|
Chafa
| |
| Thursday, March 23, 2006 - 4:07 am: |
| 
|
LT मस्त लिहीलंय! लिंबं शोधतानाचा प्रसंग आणि माकडांचा प्रसंग ..... फोटो पण मस्त आलेत सगळे!
|
Charu_ag
| |
| Thursday, March 23, 2006 - 8:42 am: |
| 
|
LT , छान खुसखुशीत लिहीलयस रे. पुढचा भाग लवकर टाक.
|
Tanya
| |
| Thursday, March 23, 2006 - 9:09 am: |
| 
|
लिंबु.... HHPT . मला क्रशचा बीबी थितबी आठवला....... अजुन येऊ दे. तुझ्या साहेबांकडुन तुला promotio नक्की.जास्तच काम करतोस अस वाटेल त्यांना
|
तर अस शिट्ट्या फुन्कीत, कधी रेलिन्गला धरुन तर कधी चारीपायान्वर रान्गत रान्गत आमी चोरदरवाजातुन पद्मावती माचीवर दाखल झालो! तिथ थोडावेळ विश्रान्ती घेतली, चुरमुरे भडन्ग असला माल चघळला! मगाची माकड हित बी मागोमाग आलेली, त्यान्ना त्यान्चा चुरमुर्याचा शेअर देवुन टाकला! म्हणल उगा लफड नको, पोटात दुखायला लागल तर काय घ्या! गडाचा वरला पसारा बराच मोठा हे! म्हन्जी बाकीच्या माच्या हेत ना सुवेळा आणि सन्जिवनी, तर त्यान्ची लाम्बी किलोमीटर मधी मोजावी लागती, तर आमी फकस्त बालेकिल्ल्यावर जायच ठरवल कारण वेळेची कमी होती अन समद्यानाच दुसर्या दिवशी ड्युटीवर हजर होण कम्पल्सरी होत! तर आम्ही बालेकिल्ल्याकडे निघालो, जाताना वाटेत जुन्या बान्धकामाचे बरेच अवशेष दिसतात, राजान्च्या सदरेची जागाही वाटेतच हे! ती ओलान्डली की एक वाट वर बालेकिल्ल्याकड जाती, दुसर्या डावीकडच्या वाटेन गुन्जवणे दरवाजा नी तिथुन पुढ सुवेळा माचीकड जाता येत. बालेकिल्ल्याकड जातानाच आधी उजवीकड एक वाट सन्जिवनीमाचीकडे जाते. बालेकिल्ला उजव्या हाताला ठेवुन पायथ्यान एक निमुळती वाट पुढे जाते तीने काही अन्तर चालल की मग पुन्हा चढण सुरु होते. इथेही रेलिन्ग हेत अन चारी पायान्चा वापर करुन चढाव लागत! माझ्या हातात येक काठी कसली? दन्डुकाच म्हणायला हव, गळ्यात मोबाईल अन कॅमेरा, पाठीवर दहा किलोची पिशवी, पायात इन्डस्ट्रिअल शूज अशा अवतारात ते खडक चढणे म्हणजे एक दिव्य होत, करतो काय बापडा? जमत नाही, भिती वाट्टी असल काय म्हणायची सुदीक चोरी होती! मी खर तर नेम केला होता की अज्जाबात खाली दरीकड म्हणुन बघुन डोळे फिरवुन घ्यायचे नाहीत, पर काय व्हायच ना की बाकीच्यान्च फोटु काढताना दरीकड बघितल जायचच अन जी भम्बेरी उडायची म्हणुन सान्गू! अहो पाय नुस्ते लटलट लटलट कापायचे! श्वास फुलायचा, कपाळावर भितीन घर्मबिन्दू जमायचे, घशाला कोरड पडायची अन उगाचच पायाखालचा दगड निसटतो हे अस सारख