सोनी मराठी - अजूनही बरसात आहे

Submitted by DJ....... on 27 August, 2021 - 09:37

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही सिरियल सुरु आहे अन त्यातील कलाकारांमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मुक्ता बर्वेचा एक जबर फॅन फॉलोवर आहे जो तिच्या नुसत्या असण्याने शिरेली हिट्ट करतो. अशा सॉफ्ट कॉर्नर हिरविणीमुळे सोनी मराठीला प्रेक्षकांनी स्विकारलं असं चित्र दिसत आहे. या शिरेलीत उमेश कामत, शर्मिला राजाराम, सुहिता थत्ते, सुलक्षणा पाठक असे कलाकार आहेत.

या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा... Bw

Group content visibility: 
Use group defaults

ती चार दिवसासाठी गेली आहे पाठराखीण म्हणून>> ते मनू बाळ रडत होत की नविन घरात मी एकटी कशी जाणार त्यात ते लोक चिडलेले आहेत.. मीरा म्हणते काय झालं बाळा.. ते बाळा बाळा म्हणण डोक्यात जातय.. इथे बाळाला काय हवेतून बाळ होणार आहे का... एवढी पुढे जायची हिम्मत होती ना मल्हार मनू मध्ये..मग आता का अगदी कणाहीन वागत आहेत..जस काही बाल विवाह झालाय..स्वतात अजिबात धमक नाही दोघमध्ये ..मग लगेच मनू ची आई म्हणते मिरा येईल सोबत... हिरो हेरोईन ला मोठ करण्याच्या नादात मनू मल्हार च charactor अगदीच पुचाट करुन ठेवलय

मला आणि आता तर फुल्ल दाऊत आहे याचं बाहेर काहीतरी चक्कर आहे >>> तो डाऊट खराच असावा, मला पहिल्या दिवसापासून वाटतंय मीन्स त्यांच्या एंट्री पासून.

मीराबाई गेल्यात ना चार दिवस, त्यांनाच सुगावा लागेल.

तुरू हाहाहा.

मनू मल्हार च charactor अगदीच पुचाट करुन ठेवलय >>> अगदी अगदी, त्यांचेच संगोपन करायला लागणार आहे आदि मीराला.

ते दोघेही बहुतेक दारूच्या नशेत असतात जेव्हा हे झालं तेव्हा. म्हणजे आपण असं काही करतोय ज्याने मूल वगैरे होऊ शकतं हे त्यांना माहीतच नव्हतं. नशेतून बाहेर आले तर डायरेक्ट पोटात बाळ. म्हणजे आधीच माकड, त्यात दारू पिलेलं असं काहीतरी झालं त्यांचं. म्हणून तो बालविवाहच समजतात दोन्ही घरचे. आदी म्हणतो पंचवीस म्हणजे काही लहान नाही. मग मल्हारला तूझं तू बघ असं का सांगत नाही.

>>मला आणि आता तर फुल्ल दाऊत आहे याचं बाहेर काहीतरी चक्कर आहे
मला अजिबात नाही वाटत असं काही असेल. ते खूप व्यवहारी आहेत आणि सारखं कामाला महत्त्व देतात हेच दाखवायचं आहे माझ्या मते.

गेल मनू बाळ एकदाच आपल्या सासरी.. काहिच बघणेबल नाही सध्यातरी. फक्त अश्विनी निखिल चा फोन घेते आणि त्याची खेचते...लग्न झालं अस सांगून.. तेच 2 मिनट गमतीशीर होत... बाकी 2 दिवस नुसतं हळू बाई हळू चालू आहे. आता मनू बाळ ताई च्या जिवावर म्हणतय कस करायच आता पुढे ताई... तू पण ये ना याच घरात..

ताई या घरात आली की मनुला काही करायला नको, ताई सुपरवुमन आहेना. पण माहेरी अश्विनीचं कसं होईल, तिला काहीही करायला नको असतं, परत खर्च पण तिच्या नणंदेने करायचा, नवऱ्याने नाही. ती अभिनय छान करत असली तरी chara मध्ये काही त्रुटि आहेत. इतकं कोणी करत नसेल. मला आवडते, तिचं काम उत्तम करते.

आजच्या भागात डायनिंग टेबल वर मजा आली. मनू अन मल्हार ही दोन बाळं शिरेल सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच खळखळून हसताना बघितली. इतकंच काय शिरेल सुरु झाल्यापासुनच्या संवादांचे बॅकलॉग पण दोघांनी १ मिनिटात म्हटले (त्यामुळे ते काय बोलले हे काहीच कळालं नाही..!). लाल माठाच्या भाजीला लाल भाजी म्हटलं म्हणुन आदी भगिनीने किती ऐकवलं मनुला. नंतरच्या फ्रेम मधे मनु बाळ अन मल्हार बाळ जेवत्या ताटावरून उठून पकडापकडी खेळू लागले अन थेट आदी आजोबांवर जाऊन आदळले. मग त्यांनी नव्या नवरीची, नवरीच्या भैनीची उतरून ठेवली. तरी मीराने आजोबांची माफी मागुन प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला पण आजोबांनी ताकास तूर लागू न देता सर्वांची हवाच टाईट केली.

