मन वढाय वढाय...
nimita यांची 'मन वढाय वढाय' ही कथा वाचल्यावर मनात विचारांची रांग लागली होती... तेच विचार कवितेत शब्दबद्ध करायचा माझा केविलवाणा प्रयत्न...
पसारे ते भावनांचे
आवरावे किती?
मनास माझिया मी
सावरावे किती?
ओढ तुझी, कि
धुंदी आठवांची
मनास माझिया मी
समजवावे किती?
ठेहराव मनाचा
हरपत चालला
निष्फळ उसासे
टाकावे किती?
हळूवार वेच ती
प्राजक्ताची फुले
रानपाखरे वेलीवरती
घेती तेथे झुले
मधुर गोजिरी होते किलबिल.
तुझ येण्याची देती चाहूल.
प्राजक्त ही मग बहरून येतो
शुभ्र फुलांची रास घालीतो
केस मोकळे शुर्भ वसने
पायावर ते अलगत बसणे
फुल फुलाशी घेते वेचून
असेच मजला वाटे पाहून
चोरुन घेई गंध नेटका
अंगणी वाहे वारा अवखळ
प्राजक्ताचा गंध सुगंधी
की आसे तो तुझाच दरवळ
अस्तित्व ते तुझे..
धुक्यासम अस्तित्व ते तुझे
अलवार मिठीत तुझिया मी येई
त्या मिठीत मी विरताना
तुझे अस्तित्व विरुन जाई
मृदुगंध अस्तित्व ते तुझे
नव्याने फुलणारे
दरवळ दाटला आसमंतात
जीवन सुगंधी करणारे
तुला श्वासात भरु पाहता
मजला भुल देणारे
अस्तित्व ते तुझे
धुसर दर्पणाप्रमाणे
ओळख नजरेत असुन
मज सदैव अनोळखी भासणारे
अस्तित्व ते तुझे
ओल्या रेतीत उमटणाऱ्या
पाऊलखुणेप्रमाणे
नोंद मनात होताच
सागराने पुसून टाकलेले
प्रेम थांबते
********
युगो युगी
प्रेम थांबते
वाट पाहाता
वाटच होते ॥
विना अपेक्षा
कधी कुठल्या
जळणारी ती
ज्योत होते ॥
गीता मधले
शब्द हरवती
सूर सुने ते
करून जाती ॥
तरीही कंपण
देहा मधले
अनुभूतीचे
स्पंदन होती ॥
शोध सुखाचा
खुळा नसतो
अंतरातील
हुंकार असतो ॥
आनंदाच्या
सरीते आवतन
आनंदाचा
सागर करतो ॥
क्षण अपूर्ण
जगण्यातला
पूर्णत्वाचे
क्षेम मागतो ॥
अन् जीवाच्या
जगण्यातला
दिप संजीवक
प्रदिप्त होतो॥
आकाश आज खूपच अस्वस्थ होता. आज बरोबर एक महिना झाला होता , त्याला श्वेताला भेटून . तरीसुद्धा तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून दूर होत नव्हता. तो रात्रंदिवस फक्त तिचाच विचार करत असे.
आकाश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पत्रकारीतेचं शिक्षण घेतोय. त्याचा स्वभाव कमालीचा शांत आहे , याउलट श्वेता ही मनमिळावू आणि बोलघेवड्या स्वभावाची मुलगी आहे. श्वेता ची आठवण येताच त्याच्या चेहर्यावर हलकेच स्मित हास्य उमटले. तिच्या आठवणीने तो बेफाम झाला त्याचे भान हरपले. त्यांची पहिली भेट त्याला आठवली .
ते दोघं रेल्वे स्टेशनवर गेले.तिकीट खिडकीत जाऊन अनिकेतने पहिल्यांदा पुण्याला जाणारी गाडी आहे का गेली याची चौकशी केली. त्याला समजले की पुण्याला जाणारी गाडी पाचच मिनिटात प्लॅट फॉर्म नंबर एक वर येणार आहे. अनिकेत प्लॅट फॉर्मवर धावतच सुटला .त्याची नजर अन्विकाला शोधत होती .त्याला एका बाकावर अन्विका बसलेली दिसली .तीच लक्ष अनिकेतकडे नव्हतं .अनिकेत तिच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला आणि तिच्या एक कानाखाली लावली .अन्विका जोरात बसलेल्या तडाख्याने एकदम भानावर आली तर समोर अनिकेत आणि मागे रुकसार धापा टाकत असलेली तिला दिसली .अनिकेत कडे न पाहता ती रुकसार कडे पाहत रागाने म्हणाली,
रात्री अन्विका व रुकसार नेहमी प्रमाणे तयार झाल्या .अम्मा व तिचे दलाल त्यांच्या कामात मग्न होते .आज काय होणार आहे या गोष्टी पासून ते अनभिज्ञ होते .ठरल्या प्रमाणे अनिकेत व जवळ -जवळ शंभर पोलीसांचा साध्या वेषातील फौजफाटा घेऊन ,कोणाला संशय येऊ नये म्हणून ग्राहक बनून रात्री आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजे पर्यंत दाखल झाला होता . ते पूर्ण एरिआ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पसरले होते . अनिकेत ठरल्या प्रमाणे अम्माच्या कोठ्यावर अन्विकाकडे गेला . रात्री दिड वाजण्याच्या सुमारास पोलीसांनी छापा मारला व सगळ्या मुलींना व ग्राहकांना ताब्यात घेतले . कोठ्यावर एकच गोंधळ उडाला .
अन्विका त्याच्यावर रागवत होती पण मनोमन ती सुखावली होती ;की कदाचित अनिकेत आपली या नरकातून करेल.
( आता पुढे )
अनिकेत अन्विकाला भेटायला कोठ्यावर आला होता .त्याच्या जवळ आज कसली तरी पिशवी होती .तो अन्विकाला बोलायचं थांबवून तो बोलू लागला.
अनिकेत , “ शू sss ऐक ही घे पिशवी यात एक बुरखा आहे .उद्या तुमच्या कोठ्यावर रेड पडली की मी तुला येथून घेऊन
जाईन आणि रेडच्या धावपळीत आपल्याकडे कोणाचे लक्ष पण नाही जाणार आणि हो पोलीस
इथल्या सगळ्या मुलींना सोडवणार आहे .”
अन्विका , “ काय ? खरं बोलतोयस तू ”
त्याग भाग ६
अनिकेतची नजर भिरभिरत होती . आता त्याने प्रत्येक घरात जावून पाहायचं ठरवलं व तो एका बिल्डिंग मध्ये गेला.तिथे उभ्या असलेल्या एका दलालाने अनिकेतला अडवले व त्याला गिऱ्हाईक समजून वरच्या मजल्यावर घेवून गेला तिथे एक वयाची पन्नाशी पार केलेली बाई बसली होती .तिने त्याचे हसून स्वागत केले. त्याला बळे-बळे स्वतः जवळ बसवून घेतले .
“ बोलो साहब कैसा माल चाहीए ,पुराना या नया ? हमारे पास दोनों हैं। बतावो बतावो शर्मावो मत ।
अनिकेतला काय बोलावे ते सुचेना .तो शांतच होता . मग ती बाईच म्हणाली