानं आपली मानसिकता हळुहळू बदलते आहे. आपल्या आई-वडिलांच्या पिढीतला आणि आपला घटस्फोटाकडे बघण्याचा द्रुष्टिकोन बदलला आहे असं नाही का तुम्हाला वाटंत? एक अगदी जवळून बघितलेली घटना: आईकडे काम करणार्या बाईंन्च्या मुलीला सासरी अतिशय भयानक वागणुक दिली. तीला अंगावरच्या फ़ाटक्या कपड्यात तिच्या सासरच्या गावच्या शेज़ारणीनी आमच्या बाईंकडे आणून सोडलं. बाई आपल्या चार नातेवाईकांना घेऊन दुसर्या दिवशी तिच्या सासरी गेल्या. जावयाला खूप खडसावून 'सोडचिठ्ठी' मागितली. माझ्या आईला सांगितलं, "बाई, माझी सोन्यासारखी लेक काही वाटेवर पडली नाही की तिच्या सासरच्या लोकांनी तिला असं वागवावं. तिचा बा तिला म्हणाला, ४ दिवसानी परत जा सासरी अन माफ़ी माग सगळ्यांची निघून आलीस म्हणून. तर मी त्यला सांगितलं, पोर जिवंत पाहायची आहे मला. मी ४ घरची कामं करीन जास्तीची पण पोरिला परत धाडणार नाही." आज ती मुलगी स्वत:च्या पायावर उभी आहे आणि mental trauma तून आताकुठे बाहेर आली आहे.
|
P_para2
| |
| Monday, August 28, 2006 - 10:37 am: |
| 
|
Marriage ????????? OR Life ????????? ans is "life"....................
|
Amanjot
| |
| Tuesday, August 29, 2006 - 7:01 am: |
| 
|
माझ्य अगदि जवळच्या मैत्रिनिच्या अनुभवावरुन सान्गते.... काहि वेळा लग्न मोडन्याचा डिवोर्से होण्याचा प्रसन्ग ज्या व्यक्तिच्या बाबतित घडतो त्या व्यक्तिचे समाजातिल स्थान काय आहे आत्तापर्यन्तचि वागणुक काय आहे यावरहि अवलम्बुन आहे... आपन खम्बिर राहिल तर कोनि काहि म्हनत नहि... लोकान्चा विचार करावा पन एका मर्यादेपर्यन्तच... कर नाहि त्याला डर कशाला... अशा प्रसन्गात निर्णय घेण महत्त्वाच असत.. यात आइ-वडिल आनि तो मुलगा किवा मुलगि याना खुप विचार करुन पावल टाकवि लागतात.. हमरितुमरिवर न येता भविश्यकालावर नजर ठेवुन निर्णय घ्यावा लागतो.. काहि वेळा निर्णय कठिन असला तरि तो योग्य वेळिच घ्यावा लागतो... आनि योग्य वेळ व्यक्तिनेच ठरवावि लागते कारण त्या निर्णयाचि आनि त्याच्या परिनामान्चि पुर्ण जबाबदारि त्या व्यक्तिलाच घ्यावि लागते...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|