पोटगी की खंडणी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 January, 2021 - 05:13

नात्यातला एक तरुण मुलगा आहे, वयाने माझ्यापेक्षाही किंचित लहान. पण लग्न करून अडकला आहे. फसला आहे असे म्हणता आले असते तरी चालले असते, ते परवडले असते, निदान स्वतःच्या नशीबाला दोष देत पुन्हा सुरुवात करता आली असती. पण बिचारा अडकला आहे.

झाले असे, लव्ह कम अरेंज असे ओळख झालेल्या एका मुलीशी त्याचे लग्न झाले. लग्नानंतर पहिले तीनचार महिने मौजमस्तीचे सर्वांसारखेच सुखात गेले. मग कुरबुरी चालू लागल्या. सूनेला सासूसासर्‍यांपासून वेगळे राहायची ईच्छा होती. यात काही गैर नाही. पण एकुलता एक मुलगा होता म्हणून आधी एकत्रच राहता येईल का अशी तिला विनंती केली. तिने ती फेटाळली. याच्या घरच्यांनी ते मान्य केले. मधला तोडगा म्हणून आईवडीलांच्याच शेजारच्या सोसायटीत भाड्याने घर घेऊन दोघे राहू लागले. हे लग्नानंतर पाचसहा महिन्यातच घडले. त्यानंतर मुलीने नवीन जॉब शोधतेय सांगून तो मिळायच्या आधीच आपला आधीचा जॉब सोडून दिला. घरातल्या कामातही कुरबूर करू लागली. कामाला बाई होतीच तरीही घरकामाच्या वाटणीवरून वाद होऊ लागले. स्वतः कमवायचे सोडले तरी नवर्‍याचे पैसे कसेही उधळू लागली. त्या मुलाकडे आईवडीलांकडे पैसे मागायची वेळ वारंवार येऊ लागली. आईवडीलही एकुलता एक मुलगा आहे तर जमेल तशी पैश्याची मदत करत होतेच. पण सुनेला नवीन जॉब शोधण्यात काडीचा रस नव्हता. उधळपट्टीला रोख लावण्यातही नव्हता. मग एक दिवस गेली घर सोडून. ते आलीच नाही.

गेले तीन चार वर्षे आलीच नाहीये. डिव्होर्स द्यायचा नाहीये. सोबत नांदायचे नाहीये. मुलाला आता नांदण्यात रसही नाहीये. पण दुसरे लग्न करता येत नाहीये. जिच्याशी दुसरे लग्न करायचे आहे ती मुलगीही रेडी आहे. किंवा होती. पण यालाच डिव्होर्स मिळत नसल्याने तिचेही पेशन्स संपलेत.

आणि आता त्याच्या बायकोने पोटगी मागितलीय. तब्बल पन्नास लाख. ज्याच्यासाठी याच्या आईवडीलांचे घरच विकावे लागेल. हास्यास्पद.
मग तिने मनाचा मोठेपणा दाखवत तो आकडा थेट दहा लाखांपर्यंत उतरवला. आता हा आकडा अवघड आहे पण अशक्य नाही. काय करावे याबाबत मुलाचे डोके भंजाळून गेलेय.

जशी ही बातमी बाहेर आली तसे समजले की त्यांच्याच सोसायटीतील आणखी दोन मुलांकडे पोटगी म्हणून असेच दहा लाखांची मागणी केली गेली आणि त्यांनी ते देऊन स्वतःची सोडवणूक करून घेतली. आता हा आकडा तिथूनच आला की काय कल्पना नाही पण तिन्ही केसेसमध्ये सिमिलर पॅटर्न आढळला. आमच्याकडे जेव्हा यावर चर्चा होत होती तेव्हा असे बरेच किस्से कोणी कोणी सांगितले.

एकंदर असे वाटते की हा एक फसवणूकीचा नवीन प्रकारच झालाय की काय.. याला पोटगी म्हणावे की खंडणी.. आणि अश्यात जर कोणी अडकला तर त्यावर उपाय काय? तसेच अडकू नये म्हणून सावधगिरी काय घ्यायची? लग्न करतानाच असे चालणार नाही म्हणून कॉन्ट्रेक्ट करावे का? ते तरी कायद्यात बसते का? भले अल्पसंख्यांक का असेना अश्या अडकल्या गेलेल्या मुलांना कायदा काही मदत करतो का?

मुलगा माझ्या फार जवळचा नातेवाईक नाही, वर्षातून एखाद दोन वेळा लग्नसमारंभातच भेट होते. गेले तीनचार वर्षे जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा याच दडपणात वाटला. शेवटच्या भेटीत तर जास्तच फ्रस्ट्रेशन आल्यासारखा वाटला. आपल्या आयुष्याची दोरी कोणाच्यातरी हातात आहे ही अडकल्यासारखी भावना मनात घेऊन जगणे कठीण असावे. सद्यपरीस्थिती पाहता कदाचित दहा लाख किंमत मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी तितकीही जास्त नसावी. पण ज्याने मुद्दाम तो कोंडून ठेवला आहे त्याच्याच पोटात ते दहा लाख जाणार आहे हे पचवणे जास्त जड असावे...

