|
Manuswini
| |
| Saturday, March 04, 2006 - 3:15 am: |
| 
|
मला हा प्रश्ण बरेच वेळा पडतो तरी मी फार खोलात गेले नाही जरी वाईट मात्र निश्चित वाटले असते. उदाहरण द्यायचे झाले तर, एखाद्या वेळी आपण खूप मेहनत घेतो, hopes ठेवतो,स्वपने रंगवतो आणि ती गोष्ट होत नाही किंवा मिळत नाही अश्या वेळी तुम्ही काय करता मी तेव्ढ्या वेळेपुरती किंवा काही काळ दुःखी होते पण शेवटी दुसरे काय माझे नशीब' असे म्हणते पण वाटते आपलेच का असे व्हावे? आणखी उदाहरण म्हण्जे खूप मेहनत घेता, काम करता,पण job मधे appreciation होत नाही, एखाद्या ठिकाणी जायची संधी मिळता मिळता हुकते किंवा एखादी छानशी गोष्ट you know what I mean here,deserving something करता आणि hopes ठेवता आणि होत नाही मग त्रास कमी होण्यासाठी तुम्ही काय करता 'माझे नशीब' म्हणून सोडून द्यायचे का? how easily can you accept? ती disappointment कशी दूर करावी?
|
Zakki
| |
| Saturday, March 04, 2006 - 5:14 pm: |
| 
|
त्यालाच गीतेत म्हंटले आहे, ' कर्मण्ये वाऽ धिकारस्ते मा फलेषू कदाचन ' . आता प्रत्यक्षात ते आचरणात आणणे महा कठिण हे मान्य आहे. पण ज्याप्रमाणे मला केवळ ऑस्ट्रेलिया ला जाणे हेच पाहिजे होते, तिथे काय काम केले किंवा त्याची दाद मिळाली की नाही याबद्दल मी काहीहि मनाला लावून घेतले नाही. केवळ क्षणिक आनंदासाठी सगळे करायचे. नाहीतरी या नश्वर जगात शाश्वत असे काय आहे?
|
झक्की.. मनातल बोल्लात. आमच्या नव्हे.. भगवंताच्या!!.. हा बीबी बंद करायला हरकत नाही. मनुस्विनीताई.. आमचा तुम्हाला एक मन : पुर्वक सल्ला आहे. तुम्ही जास्त विचार आणि चिंता करु नका. तुम्ही एकट्या राहात असाल तर वेगवेगळ्या गोष्टी ज्यात मन रमेल अशा करायला चालु करा. खेळा, वाचा, गा, शिका,.... ई.ई. मुख्य म्हणजे पुढचे सहा महीने नवीन बीबी उघडु नका... राग नसावा. मायबोलीवर येवु नका असाच आमचा खरा सल्ला होता.. पण रागावाल म्हणुन गप्प बसतो. स्वामी विविकानंदांचे चरीत्र वाचले नसेल तर ते एक वाचा. भारतीय संस्क्रुतीचा अभ्यास करा.
|
Manuswini
| |
| Saturday, March 04, 2006 - 9:10 pm: |
| 
|
धोंडोपंत, तुमचा सल्ल कळला नाही? आम्ही माय्बोलिवर येवू नका हे तुम्ही कुठेल्या हक्काने सांगताय? स्वमि विवेकंनदाचे हेच विचार तुमच्यात दिसतात असे समजायचे. मी पण तुम्हाला सांगते राग मानु नका. जे मनात आले ते लिहिले.
|
Manuswini
| |
| Saturday, March 04, 2006 - 9:20 pm: |
| 
|
mod हा BB ब/न्द केला तर माझी हरकत नाही. पण ते धोंडोपनताच्या आगाउ सुचना म्हणून नाही. मी actually deletE करणार होते. धोंडोपन्त, तुम्ही पुन्हा ते स्वमि विवेकानदाचे पुस्तक वाचा आणि बघा जरा दुसर्यांशी सवाद कसा साधावा. भरतिय संस्क्रुतित हे म्हटले आहे की लोकांच्या विचाराचा / भवनांचा आदर करावा राग मन किंवा नका मानु मी ही मनातले लिहिले
|
dhoधोंडोपंत, कशाला तिला उगिच त्रास देताय? मनुस्विनी, मी बाकी बर्याच लोकांप्रमाणे यासारख्या काही अनुभवांमधून गेलो आहे कळीचा मुद्द हा आहे- की आपण कशात तरी सातत्य, चिरंतन अस कही तरी शोधू पहातो. नोकरी, लग्न, इतर नातेसंबध्- असा आपला फ़ोकस बदलत रहतो य चिरंतनत्वाच्या शोधात. परंतु सत्य हे शब्दात किंवा इतर अशाच ऐहिक गोष्टीत कधीच बसणार नाही. ज्यावेळी कोणाला त्याचा साक्षात्कार होतो, तो क्षण शब्दात बसवण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषगाने त्या सत्यावर अपण करणारे आरोप हेच या विफ़लतेचे आणि नैराश्याचे मूळ आहे चिरंतनत्वाला आपल्या मुठीत बाळगण्याचा प्रयत्न केला नाही तर मत्र य विफ़लतेतून कायमची मोकळीक मिळेल, आणि जगण्याच प्रत्येक क्षण मेडिटशन बनेल हा माझा अनुभव..
|
आदित्य भाऊ thanks अहो जरासे काहेसे डोक्यात आले तर लिहिते हो मोकळिक करून देते शब्दांच्या माध्यमातून आणि मायबोलिला आपले समजून पण काय आहे ना चुकिचा गैरसमज होतोय लोकांचा असे दिसते जावु दे मी सांगितले mod भाऊंना नसेल पटत तर उडवा ही post
|
Manmouji
| |
| Monday, March 06, 2006 - 4:38 am: |
| 
|
माझा अनुभव सांगतो. मी अशी एक महत्वाची गोष्ट चालु केली की त्याबरोबर अजुन एक लहान गोष्ट चालु करतो. त्यामुळे जर मुख्य गोष्टिमध्ये अपयश आले तर त्या दुसर्या गोष्टिमध्ये लक्ष घालतो.
|
Milindaa
| |
| Monday, March 06, 2006 - 9:42 am: |
| 
|
आणि ती छोटी गोष्ट पण नेहमीच जमेल याची खात्री असते का ?
|
Mrunmayi
| |
| Monday, March 06, 2006 - 10:28 am: |
| 
|
मनु, Accept the things as the are हेच खरं.. जसा काळ जातो तस आपण बाहेर पडतोच की अश्या गोष्टींमधून..
|
Dswati
| |
| Monday, March 06, 2006 - 3:43 pm: |
| 
|
जसा काळ जातो तस आपण बाहेर पडतोच की अश्या गोष्टींमधून.. माझे अनुमोदन! आपण आपल्या मागच्या अनुभवावरून पुढच्या आयुष्याचे मोजमाप ठरवायचा प्रयत्न करतो. पूर्वी एखाद्या गोष्टीत सफल झालो म्हणजे कायमच होऊ असे नाही, प्रयत्न करणं महत्वाचं, त्यात आनंद मानावा. यशाचं प्रमाण आपण काय मानायचं तेच ठरतं. कधी आपल्याला वाटतं की दुसर्या कोणाला अमुक केल्याने अमुक यश प्राप्त झालं म्हणजे आपल्यालाही मिळेल, पण नेहमीच तसं होत नाही. आपण जे काही करतो ते चांगल्या हेतूने किंवा भावनेने केलं असलं तर आपल्याला त्यातून थोडंसं समाधान तरी मिळालेलं असतंच. कधीकधी आपल्याला वाटत, Life is not fair, ते खरंच आहे. पण नोकरीत, शाळा, कॉलेजमधे, वैयक्तिक जीवनात आपण कित्येकदा असे चांगले वाईट अनुभव घेतलेले असतात किंवा इतरांचे ऐकलेले असतात. एखादेवेळेस काही बाबतीत आपली फारच निराशा होते, तेव्हा आपल्याला आवडणार्या दुसर्या गोष्टीत थोडावेळ मन रमवावे, म्हणजे पुन्हा नवीन जोमाने आपल्याला आपले काम करायला उत्साह येईल, व आपल्याला हवे असलेले यश प्राप्त होईल. असे करताना काही नवीन मार्ग सापडू शकतात, तर काही वेळा यशाची व्याख्याही बदलू शकते. मनुस्वीनी, तू ऑलिंपिक्स बघितलेस का कधी? कित्येकांना सुवर्ण, रौप्य पदके मिळतात. पण ज्यांना मिळत नाहीत, त्यांना काय मिळतं? त्यांना प्रयत्न केल्याचं समाधान मिळतं, नवीन प्रयत्नांना दिशा सापडतात. ते काही कमी नसतात त्यांच्या क्षेत्रात, फक्त त्यांना पदक मिळालेलं नसतं. पण ते नसते तर जे जिंकले, ते विजेते असते का?