सारख वाटायच! अन पुन्हा हे कुणाला बोलायच नाही! नाहीतर तो दुसरा बी माझ्या अवस्थेला येवुन पोचला असल तर त्यालाबी निमित्त मिळुन तो बी गठाळायचा, नसला भ्यालेला तर खरच घाबरायचा! म्हणुन तोन्डातुन चकार सबुद निघु दिला नाही! कुठन यान्ना हो येतो अस म्हणालो! म्हणे छान साईट सिईन्ग हे! डोम्बलाच आलीये साईट! खोल खोल दरी शिवाय खाली काही दिसत नव्हत अन उन्च उन्च भिन्तीगट काळ्याकभिन्न दगडी कड्यान्शिवाय वर काही दिसत नव्हत! मनातल्या मनात सन्योजकाला मोजुन सत्राशेसाठ पैजारा मारत मारत एकडाचा बालेकील्यावर पोचलो! पुर्णपणे वर पोचल्यावर मात्र... अहाहा! क्या बात है! लव्हली! टू मच! फॅन्टास्टिक! असे येकेकच शब्द तोन्डातुन फुटत होते! गडाच्या चहुबाजुचा परिसर येवढ्या उन्चावरुन बघताना शब्दशः भान हरपत होते! अब्बे थाम्ब थाम्ब, अस्स भान हरपू देवु नगस! वार केवढ भन्नाट भणाणाणाहे.. जाशील की उडुन! तर ठरावीक स्पॉटवर वार्यामुळ जाणारा तोल सावरीत मी फ्लॅशवर फ्लॅश उडवत होतो! फ्रेम्स वर फ्रेम्स! पहिल्यान्दाच अऑप्टिकल झुमच्या डिजिटलवर हात साफ करुन घेत होतो! एकदम वर थोडावेळ बसुन मग ब्रह्मर्शी मन्दिरापाशी कान्दा कापुन भेळ करुन खाल्ली! तोवर समद्यान्च्या बाटल्यातल पाणी सम्पल होत अन थितल्या टाक्यातल हिरव पाणी भरुन पिण्याची धमक फार कमीजणात होती, तर बरेच जण तसेच रिकाम्या बाटल्यानीशी परत निघाले! पर म्या येक शाणपणा केला! अहो पाणी नसल तर नसरापुरला घेतलेल्या लिम्बान्च काय करायच मग? कुणावरुन ओवाळुन टाकायची की काय? ते काय नाय! म्या अन माझा जोडीदार दोन रिकाम्या बाटल्या घेवुन परत मन्दिरापाशी आलो! फकस्त मन्दिरामागच्या टाक्यातल पाणी बर्यापैकी स्वच्छ नितळ होत पर तेच्यातही कसले कसले पान्ढरे कण तरन्गतच होते! अन पाणी खोलीवर असल्यान काढाव कस हा पण पेचच होता! तर म्या आयडियेची शक्कल लढवली! काठीला बाटली बान्धली अन तस करुन पाणी काढल! लईच अवघड काम! दोन बाटल्या भरुन घेतल्या अन पुन्हा पद्मावती माचीवर येवुन सावलीला टेकलो तर आणलेल्या बाटलीतली येक बाटली बाकिच्यान्नी सम्पवली पण! आत्ता ह्या कर्माला काय म्हणाव? येक बाटलीत कितिकस सरबत होणार? अन स्वच्छ पाण्याकरता पुन्हा बालेकिल्ल्यावर कोण जाणार? पद्मावती तळ्याच पाणी हे पर ते बी बर्यापैकी हिरव झालेल! हार मानेल तो लिम्ब्या कसला? मन्ग मी माझी धोकटी उघडली! त्यात पुण्याहुन आदल्या दिवशी घेतलेली बाटली राखिव ठेवली होती लपवुन, ती काढली. येका रिकाम्या बाटलीत अर्धाशेर