मजाच दिसतेय सगळी या भागात!

आता या देसायांच्या दोन कन्या मिळून आदीबाबांना आणि आदीभगिनीला सरळ करणार का Lol

लाल माठाच्या भाजीला लाल भाजी म्हटलं म्हणुन आदी भगिनीने किती ऐकवलं मनुला.>>> होना!! आधिच पोरगा माठ,सुन माठ आणि वर भाजीही माठच... कस होणार पाठकाच

अहो केया मला पण मु.ब. आवडली होती रुद्रम वेळी. परंतू तिचे मुंबई-पुणे-मुंबईचे ३ भाग बघितले, एका लग्नाची दुसरी गोष्ट बघितली, जोगवा सोडून इतरही सिनेमे बघितले तर ती एकाच प्रकारे अ‍ॅक्टिंग करते.. विविधता आजिबात नाही. या शिरेलीत तर तिचा तोच तोच पणा असह्य होतो अगदी. वरचा ओठ न हलवता बोलणं कसं जमतं बुवा हिला..? डायलॉग म्हणताना वरच्या ओठात कापूस सरकवते की काय असं वाटतं.

आजही मनु बाळ अन मल्हार बाळ खूप आनंदात दिसले. अगदी ओळखेनासे वाटत होते. स्वतःच्या येणार्‍या बाळाबद्दल बोलत होते. कॉलेज मन लाऊन करायचं म्हणात होते. आता कॉलेज अन बाळ एकाच वेळी कसं सांभाळतील ही बाळं काय माहीत. हे कमी की काय म्हणुन ही बाळं अपल्या बहिणीचं/म्हेवणीचं लग्न आपल्या मामे सासर्‍याशी/मामाशी करायचा प्लॅन करु लागलेत... आता तर प्रश्न अजुनच गंभीर बनत चाललाय. जर या बाळांनी येणकेनप्रकारेण आपल्या बहिणीचं/म्हेवणीचं लग्न आपल्या मामे सासर्‍याशी/मामाशी लाऊन दिलं तर या बाळांचं येणारं बाळ त्या मु.ब. अन उ.का. ला काय म्हणेल..? मावशी न अजोबा..?????

बर ते एक वेळ जाउद्या.. पण मु.ब. अन उ.का. ला लग्नानंतर बाळ झाल्यावर ते या मनु+मल्हार बाळांना काय म्हणेल..? मावशी अन मामा...??

बर हेही जाऊद्या... मु.ब. +उ.का चं बाळ मनु+मल्हारच्या बाळाला काय म्हणेल..?? भैय्या की भाचा...?? काय सगळं अवघड आहे बघा... Uhoh

मीराचा डॉ पाठकने केलेला अपमान बघून मजा आली. त्याच्याच घरात त्यांनाच सांगत होती जेऊन घ्या, जाऊदे लग्न केलं तर त्यात काय एवढं. मल्हार तर किती मूर्ख आहे, परत प्रेग्नेंट वगैरे होणार नाही म्हणे. त्यालाही चांगला फटकावलाय डॉनी पण पालथ्या घड्यावर पाणी. मनू आणि मल्हार ही बाळं लग्न करूनच थकून गेलेली आणि गाडीत झोपलेली, आदी आणि मीरा कौतुकाने बघत होते. मनुची कॉलेजची बॅग किती छोटी, MA करते की बालवर्गात शिकते. असाही आता शिक्षणाशी काही तिचा संबंध नाही, सासूच्या हाताखाली मशीनवर कपडे शिवेल पुढेमागे. डॉ मीरा ते भयाण केस घेऊन स्वयंपाकघरात वावरते.

पाठराखीण म्हणून जाताना मुक्तानी घातलेला डालडा रंगाचा पिवळा कुडता बघवत नव्हता. पुढे ज्या घरात सून म्हणून जायचे संकेत आहेत तिथे जाताना आणि मनूला मानानी घेऊन जायला आदी येतोय हे कळल्यावर मनोवृत्तीत झालेला बदल दाखवायला तो पोशाख अगदीच चुकीचा होता.

मुक्ताला तो हेअरविग अगदीच अडचणीचा झालाय. इतर ठिकाणी छान अभिनय करणारी मुक्ता फार अवघडलीय या गेटअप मध्ये .
त्यामुळे तिचे क्लोज अप्स आवडेनासे झालेत.
तिच्या पुढे शर्मिला सहज वाटते आहे. दोन्ही नणंदांना कटवायला बसलेली थोडी स्वार्थी, स्पष्ट बोलणारी,
घरकाम न करणारी सून तिने विनोदी रंगानी छान रंगवली आहे. तिला नुसतच षडयंत्री दाखवलं नाहीये हे बरं वाटतंय ...

