काव्यलेखन

तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही..

Submitted by रसप on 19 August, 2012 - 03:20

पाउलवाटेवर माझ्या माझीच सावली असते
माझीच पापणी ओली माझ्या डोळ्यांना दिसते
तू हात पुढे केला पण मी वळुन बघितले नाही
तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही

जो रोज साथ देतो तो एकांत हवासा वाटे
मी घड्याळ माझ्यापुरते थांबवतो अडवुन काटे
तू शब्दावरती एका अडल्याचे कळले नाही
तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही

बाळगले उरात होते काहूर कधीकाळी जे
अन आज सजवले आहे तू खुद्द तुझ्या भाळी जे
ते दारावरून गेले पण मी थोपवले नाही
तू सांगितले जे नाही ते मला समजले नाही

अस्तित्त्वाच्या अंताची ओढ्याला चिंता नसते
निर्बुद्ध वाहिल्यानंतर त्याचीही सरिता बनते
तू माझी सरिता व्हावे, हे भाग्य लाभले नाही

छळ मांडला ( एलदुगोला समर्पित) - विडंबन

Submitted by रीया on 17 August, 2012 - 13:56

गुरू ठाकूरची क्षमा मागून... खेळ मांडला...

संदर्भ : http://www.maayboli.com/node/35791 Proud

तुझ्या काळेवाडी कोणी सान थोर न्हाई
साद प्रेक्षकमाऊलींची तुझ्या कानी जाई
तरी देवा संपनाही सिरियल कशापायी
हरवली कथा त्यात काही लॉजिक नाही

चवताळून खरडतो बाफ मायबापा
माबोवरी धागा पेटला
छळ मांडला ...... छळ मांडला... छळ मांडला

माई आजी, ज्ञाना सवे ती कुहू नि प्रभुटला
राजवाडे कंपनीने छळ मांडला
सोडूनी कामधाम हिंडे वल्लभ आणि दिग्या काका
माझ्याच टिव्हीने माझा छळ मांडला…

हरवली अमेरिका अशी आधार कुणाचा न्हाई
तुटलेल्या हृदयाने घना लॅपटॉप फॉर्मॅटींग करी
बळ दे बघायाला, संयमाची ढाल दे

देव कंटाळला

Submitted by प्रकाश कर्णिक on 17 August, 2012 - 06:12

आपण जेंव्हा म्हणतो धाव माझ्या देवा
असतो खेळत जुगार देव कोठेतरी तेंव्हा
वारा नसतो वहात अन हालत नसते पान
सर्वत्र असतो अंधार अन काहीच नसते छान

देवाला पण हवी असते कधीतरी फुरसत
का म्हणून त्याने रहावे कामात व्यग्र सतत
होतो खूप प्रलय तेंव्हा नाही का येत धावून मग
आपण का धरावे गृहीत माणसासाठी केले त्यानी हे जग

का म्हणतो माणूस मीच आहे सर्व श्रेष्ठ
देवाला सेवेला का ठेवले सांगा बरे स्पष्ट
त्याला काही का काम नाही मुंग्या चिमण्यांचे
प्रत्येक वेळीस माणसाने देवास का वेठीस धरायचे

आता पुरे झाले देव म्हणे मला नको बोलवू सतत
आहे बरेच काम राहिले माझे नको मागू मदत

शब्दखुणा: 

आज सगळेच शब्द विरुद् झाले

Submitted by सखी साजिरी on 17 August, 2012 - 03:30

आज सगळेच शब्द विरुद् झाले
आज सगळे मनाच्या विरूधात लिहाव लागतय

का कोन जाने हे सगळे नकोस वाटतय
पण नियतीच्या पुढे झुकाव लागतंय

नको हे सगळे, नको ते रडणे,
जीव जळतो बोलताना सगळे,

हे क्षण नकोस वाटतय, हे जगणंच नकोस झालाय,
कोणासाठी जगू?हाच प्रश्न पडलाय......

श्वास घेयाला शिकवलं आज ती ही परकी झाली,
स्वप्न पाहायला शिकवलं आज ती ही स्वार्थी झाली,

काय करायचं अशा जगण्याचं, जगण पण लाजिरवाणे झाले,
व्यथा लिहिण्यासाठी आता शब्द पण कमी पडले.

