कथा

निर्णय

Submitted by सुपरमॉम on 8 January, 2009 - 12:31

डोळ्यावरचं वर्तमानपत्र बाजूला करत नानासाहेबांनी मनगटावरच्या घड्याळाकडे बघितलं. चक्क सकाळचे अकरा वाजले होते. भिवानं आणलेला चहा समोरच्या टीपॉयवर ठेवल्या ठेवल्याच गार झाला होता. हलकीशी सायही जमून आली होती त्यावर. बाजूलाच एका बशीत सुबक चिरलेली फळं नि थोडा सुका मेवा होता. निरुत्साहानंच त्यांनी ती बशी बाजूला सरकावली नि तो गारढोण चहा तोंडाला लावला. एरवी असा चहा नजरेसमोरही येऊ दिला नसता त्यांनी... पण या सहा महिन्यात सार्‍याच गोष्टींच्या व्याख्या बदलल्या होत्या...

एक मोठा सुस्कारा टाकत त्यांनी दिवाणखान्यावर नजर फिरवली.

गुलमोहर: 

ठिणगी

Submitted by दाद on 6 January, 2009 - 22:36

मानसी घरात शिरली. गेले दोन दिवस अगदी जरूरीचं तेव्हढं आवरून बाबा जिथे शून्यात नजर लावून बसत होते, तिथेच आत्ताही बसले होते... आरामखुर्चीत. आतल्या खोलीत जाताना तिने आशेने बघितलं पण तिच्या नजरेला नजर मिळताच त्यांनी तोंड फिरवलं....

गुलमोहर: 

चकवा !

Submitted by कवठीचाफा on 6 January, 2009 - 10:49

" ओह, नो यार, नॉट अगेन!" वैतागुन हातातले पुस्तक टाकुन देत तन्मय उठला. म्हणजे त्याला तसं उठावच लागलं बॉसने हाक मारल्यावरही ढिम्म बसुन रहाणे निदान खासगी नोकरीत तरी शक्य नसते ना ! त्यात तन्मयचा बॉस म्हणजे बाप रे बाप !

गुलमोहर: 

दोन मिनिटात........

Submitted by कौतुक शिरोडकर on 6 January, 2009 - 02:04

जांभुळवाडीचा एकुलता एक बसस्टँड. अमरावतीची बस लागलेली होती. आठ दहा जण स्थानापन्न झालेले होते.
त्याच्यापाठोपाठ ती बसमध्ये चढली. त्याची शोधक नजर बसमध्ये हवेशीर खिडकीची जागा शोधू लागली. हवे तसे मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर तरळला व त्याने अकरा नंबरच्या सीटवरील सामानाच्या कप्प्यात बॅग टाकली.

"इकडे बस." तो बोलला आणि ती एखाद्या आज्ञाकारी मुलासारखी सीटवर बसली.

गुलमोहर: 

प्रिटी वूमन - भाग १

Submitted by sunilt on 5 January, 2009 - 02:09

मध्यरात्र उलटून गेली होती. आईचे औषधपाणी करून मर्जिना आताच पडली होती. इतक्यात तिला कण्ह्ण्याचा आवाज आला. चटकन उठून ती आईजवळ गेली आणि तिच्या कडे बघितले. आईचे डोळे खोल गेले होते आणि श्वास घेताना तिला त्रासदेखील होत होता.

गुलमोहर: 

खेळ - अंतीम भाग

Submitted by विशाल कुलकर्णी on 3 January, 2009 - 03:25

खेळ-भाग १ : http://www.maayboli.com/node/4993

खेळ- भाग २ : http://www.maayboli.com/node/5010

निंबाळकर साहेब कितीतरी वेळ त्या डेड झालेल्या फोनकडे बघत उभे होते.
"आणखी एक कोडं ! मला पुन्हा लहान झाल्यासारखे वाटतेय सर, " भोसले उदगारले.

गुलमोहर: 

खेळ : भाग २

Submitted by विशाल कुलकर्णी on 31 December, 2008 - 05:03

खेळ : भाग १ : http://www.maayboli.com/node/4993

टण...टण....टण....

"साहेब, बास की आता, माझ्याच डोक्यावर टेंगळं यायला लागलीत आता.", सब इन्स्पेक्टर भोसले हसुन म्हणाले.

गुलमोहर: 

कवडसा

Submitted by सुपरमॉम on 30 December, 2008 - 14:59

पंचतंत्रातल्या गोष्टी ऐकता ऐकताच छोट्या सुमितचे डोळे मिटू मिटू व्हायला लागले तसं हातातलं पुस्तक विकासनं हळूच बाजूला ठेवलं. अगदी आवाज न करता तो पलंगावरून खाली उतरला.

गुलमोहर: 

चक्र / वर्तूळ (भाग-१)

Submitted by कविन on 30 December, 2008 - 05:44

चला निमाबाई उठायला हव आता. घड्याळानी ६.३० वाजल्याच जाहीर करताच मी मनाशीच म्हंटल. आज खरतर रविवार, मस्त लोळत पडाव अजुन थोडावेळ! एरव्ही ऑफ़िस म्हणुन असतेच सकाळची घाई. नुसती घड्याळ्याच्या काट्यांशी स्पर्धा.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कथा