आय आय टी बद्दल मार्गदर्शन

Submitted by इच्चूकाटा on 24 October, 2020 - 13:50

माझ्या मुलाला त्याला पाहिजे ते कॉलेज व branch मिळत आहे. परंतु मुलीला चांगले कॉलेज v branch मिळत नाही.
तर अशा कॉलेजला प्रवेश घेणे कितपत योग्य आहे. पुढे skop आहे का.
तसेच तिला आय आय टी n krta स्पर्धा परीक्षा दे म्हणतोय.
तुम्हाला काय वाटते
इथे आय आय टी असे शोडले पण पूर्वीचा धागा दिसला नाही म्हणून नवीन प्रश्न केला आहे

Group content visibility: 
Use group defaults

माहिती जरा अपुरी वाटते. तुमचा मुलगा आणि मुलगी एकाच वयाचे आहेत का? कुठल्या मार्कांमुळे मुलाला हवी ती ब्रांच मिळत आहे? कारण JEE चा रिझल्ट लागला असला तरी CET चा अजून लागला नाही.

आयआयटी मध्ये हवी ती ब्रँच मिळत नसेल तर टायर 3 कॉलेज मध्ये हव्या त्या ब्रँच मध्ये गेलेले जास्त चांगले.
ऍडमिशन घेताना पुढील बाबींचा विचार करावा-
१.कॉलेज ची प्लेसमेंट टक्केवारी.
२.कॉलेज मध्ये कोणत्या कंपन्या येतात.
३.पॅकेज कशा रेंज मध्ये दिले जाते.
४.कॉलेज ची पासिंग टक्केवारी.
५.लोकेशन.

टायर ३ कॉलेज मधून देखील उत्तम करियर घडू शकते, अगदी आयआयटी पेक्षाही चांगले.

आयआयटी मध्ये नावडती ब्रँच घेऊन कसेबसे पास होण्यापेक्षा टियर ३ कॉलेजमध्ये चांगले गुण मिळवून चांगले प्लेसमेंट मिळवणे कधीही चांगले.

माहिती जरा अपुरी वाटते. तुमचा मुलगा आणि मुलगी एकाच वयाचे आहेत का? कुठल्या मार्कांमुळे मुलाला हवी ती ब्रांच मिळत आहे? कारण JEE चा रिझल्ट लागला असला तरी CET चा अजून लागला नाही◆◆◆◆◆
दोघे एका मागे एक आगेत , मुलाने ड्रॉप घेतल्याने या वेळेस दोघांनी बरोबर परीक्षा दिली।
दोघांनी ऍडव्हान्स क्लिअर केली आहे

Advanced पास केली म्हणजे तुमची मुले किमान २ वर्षे त्या grind मध्ये होती. सहसा मुले आणि पालक दोघांचे बॅकअप प्लॅन तयार असतात. उदाहरणार्थ - BITSAT देणे. CET देऊन महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट इंजिनीयरींग कॉलेजचा पर्याय तयार ठेवणे.
तुम्ही IIIT चा पर्याय तपासला आहे का?
टियर ३ कॉलेजेस म्हणजे लोकल कॉलेजेस
पुण्यातील VIT, MIT, PICT
माझ्या माहितीनुसार इथे JEE MAINS आणि CET चे मार्क्स राहतात.
मुलांच्या jee preparation च्या काळात ह्या चर्चा क्लासमधील शिक्षक, सहाध्यायी यांच्याशी होत असतात.

तुमचा प्रश्न अजूनही कळला नाहीय.
बारावी नंतर कोणत्या स्पर्धा परीक्षा द्या म्हणताय तिला? तिला ग्रॅज्युएशन करावेच लागेल ना.
ती आय आय टी साठी ब्रेक घ्यायचे म्हणत आहे का? मुलाला तुम्ही ब्रेक घेऊ दिलात तर तिलाही ब्रेक घेऊ देणे योग्य असेल.
जर तो ब्रेक घेऊन चांगले कॉलेज मिळवू शकतो तर तिलाही संधी मिळायला हवी.
अर्थात VJTI,COEP किंवा वालचंद सांगली मिळत असेल तर बिंदास पुढे जाण्यास हरकत नाही.
पण तिची इच्छा आयआयटी आहे तर प्रयत्न करू द्या.

तुमचा प्रश्न अजूनही कळला नाहीय.¶¶¶¶¶ ok. Savistar sangto.

बारावी नंतर कोणत्या स्पर्धा परीक्षा द्या म्हणताय तिला? तिला ग्रॅज्युएशन करावेच लागेल ना.¶¶¶¶¶¶¶
होय. तिने बी इसी ऍग्री करून नंतर स्पर्धा परीक्षा द्याव्यात असे सुचवले आहे. तिचे अक्षर वळणदार आणि विश्लेषण क्षमता चांगली आहे.
ती आय आय टी साठी ब्रेक घ्यायचे म्हणत आहे का? मुलाला तुम्ही ब्रेक घेऊ दिलात तर तिलाही ब्रेक घेऊ देणे योग्य असेल. ¶¶¶¶¶
तिने cet पण दिली आहे. ब्रेक नाही घायचा म्हणते. मुलगा मुलगी आम्ही फरक करत नाही. त्याच्या पेक्षा तिचे क्लास चारपट फी जास्त होते.

जर तो ब्रेक घेऊन चांगले कॉलेज मिळवू शकतो तर तिलाही संधी मिळायला हवी.¶¶¶¶¶¶
हो बरोबर आहे. तिने CET दिली आहे. आय आय टी चे राऊंड अजुन चालू आहेत. तिला चांगले कॉलेज v branch मिळाली तर तिलाही आयआयटी laa पाठवू नाही मिळाले तर CET chya बेसवर तुम्ही म्हणता ते टियर 3 मध्ये admission gheu.
अर्थात VJTI,COEP किंवा वालचंद सांगली मिळत असेल तर बिंदास पुढे जाण्यास हरकत नाही. ,,,,,,, Ok

तसेच तिला आय आय टी n krta स्पर्धा परीक्षा दे म्हणतोय.
>>

सगळे ऑप्शन सोडून जर स्पर्धा परीक्षा देणार असा विचार असेल तर तिथेच थांबा. नीट विचार करून पुढचा निर्णय घेतलेला बरा. माझ्या बऱ्याच मित्रांची आँखो देखी मीपण पाहिलीय त्यावरून सांगतोय खालील गोष्टीवर जरा विचार करावा

१) जीवघेणी स्पर्धा - केवळ यूपीएससी स्पर्धेचं बघाल तर, आजघडीला दरवर्षी जवळजवळ १० लाख लोकं परीक्षेचा फॉर्म भरतात, त्यातले ५ लाख प्रेलीम्स देतात. त्यातून केवळ १० हजारच्या आसपास मेन्स साठी निवडतात आणि त्यातून मेरीटवर आलेले २ हजार इंटव्ह्यूसाठी पात्र ठरतात. प्रत्यक्ष जागा आहेत हजारच, म्हणजे तोंडी परिक्षेतूनही ५०% विद्यार्थ्यांना रिकाम्या हाती परतावं लागतं.
एकूण परीक्षा देणारे आणि शेवटच्या हजारात मेरिटमध्ये येणारे यांचं पर्सेंटेज काढलं १०००/५००००० = ०.००२% इतकंच भरतं. बाकीच्या सरकारी परीक्षांची टक्केवारी पहिली तरी आकडा ०. १% वर जाणार नाही याची खात्री बाळगा.
विचार करा अशी परीक्षेत, तुमच्या मुलीला किती गुरासारखी मेहनत घ्यावी लागेल ?

२) तयारीचा वेळ - या परीक्षा तयारच अशा केलेल्या आहेत की किमान १-२ वर्षे झोकून मेहनत घेतल्याशिवाय यश मिळणं शक्य नाही, अगदी कॅटेगरी वाले असलात तरीही. माझ्या ओळखीतले २-३ जण आहेत ज्यांनी ३ ते ५ वर्षे केवळ या परीक्षा देण्यात घालवलेत पण शेवटी हातात काहीच नाही. एकजण शेवटी हताश होऊन १० हजारावर एन जी ओत काम करतोय कारण त्याच्या ५ वर्ष जुन्या डिग्रीला आज बाजारात कुणीही विचारात नाही. दुसरा गावी परत जाऊन शेतीत लक्ष घालायच्या विचारात आहे.
सांगायचं एकच की, तुमची मुलगी आज अशा टप्प्यावर आहे, जिथं ३-४ वर्षात तिच्या करियरला एक निश्चित गती द्यायची असते. एकदा ही वेळ गेली की परत नव्यानं सुरवात करणं खूप अवघड. या वेळेत स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतलेली पोरं ३-४ वर्ष झोकून देतात, पण जेव्हा परत यायची पाळी येते तोवर बाकीचं जग बरंच पुढं गेलेलं असतं. आपल्या जुन्या स्किल आणि डिग्रीला आता तितकी किंमत राहिलेली नसते. नवीन दमाची बेकारांची फौज मार्केटमध्ये आलेली असते. तुमचे यार दोस्त कदाचित आयुष्यात बरेच पुढे निघून गेलेले असतात. नोकऱ्या चटकन मिळत नाहीत, मग करियर लग्न सगळंच लांबणीवर पडत जातं, हे सगळं खूप वेदनादायी असतं. वर पैशापरी पैसे जाऊनही सिलेक्शन झालं नाही तर जे डिप्रेशन येत ते वेगळंच.

३) जॉब सॅटिसफॅक्शन - यदा कदाचित सिलेक्शन झालंच तरीही पुढचा रास्ता सरळसोट मुळीच नाही. नोकरीत सरकारी लाभ चांगले निश्चितच आहेत. पण बरीच बंधन सुद्धा येतात. मोजक्या पोस्ट सोडल्या तर सरकारात सगळीकडं क्लेरिकल जॉबच करावे लागतात. वरिष्ठांचा, नेत्याचा दबाव सतत तुमच्या कामावर असतो. सगळ्यांची मर्जी राखली तरच मनासारखं पोस्टिंग आणि प्रमोशन, नाहीतर जबरदस्तीची ऑल इंडिया/महाराष्ट्र सहल पदरात पडते. मनस्वी, क्रिएटिव्ह लोकांची अशा पोस्टवर प्रचंड कुचंबणा होते. प्रायव्हेट सेक्टर दुरावलेलं असतं त्यामुळे परतीचे दोर जवळ जवळ संपलेले असतात. शेवटी बऱ्याच जणांना आहे त्या पोस्टवर समाधान मानत पाट्या टाकत दिवस काढावे लागतात. प्रायव्हेटवाले या बाबतीत तुलनेनं बरेच समाधानी दिसतील.

कुठलीही स्पर्धा परीक्षा देण्यापूर्वी तुमच्या मुलीला या सगळ्याची जाणीव नक्की करून द्या. एखादा बॅकअप प्लॅन असल्याशिवाय मुलीला या भुलभुलैय्यात पडू देऊ नका. इथं गर्दी फक्त आत जाताना दिसते, बाहेर येताना नाही.