गणेशोत्सव २००९ सांस्कृतिक कार्यक्रम
अष्टविनायक दर्शन : श्री विघ्नहर
श्री विघ्नहर- ओझर, जि. पुणे.
मार्ग- पुणे-नारायणगाव रस्ता. जुन्नर रस्त्यावर ओझरचा फाटा, तिथून ८ कि.मी. कुकडी नदीच्या काठी.
यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी व माघ शु. चतुर्थी.
मूर्ती- पूर्वाभिमुख. गाभार्यासमोर ओळीने ३ सभामंडप. गाभार्यात चारी बाजूंना कोनाड्यात पंचायतनातल्या इतर चार मूर्ती. दीपमाला सुबद्ध, सुंदर.
'चिंटू' चे निर्माते - चारूहास पंडित, प्रभाकर वाडेकर
परिचितांमधले अपरिचित : 'चिंटू' चे निर्माते - चारूहास पंडित, प्रभाकर वाडेकर
प्रथम नमन तुजसी - श्री. राहुल देशपांडे
आज हो गणपती आले दारी - राहुल देशपांडे, माधुरी करमरकर
सुरूवात
एक पत्रकार या दृष्टीकोनातून पाहिले तर ही संपूर्ण घटना म्हणजे सॉलीड मालमसाला असलेली जबरदस्त बातमीच होती माझ्यासाठी! पण जेव्हा सुखदेवकाकांबरोबर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या रणरागिण्यांना भेटलो, त्यांच्या या जगावेगळ्या संघर्षाची कथा ऐकली तेव्हा थक्कच झालो. सुखदेवकाका आणि भारतीताईंबरोबर त्या दिवशी अंजनाबाईंना आणि त्यांच्या सहकारी भगिनींना भेटलो. त्यांच्याच तोंडून त्यांची कर्मकहाणी ऐकली ........
............................................................................................................
अष्टविनायक दर्शन : श्री गिरिजात्मक
श्री गिरिजात्मक- लेण्याद्री, लेण्याद्रीचा डोंगर, जि. पुणे.
मार्ग- पुणे-जुन्नर रस्त्यावर जुन्नरपासुन ५ कि.मी. अंतरावर कुकडी नदी ओलांडुन डोंगरावर जावे लागते. डोंगर्यातल्या २८३ पायर्या चढाव्या लागतात.
यात्रा- भाद्रपद व माघ मासात इथे दोन मोठे उत्सव होतात, त्यानिमित्त यात्रा भरते.
मंडळ - भाग ३
थंड अंधारानं तुडुंब भरलेल्या विहिरीच्या पाण्याचा चांदण्यांनी गोंदलेला आरसा वार्याच्या ओझरत्या स्पर्शाने हलकेच शहारून यावा तसा खिडकीच्या पडद्याआडून दिसणारा रात्रीच्या आभाळाचा काळाभोर तुकडा शहारून आला. पहाटे पहाटे, अंगणात बहरलेल्या जाईच्या वेलीवरून हलकेच निसटून गेलेल्या कोवळ्या फुलांसारखा लुकलुक चांदण्यांचा पांढराशुभ्र शीतल सडा आभाळाच्या चौकोनी तुकड्यावर चमचमत होता. सगळीकडे नीरव शांतता भरून राहिलेली, उरला फक्त खिडकीतून आत वाहणार्या वार्याचा उन्मादक आवाज आणि डोळ्यांवरून ओझरणारा त्याचा तलम नाजूक स्पर्श.
नमन तुजसी श्री गौरीसुता - श्री. रघुनंदन पणशीकर
अष्टविनायक दर्शन : श्री चिंतामणी
श्री चिंतामणी- थेऊर, जि. पुणे
मार्ग- पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासुन २२ कि.मी. अंतरावर. लोणी स्थानकापासून ५ कि.मी.
यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी. रमा-माधव पुण्यतिथी. कार्तिक कृष्ण अष्टमी.
मूर्ती- स्वयंभू. उजव्या सोंडेची.
मंदिर- महाद्वार उत्तराभिमुख पण मूर्ती पूर्वाभिमुख. प्रशस्त आवार. विस्तृत सभामंडप. तिन्ही बाजूंनी मुळा-मुठेचा वेढा. या मंदिराची व्यवस्था चिंचवड देवस्थानाकडे आहे.