थोडा बदललेला तपशील, आणि मला मिळालेली नवीन माहिती

१) मुलीने आधी ५० लाख मागितलेले. आता थेट दहा पंधरा लाखावर आलेली नसून पंधरा लाख + घर असे मागत आहे. घर काय कुठे कितीचे याबद्दल माहिती नाही. बहुधा डिटेलमध्ये तिनेच सांगितले नसावे.

२) मुलीचे वय मुलापेक्षा जास्त आहे आणि तिला लग्न करण्यात रस नाहीये. त्यामुळे मी तुला डिव्होर्स सहजी देणार नाही, कोर्टात लागू दे कितीही वेळ, मला घाई नाही, जर तू मला वरील रक्कम दिली नाहीस तर मी तुझे दुसरे लग्न सहजी होऊ देणार नाही असे तीच स्वतः म्हणतेय. याला धमकी म्हणू शकतो.

३) काही नाही होत, कर तू बिनधास्त लग्न, चालत राहू दे कोर्टात केस - असेही आचरट सल्ले त्या मुलाला जवळच्या नातेवाईकांकडून मिळत आहेत.

४) मुलगी भले याला तीन वर्षे भेटलीही नसेल तरी ती गेले चार सहा महिने मुलाच्या गावी जाऊन त्याच्याशी वाद असलेल्या नातेवाईकांसोबत मिळून दुश्मन का दुश्मन दोस्त म्हणत याच्याविरुद्ध कट करत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमंतिनी, जर तिला पुन्हा पोटगीचा चान्स असेल तर या शुभेच्छाच आहेत की Happy

आज जेव्हा हे आम्हाला समजले तेव्हा लगेच माझ्या बायकोने मला डायलॉग मारला की मी तुला सोडले तर मलाही पोटगी मिळेल. मी तर अर्धा पगारच घेईन.
जणू हा कायदा म्हणजे एक शस्त्रच गवसल्याचा आसुरी आनंद तिच्या चेहर्‍यावर होता.
आता ती गोष्ट वेगळी की सध्याही तीच माझा अर्ध्यापेक्षा जास्त पगार संपवत असल्याने अर्धा पगार देणे तसे मला फायदेशीरच ठरेल Wink

जोक्स द अपार्ट,
अश्या प्रकरणात ९० टक्के मुलींना आधार मिळत असेल पण १० टक्के मुलांची फसगतही होत असेल. कायदा कदाचित त्या ९० टक्के महिलांसाठी बनवला असेल. तरी त्या १० टक्के मुलांनी आपली फसगत होऊ नये म्हणून स्वतःच काळजी घेणे योग्य हा संदेश जरी या धाग्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचला तरी धागा सार्थकी लागला.

Prenuptial agreement

इलॉन मस्कने लग्न झाल्यावर बायकोबरोबर Postnuptial agreement केले. घटस्फोट झाल्यावर ते रद्द व्हावे म्हणून त्याची बायको कोर्टात गेली पण तिथे ती जिंकू शकली नाही (ते पण कॅलिफोर्नियात). त्यामुळे बिलियन्स $ मिळण्याऐवजी तिला जेमतेम १०० मिलियन $ मिळाले. Lol

हसत खेळत गंभीर विषयांना आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन न करता वाचा फोडण्याचं कसब ऋ सरांकडे आहे. ते कधीच आपण हुषार आहोत हे दाखवत नाहीत, ते नेहमी जोकर किंवा मस्क-याच्या भूमिकेत वावरतात त्यामुळे स्वतःला हुषार समजणारे त्यांना तुच्छ समजतात. पण आजवर त्यांच्या मतांचे खंडन कुणाला करता आलेले नाही यातूनच काहींची नेहमी चिडचिड होताना दिसते.
ऋ सरांचे मायबोलीच्या जडणघडणीत असलेले योगदान अतुल्य आहे. मायबोलीचा इतिहास त्यांच्याशिवाय लिहीता येणार नाही.

@ऋन्मेऽऽष
अश्या प्रकरणात ९० टक्के मुलींना आधार मिळत असेल पण १० टक्के मुलांची फसगतही होत असेल.

--- वाटतंय प्रमाण उलट असावे. आणि ते "खांद्याला खांदा लावून लढणारे" शब्द अश्या प्रकरणांत पुरुषवादी समाजव्यवस्था, अबला नारी वगैरे शब्द वापरून पुरुष किती गुन्हेगारी असतात आणि स्रिया किती अबला असतात असे दाखवून पुरुष आणि पर्यायाने त्याच्या पूर्ण कुटुंबावर किती आघात करतात हे अश्या स्रियांनी पुरुषांवर केलेला समाजमान्य बलात्कारा पेक्षा कमी नसावे.

Pages