|
ह्या लेखातील विचार पटतात का ते पहा. http://www.dhamma.org/art.htm
|
आहो ज्याला यश आलंय त्याला शाबासकी द्यायची आणि अजून एकदा पदर खोचायचा!
|
मनुस्विनीताई... तुम्ही रागावलात. कोणतीही गोष्ट ही सफल होण्यासाठी कर्ता, साधन, काळ, ई. गोष्टी महत्वाच्या आहेतच पण सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे दैव होय. याची साथ लागतेच लागते. तुम्ही विचारलेली गोष्ट अशी सांगता येणार नाही... " अध्यात्म " च तुमच्या प्रश्नाचे उत्तर देवु शकते. भगवंतानी जे अर्जुनाला सांगितल तो शेवटचा शब्द प्रमाण माना. कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे पार्था... फळावर नाही. तु कर्म कर व्यवस्थित.. फळ मिळेलच. त्याची चिंता तु नको करु... त्याची तु मिळेल म्हणुन अपेक्षा करणे मुळातच चुकीचे आहे. तु बीज पेर, पाणी घाल, खत घाल, अनुकुल स्थिती निर्माण कर... रोप उगवेल... कर्म ठीक केले असेल तर फळ येईलच... श्रद्धा ठेव. आणि तरीही नाही उगवल रोप तर भयशंकीत होवुन शंका घेण्यापेक्षा पुन्हा यत्न कर... भगवंताचे अधिष्ठान ठेव. यश येईलच. त्याच्यावर शंका घेण्यापरीस तु स्वत : वर घे!! होशी का भयशंकीत धरीशी का शंका गाजतसे वाजतसे तयाचाच डंका|| हा जो अनंताचा पसारा आहे ना हा त्याचाच डंका आहे ना! काय आपली शक्ती म्हणुन आपण म्हणावे की " हे असेच होणार! " ?... जी गोष्ट घडते आहे ती तशीच का घडते याचे उत्तर आपण देवु शकत नाही. आपण त्याचाच एक अंश असल्याने काही शक्ती आपल्यात जरुर आहे पण ती अपुरी आहे. हे विश्वाचे नियम भारतीय अध्यात्म शिकवते... विचार करायला भाग पाडते. त्यामुळे झाला तर फायदाच होईल. म्हणुन तुम्हाला वाचायला सांगितले. तुम्ही मायबोलीवर न येण्याविषयीचे आमचे म्हणणे आणि विवेकानंदांचे विचार यात काय संबंध आहे? ते आम्ही शब्द सांभाळुनच सांगितले आहे. स्वामी विवेकानंदानी एका ठीकाणी म्हटले आहे की " गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळला तर तुम्ही मुले गीतेच्या अधिक जवळ याल. " .. त्यामुळे तुम्ही हे QLC केंवा माझे नशीब असले बीबी उघडुन काही फायदा होईल असे आम्हाला वाटत नाही. करमणुकीसाठी आणि बीबी उघडुन तुम्हाला आनंद वाटत असल्यास गोष्ट वेगळी. म्हणुन तरी तुम्हाला विचारले की तुम्ही एकट्या राहाता का? त्याचमुळे पहील्या पोस्टमधे तुमचा आम्ही अनादर कसा केला हे कळले नाही. मायबोलीवर कुणी यावे कीवा न यावे हे आम्ही कोण सांगणार?.. तो हक्क शिंच्या मॉडरेटरांचा. आमचा नव्हे. मॉडरेटरसाहेबरावजी न पटल्यास पोस्ट उडवा.
|
Aschig
| |
| Tuesday, March 07, 2006 - 5:31 am: |
| 
|
manuswini, I will say the exact opposite of what Dhondopant says. You should always have a goal (fruit) in mind when you do something. Unless that is true, you are unlikely to give your best. Then do your best, but as they say, prepare for the worst. Do not despair if things go wrong due to conditions that are not under your control (e.g. what your boss decides). If something went wrong in what you could have controlled, well, you have learnt a lesson - use it to proceed. As others have said above, there is no unique advise on this. It very much depends on the particular circumstances you may find yourself in at any gven time. Claiming that "nothing" is in your control anyway is the most escapist you can become. You have to control your situation as best as you can and then leave it to the dynamics of the situation. Since there are other humans involved, both good and bad, it is unlikely that you will get desired results all the time (unless you are ready to and capable of bending or even defining the rules). Fair? There is no reason why life would be fair. But that does not mean that it is thorns all the way either. Just enjoy the journey. I am sure you do. When you start a BB like this, doesn't everyone just assume that you are ALWAYS in that mood :-) I read about some cow philosophy just today: In your journeys you will travel many roads. Do not forget to stop and eat the roses.
