नाती
अबोल
मी उदास आहे म्हणूनी
तू मला बोलवावे
डोळ्यात रोखूनी काही
लटकेच रागवावे
मी उगाच टाळूनी जावे
संवाद साचलेले
तू ही न जाणवू द्यावे
ते भाव वाचलेले
शब्दा विना ही काही
नाती अशी रुजावी
सर ओसरुनी जाता
पापण्यांत जी भिजावी
मी उदास आहे म्हणूनी
तू मला बोलवावे
अन जाताना हळवे
क्षण हासरे करावे
शमा
पारसी बावा 'दानू'
मुंबईच्या 'फ़ाइव गार्डन' ह्या माटुंगा मधील भागात बरीच वर्दळ असते. गार्डन म्हटलं तर टांगे, छोटे पाळणे, भेळवाले, चणे-दाणे वाले आणि तत्सम विक्रेते असतात. लोकं आपल्या पोरांना घेऊन गार्डन मध्ये फिरायला येतात. कुठे दहा-बारा संघ वेगवेगळ्या खेळपट्ट्या पकडून एकाच मैदानात क्रिकेट खेळायची कसरत करीत असतात तर कुठे कुणीतरी संध्याकाळी तिथल्या कट्ट्यांवर योग किंवा कराटेचे 'क्लासेस' घेत असतात! जवळच २-३ कॉलेज असल्यामुळे तिथल्या जोडप्यांनी गार्डन मधील अंधारे कोपरे बऱ्याच चतुराईने शोधलेले असतात.
आस्थेचे बंध
मध्यंतरी रझा ऍकॅडमीने चालवलेल्या विरोध प्रदर्शनाच्या वेळेस मुंबईच्या आझाद मैदानावर जेव्हा तोडफोड झाली त्यात एक फोटो प्रामुख्याने आपल्या मनाला ठेच लावून गेला. आझाद मैदानावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला एक इसम तोडतानाचा तो फोटो होता. हा फोटो पाहून बऱ्याच जणांना राग आला असेल, व काहींना तर अगदी आताच ह्या इसमाला पकडून हाणायला पाहिजे असे वाटले असेल.
नाती ( "न+अति")
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. माणूस जेव्हा एकटा रानावनात रहात होता
तेव्हाची.माणूस मुळातच बुद्धिमान होता.आपले जीवन समृद्ध करण्यासाठी तो
अनेक प्रयत्न करत होता. लवकरच इतर सर्व प्राणिमात्रांहुन तो प्रगत होत
गेला, आणि वेगळा ठरला. परंतु तरीही एकटेपणा त्याला भेडसावत होता.त्याला
आयुष्यात कसलीतरी उणीव भासत होती.मग त्याने देवाची मनापासुन प्रार्थना
केली आणि सांगितले की देवा जीवनात यशस्वी होण्याची कला तर तु मला
जन्मजातच दिली आहेस, परंतु आता मला असे काहीतरी दे की ज्यामुळे माझ्या
आयुष्याला अर्थ लाभेल. मग देवाने प्रसन्न होवुन त्याला नात्याचे अनमोल