का कोन जाने हे सगळे नकोस वाटतय
पण नियतीच्या पुढे झुकाव लागतंय

- रुषाली हरेकर

आज सगळेच शब्द विरुद् झाले

Submitted by सखी साजिरी on 17 August, 2012 - 03:30

आज सगळेच शब्द विरुद् झाले
आज सगळे मनाच्या विरूधात लिहाव लागतय

का कोन जाने हे सगळे नकोस वाटतय
पण नियतीच्या पुढे झुकाव लागतंय

नको हे सगळे, नको ते रडणे,
जीव जळतो बोलताना सगळे,

हे क्षण नकोस वाटतय, हे जगणंच नकोस झालाय,
कोणासाठी जगू?हाच प्रश्न पडलाय......

श्वास घेयाला शिकवलं आज ती ही परकी झाली,
स्वप्न पाहायला शिकवलं आज ती ही स्वार्थी झाली,

काय करायचं अशा जगण्याचं, जगण पण लाजिरवाणे झाले,
व्यथा लिहिण्यासाठी आता शब्द पण कमी पडले.

का कोन जाने हे सगळे नकोस वाटतय
पण नियतीच्या पुढे झुकाव लागतंय

- रुषाली हरेकर

''आरसा''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 17 August, 2012 - 03:02

अचानक आरश्याची काच फुटली
मी रजेवरच होतो..,

रस्ता मोकळेपणाने श्वास घेत होता,
नेहमीसारखं न घुटमळता, काही न बोलता तू निघून गेलास...
आता पौर्णिमेची वाट पहाणेच नशीबात राहिले.

--डॉ.कैलास गायकवाड

पाखरांच्या थव्यांना दिसू लागले!

Submitted by सतीश देवपूरकर on 17 August, 2012 - 00:15

गझल
पाखरांच्या थव्यांना दिसू लागले!
तोच आकाश का आकसू लागले?

कोण जाणे दिसे फायदा कोणता?
भोवती लोक माझ्या बसू लागले!

वाचली फक्त मी एक माझी गझल....
काय आयोजकांना डसू लागले?

छाप माझी पडाया जशी लागली;
लोक माझ्यासवे धुसफुसू लागले!

चेह-यावर जसा चेहरा लावला;
बिंब त्याचे कुठेही ठसू लागले!

जो उठे, ज्ञान तो, पाजळू लागला!
लोक माझ्याच गझला किसू लागले!!

खणखणे आज खोटेच नाणे किती;
आंधळ्यासारखे जग फसू लागले!

दु:ख झाले जसे सोयरे आमुचे;
सुख जणू आमुच्यावर रुसू लागले!

स्वप्न माझे जसे मोहरू लागले;
वास्तवाचेच जाते पिसू लागले!

चार संकल्प यंदाच केलेत मी!

"रात्र"

Submitted by -शाम on 16 August, 2012 - 13:44

शेवटी शेवटी इवलासा भडका
विझवून जातो
पेटल्यापासूनचा जळता प्रवास...

सरलेलं तेल

राख झालेली वात

अन् उदास समई
.
.

रात्र अजूनही बाकीच असते
व्यर्थ स्वप्नांचे दिवे लावत.

............................................शाम

"एकाकी"

Submitted by -शाम on 16 August, 2012 - 13:36

प्रत्येकाच्याच नशिबात असतो हा प्रवास
मुक्कामाचं ठिकाण माहित असलेला....

लागत नाही वेळ श्वासाइतकाही
कोसळायला....

सावरत सावरत थरथरत असतो
आतून-आतून क्षणाक्षणाला...

सगळं जग खुजं दिसतं
इतकीच काय ती गंमत

गाफील प्रवासी या उंचीचं कौतुक करतात
पण हळहळतो कोण

कड्यावरल्या,
एकाकी धोंड्यासाठी...

...........................................शाम

साहवेना भारताला येथले स्वातंत्र्य हे

Submitted by शेळी on 16 August, 2012 - 12:40

साहवेना भारताला येथले स्वातंत्र्य हे
धुमसत्या देशास पाहुन गोठले स्वातंत्र्य हे

कैद होता प्राणपक्षी नश्वरी पिंजर्‍यामध्ये
बद्ध जीवा काळरूपी लाभले स्वातंत्र्य हे

बैलबाजारात बसला लोकशाहीचा वळू
'पांढरे' गेले तरी ना भेटले स्वातंत्र्य हे

पिक्चर अभी बाकी है.... Proud

तोवर तरही घ्या.

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन