एक प्यार का नगमा है: गीतकार संतोष आनंद यांची ह्रदयस्पर्शी कहाणी

Submitted by अतुल. on 23 February, 2021 - 02:18

एक प्यार का नगमा है... माझं अत्यंत आवडतं गाणं. गाण्याला अजोड उंचीवर नेऊन ठेवणारे लतादीदी आणि मुकेशजी. आणि संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल. पण त्याचे गीतकार कोण, सध्या कुठे आहेत. काही माहित नव्हतं. जगाच्या विमृतीत गेलेला हा गीतकार. या व्यतिरिक्त त्यांनी कितीतरी सुंदर गाणी त्या काळात दिलीत. जसे कि:

मेघा रे मेघा रे...
तेरा साथ है जो मुझे क्या कमी है...
मोहब्बत है क्या चीज...

आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी गीत लिहिणाऱ्या आनंद यांना उत्कृष्ट गीतलेखनासाठी तब्बल दोनवेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. पण पुढे दिवस फिरले. काळ कोणासाठी थांबतो? एकुलता एक मुलगा अत्यंत चांगल्या अधिकारीपदाच्या सरकारी नोकरीत होता. त्यावर अफरातफरीचे आरोप झाले. तब्बल २५० करोडपर्यंत आकडा गेला. अडकला. अखेर २०१४ साली यात गुंतलेल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांची नावे सुसाईड नोट मध्ये लिहून बायको आणि चार वर्षाच्या मुलीसमवेत रेल्वेखाली उडी मारली. छोटी मुलगी केवळ नशिबाने वाचली. तीच आता संतोष आनंद यांचा एकमेव आधार आहे "जिंदगी और कूछ भी नही, तेरी मेरी कहाणी है". गाण्याच्या चित्रीकरणात सुद्धा चित्रपटाचा नायक (मनोजकुमार) पत्नीच्या निधनानंतर आपल्या एकुलत्या एका छोट्या मुलासमवेत हे गाणे गाताना दाखवलाय. आज त्याहूनही अधिक कसोटीची वेळ वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी गीतकार संतोष आनंद यांच्यावर आली आहे.

परवा इंडियन आयडॉलने प्रथमच त्यांना अनेकानेक वर्षांनी मंचावर आणले आणि हि त्यांची हि कहाणी ऐकून उपस्थित सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. नेहा कक्कर घळघळा रडली. तिने त्यांना पाच लाख रुपयांची भेट देऊ केली. पण आपण आयुष्यात कधी कुणाकडे काही मागितले नाही असे विनम्रपणे सांगताना संतोष आनंद भावूक झाले. अखेर "हि तुमच्या नातीने दिलेली भेट आहे असे समजा" असे म्हणून सद्गदित झालेल्या नेहा ने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत गायिले "जिंदगी और कूछ भी नही, तेरी मेरी..." पण यापुढे ती गाऊ शकली नाही.

हा व्हिडीओ जरूर पहा. अंतर्मुख करेल:
https://youtu.be/xO0AlIXuKu4

कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो, आना और जाना है

आँखों में समंदर है, आशाओं का पानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है...

आपल्या लेखणीने अजोड आणि अद्वितीय गोडीची गाणी लिहून आपल्या सर्वाच्या मनाला केवळ संतोष आणि अपार आनंद देणाऱ्या गीतकार संतोष आनंद यांना ईश्वर सुदृढ आयुष्य आणि यातून सावरायची शक्ती देवो हि सदिच्छा!

-अतुल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.

तरी बरं लेखकाने शेवटी 'अतुल' असं स्पष्ट लिहीलेलं आहे मग कॉपी-पेस्ट करणारे तेवढं गाळून कसं बरं कॉपी-पेस्ट करतात? कोव्हीडपूर्वी निदान 'कॉपी टू कॉपी, माशी टू माशी' असायचं (म्हणजे समोरच्याच्या पेपरावर माशी असेल तर कॉपी करणारा माशी पण काढणार - इतकी कडक कॉपी. हल्ली ऑन-लाईन परीक्षा असल्याने अशा वाकप्रचारांचे स्पष्टीकरण द्यावे लागते.) कॉपीच करायचं तर ते तरी धड करावं. ते पण जमेना आता....

छान लेख.

तरी बरं लेखकाने शेवटी 'अतुल' असं स्पष्ट लिहीलेलं आहे मग कॉपी-पेस्ट करणारे तेवढं गाळून कसं बरं कॉपी-पेस्ट करतात? कोव्हीडपूर्वी निदान 'कॉपी टू कॉपी, माशी टू माशी' असायचं (म्हणजे समोरच्याच्या पेपरावर माशी असेल तर कॉपी करणारा माशी पण काढणार - इतकी कडक कॉपी. हल्ली ऑन-लाईन परीक्षा असल्याने अशा वाकप्रचारांचे स्पष्टीकरण द्यावे लागते.) कॉपीच करायचं तर ते तरी धड करावं. ते पण जमेना आता....

ते म्हणजे कोणी विचारल्यास 'मला ऑनलाइन मिळालं, आवडलं म्हणून शेअर केलं, कोणाचं आहे माहीत नाही' म्हणता यावं आणि कोणी न विचारल्यास स्वतः वाहवा स्वीकारत राहावी अशी सोयीस्कर पळवाट असते Happy
म्हणजे आता लेखात मध्येमध्ये पटकन कट न करता येतील अशी वाक्य टाकायला हवी. म्हणजे 'मी हे लिहीत होतो आणि डोळ्यातून टपटप पाणी गळत होतं.तितक्यात आई आली आणि म्हणाली 'अतुल काय झालं?' वगैरे.बायका उखाण्यात नवऱ्याचं नाव पेरतात तसं लेखकाने आपलंच नाव पेरायचं. Happy

त्यांनी चित्रपटात नसलेलं एक कडवं गाऊन दाखवलं जो बित गया है वो अब कौन लायेगा, इस् दिल मे सिवा तेरे कोई और ना आयेगा, घर फूंक दिया हमने अब राख उठानी है, जिन्दगी और कुछ भी नही तेरी मेरी कहानी है....

मागे अनुप जलोटा, तलत अझीझ उदित नारायण यांचा कोणाच्या तरी घरातला जॅम करतानाचा विडिओ पाहिला होता. त्यात कोणी तरी मै शायर तो नही या गाण्यातील चित्रपटात प्रसिद्ध न झालेली २ कडवी गायली होती. अशा न प्रसिद्ध झालेल्या गाण्यांची माहिती कोणाकडे असेल तर नक्की सांगावी.

<< आणि म्हणाली 'अतुल काय झालं?' वगैरे.बायका उखाण्यात नवऱ्याचं नाव पेरतात तसं लेखकाने आपलंच नाव पेरायचं. >>

------- (वाचत असतील ना पेस्ट करायच्या आधी) अतुल च्या जावे जागेवर स्वत: चे नाव लिहायचे कष्ट घेतील. Happy

Pages