पंतप्रधान मोदीजी उद्या पुण्यात आहेत. विकासकामांच्या उद्घाटनाचा धूमधडाका ते पुण्यनगरीपासून सुरू करणार आहेत.
ढुडलगाव इथे १७००० नागरिकांना मोफत घरे देण्याच्या योजनेचे लोकार्पण.
पिंपरी चिंचवड इथेही अल्पमिळकतधारकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून स्वस्तातली घरे या योजनेचे लोकार्पण
कचर्यापासून १४००० किवॅ वीज या प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण
तसेच पुण्याचे लाडके दैवत दगडूशेठ गणपती इथेही मोदीजी भेट देणार आहेत. त्यामुळे या संस्थानाचे भाग्य फळफळले आहे.
आणखीही अन्य विकासकामांचे उद्घाटन आहे.
त्यामुळे उद्या सकाळी सहा ते दुपारी ३ या वेळेत पुण्यातले काही चौक टाळावेत असे पोलिसांनी आवाहन केलेले आहे.
१. दगडूशेठ परीसर, मंडई, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शनिवारवाडा इत्यादी
२. फर्गसन कॉलेज रस्ता, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिमला ऑफीस चौक, पुणे विद्यापीठ चौक, सेनापती बापट रस्त्याचा काही भाग
३. वाकडेवाडी, संगमवाडी, शादलबाबा, कृषी महाविद्यालय चौक, डेक्कन कॉलेज रस्ता, संगमवाडी रस्ता,
४. गोल्फ क्लब चौक, गुंजन टॉकीज चौक, जेल रोड चौक, गोल्फ क्लब चौक ते आळंदी रस्ता
हे रस्ते टाळून पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन पोलीस व प्रशासनाने केलेले आहे. तरी नागरिकांनी आपली कामे करताना ही काळजी घ्यावी.
टिळक रोड, अलका चौक वगैरे
टिळक रोड, अलका चौक वगैरे राहिले वरच्या लिस्टित.
तेही बंद आहेत असे वाचले.
शाळांना सुट्टी, अधिवेशनाला
शाळांना सुट्टी, अधिवेशनाला सुट्टी .... लोकशाही इन अवर डी एन ए
हवाई मार्ग तरी चालू आहेत का ?
हवाई मार्ग तरी चालू आहेत का ?
बुटांना भिंगर्या लावून जावं म्हणतो,