राकट देशा, कॅनियनच्या देशा - युटाह (Utah) - प्रकाशचित्रे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नुकतीच आम्ही कोलोरॅडो स्प्रिंग्स कोलोरॅडो, मोआब युटाह आणि रॉकी माउंटन नॅशनल पार्क, कोलोरॅडो ची ट्रीप करून आलो. त्यातल्या मोआब, युटाह (Utah) मधली काही प्रकाशचित्रं.
मोआब हे युटाह राज्यातलं एक टुमदार गाव. कोलोरॅडो नदीच्या काठावर वसलेलं, युरॅनियम आणि पोटॅशच्या खाणींमुळे प्रसिध्दीस आलेलं. इथून जवळच पोटॅश कंपनीचा एक कारखाना पण आहे. आता जवळ जवळ सगळ्या खाणी बंद आहेत आणि पर्यटन हा महत्वाचा व्यवसाय बनलाय. मोआबच्या पश्चिमेला कॅनियनलँडस् नॅशनल पार्क आणि पुर्वेला आर्चेस नॅशनल पार्क आहे.
कॅनियनलॅंडस् म्हणजे कोलोरॅडो नदीने लाखो वर्षांपासून निर्माण केलेलं कॅनियन्सचं जाळं. त्याचे ३ भाग आहेत, आयलंड इन द स्काय, नीडल्स आणि मेझ. त्यातला आयलंड ला गाडी घेउन जाता येते. नीडल्स आणि मेझ हे फारसे अ‍ॅक्सेसीबल नाहीत. आम्ही फक्त आयलंडचा भाग केला. पण नीडल्स हा भाग खूप सुंदर आहे असं ऐकलंय.

आयलंड इन द स्काय -

कँडलस्टीक -
Utah_Candlestick.jpg

व्हाइट रीम - ग्रँड व्हयू पॉइंटहून दिसणारी -
white_rim.jpg

व्हाइट रीम - दुसर्‍या एक ठिकाणाहून -
white_rim2.jpg

मेसा आर्च -
mesa_arch1.jpg

या आर्चला जाण्यासाठी थोडी (१० मि.) पायपीट करावी लागते. हौशी फोटोग्राफर्स इथं सुर्योदयाच्यावेळी फोटो काढण्यासाठी येतात (मे मध्ये ५.३०-६ लाच सुर्योदय होतो तर लोक ४.३०-५ पासून मोक्याची जागा धरून बसलेले असतात). मी पण दुसर्‍या दिवशी ५ ला यायचे ठरवलं होतं पण ते काही शक्य नाही झालं.

मेसा आर्चमधून दिसणारं दृष्य -
mesa_arch2.jpg

या आर्चच्या वाटेवर काही मस्त फुलं होती...
flowers1.jpgflowers2.jpg

तिथं आम्हाला हे पण भेटले...
lizzard.jpg

कॅनियनलँडस् मधून बाहेर पडल्यावर तिथून जवळच डेड हॉर्स पॉइंट स्टेट पार्क आहे. पुर्वीच्या काळी काउबॉइज घोडे पाळत. चांगले घोडे निवडून बाकिच्या नको असलेल्या घोड्यांना ते इथे सोडून देत. इथे पाण्याची कमतरता असल्याने ते राहिलेले घोडे थोड्या दिवसात मरून जात. म्हणून जागेचे नाव. इथून कोलोरॅडो नदी आणि कॅनियन खूप सुंदर दिसतात. याच कॅनियन मध्ये बर्‍याच हॉलीवूड सिनेमांचे चित्रीकरण झालंय जसे की थेल्मा अँड लुइस, मिशन इंपॉसिबल १ (टॉम क्रूझचा स्टंट).

dead_horse_point.jpg

तिथेच ही एक सुंदर जागा आहे...
dead_horse_point2.jpg

इथून बाहेर पडलं की थोड्याच अंतरावर आर्चेस नॅशनल पार्क आहे. वार्‍यानं आणि पाण्यामुळं दगडांची झीज होउन खूपश्या नैसर्गिक आर्चेस (कमानी) आणि आकार तयार झालेत.

