Submitted by निशिकांत on 26 November, 2020 - 07:19
जरी ना झोप येते, मी तरीही लोळतो आहे
अधूर्या कैक स्वप्नांची धुरा मी वाहतो आहे
नसे भोळे इथे कोणी, समजतो स्वार्थ सर्वांना
कधीचा एक नि:स्वार्थी जगी मी शोधतो आहे
सखे तू काढला गजरा फुले पाहून सुकलेली
अता केसात नसुनी मोगरा गंधाळतो आहे
न दिसतो एकही खांदा रडाया टेकुनी डोके
कसे मिळतील खांदे चार? संभ्रम वाढतो आहे
नको हिरवा, निळा, भगवा, नको झेंडाच कुठलाही
हवा का ध्वज? समाजाला तडे जो पाडतो आहे
सुखाला पात्र होतो एकटा जो पूर्ण अज्ञानी
म्हणोनी भेटतो जो आपुला तो वाटतो आहे
कधी रूढी प्रथांना तर्कसंगत प्रश्न केल्यावर
निरुत्तर जाहलेला का असा संतापतो आहे?
जसे तारुण्य तिज आले, वळाया लागल्या माना
जमाना आस ठेऊनी तिच्याशी वागतो आहे
तुला "निशिकांत"इतकी खंत का अंधार असल्याची?
उजेडाची कमी होता, मना तम भासतो आहे
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह.... छान शेर जमले सगळेच...
वाह.... छान शेर जमले सगळेच....