पहिल्यांदा युनिव्हर्सिटी कॅम्पसवर काहीतरी खायची वेळ आली तेव्हा त्या ट्रक्सवर लावलेल्या बोर्डांवरचे कुठलेही प्रकार ओळखीचे वाटत नव्हते. अर्ध्या पदार्थांचा उच्चार कसा करायचा तेही माहीत नव्हतं. ओरिएंटेशनच्या नंतर एका सिनियरने सांगितल्यावरून "रिचीच्या ट्रकवर त्यातल्या त्यात बरे प्रकार मिळतात, बाकीच्या ट्रक्सवरचे प्रकार देशी लोकांना आवडत नाहीत/चालत नाहीत" एवढं ऐकून माहीत होतं. म्हातार्या रिचीने तीन वेळा "मे आय हेल्प यू?"म्हटल्यानंतर घाबरत घाबरत 'ग्रिल्ड चीझ' सँडविच मागितलं अन् माझं वाक्य संपायच्या आत त्याने "व्हॉट काइंड ऑफ चीझ?'"विचारल्यावर परत ' मुखं च परिशुष्यति' अवस्था झाली होती.
७ वर्षांची होते मी, तिसरीत होते. प्राथमिक शाळेत वक्तृत्व स्पर्धा होत्या. फक्त दोन मिनिटांचं भाषण करायचं होतं. कधीही वाटलं नव्हतं की मला त्या वक्तृत्व स्पर्धेत बक्षिस वगैरे मिळेल! माझ्या आठवणीप्रमाणे ते माझं भाषण आईने लिहून दिलेलं पहिलं लिखित होतं. त्या आधी म्हणजे तिच्या कॉलेजच्या दिवसांत तिने बर्याच स्पर्धा गाजविल्या होत्या हे कालांतरानं समजलं. पण आपली आई खूप छान लिहिते हे समजायला मला तिसरीत जावं लागलं.
गीत/स्वर: मिल्या (मिलिंद छत्रे)
गीत: जयवी (जयश्री अंबासकर)
संगीत/स्वर: सुबोध साठे
ॐ नमोजी आद्या
कैलासावर शिव पार्वतीसह हास्य विनोदात रमले होते. तितक्यात, देवर्षी नारदांची स्वारी तिथे प्रवेश करती झाली.
"नारायण...नारायण"
"काय नारदा? कसं काय येणं केलंत?"
"आलो असाच समाचारासाठी. देवाधिदेवा, हे एक फळ आणलंय. पण आता कार्तिकेयाला द्यावे की गणेशाला, असा संभ्रम निर्माण झालाय.."
"हं.. आहे खरा संभ्रम! आपण असे करुया, त्या दोघांतील जो पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करुन प्रथम येईल त्याला हे फळ देऊयात.."
"कार्तिकेयाss, गणेशाss" पार्वती देवींनी साद दिली.
"हे बघा, दोघांपैकी जो आधी पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याला हे फळ देणार आहेत नारद ऋषी!"
श्री वरद विनायक- महड/मढ, जि. रायगड
मार्ग- कर्जत-खोपोली रस्त्यावर. मुंबई-पुणे रस्त्याने खोपोलीजवळ १.५ कि.मी चा फाटा. पाताळ गंगेपासूनही १.५ कि.मी.
यात्रा- भाद्रपद व माघ या दोन्ही मासात शु. प्रतिपदा ते पंचमी अशी यात्रा असते.
मूर्ती- दगडी सिंहासनावर बसलेली, सिंहासनावर दोन हत्ती कोरलेले.
गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: सौ. माधुरी करमरकर
धुमसत्या युद्धभुमीवर, मांडीत रूतलेल्या बाणाची जखम भळभळत असतांना एखाद्या अज्ञात दिशेने कुठल्यातरी धूसर आशेवर निग्रहाने खुरडत खुरडत रांगणार्या जखमी सैनिकासारखा पाय उचलत तो मंडळाकडे चालत होता. तिरवड्याहून परतल्यापासून भयंकर त्रासदायक कल्पना आणि प्रश्न मनात, समुद्रात उठणार्या वावटळीसारखे थैमान घालत होते. प्रश्नांच्या उंचचउंच लाटा आणि उत्तरांचे भोवरे, फक्त एकातून दुसर्यात अडकत रहाणे, सुटका नाहीच.
असे म्हणतात की श्रीगणेशाने दृष्टांत दिल्यानंतर अथर्व ऋषींनी अथर्वशीर्ष लिहिले. संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्षाची एक हजार (सहस्त्रावर्तन), एकशे आठ अथवा एकवीस आवर्तने करतात. उपनिषदाने आवर्तनाची सुरुवात होते आणि श्रीगणेशाची आठ नावे घेऊन ते संपते.
अथर्वशीर्षाची नियमीत आवर्तने करणारे आपल्यात अनेक असतील. बर्याचदा असे होते की धार्मिक विधी अथवा परंपरा पाळत असताना आपल्याला त्याचा अर्थ ठाऊक नसतो, फलश्रुति ठाऊक नसते. ह्यासाठीच यंदाच्या गणेशोत्सवात खास मायबोलीकरांसाठी संपूर्ण अथर्वशीर्षाचा मराठीत अनुवाद केला आहे. तर समजावून घेऊयात अथर्वशीर्षाचा अर्थ आणि उद्देश !!!
| श्रीगणेशाय नम: |
श्री बलाळेश्वर - पाली, जि. रायगड
मार्ग- खोपोली-शीळ फाट्यापासून पडघवली रस्त्याने ४० कि.मी., नागोठण्यापासून ११.२ कि.मी. अलिकडे.
यात्रा- माघ शु. चतुर्थी. यात्रेकरूंच्या भोजनाची व्यवस्था १२ घरांकडे आहे. पुजारी ब्राम्हण व गुरव आहेत.
मूर्ती- स्वयंभू. ३ फूट उंचीची. डाव्या सोंडेची. जरा रुंद. कपाळाचा भाग काहीसा खोलगट.