हल्ली फार उशिरा पोस्ट करतात एपिसोडस.

मुक्ताला आदीबाबा बरोबर सुनावतात आणि मनू मल्हार कसले बालिश आहेत, ती मारत काय बसते मल्हारला डायनिंग टेबलवर आणि पळापळ काय करतात. अति वाटत होतं सर्व. आजच आलीस ना त्या घरात, लगेच एवढी फ्री वागायला लागली, तरी सासूला आपण पसंत नाही हे माहितेय. मुक्ता तिला काहीच बोलत नाही.

मीराचे बाबा मुलीची पाठवणी करून दुसऱ्या मालिकेत मुलगी उजवायला गेले, ठिपक्यांची रांगोळी Happy मनू बाळंतपणाला आली की येतील कदाचित. तिथे ते डॉ आहेत बहुतेक.

ती व्हीलचेअर आदि आई पण सन टीव्ही मराठी चॅनेल येतंय (एबीपी माझा वर अॅड असतात) त्यावर कुठल्यातरी मराठी सिरियल प्रोमोत दिसली.

सन मराठी आलंय. आमच्याकडे आपोआप दिसायला लागलं, फुकट असावं. बऱ्याच मालिका सुरु होणार आहेत. एका मालिकेत शिवा आहे. आस्ताद चक्क एका मोठया मुलीचा बाप दाखवलाय.

काय दळत बसलेत नमुने एकेक. ती मनू रडायला आल्याचा अभिनय करते तेव्हा मला आता तिला उलटी होईल बहुतेक असं वाटतं Lol

अजूनही वेडेपणा आहे.....

अस मी म्हणत नाही तर उकाचं पोस्ट बघितलं त्याच्या फेसबुकवर त्याच शीर्षक अस होत Lol

किती प्रामाणिक आहे उका! बघा बर!

काल आदीमायला मु.ब. अन मनुबाळ ने व्हीलचेअर वरून उठवलं.. थेट दोन पायावर उभंच केलं (अटेंडंटची नोकरी घालवली..!).
आदीमाय ५ मिनिटं तोंड वेडंवाकडं करत कशीबशी उभी राहिली. सर्वांनी मु.ब.चं कौतुक केलं. मनुबाळ अन मल्हार बाळ एकदम उजळलेत.. किती एक्सायटेड दाखवलेत. हे दोघं खरंच छान दिसतायत असं वाटू लागलंय आतशा.

सन टीव्ही वरच्या सिरीयल भयानक (टुकार)आहेत आस्ताद माहेरच्या साडीतला विक्रम गोखले झाला आहे त्यावरूनच समजा काय सिरीयल असेल.

अहो केया मला पण मु.ब. आवडली होती रुद्रम वेळी. परंतू तिचे मुंबई-पुणे-मुंबईचे ३ भाग बघितले, एका लग्नाची दुसरी गोष्ट बघितली, जोगवा सोडून इतरही सिनेमे बघितले तर ती एकाच प्रकारे अ‍ॅक्टिंग करते.. विविधता आजिबात नाही. या शिरेलीत तर तिचा तोच तोच पणा असह्य होतो अगदी. वरचा ओठ न हलवता बोलणं कसं जमतं बुवा हिला..? डायलॉग म्हणताना वरच्या ओठात कापूस सरकवते की काय असं >>>>>>>
अरे वा dj , इथे पण ब्राह्माण बद्दल निगेटीव्ह लिहायला सुरुवात केली ?
धागा काढायचा आणि मग हळूहळू ब्राह्मण द्वेषमूलक प्रतिसाद टाकायला सुरवात करायची , तू ब्राह्माण बद्दल जी खालच्या पातळीवरची भाषा वापरतोस त्याचे
आपल्या धाग्यातील स्क्रीन शॉट टाकू का इथे ?

एक चेहरे के पिछे कई चेहरे लगाते हैं कुछ लोग Lol .

मनुची आजेसासू ज्या मालिकेत आहे सन टीव्हीवर ती मालिका इंद्रधनुष (हिंदी होती, सात मुली होत्या, बहुतेक आईविना) सारखी वाटते. यात पाच मुली आहेत आणि अविनाश नारकर बाबा. सगळ्या मालिका इथून तिथून ढापलेल्याच वाटतात. मनोरंजन सृष्टीला उत्पन्नाचा नवीन स्रोत. सोनिशी संलग्न असावी कारण सोनी मराठीवर प्रोमो लागतात.

आता काय गोंधळ चालू आहे काही कळेना. उ.का. अन मु.ब. चे रोमॅंटिक सिन्स झीम च्या ष्वीटू अन ओम्या इतकेच भयंकर का वाटु लागलेत ते काही कळेना. Uhoh

Pages