Submitted by किमयागार on 20 May, 2021 - 09:55
शब्द मी तुजला दिलेला पाळतो आहे सखे
तोच माझा श्वासही सांभाळतो आहे सखे
मद्य अन् गोळ्या निजेच्या व्यर्थ गेल्यावर अता
आसवांनी आठवांना जाळतो आहे सखे
तेच नाटक, तीच पात्रे, तीच आहे संहिता
फक्त मी संवाद अपुले गाळतो आहे सखे
सापडेना पान जेथे नाव ना आले तुझे
आत्मवृत्तातील पाने चाळतो आहे सखे
जर अचानक लागली उचकी तुला तर जाण की
मी तुझ्या हळव्या स्मृती कुरवाळतो आहे सखे
----©मयुरेश परांजपे(किमयागार)----
२०/०५/२०२१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूपच छान..! आवडली शब्दरचना..!
खूपच छान..!
आवडली शब्दरचना..!
धन्यवाद
धन्यवाद
शेर क्रमांक २ आणि ३ सर्वात
शेर क्रमांक २ आणि ३ सर्वात आवडले. सुंदर गझल आहे.
आसवांनी आठवांना --> हे दोन शब्द एका मागोमाग छानच आले आहेत.
आर्त धन्यवाद
आर्त धन्यवाद