पार्क अवेन्यू -
park_avenue.jpg

नॉर्थ विंडो -
north_window1.jpg

वेगळ्या अँगलनं -
north_window2.jpg

डबल आर्च -
double_arch.jpg

आर्च इन द मेकिंग - पूर्ण आर्च तयार होउ पर्यंत त्याला वॉल आर्च म्हणतात.
arch_in_making.jpg

फियरी फर्नेस - व्यवस्थीत उन पडलं असेल तर एखादी भट्टी लावली आहे असं दृष्य दिसतं
fiery_furnace.jpg

फियरी फर्नेस (जवळून) -
fiery_furnace_close_look.jpg

डेलिकेट आर्च - हे सगळ्यात मुख्य आकर्षण. असं म्हणतात की this is the most photographed arch in the world. इथं जायला जवळ जवळ २-२.५ मैलाचा बर्‍यापैकी दमछाक करणारा ट्रेक करून जावं लागतं. अगदी वर गेल्याशिवाय ही कमान दिसत सुध्दा नाही. पण कमानीचं दर्शन झाल्यावर प्रत्येक मिनिट अगदी वसूल. मेसा आर्च जशी सुर्योदयाच्यावेळी चांगली दिसते तशी ही कमान सुर्यास्ताला. मी पोहोचलो तेव्हा जवळ जवळ २०-२५ फोटोग्राफर्स मोक्याच्या जागा धरून बसले होते. मला मात्र सुर्यास्तापर्यंत थांबता नाही आले (५ मिनिटातच चुकला).

Delicate_Arch.jpg

१.५ तासात हा ट्रेक करून आल्यानं एकदम दमून गेलो. त्यामुळं दुसर्‍या दिवशी सकाळी मेसा आर्चला जायचा केलेला प्लॅन रद्द केला. त्याऐवजी आम्ही कॅनियनलँडस् ची जीप टूर घेतली. आमच्या गाइडनं एकदम छान माहिती सांगत कॅनियनमधून खालून सुरु करून आम्हाला कॅनियनच्या वर आणलं. पूर्ण मातीचा आणी मधे मधे बर्‍यापैकी अवघड चढ असा रस्ता होता.
road.jpg

वाटेत दिसणार्‍या दगडांचे आकार बघून दक्षिण भारतातल्या मंदिरांची आठवण येत होती.
rocks.jpg

जीप टूर संपल्यावर लगेच हॉटेलवर जाउन चेक आउट केलं. खूप भूक लागली होती म्हणून हॉटेलवाल्यानं शिफारस केलेल्या मोआब ब्रूअरी मध्ये जेवण केलं. तिथली व्हेज चिली मस्त होती. बाकिचे पदार्थपण मस्त होते. तिथून परत डेनवरला जाताना कोलोरॅडो नदीच्या किनार्‍याने जाणारा scenic byway घेतला. तिथून दिसलेले हे टॉवर्स (मी नाव विसरलो)
towers.jpg

तिथून डेनवर पर्यंतचा रस्तासुध्दा खूप छान आहे. नंतर २ दिवस डेनवर मध्ये थांबून घरी परत आलो. लवकरच भारतात परत जात असल्यानं आमची अमेरिकेतली ही शेवटचीच ट्रीप होती जी एकदम मस्त झाली. परत जर संधी मिळाली तर कॅनियनलँडस् मधले नीडल्स आणि युटाह मधले ब्राइस आणि झायन्स नॅशनल पार्क बघायचेच असं सध्या ठरवलंय.

ट्रीपचे डीटेल्स -

दिवस १ -इंडियानापलिस - डेनवर (विमानानं), कोलोरॅडो स्प्रिंग्स
दिवस २ - कोलोरॅडो स्प्रिंग्स, पाइक्स पीक, रॉयल गॉर्ज
दिवस ३ - तिथून ड्राइव्ह करून मोआब
दिवस ४ - कॅनियनलँडस् (अर्धा दिवस) आर्चेस (अर्धा दिवस)
दिवस ५ - कॅनियनलँडस् जीप टूर, डेनवर
दिवस ६ - रॉकी माउंटन नॅशनल पार्क, डेनवर डाउनटाउन
दिवस ७ - कूर्स (Coors) ब्रूअरी, इंडियानापलिस ला परत

ट्रीपचं सगळं प्लॅनींग www.tripadvisor.com ची मदत घेउन केलं

विषय: 

Pages