साखर, दोन तिन चमचे मीठ अन समदी लिम्ब कापुन पिळली, थोड पाणी घालुन बशिवल येकाला बाटली हलवायला! मस्त पैकी साखर विरघळल्यावर त्यात पाणी वाढवुन समद्याना प्लॅस्टिकच्या गिल्लासातुन सरबत वाटल! समदी जनता खुष! तर येक सान्गायचच राहील की! बालेकिल्ल्याकड जाताना ना येका ताकवाल्या पोराला बुक केला होता! त्याला म्हणल हिथ पद्मावतीवर नको ताक, बालेकिल्ल्यावर आणुन देणार का? आख्खी कळशीभर घेतो! तर बालेकिल्ल्यावर बसुन कळशीभर ताक आम्ही सम्पवल! आत्तापर्यन्त बारा वाजले होते! गड उतरायला सुरुवात केली! एकवेळ चढणं सोप असत पण उतरण अवघद! खोल खोल दरी सामोरी असती! पाय लटपटत असतात! जिवाच्या भितीन घशाला कोरड पडलेली असती अन सोबतच्या बाटल्यातल पाणी सम्पलेल असत! अस झाल की भर दुपारच्या उन्हात डोळ्यासमोर काजवे चमकू लागतात! हे वर्णन काय होऊ शकत याच नसुन उतरताना माझ काय झाल त्याच हे! मग मी शाणपणा केला अन दरीकड पाठ करुन उतरायला सुरुवात केली! नाहीतरी उतरताना पाठीवरची सॅक मागल्या दगडाला धडकुन येकदोनदा फुड तोल गेलाच होता! मन्ग येकदा का दरीकडच पाठ करुन उतरायला लागलो तर समदच सोप्प झाल! चोरदरवाज्याचा अवघड टप्पा पार करुन फुडल्या मुरुमभर्या टप्प्यावर पोचलो अन मग मात्रा माझ्या हालाला पारावार उरला नाही! पहिला टप्पा कसाबसा घसरत लचकत मुरडत काठी टेकीत टेकीत उतरलो! तोवर पायात पेटगे येवु लागले होते! कपाळावरला घाम भुवयान्ना पार करुन डोळ्यात शिरत होता अन डोळे पुसायला गेल तर हाताची धुळ डोळ्यात जावुन अधिकच आग आग होत होती, भर दुपारच बाराच रणरणत तळपत उन्ह डोक्यावर पाणि सम्पल्याची बोच अधिकच तीव्र करीत होत! आणि.... आणि दुसर्या टप्प्यावर एका ठिकाणी माझा तोल गेला! तोल सावरताना डाव्या पायावर जास्त वेळ भार दुवुन राहीलो तर डाव्या पोटरी मरणाची कळ जावुन क्रॅम्प आला! अबॉबॉबॉबॉ..... बोम्बलायची पाळी माझी होती! हां हसल नाय कुणी, बाकीच्याना फुड व्हायला सान्गितल अन म्या बसलो थितच धुळीत फतकल घालुन... आता काय म्या येत नाय, आता काय म्या पोचत नाय घरला... म्या हिथच र्हातो तुमी जावा म्होर! ...... कळवळत, ओठावर दात घट्ट चेपुन धडपडत कशीतरी सॅक पाठीवरुन ओरबाडुन काढली, थरथरत्या हातान कप्पा शोडुन त्यातुन येक मलम काढल अन भरारा पोटरीवर चोळल! येकदम थन्डगाऽऽऽर वाटल..्अई शाब्बास! मगा पोटरीला बोट लावता येत नवत, आता थोडा वेळ गेल्यावर पेटगा जागेवर आल्यावर मलम लावुन त्या पोटरीला पाऽऽर बधिर करुन टाकल! उठलो... एकेक पाऊल हळु हळु जपुन जपुन टाकत पुढ निघालो, दोन जन माझ्या सोबतीला मागच राहीले होते! मी मनात म्हणल लिम्ब्या, शिन्च्या आधी मनातली उतारची नी घसरुन पडण्याची भिती काढुन टाक! अन ते टाचेवर भार देवुन उतरण्यापरीस चवड्यावर तोल सावर.... आसा चवड्यावर तोल सावरलास ना तर दुडक्या उड्या मारत कवाच गड उतरुन जाशीला! अन तस्सच झाल की! चवड्यावुन दुडक्या उड्या मारत तसल्या घसरड्या मुरुमावरुन मी भर भर फुड जायला लागलो!.... पण हे सुख थोडा वेळच! इन्डस्ट्रियल बुटाला म्होरल्या साईडला येक लोखन्डी वाटी असती अन हे बुट फारसे वाकत नाहीत! तर चवड्यावर चालताना बोटात क्रम्प्स येवु लागले! मग तस चालण्याचा नाद सोडला तर येका ठिकाणी तोल जावुन तोल सावरताना या बारीला उजव्या पोटरीत क्रॅम्प आला! काय हे की क्रॅम्प येताना तुम्ही सावध असाल तर क्रॅम्प कन्ट्रोल होतो! सावध कसला र्हातो? माझा तोल चाल्ला होता अन या क्रॅम्प वर काय मला नियन्त्रण मिळवता आल नाही! येका झटक्यात जस्सा होतो तश्शाच अवस्थेत बुड टेकल! पाय मागे पुढ घेववत नव्हता अन पेटग्यावर पेटगे, त्याच्या वेदना मस्तकात भिनत होत्या! कधी नाही ते तोन्डुन कळवळुन आयाईग, लईच दुखतय अस शब्द बाहेर पडले, पुन्हा तोच अध्याय, सॅक ओरबाडा, कप्पा शोधा, ट्युब काढा, खसा खसा मलम चोळुन मालिश करा! केल! न करुन सान्गतो कुणाला? येकीकड उन्हाचे चटके, घशाला कोरड अन तशात पायात वेदनान्वर वेदना! पाचेक मिन्टात माझा घाम काढला त्या दुखण्यान! जोडिदारान क्रॅम्प वरचा स्प्रे मारला, तर मलम अन स्प्रे च कॉम्बिनेशन होवुन जी काय आग आग झाली ना की मी फकस्त थयथया नाचायचा बाकी होतो! तसाच पुढ निघालो! तर वीस वर्षान्पुर्वी दुखवलेला गुढगा, त्यान का उचल खावु नये? तो बी ठणकुन त्याच अस्तित्व दाखवायला लागला, मन्ग मात्र म्या जाम चिडलो! उभाउभ्याच पॅन्ट वर करुन गुढग्यालाबी मलम चोपडल! म्हणल घे लेका, फुकाचच हे ना तुझ्या बाच, घे लावुन! तुझी तरी काय चूक म्हणा? नाहीतर आम्हाला पाय गुढगे असतात हे तरी आम्ही कधी आठवणार? तिन टप्पे पार केले, आता शेवटचा टप्पा! अक्षरष पाय ओढत ओढत, लुत भरल कुत्र जस फेन्गडत फेन्गडत चालेल तस चालत हळु हळु कासवाच्या गतीन इन्च इन्च फुड सरकत होतो! तहानेन जीव नुस्ता व्याकुळ झाला होता! घामान निथळल्यामुळ शरीरातल पाणी कमी झालेल ते पेटग्याच्या रुपात शरीर निषेध नोन्दवत होत! आता घामही यायचा बन्द झाला होता अन तोन्डातली पेपरमिन्टची गोळी विरघवळायला तोन्डालाही पाणी सुटत नव्हत! अन