वाट पाहतो
Submitted by राजेंद्र देवी on 23 November, 2013 - 23:31
वाट पाहतो
पुजत होतो मनोमनी मी तुला
होतीस तू माझ्या मनाच्या देव्हारी
भिंती घराला होत्या नव्हत्या मनाला
तुझा तू निर्णय घेतला व्यवहारी
कशी विसरलीस तू आपुल्या प्रेमाला
पाठवले विवाहाचे निमंत्रण लागले जे जिव्हारी
नाही विसरू शकत मी तुला
नाही सहन होत हि दुनियादारी
एकदा तरी वाहण्यास फुले ये
समाधी वाट पाहते शिवारी
राजेंद्र देवी
विषय:
शब्दखुणा: