|
Abhay
| |
| Wednesday, March 30, 2005 - 5:56 pm: |
| 
|
AaiNa ha rajagaDvaÉna tÜrNaaÊ rajagaDcaI saavalaI pDlaIyao tÜrNyaavar. 
|
Dhumketu
| |
| Wednesday, March 30, 2005 - 6:34 pm: |
| 
|
Aro malaa Zumakotu kÉna Taklaosa ´ Qaumakotu Asao Aaho ro naava..... AsaÜ. ÔÜTÜ mast Aahot... Aajakala T/oikMga krayalaa imaLt naahI %yaamauLo Asao ÔÜTÜca phayacao Ô>
|
Desaaya, Anakhi yeu det!!
|
श्री पद्मावती देवी
बालेकिल्ल्यावरुन सन्जिवनी माची
बालेकिल्ल्यावरुन ब्रह्मर्षी मन्दिर
बलेकिल्ला दरवाजातुन सुवेळा माची
|
बालेकिल्ल्यावरुन डुम्बा आणि सुवेळा माची, मागे भाटघर धरणाचे पाणी
बालेकिल्ल्यावरुन सन्जिवनि माची
बालेकिल्ल्यावरील ब्रह्मर्षी
बालेकिल्ल्यावरुन पद्मावती माची
बालेकिल्ल्यावरील चन्द्रतळे (टाक)
बालेकिल्ल्यावरील राजवाड्याचे अवशेष

|
बालेकिल्ल्यावरील टेहळणी बुरुज आणि मागे भाटघरचे पाणी
baalekillyaavarun Dumbaa va suveLaa maachii}
बालेकिल्ल्यावरुन सुवेळा माची व भाटघरचे पाणी
पद्मावती माची व गुन्जवणे दरवाजा

|
अजुनबी मोप फोटु काढले हैती! येकशे धा फोटो काढले बघा! अन त्यातुन टाळकी वजा केलेले थोडे फोटो हिथ टाकलेत! अजुन टाकू का?
|
बालेकिल्ल्याचा दरवाजा
राजगड, डाविकडे डुम्बा, मधे बालेकिल्ला, उजवीकडे पद्मावती माची
सुवेळ मचि व नेढ
हे कोण हेत सान्गायलाच हव का? आपले पुर्वज
गिर्यारे, मला तुझी लई म्हन्जी लईच आठवण आली होती DDD
|
Moodi
| |
| Tuesday, March 21, 2006 - 9:52 am: |
| 
|
छान फोटो आलेत की रे लिंब्या. जरा याच्याबरोबर वृतांत पण लिही की, कूलने लिहीला तसा. 
|
Athak
| |
| Tuesday, March 21, 2006 - 11:11 am: |
| 
|
लिंब्या बालेकिल्ला परीसर अन तुझे फोटु छान आलेत
|
>>>>> अन तुझे फोटु छान आलेत खीखीखीखी अथकभाव! डावीकड त्वान्ड केलेला तो म्या हे अन उजवीकड त्वान्ड केलेला तो अधाशी ओळख पाहू कोण?
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 21, 2006 - 2:30 pm: |
| 
|
छानच आहेत फोटो. या दिवसात पाणी आहे वरती, ते बघुन छान वाटले. खुपदा हि टाकि कोरडी पडलेली दिसतात, आणि माझा विरस होतो. अर्थात वृतांत हवाच.
|
Chinnu
| |
| Tuesday, March 21, 2006 - 8:05 pm: |
| 
|
LT वृतांत लीहाच आता! फोटो झ्याक हेत.
|
Bee
| |
| Wednesday, March 22, 2006 - 3:56 am: |
| 
|
अफ़ाट आहेत फोटो. लिम्बू, कसे जायचे ते लिवाल का? काय काय सोयी आहेत तिथे?
