शाळा

सिंहगड स्प्रिंग डेल इंग्लिश मिडियम स्कूल, वडंगाव, पुणे

Submitted by देवू on 6 January, 2014 - 05:12

मला माझ्या मुलासाठी mini kg (CBSE Board) सिंहगड स्प्रिंग डेल इंग्लिश मिडियम स्कूल, वडंगाव, पुणे ईथे

admission घ्यायचे आहे. admission साठी मुलाचा थोडक्यात interview झाला आणि तो select हि झाला परंतू

मला या शाळेबद्दल +/- असं ऐकायला मिळतय.. म्हणून मुलाचे तेथे admission करावे की नाही या विचारात आहे.

please मला या शाळेबद्दल जास्त माहिती हवी आहे ....

कोणाला काही माहीत असेल किंवा अनुभव असेल तर please शेअर करा...

धन्यवाद ....

विषय: 

माझी काही स्वप्ने -१

Submitted by विजय देशमुख on 30 December, 2013 - 22:05

प्रत्येकाला स्वप्ने पडतात. त्यात त्याला फारसं काहीच करावं लागत नाही. त्याबद्दल आधी एका धाग्यात http://www.maayboli.com/node/44262 लिहिलं होतं.

पण जी स्वप्ने जागेपणी बघितल्या जातात, मग ती पूर्ण करणे स्वतःच्या हातात असो किंवा दुसर्‍याच्या, त्या स्वप्नांना एक विशेष अर्थही असतो, असं मला वाटतं. त्यातलीच काही स्वप्ने. कधी ती अचानक कोणीतरी पुर्ण करतो, तर काही अजुनही अधुरीच.

बालस्नेहसंमेलन ( संमेलनाचे धमाल किस्से )

Submitted by मितान on 20 December, 2013 - 04:10

दिवाळी झाली की शाळांना स्नेहसंमेलनाचे वेध लागतात. त्यात चिमुकल्यांच्या आनंदाला तर उधाण येतं. शिशुवर्ग आणि बालवर्गाची तर ही पहिलीवाहिली संमेलनं. पहिल्यांदाच नेहमीपेक्षा वेगळा पोषाख, नाटकात काम, गाण्यावर नाच, फॅन्सी ड्रेस, पाठांतर, गोष्ट सांगणं, लिंबू चमचा नि बेडूक उड्या ! शाळा कोणतीही असो, कोणत्याही गावातली, कोणत्याही माध्यमाची नि बोर्डाची, गरिबीतली किंवा श्रीमंतीतली ; छोट्या वर्गांच्या स्नेहसंमेलनाची धमाल सगळेकडे सारखीच ! अशाच काही संमेलनातील निरीक्षणे.

शाळा प्रवेशासाठी वयाची अट

Submitted by जुईली on 19 November, 2013 - 22:45

पुण्यातल्या शाळा प्रवेशासाठी वयाची काय अट आहे ? मला कोथरूडच्या बालशिक्षण मध्ये प्रवेश घायचा आहे

विषय: 

मुलं - काही नोंदी

Submitted by मितान on 21 October, 2013 - 03:09

मुलं - काही नोंदी
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.

अवनी. वय १७.

ज्युनियर के जी अभ्यासक्रम.

Submitted by साती on 1 October, 2013 - 07:04

नर्सरीच्या अभ्यासक्रमाबद्दल सांगोपांग चर्चा इथे वाचली.
ज्युनियर आणि सिनीयर के जी च्या अभ्यासक्रमाबद्दल इथे चर्चा करूया.
आमच्या मुलाच्या शाळेत कन्नड, हिंदी मूळाक्षरे, इंग्रजी कॅपिटल , स्मॉल , करसिव रायटिंग , दोन ते पाच पाढे , एक ते शंभर आकडे एवढे सगळे लिहीणे ज्युनियर केजीत अपेक्षित आहे.
हे फारच जास्तं आहे असे आमचे मत आहे.

विषय: 

परदेशातुन भारतात परत गेल्यावर मुलांचे शिक्षण

Submitted by डॅफोडिल्स on 18 September, 2013 - 22:54

भरतातल्या शाळा वर्षाच्या मध्ये म्हणजे ़जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये मुलांना अ‍ॅडमिशन देतात का? अमेरिकेतून काही लोक शैक्षणिक वर्षाच्या मधल्या कालावधीत भारतात परत जात आहेत, त्यांची मुले पहिली ते आठवी या इयत्तां मधली आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर ला भारतात परत जायचे असेल तर भारतातिल एक टर्म तेव्हा पूर्ण झालेली असते अश्यावेळी भारतातल्या शाळांमध्ये प्रवेश मिळू शकतो का ? की विद्यार्थ्या चे वर्ष वाया जाउ शकते ? कुणाला काही माहीती किंवा अनुभव असल्यास जरूर कळवा.

संकल्प शिक्षकदिनाचा....

Submitted by श्रीकांत काशीकर on 5 September, 2013 - 09:35

मातृदेवो भव, पितृदेवो भव पाठोपाठ समाजात आचार्य अर्थात शिक्षक श्रेष्ठ. 'आचार्य देवो भव' असं विशेष स्थान शिक्षकांना आहे. गुराख्याचा पोर असणार्‍या चंद्रगुप्ताला आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या आधारे चाणक्याने चक्रवर्ती सम्राट बनवलं. अलिकडच्या काळात एक शिक्षक या राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर पोचला होता. पाच सप्टेंबर हा दिवस या शिक्षकाचाच जन्मदिन. हा शिक्षक म्हणजेच आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.

Pages

Subscribe to RSS - शाळा