आंबूसघार्‍या

Submitted by मनःस्विनी on 11 August, 2009 - 12:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या उरलेला शिळा भात(नरमसर असेल तर उत्तम),
१ वाटी कणीक(हि जाडसर असेल तर उत्तम),
१/२ वाटी रवाळ बेसन,
१ चमचा घट्ट बर्‍यापैकी आंबट दही,
४ चमचे पातळ ताक,
११/२ चमचा बडीशेप,१ चमचा धणे, १/२ चमचा जीरे, १/४ चमचा ओवा. हे जरासे खमंग परतून भरड वाटावे मग चिमटीभर हिंग(न भाजता) टाकावे.
भरपूर बरीक चिरलेली कोरडी केलेली कोथींबीर,
हवेच असेल तर गरम मसाला नाहीतर धानसाक मसाला,
मिठ,
हवेच असेल तर कडिपत्ता(मी नाही टाकला).

क्रमवार पाककृती: 

ghaaryaa2.jpg

--------------------------------------------------------------
आदल्या दिवशीचा भात खूप कोरडा व मोकळा असेल तर दाबून मळून घ्यावा. मग खूप कोरडा वाटलाच तर त्यात किंचित पाणी शिंपडून मायक्रोवेव मध्ये २ मिनीटे वाफवावा. आता त्यात दही घालून मळावं. मग त्यात कणी़क, बेसन, वरील मसाले,मिठ घालून घट्ट गोळा करून पातेल्यात ठेवण्याआधी खाली दोन चमचे ताक मग गोळा त्यावर मग त्यावर उरलेले ताक असे करून झाकून रात्रभर ठेवावा. पिठ बर्‍यापैकी फसफसेल सकाळी. ते पुन्हा मळावे व जर गरज असेल तरच जराशीच कणीक व त्याच्या निम्मे बेसन घालून मळावे. मग हलगद हलक्या हाताने कडेला पातळ व मध्ये भोक पाडून थापून तळावे. खमंग खुसखुशीत लागतात. मध्ये भोक पाडण्याने मधला भाग छान तळला जातो. मूळ कृतीत भोक पाडून लिहिले न्हवते. Happy
कोकणात कोंबडी वडे भोक पाडून असे करतात. आम्ही लहानपणी त्यात चिकन भरून फस्त करायचो.

नोंदः हि मूळ वैदर्भीय पाकृ लोकसत्तेत आली होती. पण मी त्यात थोडेसे फेरफार करून्(दही घालणे, भोक पाडून तळणे वगैरे बदल..) इथे लिहिली होती आधी. माझ्या ब्लॉग वर एकत्रित लिहिण्या साठी मी काढली होती.आता पुन्हा लोकाग्रहास्त्व इथे लिहित आहे.

वाढणी/प्रमाण: 
खाण्यावर आहे.
अधिक टिपा: 

१)भात कोरडा असेल त्यावर अवलंबून पाणी शिंपडावे.
२) कणीक व बेसन त्याच प्रमाणात घालावे नाहीतर भजी व्हायला वेळ लागणार नाही. Happy
३) ताक बदाबदा ओतून ठेवू नये कारण पिठ बरेच फसफसून वर येते दुसर्‍या दिवशी तेव्हा पातळ होते मग थापू शकत नाही. मग पुन्हा कणीक ,पुन्हा बेसन हे चालुच राहील Happy
४) कडेने पातळ व मध्ये बर्‍यापैकी जाड्(अती जाड नाही) व भोक पाडावे.

माहितीचा स्रोत: 
लोकसत्ता पुरवणीत एक लेख होता मी त्यावर जरासे सोपे बदल करून केले. :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users