|
Seema_
| |
| Tuesday, March 07, 2006 - 5:46 am: |
| 
|
शिवराज गोर्ले यांच " मजेत कस जगाव ? " हे पुस्तक मी वाचल. त्यातली एक गोष्ट मला फ़ार आवडली ती म्हणजे यश = नशिब * कष्ट यातली एखादी value पुर्णाकाच्या ऐवजी अपुर्णाकात सुद्धा असु शकते. ashiq very well said
|
धोंडोपन्त रागवले नाही पण एथे न येण्याची सुचना देण्याचे कारण कळले नाही.
|
thanks to all for good posts
|
मराटीत लिवा की.. ईंग्रजीचा तोरा कशाला दाखवताय?
|
गीतेत, आणि अध्यात्मात समोरच्यावर असे चिडने??? ? हे वरच्या मेलसाठी!!! ही.. ही.. मन्स्वीनि, वर जे अशिष यांनी दीले आहे नाते पटले अपयशाच्या खाइतुन वर येण्यासाठी थोरामोठ्यांनी काय केलेयासाठी तु त्यांच्यी autobiograaphy वाच. तसेच मी तुला चांगली पुस्तके देते, मैल करते सवडीने तीपण वाच,तु ज्यातुन जातेय त्यातुन प्रत्येक्जण जातो, आज तर मी सुध्दा तुझ्यासारखीच स्थीतीतुन जात आहे, पण माय्बोली वर येउन मन हलके होते, तरी कधी कधी वादात ही सापडते. असो निवांत मेल करते हा विशय खुप वास्ट आहे! फ़क्त तोवर कुठलीच चिंता करु नको!!!
|
वैशाली, thanks ग माझा email आहे ना तुझ्याकडे? अग लोक गीता फक्त वाचतात ते तोरा मिरवायला असेल जावु दे न बोललेच बरे
|
aschiq thanks तुमचे मेल खुप छान वाटले वाचुन
|
tula maybolitarfe mail keliye, milalee kaa? sang mag detail mail karate!!
|
Have you heard of a french philosopher Rene Discartes ? He says "cogito ergo sum" meaning I think ... therefore I am .... In short "I think I am disappointed so I am disappointed" the other way is also true "I think I am satisfied, so I am satisfied" थोडक्यात सांगायचे तर विचार बदला म्हणजे नशीब पण बदलेल.
|
Aschig
| |
| Thursday, March 16, 2006 - 6:40 am: |
| 
|
shankasoor, you are right about being positive minded, but Descartes' statment was related to the self. It should perhaps have been "I think therefore there are thoughts" since it is not clear what the two I's in his statement are.
|
Bee
| |
| Thursday, March 16, 2006 - 8:00 am: |
| 
|
There are several quotes like this. Like they say - u r master of ur own fate. So ultimately there is nothing like "daiw, prarabdha, nashib" etc, whatever good or bad happens u r responsible for it. Such quotes are difficult for me to accept.
|
Arjun0306
| |
| Thursday, March 16, 2006 - 9:32 pm: |
| 
|
बी, गीतेमध्ये सांगितले आहे की फक्त फल देवाच्या हाती असते, पण ज्याने त्याने आपले कर्तव्य पूर्ण शक्तिनिशी पार पाडलेच पाहिजे. म्हणून माझ्या मते, तसे केले नाही तर अर्थातच न करणार्याचा दोष, नि त्याची पण फळे त्याला मिळतीलच. तेंव्हा 'एकतर दैव, प्रारब्ध, नशिब' किंवा 'मी, माझे कर्तुत्व' अशी एकदम टोकाची विचारसरणी नसावी असे मला वाटते. माझ्या मते गीतेत असे कुठेहि म्हंटले नाही की तू आपले कामधाम सोडून फक्त माझ्या वर भरवसा ठेवून गप बस. तसे असते तर त्याने अर्जुनाला उपदेश करून युद्ध करायला भाग पाडलेच नसते.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|