तेवढ्यात ती दिसली... चौथ्या टप्प्याच्या शेवटी शेवटी ती दिसली! ती दिसली अन हृदयात आनन्दाच्या उकळ्या फुटू लागल्या! चातीतली धडधड उतरतानाही वाढली अन मी चालण्याचा वेग वाढवीत तिच्याकडे जावु लागलो! ती देखिल माझ्याकडेच आशेने बघत होती! पण अजुनही ती लाम्बवरच होती! अस वाटत होत की मी चलतो हे तरी तिच्या अन माझ्यातल अन्तर कमीच होत नाही हे! मी पुन्हा पुन्हा डोळ्यावर हात चोळुन खात्री करुन घेतली की ती तीच हे ना! हळु हळु आमच्या दोघातल अन्तर कमी होत गेल! तिच्या पाशी पोचलो! अन अत्यानन्दान तिच्या समोरच जमिनीवरच बसकण घेतली! दे ग बाऽऽई चल दे आता, आता अन्त नको पाहूस, दे लौकर, काय तुला जे द्यायच असेल ते दे! ती गोडस हसली! साहेब, लिम्बु शरबत हे! चालल का? अग चालल कसल? आण आण लौकर! अन त्या बारक्या मुलीकडुन दोन गिल्लास सरबत घेवुन नरड्यात ओतले तवा आत्मा शान्त झाला! खाली गावात पोचलो, थितल्या हॉटेलात कोकची बाटली रिचवली, सकाळी सहा पासुन दुपारी दोन वाजेस्तोवर आमचा राजगडाचा ट्रेक आठ तासात यशस्वी पणे ( ? ) पुर्णकरुन हातीपायी धड अवशेत मुक्कामाला पोचलो आणी दुसर्या दिवशी हिथ! वरल्या वृत्तान्तात बरेच वैयक्तीक घटनान्चे सन्दर्भ आलेत पण ट्रेकला गेल्यावर काय होऊ शकते याची जाण यावी म्हणुन केवळ ते लिहिलेत तस नस्त तर.... दिनान्क १९ मार्च रोजी मी माझ्या दहा सहकार्यान्बरोबर सकाळी सहाला राजगडावर चढुन गेलो ते दुपारी दोन वाजता मुक्कामाला परत पोहोचलो, अशा एका वाक्यातही सान्गता आल असत! नाही का? 
|
मुडी, अथक, दिनेश, चिनु, बी, सिमिन्त, फदी, सुनिती, चाफा, चारू, तनया, सर्वान्चे प्रतिसादाबद्दल आभार!
|
सदरेवर टोकावर जाऊन बसल्यावर मोबाईल फोनला रेन्ज मिळती! आयडियाचा असल तर नक्कीच मिळती! सदरेच्या म्होर नी बाजुला बी मिळती पर तुम्हाला पलिकडच्याच बोलण ऐकु येत नाही, पर त्याला तुमच बोलण ऐकु येत! 
|
Dineshvs
| |
| Friday, March 24, 2006 - 1:31 pm: |
| 
|
लिंबु, हि ठिकाणे नांदती होती, त्यावेळी कशी दिसत असतील, याचे कल्पनाचित्र बघायची मला फार ईच्छा आहे. आपल्यापैकी कुणी चित्रकाराने हे मनावर घेतले तर, हे शक्य आहे. एखादी व्यक्ति नको, केवळ ते स्थळ आणि समुह चितारले पाहिजे. त्याने या जागा आता ओसाड झालेल्या बघुन जी हळहळ वाटते ना, ती जरा कमी होईल.
|
Zelam
| |
| Friday, March 24, 2006 - 2:14 pm: |
| 
|
लिंब्या भाव, लई भारी लिवलय बगा. आमच्या पण trek च्या आणि पेटक्यांच्या आठवणी जाग्या झाल्या नव्हं.