|
मागल्या बारीला नाही का ते आमच्या हिथल्या ऑर्केस्ट्राच बोल्लो होतो? तर त्यातली गायक अन वादक मन्डळीन्नी ठरिवल की येका रविवारी राजगडला ट्रेकला जायच! आता ह्यान्च्या गायन वादनात माझा काही सम्बन्ध नव्हता! मला गाण्यातल ओ की ठो कळत नाही, अन तर्रीबी ह्यान्च्यातल्या काही टाळक्यानी मला लईच गळ घातली की त्वा यायलाच पायजेल. म्या खुप नाकारुन पाहील, नाना बयादी सान्गितल्या, म्हणल अहो उन्ह किती कडक हे? कशाला जायच उन्हातान्हात? त्यापरीस मस्त पैकी एअर कन्डिशन हॉटेलात बसुन प्वॉटभर गिळू की! अन तुम्ही जाणार ते गाडीवरुन किन्वा भाड्याच्या गाडीतुन, त्यो घेणार तीन चार हजार रुपये! कशाला हा असला खर्च कर्ता? पठ्यान्नी येक ऐकल नाही, त्यान्च आपल तुणतुण चालूच, लिम्ब्या त्वा यायलाच पायजेल, बाकी काय बोलु नगस! शेवटी निरुपायान म्या हो म्हणल! अहो कितिक झाल तरी येका कम्पनीत र्हायच म्हटल तर आपल्या आवडीनिवडीला थोडी मुरड घालावीच लागती, नाही का? आता या ट्रेकचा सुत्रधार की सन्योजक की काय सस म्हणतात ना, तर त्ये कोण हे तेच मला नेमक ठाव नव्हत! येक बी सन्योजक, म्याच सन्योजक हे म्हणुन म्होर येत नव्हता अन त्यामुळ त्यान्च्या सन्योजनाची बरीवाईट कलम काय मला समजत नव्हती! नुस्त येवढच समजल होत की माह्यासहित येकुण अकरा जणात ३ कन्यका होत्या अन बाकी बाप्ये होते! बाकी बाप्यात येकदोघ लग्नाळुही होते! म्हणल छान हे! ह्ये लग्नाळुच सन्योजक नसले म्हन्जे मिळविली! शेवटी सन्योजक कोण कोण हेत त्यान्नी काय काय ठरिवल हे ते काहीच न कळल्यामुळ माझ्यापुरत म्या सन्योजन केल. मला येवढच कल्ल होत की शनिवारी येक गाडी सव्वापाचला कम्पनीच्या बाहेर येवुन थाम्बणार हे, तिच्यात बसुन समद्यानी राजगडाच्या पायथ्याला गुन्जवणे म्हणुन येक गाव हे थित मुक्कामाला जायच हे! आता थित र्हायच कस, खायच काय, गडावर कवा निघायच मला काय काय बी माहीत नव्हत! पर अस अन्धारात तीर मारत बसेल तर तो लिम्ब्या कसा? निघता निघता देखिल म्या माह्याकडुन पक्की तयारी करुन घेतली! काय हे ना की सकाळी घरुन निघतानाच लिम्बोटल्याची साळची धोकटी मागुन घेतली होती ती निरनिराळ्या सामानानी अर्ध्या तासात भरुन टाकली! आता येवढ लाम्ब अनोळखी प्रदेशात जायच तर विन्चवाच्या पाठीवरल्या बिर्हाडासारखी तयारी नको? मन्ग हे घ्या ते घ्या करता करता धोकटी पुर्ण भरली! सक्काळी सक्काळी धावत पळत आन्घुळीच्या आधी चार पाच कान्द घेतल, ते ठिवायला प्लॅस्टिकची पिशवी शोधुन घेतली, घरात लिम्ब हैती का पाहील तर नवती शिल्लक! बोम्बलायला म्या दर येळेस डझनावारी लिम्ब आणतो अन आमची धाकटी लिम्बोणी हे ना ती सरबतं करुन समद्या लिम्बान्ची वाट लावुन टाकती. ऐन वेळेस लिम्बु न मिळाल्यान अस्सा सटकलो होतो ना की बस्स! पर लिम्बोणी साळला गेली होती! आता लिम्बीला थोडी साखर मागावी असा विचार होता! साखर कशाला काय? गडावर गेल्यावर उन्हातानात होरपळल्यावर थन्डगाऽऽर लिम्बु शरबत नको? पर लिम्बीचा मुड