Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
उत्कर्ष वशिल्याने जरी टिकला
उत्कर्ष वशिल्याने जरी टिकला असला तरी लावालाव्या करून तोच निम्मा एपिसोड स्वतः च्या खांद्यावर घेतो.
ती निथा अगदीच बोर निघाली.
टीम ए मध्ये दुफळी पडली.
टीम ए मध्ये दुफळी पडली.
टीम ए१ - जय, स्नेहा, उत्कर्ष, दादुस, तृप्ती
टीम ए२ - मीरा, गायत्री, उत्कर्ष.
जय मीरा गायत्रीच्या पूर्ण विरोधात आहे.
उत्कर्ष जयकडे यांच्या विरोधात बोलतोय पण दोघींना चुचकारतोय.
आज मीरा जायचं वाजत असताना तो मीराला बोलू नको असं खुणावत होता.
जय अचानक या दोघींच्या विरोधात का गेला? त्या स्नेहाला बोलल्या म्हणून की त्याचे सिक्रेट गेम्स उघड झाले म्हणून?
त्या स्नेहाला बोलल्या म्हणून
त्या स्नेहाला बोलल्या म्हणून की त्याचे सिक्रेट गेम्स उघड झाले म्हणून?>> सिक्रेट गेम उघड झाले म्हणुनच, जय काल म्हटला ना की इथपर्यत या दोघिना आणल म्हणून त्यात ममाही म्हणतात की जय एकटा लिडर बाकी सगळे फॉलो द लिडर त्यामुळे त्याला वाटत आपण सगळाच शो रन करतोय.
काल उत्कर्षने गादाला वाचवल आणी गादाने लगेच "घालिण लोटागण ... " सुरु केले.
सुरुवात स्नेहाने मीराला नरकात
सुरुवात स्नेहाने मीराला नरकात टाकण्यानंतर झाली. त्यावरून जय आणि उत्क्याने तिला आप्लयात घेऊ नये असे मीराचे म्हणणे होते आणि ते त्यांनी ऐकले नाही. मीर म्हटाली म्हणून गायत्रीनेही तेच लावून धरले. नंतर मग जय आणि उत्कर्ष ने स्नेहाला कॅप्टनशिप साठी सपोर्ट केले हे त्या चुगलीनंतर उघड झाले. तेव्हा पासून ड्रामा सुरुच आहे हा. गंमत म्हणजे गायत्रीला जय शी प्रोब्लेम आहे पण उत्कर्ष शी नाही. अन मीरा चे उलटे, तिला जय चालतो पण उत्क्या नाही!
जयने मिराचे परतीचे दोर कापून
जयने मिराचे परतीचे दोर कापून टाकले. त्याने हे रागाच्या भरात नाही तर ठरवुन केले. तो प्रचंड अहंकारी मुलगा आहे. त्यामुळे त्याला कम्लिट सरडंर करणारे लोक आसपास लागतात. तसे ते असतील तर तो त्यांना शेवटच्या वीक पर्यंत पण नेईल. स्वत चे डोके लावणारी , त्याला जाब विचारणारी वक्ती त्याला आवडत नाही.
कोणालातरी मेजर इंज्युरी झाली
कोणालातरी मेजर इंज्युरी झाली वाटते? नॉट वर्थ इट.
रेवा२ +१०००
रेवा२ +१०००
मला गायत्री जयकडेच जाईल अस
मला गायत्री जयकडेच जाईल अस वाटत आहे.
आज मला पुन्हा एकदा जयच खर वाटत आहे,विकासच तो माणूस आहे.आज मिनलने सरळ विचारल.पण हा काही बोलला नाही.
ते कोल्ड ब्लड मर्डर करणारे असतात ना तसच काहीस विकासला बघितल्यावर आता मला वाटायला लागल आहे.
विशाल आणि मिनलने सांभाळून राहाव .
बाकी बिबॉस wwf,कुस्ती,कबड्डी,बॉक्सिंग असेच खेळ का नाही ठेवत कारण टास्कमध्ये नंतर हेच बघायला मिळत.
आता फक्त भाले, काठ्या,सूरे यायचच बाकी आहे.
ह्या गेममध्ये बिग बॉस टीमच
ह्या गेममध्ये बिग बॉस टीमच कोल्ड ब्लडेड मरडर करतीये.
बाकी सब प्यादे आहेत. खरतर सगळे जण मस्त खेळत आहेत.
जय आधी सोनाली चे नाव घ्यायचा, चुगलीच्या नंतर विकास चे
काल उत्कर्षने गादाला वाचवल
काल उत्कर्षने गादाला वाचवल आणी गादाने लगेच "घालिण लोटागण ... " सुरु केले. >>> हाहाहा, सही.
आरारारा ! उद्याचा प्रोमो येतो
आरारारा ! उद्याचा प्रोमो येतो आहे त्यात विशाल आणि विकास ने मिळुन जय ला ओढत नेऊन पूल मधे टाकलेले दिसते आहे!
तसे नाही वाटले प्रोमो बघून
तसे नाही वाटले प्रोमो बघून, विशाल आणि विकास आधी पूल मधे पडलेत ते दिसले मग त्यांनी जयला आत ओढले असेल. तसेही जमिनीवर जोरात धक्का मारून अंगावर बसण्यापेक्षा पाण्यात ढकलणे कमी हानीकारक आहे.
जय आणि उत्कर्ष बरोबर खेळताना फेअर गेमच्या गप्पा मारणारी मिनल अनफेअर खेळली. दादूसने लपवलेले खोके गुपचूप तिने नव्या गेम मधे मिसळले.
आणि बिबॅाने फुकायच्या खोलीत खोके का लपवू दिले? ती खेळायची जागा नाही ना. तसे तर मग दुसऱ्या गटाने घरात किंवा तुरूंगात खोकी लपवायला हवी होती.
आजच्या टास्क मधे मीरा भारी
आजच्या टास्क मधे मीरा भारी वाटली, चांगल्या गृपच्या संगतका अस्सर आणि जयला आदिशच्या लेव्हलला नडली म्हणून जास्त आवडली !
जय कंप्लिट गलपटलाय , हायस्कुल बुलिंग करणारा बैल दिसतोय, त्यात बरोबर तो अनॉयिंग उत्क्या !
आज जय त्याचं नेहमीचं फ्लर्टिंग हत्त्यार घेऊन नीथाच्या मागे आला, तिने मॅरीड असल्याचं आणि ९ वर्षाची मुलगी असल्याचं सांगितलं, पचका केला
जय आणि उत्कर्ष सतत 'ह्याला
जय आणि उत्कर्ष सतत 'ह्याला उडवू, तिला बाहेर काढू' अश्याच गप्पा करत असतात. हा भोपळा फुटला पाहिजे चांगलाच.
त्याला काय फरक पडतोय.. त्याला
त्याला काय फरक पडतोय.. त्याला मिल्फ जास्त आवडत असाव्यात.. स्नेहा उदाहरण आहेच..
उत्कर्ष पहिल्यांदा आवडला नाही
उत्कर्ष पहिल्यांदा आवडला नाही पण पटला या वीकमधे. त्याचे प्लानिंग लक्षात येतय थोडसे, टीम मधे जास्तीत जास्त लोक ओढायचे म्हणजे बहुमताची सगळी टास्क जिंकता येतात. त्याचा उपयोग करुन वीक मेंबरना सेफ करायचे; नॉमिनेशन टाळायची आणि अगदी वेळ आलीच तर जय सारखे स्टाँग लोक नॉमिनेट करायचे. नॉट बॅड.
तो मीरा गायत्रीने फुटु नये म्हणुन खुप मेहनत घेतोय ते याच साठी.
विशाल खरंतर उत्कर्ष आणि जय या
विशाल खरंतर उत्कर्ष आणि जय या दोघांनाही पुरून उरतो आणि कालही sarcastically मस्त चिडवत होता जयला टेबल वर चढून... विशाल ला सेल्फ ego नाही , हा त्याचा प्लस पॉइंट आहे बाकीच्यांना जरा काही म्हटलं की लगेच भडकतात. मागे पण विकासने सामान्य माणूस म्हटल्यानंतरही विशाल मस्त उत्तर देत होता.
काल उत्कर्ष हतबुद्ध झाल्यासारखा वाटला त्याचं कोणीच ऐकत नव्हतं नाही गायत्री,नाही मीरा ,नाही जय, बिच्चारा मास्टरमाईंड.