|
Shonoo
| |
| Friday, March 24, 2006 - 2:32 pm: |
| 
|
लिम्बुटिम्बु फ़ोटो एकदम झकास आहेत. बालेकिल्ल्याच्या दरवाज्याच्या फोटो चे फ़्रेमिन्ग पण भारी आहे. मोठी प्रिन्ट घेवून फ़्रेम करुन लावायला हरकत नाही वृत्तांत तर रोमांचकारी आहेच
|
दिनेश, झेलम, शोनू, तुमच्या प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक आभार! हे आभार मानताना डोळ्यात कणभर तरी काहोईना पण पाणी उभे राहिले आहे हे कबुल करताना मला जराही लाऽऽज वाटत नाही! आज चुकुन कामानिमित्त रात्री नऊ दहाच्या सुमारास हापीसात आलो हे! तर तुमची पोस्ट्स बघितली! अनुल्लेखाच्या पळपुट्या गान्धीवादी शस्त्रानी झालेल्या न भरुन येणार्या जखमा जणु तुमच्या पोस्ट्स नी जादु प्रमाणे भरुन येतात येवढेच सान्गतो! दिनेशजी, तशी चित्र काढणे अवघड नाही पण... आज जो गड आपण पहातो तो तसाच स्वरुपात होता यावर माझा विश्वास बसत नाही! लढाऊ किल्ल्याचा वाटा दरवाजे हे इन्ग्रजान्नी तोडुन फोडुन टाकले! ना त्याची लाज येथिल जनाना ना राज्य कर्त्यान्न्ना! अन बाकीची लोक काय? तर बामण कुठ धुवायला मिळतील अन कशी त्यान्च्या विरुद्ध हवा करता येईल यात गुन्तलेली.... राज देखिल काही वेगळ करेल अशी अपेक्षा मला नाही! .. हा विषय वेगळा हे! तरीही तुम्ही मनःपुर्वक प्रतिक्रिया दिलीत, तुमचे मनापासुन आभार, उधारीचा कॅमेरा, उधारीची गाडी, सगळ आयुष्यच जिथ उधारीच, पण शब्द माझे स्वतःचे होते... त्याला तुम्ही दाद दिलीत, किमान अस्तित्वाची दखल घेतलीत त्या बद्दल खरच धन्यवाद! या उप्पर काय लिहू? सुज्ञास सान्गणे न लगे!
|
Nalini
| |
| Friday, March 24, 2006 - 5:04 pm: |
| 
|
लई झक्कास लिवलय लिंबुभाव. अन फोटु बी लई मस्त आल्यात बघ. असाच ट्रेक करत र्हावा अन असच लिव्हत र्हावा.
|
Charu_ag
| |
| Friday, March 24, 2006 - 5:55 pm: |
| 
|
सगळ आयुष्यच जिथ उधारीच........... क्या बात है, लिंबु. अरे सहज हसत खेळत एखाद वाक्य अस काही बोलतोस की....... वृत्तांत मस्तच. आणखी काय लिहु? सगळं तर तुच लिहीलयस!
|
Kandapohe
| |
| Wednesday, March 29, 2006 - 2:08 am: |
| 
|
लिंब्या सही लिहीले आहेस रे.. ती दिसली अन हृदयात आनन्दाच्या उकळ्या फुटू लागल्या!>> हे जरा बळच घातल्यासारखा वाटला. 
|
>>>> हे जरा बळच घातल्यासारखा वाटला. कान्द्या, वर्णनात बळच वाटत असल पर शब्दशः खर हे! आमच्या कडच पाणी सम्पलेल होत अन दुपारी बारा ते दिड या दरम्यानच्या उन्हात आम्ही उतरलो होतो, शब्दशः घशाला कोरड पडली होती, शरीरातील पाणी सम्पत चालल की काय होत त्याचा अनुभव घेत होतो! आणि ती विकणारी पोरगी दिसल्यावर केवढे हायसे वाटले ते शब्दात सान्गुन किन्वा वाचुन उपयोग नाही, त्याकरता राजगडावर जावुन बिन पाण्याने दुपारच्या रणरणत्या उन्हात गड उतरला पाहीजेल! देवाच्यान सान्गतो, ती दिसली अन खरच उड्या मारायचो बाकी होतो, पण उड्या मारायची ताकद नव्हती अन उड्या मारायला थित जागाही नव्हती! प्रतिक्रियेबद्दल सगळ्यान्चे आभार! 
|
Dhumketu
| |
| Wednesday, August 01, 2007 - 11:25 am: |
| 
|
राजगडावर राहायची सोय होऊ शकते. अंथरूण पांघरूण स्वत:च आणावे लागेल. देऊळ आणी खोल्या आहेत. खाण्याची सोय स्वत:च करावी लागेल.. किंवा खाली गुंजवणे गावात हॉटेल मध्ये सांगितले तर ते खाणे आणून देतात. आता पावसात वरपर्यंत आणून देतील का ही शंका आहे.
|
|
|