बघितला अन साखर अन मीठ मागायचा विचार सोडुन दिला! आता सकाळी सकाळी तोन्डसुख काहुन ऐकाव बरे? तर तो विषय बाद केला! अन मन्ग माह्या औषधाच्या गोळ्या, ट्युबा, मलम, रुमाल, धोतर, अन्डरवेअर बनियान, दोन दोन बॅटर्या, काडेपेटी, येक दोन लायटर, चाकू सुर्या, बॉडी लोशन अस जे जे आठवल ते ते समद बॅगेमधी कोम्बल. पाण्याच्या बाटल्या शोधल्या तर मिळाल्या नाहीत तर म्हणल हापिसातुन घेता येतिल, मोप रिकाम्या पडलेल्या असतात. तेवढ्या प्लॅस्टिकची गिल्लास पण घेतली. अन हे समद घेवुन शनिवारी सन्ध्याकाळी गेट बाहेर आलो तर सामनेच येक चौदा सीटर टेम्पो ट्रॅव्हलर उभी होती! अस्स हे काऽऽय सन्योजक बच्चमजी! गाडी चौदा सीटर अन म्या धरुन समदी टाळकी अकराच! तरीच! तर फुड काय झाल? आम्ही समदी गाडीत बसुनशान निघालो की ट्रेकला! कात्रज अलिकड पम्पावर डिझल भरुन घेतल हजार रुपयान्च! थितच मन्ग पोलो, पॉपिन्स, टळलेल्या शेन्गदाण्याची पाकीट, गोळ्या, चॉकलेट असला चराऊ माल घेतला! दोन गायछाप बी घेतल्या! अन नसरापुरला पोचलो! थित थाम्बलो तर बाकी गेले चा प्यायला! अन म्या गेलो लिम्बे शोधायला, ते नसरापुर येवढुस्स छोट गाव हे ना पर रस्त्याला बरेच भाजीवाले बसले होते. सुरवातीच्या चार पाच जणान्कड म्या लिम्ब मागितली, कुणाकडेच नवती, तर म्या मेडिकल दुकानात जावुन सरबताची पाकीट मागितली तर त्याच्या कड नवती म्हणल ग्लुकॉन डी टाईप काय असल तर दे, गडावर सरबतासाठी पायजेल, तर तो म्हणला कशाला घेता तसल काही, ज्या म्होर अजुन हेत भाजीवाल, मिळतील लिम्ब तुम्हाला! आत्त ह्येच्या? सोताचा धन्दा होतो हे तो सोडुन तो मला फुड जायला सान्गत होता! मला लई म्हन्जी लईच गहिवरुन आल अन तेच्याकडन येक १८ रुपयाच कसल तरी औषधी सरबताच पाकीट घेतल, म्हणल असुदे बरोबर! मग तसाच फुड लाम्बवर चालत गेलो तर येका मावशी कड लिम्ब मिळाली, तीन रुपयाला दोन, येवढुश्शी होती, तर मग वीस रुपयाची लिम्ब घेतली, मागल्या दुकानातुन अर्धा किलो साखर घेतली अन उलिस मीठ द्या म्हणल तर त्यो म्हणला की येक किलोच ग्याव लागल! आर कर्मा म्हणल येक किलो नेवुन कुठ कुणाच्या चितवर घालू? मला सरबाताला पायजेल थोडस! मन्ग त्यो म्हणला की नाय कमित कमी पावशेर तरी घ्यायलाच हव! करतो काय? घेतल पाठीवरच ओझ वाढवुन! मन्ग आमची गाडी निघाली ती सुस्साऽऽट थेट गुन्जवण्यातच! थित जावुन बघतो तो काय? गड्यान्नो शनिवारी तिथिन शिवजयन्ती होती तर थित मेळावा भरलेला अन तमाशा अन ऑर्केस्ट्राचा फड बी लागलेला, ह्ये समद धिनच्याक धिनच्याक रातच्याला दोन वाजेस्तोवर चाल्ल होत तोवर आमी जागेच, अन आमच्यातला येक पठ्ठा लैच घोरणारा निघाला तर सकाळपोत्तूर त्याच्या नावान शिमगा करीत जागेच! आख्खी रात डोळ्याला डोळा नाही अन पहाट पहाट थन्डित जरा कुठ डोळा लागला तर उशापासचा चारचा गजर ठणाणा बोम्बलायला लागला अन काय मग उठलो की. समद्यान्च आवरुन निघेस्तोवर सहा वाजले, तरी बाहेर अन्धारच होता! आता बाकी वृत्तान्त उद्या टाकीन!