उत्क्या त्या रोमिलसारखा वाटतो
उत्क्या त्या रोमिलसारखा वाटतो का कुणाला?
आणि स्नेहा दिपिकासारखी. (थोडीशी) दिपिकाला थोडा कणा होता.
जय खरंच काहीतरी स्टेरॉइड वर
जय खरंच काहीतरी स्टेरॉइड वर असल्यामुळे म्हणा किंवा हायपर असल्यामुळे म्हणा जरा स्टिम्युलेशन मिळाले की विचित्रच वाटतो. अॅबनॉर्मली एक्साइट होऊन बडबड बडबड करत असतो. काल पण तसंच वाटलं. विशाल पण त्याला उत्तरे देत होता पण जय कन्ट्रोल च्या बाहेर वाटतो अशा वेळी.
कालचा टास्क सगळेच खेळले हे चांगले वाटले. आज आता असं झालं अन तसं झालं म्हणून गिव्ह अप केले नाही म्हणाजे मिळवले. मीरा काल जय-उत्क्याच्या विरुद्ध गेल्याने चक्क चांगली वाटत होती, उत्क्याचा तिळपापड झाला होता.
बाकी काहीतरी आयडिया, शॉर्ट्कट किंवा नियमातली फट शोधणे हे नेहमीच होते, त्यावर कुणाला अनफेअर खेळते म्हणू नये. विशाल अन सोनाली मीनल ला अनफेअर म्हणत होत्ते ते पटले नाही. तसंही तिला कॅप्टन बनवाय्चे होते ना तर जिंकली तर तितकेही वाइट नसते झाले.
काल उत्क्या जय आणी मिरा
काल उत्क्या जय आणी मिरा दोघानाही गप्प करत होता मग मधेच गादाला बोलावुन मिराला गप्प कर सान्गत होता, त्याला टेन्शन आल असणार आपण ज्या चुगल्या केल्यात दोन्ही साइडला त्या बाहेर येतिल म्हणून... एकदम गेमाडपन्थी आहे उत्क्या पण त्याचा गेम पब्लिक बघतय की.
काल सोमीवर जयला भरपुर शिव्या पडल्यात , त्याने विशालला सौन्दर्या वरुन चिडवले ते पब्लिकला पटले नाही.
होना, सायको सारखा ओरडायला
होना, सायको सारखा ओरडायला लागतो जय .. नक्की काहीतरी इश्युज आहेत त्याला , मागच्या आठवड्यात मारे नाटक करत म.मां ना विचारले, ‘ सर, माझा अँगर कमी दिसला का या आठवड्यात’ , जसे कस्टरमर सरव्हिस वाले विचारतात तसे
एम्टीव्ही स्पिल्ट्सविला कि औलाद या आठवड्यात लग्गेच बॅक ऑन अस्ली मोड !
स्प्लिट्सविलात दिल्लीच्या हायपर गुंड मुलां मधे जय चक्क तुलनेने कमी गुंड दिसायचा, आता जय त्यांच्या सारखा वागतोय !
उत्क्या त्या रोमिलसारखा वाटतो
उत्क्या त्या रोमिलसारखा वाटतो का कुणाला?
आणि स्नेहा दिपिकासारखी. (थोडीशी) दिपिकाला थोडा कणा होता.
<<<
हो, दोघे सेल्फ प्रोक्लेम्ड मास्टरमाइंडस
दीपिका खूप बरी होती स्नेहापेक्षा , बिनडोक नव्हती .. पण कॉमन पॉइंट हा कि स्ट्राँग माणसाशी नातं जोडून मागेमागे खेळत राहिली !
हो. आणि ती वेळ पडेल तेव्हा
हो. आणि ती वेळ पडेल तेव्हा भुमिका घ्यायची. बऱ्याच दुबळ्यांना सहारा वगैरे द्यायची.
श्रीसंत जयच्या किमान १०० पट भारी होता.
बाकी, विचित्र लोक्स होते त्या सिझनमध्ये. अनुप जलोटा, जसलीन, तो बुटका बिहारी सिंगर, बॉडीबिल्डर, त्या दोन बहिणी. काहीही करायचे ते लोक.
