मित्रांनो,
गुढी पाडव्याच्या निमित्ताने काही वर्षापूर्वी केलेलं गीत इथे देत आहे. बंगलोर येथे राज भवन मध्ये यावर सुंदर नृत्य सादर करण्यात आलं आणि कन्नड दूरचित्रवाहिनी "चंदना" वरून ते प्रक्षेपिताही करण्यात आलं होतं. आशा करते कि ट्यून आपल्याला आवडेल.
गुढी पाडवा गीत
धन्यवाद.....
प्रवरा
आज गुढी पाडवा. जय नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शक १९३६ या वर्षारंभी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा !
ब्रह्मदेवानी निर्मिलेल्या सृष्टीच्या प्रारंभ दिनाची नोंद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. प्रभू रामचंद्र यांनी रावणावर विजय मिळवून वनवास संपवून अयोध्या नगरीत प्रवेश केला तो हा दिवस.
भारतीय संस्कृतीस कालगणना चंद्र सूर्य यांचे परिभ्रमण यांचे अचूक ज्ञान खूप पूर्वीपासून आहे. दिन दर्शिका, शून्य यांची जगाला देणगी हे आपल्या भारतीयांचे कर्तृत्व.
अशा अनेक कथा असल्या तरी आजच्या दिवसाशी जोडलेली शालिवाहन याची कथा मला सर्वाधिक भावते.
नमस्कार!
सोमवार दिनांक ४ एप्रिल २०११
गुढी पाडवा नव वर्षाचा शुभारंभ.