|
Moodi
| |
| Wednesday, March 22, 2006 - 1:57 pm: |
| 
|
लिंब्या सुरुवात एकदम दणदणीत केलीस. वाट बघते आता दुसर्या भागाची.
|
Simeent
| |
| Wednesday, March 22, 2006 - 2:05 pm: |
| 
|
फोटो मस्त आहेत. व्रुत्तंताचा ट्रेलर झाला पुर्ण पिच्चर पण लवकर येवु दे.
|
Moodi
| |
| Wednesday, March 22, 2006 - 2:10 pm: |
| 
|
लिंब्या त्या टाकीतील पाणी काय मस्त हालतय बघ, भन्नाट वारे असेल ना? अंगावर शहारा येतो. 
|
Phdixit
| |
| Wednesday, March 22, 2006 - 2:36 pm: |
| 
|
लिम्ब्या फोटो मस्तच आलेत तुझे, मस्तच ट्रेक झाले ला दिसतोय
|
रातभर डोळ्याला डोळा नवता अन त्ये कुणाच्या घराच्या पडवीत निजायची सोय केली होती ना तर पडवी खालीच दोनचार म्हशी अन बैलं बान्धलेली! समदा शेणामुताचा वास भरलेला अन काय तरी बारीक बारीक सारख चावतय काय म्हणुन बघितल तर दिसे दिसेस्तोवर तो मोहोरी येवढा थिपका लाम्ब उडी मारायचा! मग दोस्तान्नी सान्गितल की अरे त्याला पिसू म्हणतात! म्हणल लईच भारी हे, ज्ञानात प्रॅक्टिकल भर पडती हे! पर एक होत हा! येक बी डास नवता! तर सकाळी उठुन असे आम्ही निघालो, पाठीवर सॅक्स, माह्या हातात थितच गावली तर येक मस्त जाडसर बाम्बुची काठी घेतली, म्हणल असुदे, काय वाघरु बिघरु आल तर असावी आपली बरोबर! जोडिदाराला विचारल कितीक उन्च हे रे ह्यो गड? जोडिदार बोल्ला त्येऽऽ काऽऽय, तो दिस्तो हे तो बालेकिल्ला अन ह्या अन्गाला सुवळा माची अन त्या अन्गाला पद्मावती! थित तर जायच हे, हाय काय अन नाय काय त्यात! चला बिगीबिगीन! म्हणल बिगीबिगीन चला तर चला बिगीबिगीन! आर तिच्या? सुरवातीला लई उत्साहात भरारा पावल टाकीत सुटलो, पावल टाकत कुठ होतो? ती तर वर वर वर चढवावी लागत होती, अहो निघालो तो पाच पन्चवीस पावल चालुन जात नाही तोच लगेच डोन्गुर लागलेला! अन जरा वर पोचलो त काय नुस्ता हपापा अन धपापा व्हायला लागल! चातीचा भात्या हेय फुल्ल टू जोसात सुरू झालेला! म्या मनात म्हणल च्यामारी ह्ये इन्जिन येवढ्या जोसात धडधडतय साल मधीच येखाद्या चाकाचा आटा सटकला म्हन्जी? जय भवानी जय शिवाजी! आता जे होइल ते होऊद्या! गड सर करायचा म्हन्जे करायचाच! मला क्रशचा बीबी थितबी आठवला! म्हणल या सगळ्या क्रशमधी वहावलेल्यान्ना येकदा ह्यो गड चढवुन आणल पायजेल! आख्ख्या आयुष्याची क्रशकरताची धडधड येकाच ट्रेकमधी वसुल होईल! आता मात्र डायरेक्ट चोर दरवाजापोत्तूर काय काय हे ते सान्गतो नायतर दर थोड्या टप्प्यावर दमुन भागुन बुडावर कसे अन