मेघा फुसका बार ठरली!!
श्रीसन्त श्रीसन्त आहे, अख्खा
श्रीसन्त श्रीसन्त आहे, अख्खा सिझन त्याने एकट्याने एन्टरटेन केला होता, खूप भारी होता तो , डिझर्व्ड टु विन पण कलर्सने फेस ऑफ कलर्स जिंकून दिला !
म मां जयला म्हणाले होते मी
म मां जयला म्हणाले होते मी तुला ओळखत नव्हतो आधी तेव्हा जयचा चेहेरा बघायला मजा आलेली. तो कोण विशाल निकम म्हणाला होता, त्याला उत्तर होतं ते.
मी स्प्लिटव्हिला वगैरे बघत नसल्याने मलाही जय कोण माहीती नव्हतं, मीनलही माहीती नव्हती मला. विकास खूप वर्ष आहे मराठी इंडस्ट्रीत. विशाल, सोनाली स्टार प्रवाहची बाळे असल्याने माहिती होती. विशालच्या पहिल्या सिरियलचा पहिला भाग आणि शेवटचा भाग बघितला होता. सोनालीची सिरियल आठवडाभर बघितली होती.
दिपिका दिसायला तरी फार सुंदर होती. स्नेहाला बघवत नाही. स्नेहाला ही लोकं नेणारकी काय फायनलपर्यन्त, नको नको.
जर संचालकांमध्ये एकमत होत
जर संचालकांमध्ये एकमत होत नसेल,तर बिबॉस ने द्याव ना मत.नुसतेच एवढे कँमेरे लावून काय उपयोग.?
पण बिबॉसला भांडणच लावून द्यायची असतात.
आज जर बिबॉसने वरती फेकलेले बॉक्स ग्राह्य धरायचे की नाहीत हे सांगितल असत तर भांडण झालीच नसती.
दिवाळीच्या दिवशी स्वत:च्याच घरात बाहेरच्यांना बोलावून त्यांच्यात भांडण लावण्यात बिबॉसला काय आनंद मिळतो आणि प्रेक्षकांना तरी बिबॉस काय आनंद देव जाणे.
खरतर थोड 19/20 सोडल तर हा टास्क कालपासून मस्त चालला होता.त्या चौघांना तरी कशाला शिक्षा करायची,पाण्यात पडल्यावर स्वत:हून उठून बाहेर आले होते,धट्टेकट्टे होते,मग ठेवायच ना.
बाकी दादूस तर फुल फॉर्ममध्ये.बिबॉस यांनाच घेऊन जायचा टॉप 6 मध्ये.
काय शिक्षा दिली चौघांना.
काय शिक्षा दिली चौघांना.
बिबॉ ने चौघांना बाहेर काढले
बिबॉ ने चौघांना बाहेर काढले गेम मधून. आता बायका + दादुस खेळणार पुढच्या फेर्या.
एका फेरीत दादुस अन सोनाली झटापटीत पाण्यात पडलेत अशी क्लिप आहे . बाकीचे बघत बसले. विशाल ने धावत जाऊन पाण्यात उडी टाकून दोघांना मदत केली. हे पहा.
https://youtu.be/NUB1xRExPB8
पब्लिक च्या नजरेत विशाल हिरो का आहे त्याचे उदा.
विशाल ने धावत जाऊन पाण्यात
विशाल ने धावत जाऊन पाण्यात उडी टाकून दोघांना मदत केली. हे पहा.>>>> पहिल्या एपिसोड मध्ये मांज्या बोलला होता कमरे एव्हड्या पाण्यात कोणी बुडत नाही. काही गरज नाही पळत जाऊन पाण्यात उडी मारून माईक खराब करण्याची. लोक्स पण आता विशालचा असा उदो उदो करतील जसं काय खवळलेल्या समुद्रात दोघे पडले आणि विशालने वाचवलं त्यांना.
हो ते खरेच अन त्याने नसती
हो ते खरेच म्हणून 'वाचवले' असे म्हटले नाही. अन त्याने नसती मदत केली किंवा पाणी खोल असते तरी बिबॉ ने ऑन कॅमेरा बुडू नसतेच दिले कुणाला. ते जेस्चर तरीही पॉजिटिव दिसतेच
Pages