कितीक वेळा टेकलो हे सान्गण्यात काय मतलब? तर गावातुन निघाल की येक लहानसा डोन्गुर लागतो, त्याच्यावर गेल की एका अजुन मोठ्या डोन्गराकड वाट निघती, ही वाट खड्या चढणीची हे, ती चालुन गेल की मधेच थोडी सपाटी लागती अन मन्ग पुन्हा येका डोन्गराची खडी चढण! या दोन्ही चढणीना आजुबाजुला झाड झुडप असतात! दुसरी चढण सम्पली की त्याच डोन्गराच्या कडकडन तर कधी धारेवरुन आपण पद्मावती माचीच्या खाली येतो, वर बघितल तर ही काय हिथ तर हे माची अस वाटत रहात, पर प्रत्यक्षात तोवर आधी चढुन आलेल्या दोन मोठ्या टप्प्यान्येवढेच अजुन दोन टप्पे बाकी असतात! पण सन्योजक चालू असले की ते सान्गत रहातात, हे काय हे म्होरच तर दिसत हे, चला बिगिबिगिन! आता कसला बिगिबिगिन चालतो रे मर्दा? ह्या शेवटच्या दोन टप्प्यान्वर मरणाचा मुरुम अन दगड धोन्डे पसरले हैती, कवा पाय सटकतो अन माणुस सपशेल आडव होत कळत बी नाही! त्यात माग तोल गेला तर कुठवर घरन्गळेल त्याचा पत्त्या नाही! म्या माग बघतच नवतो! तर काय हे ना की हे दोन टप्पे ओलान्डले की तुम्ही पद्मावती माचीच्या अगदी पायथ्याला येता! डावीकड गुन्जवणे दरवाजा दिसत असतो, त्याच्या वर बालेकिल्ला, अन समोर पद्मावती माचीचा उभा सरळसोट कडा! त्या कड्याच्या कड कडन छोटी पायवाट उजवीकड जाती तिकड जायच! तर हिथ लईच भारी गम्मत झाली आमची! काय झाल की आमच्यातल येक उत्साही टाळक फुड निघुन गेल होत, त्याच्या हातात चुरमुर्ए अन भडन्गाची पिशवी होती, म्या काय बोल्लो सन्योजकाना की समदी आधी हिथ गोळा करा नायतर वाट चुकतील अन समद्या घेवुन या तोवर म्या फुड जातो अन फोटोकरता निशाणा लावुन बसतो! तर म्या एकलाच निघालो फुड तर मला भ्या वाटायला लागल. काय हे ना की आजुबाजुला कारवीची दाट झाडी, म्हणल येखाद वाघरु नायतर तरस नायतर कोल्हा सामोरा आला तर काय घ्या! तरीबी तसाच नेटान फुड फुड जात र्हायलो तर आमचा त्यो चुरमुरे मुरमुरे वाला गडी नाही का आधीच फुद गेलेला, त्यो बोम्बलताना ऐकु येवु लागल! ह्येला काय झाल बोम्बलायला, काय विन्चुकाटा चावला की साप दिसला? म्या बिगिबिगिन पाय उचलले तर तो अस्स वर येका रेलिन्गला रेलुन उभा होता अन सारख आपल येकच... ओयेऽऽ हाईक, ओयेऽऽ हॅक.... म्या वरडुन विचारल काय झाल रे भो? काहुन बोम्बलुन र्हायलाहेस? तो म्हणला माकड हैती! कुथ र? मला तर नाही दिसत! आरे माझ्या म्होर हेत! कितीक हेत?? धापाच हेत आता काय तुला मोजुन सान्गु का? काय करतायेत ती? अरे माझी पिशवी पळवतील की! माह्या म्होर चार पाच फुटान्वर आली हेत, दात इचकुन दाखिवताहेत! म्या म्हणल अरे मन्ग मोठ्ठ्यान बोम्बल रे भो! तुही चिल्ली पिल्ली घाबरत असतील तुह्या वरडण्याला, बघु आता माकड घाबरतात का! मी त्याच्या जोडिला जायला भरभर निघालो तो तो उन्चवट्या आड दिसेनासा झाला! अन मन्ग मला तेव्हड्यात आठवल की मपल्या खिशात येक शिट्टी होती फुळ्ळकनी वाजणारी! लगी लगी शिट्टी गळ्यात घातली, म्हणल म्या पोचलो नाय लौकर काठी घेवुन तरी माह्या शिट्टीचा आवाज नक्कि पोचल अन ह्ये चेन्गटी माकड! त्यान्नी कुठ कवा ऐकली असल शिट्टीची फुर्र फुर्र? गॅरन्टीन घाबरणार! अन आक्षी तस्सच झाल बघा, म्या खच्चुन शिट्टी मारु लागलो तर ती माकड घाबरुन निघाली पर बोम्बलायला वरुन प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या टाकु लागली! मन्ग म्या काठी पण दगुडान्वर आपटु लागलो, तोवर रेलिन्ग सुरु झालेल, माग खोऽऽल दरी! सुटला की थेट तळाशीच! मनात म्हणल ह्ये हिकडच्या खडकावरुन येवुन येखाद्या माकडान नुस्ती टपली जरी मारली तरी माझा तोल जाइल अन मन्ग बॉडी थेट तळपोच अन म्या थेट गडाच्याही कितीतरी वरवर! नेटान धीर करुन हिकड तिकड वर खाली आजूबाजुला बघत माकडान्चा अदमास घेत हातातली काठी खडकान्वर बडवीत तोन्डान शिट्टी फुन्कीत फुन्कीत अस्मादीक चोरागत चोरदरवाज्यात हजर!
|
Moodi
| |
| Wednesday, March 22, 2006 - 3:01 pm: |
| 
|
लिंब्या..... अरे बापरे पोट दुखले रे बाबा हसुन हसुन. मी प्रिंटस घेतेय आता या तुझ्या वृतांताची. माकडे काय कुठे पण भेटतात रे, अगदी नाशिकच्या वणी पासुन पुण्याच्या बुधवारपेठेत सुद्धा.. 
|
>>>>> अरे बापरे पोट दुखले रे बाबा हसुन हसुन. अग हस्ती काय तू? हिथ टाईप बदडताना सुदीक म्या कपाळाला सत्राशे साठ (ह्यो पन्तोजिन्च्या साळतला माझा बक्कल नम्बर बरका! )आठ्या घालून कीबोर्ड चेपित अस्तोया! म्हन्जी तेवढच बॉसला वाट्ट की गडी कसला तरी गहन कोड लिहित असेल! अन तवा तिकड चढताना ना? उगा खोट कशाला ग बोलु? थित कुठला हस्तो हे म्या? जाम टरकलो होतो! मला खरच माकडाच्या टप्पलीची भिती वाटत होती! प्रिन्ट घेवुन काय करणारेस?
|
Suniti_in
| |
| Wednesday, March 22, 2006 - 6:37 pm: |
| 
|
मस्तच लिहिल आहे लिंबू पुढच पण येऊ द्या आता लवकर.
|
यमजेवाठारकर्नी सान्गितल म्हणुनशान पद्मावती तळ्याचे दोन फोटु हिथ टाकतो हे! ग्वाड मानुन घ्या!

|
वरल्या मजकुरात चोरदरवाजाचा उल्लेख हे, तिथली वाट कशी हे याची कल्पना यावी म्हणुनशान फुड हे तीन फोटु टाकतो हे

|
|
|