Submitted by अजिंक्यराव पाटील on 6 October, 2020 - 04:18
नुकताच रिलीज झालेला मिर्झापूर सिझन २ चा ट्रेलर बघितला.. आधीच असली कमाल सिरीज, त्यात धक्कादायक वळणावर संपलेला पहिला सीजन. भारतीय प्रेक्षकांनी #MS२W? चा ट्रेंड चालवून ऍमेझॉन प्राईमला भंडावून सोडलं होतं. २३ ऑक्टोबरला भौकाल होणार..! जुन्या आणि नव्या सीजनवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
आणि हो प्रतिसादात तुम्ही पाहिलेले धमाल मिम्स देखील टाका.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भारी घेतलंय ते पात्र
भारी घेतलंय ते पात्र
स्पेशली अम्मी वाले संवाद
पण ती लव्ह स्टोरी रादर सगळ्याच लव्ह स्टोऱ्या जाम बोर झाल्या
गोलू चे पेन ओबसेशन पण अगदीच कसतरी वाटलं
त्या डॉकटर च्या फॅमिलीला का बळच मारलं हे कळलं नाही
मला एक कळलं नाही पहिल्या
मला एक कळलं नाही पहिल्या सिझनमधे तो नोकर मेला नसतो का? त्याचं xxxx कापल्यावर.
ती बिना परत बोलवून घेते तो हा सेमच नोकर ना? राजा...
हो
हो
दद्दा अँड फॅमिलीचा ट्रॅक खूप
दद्दा अँड फॅमिलीचा ट्रॅक खूप छान बांधता आला असता, पण सगळंच विस्कळीत झालं त्यात. त्यात गोलू आणि छोटेबिहारीचं प्रकरणदेखील काहीतरी धडाकेबाज करता आलं असतं जे केलंच नाही. रॉबिन म्हणजे लिहिताना अगदी उत्तम जमून आलेली व्यक्तिरेखा पण संवाद कमी असं प्रकरण.
डॉक्टर फक्त गुड्डूला राग यावा म्हणून हकनाक मारल्या गेला, त्यात दुसरं काहीच कारण दिसत नाही. मकबूलच्या तोडीचा असून बाबरसुद्धा स्वस्तात निपटला.
पुढच्या सिझनमध्ये तरी रॉबिन, डिंपी, गोलूच्या व्यक्तिरेखांना न्याय मिळावा अशी अपेक्षा.
हायली प्रेडिक्टेबल आणि
हायली प्रेडिक्टेबल (फोरशॅडोइंग) आणि इर्रॅशनल सुद्धा. शेवटच्या मेक्सिकन स्टँडॉफ सीनमधे ज्युनियर वाचतो, वाज सो ऑब्वियस. स्टोरी टेलिंग फसली आहे, बर्याच सीन्स मधे...
राज
राज
मध्ये मध्ये मराठी शब्द येत आहेत ते खटकत आहेत
आशुचँप, मेसेज वर लक्ष ठेवा,
आशुचँप, मेसेज वर लक्ष ध्या, भाषेवर नाहि. इथे सगळे ज्युनियरचं ऑलरेडि श्राद्ध करुन बसले आहेत...
गुड्डू पूर्ण बरा झालेला
गुड्डू पूर्ण बरा झालेला दाखवायला काय झालं? पुर्ण ठीक झाला असता तर एकट्यानेच जाऊन मुन्ना आणि कालीन दोघांना मारलं असतं की, शुक्ला ला तर जौनपुर मध्ये मारतो.
डॉक्टर फक्त गुड्डूला राग यावा
डॉक्टर फक्त गुड्डूला राग यावा म्हणून हकनाक मारल्या गेला, त्यात दुसरं काहीच कारण दिसत नाही... लिप्पी मुळे गुड्डु शबनम च्या जास्त जवळ येतो आणि त्यामुळे गोलु आणि छोटे बिहारी पण जवळ येतात. डाॅक्टर च्या खुनाने बरीच उलथापालथ झालेली आहे.
बघून संपली. मला तरी आवडली.
बघून संपली. मला तरी आवडली. मागच्या सिझनपेक्षा व्हायोलेंस कमी वाटला. मुन्ना आणि त्रिपाठीच आवडले जास्त.
मुन्ना एक नंबर!
मुन्ना एक नंबर!
Vaise immediate नही socha है...
तो छोटे बिहारी वाचतो का? मला तर वाटले..गेला! तो त्यांचा मामा....अभिषेक बच्चन च्या breathe into the shadows मध्ये होता ना?
मलातर गुड्डु हे पात्रच
मलातर गुड्डु हे पात्रच पहिल्या सिजनपासून आवडल नाही.
५-६ जण घेऊन हा कसा मिर्झापुर ताब्यात घेणार होता?
नशिब कालीनभैयाने त्याची माणसं घालवून दिली होती.
मुन्ना बेस्ट सगळ्यात.
पहिल्या सिजनचे पाच एपिसोड
पहिल्या सिजनचे पाच एपिसोड पाहिले .... सध्यातरी पुढे पाहावीशी वाटत नाहीये ... विशेष पकड घेतली नाही ... एकही जण चांगला माणूस म्हणावा असा नाही हे बघून पहावीशी वाटत नाही ... वकिलाला सायलेंट प्रोटेस्ट करण्याऐवजी एकदाही मुलांना समोरासमोर बसवून समजावण्याचा प्रयत्न करावासा वाटत नाही ? मुळात चांगल्या सुशिक्षित सुसंस्कृत घरचा पोरगा इतका रक्तपिपासू कसा होतो ... त्याचा भाऊ चांगला म्हणावा तर त्यालाही खुनात काही चूक आहे असा साधा प्रश्न पडत नाही .... जो आयएएस बनायचं स्वप्न बघत होता तो चार पैशासाठी इतक्या सहज विकला जातो ? जन्मभर प्रामाणिक नवऱ्याची सावली बनून एकनिष्ठ राहिलेली बाई इतक्या सहज पॉवरने आणि गुन्हेगारीतून आलेल्या पैशाने आंधळी होते ? All this was extremely disturbing for me to watch .. इव्हन त्या गोळ्यांनी पोट / मेंदूच्या चिळकांड्या उडताना दाखवल्या आहेत , ते सुद्धा डिस्टर्बिंग नाही .... पण ह्या कुटुंबाचं हे वागणंच न पटण्यासारखं , न आवडण्यासारखं वाटलं ... जे सरळच व्हिलन आहेत किंवा ज्यांना नीतिमत्ता म्हणजे काय याचा गंधही नाही अशा बिन्नी , कालीन किंवा मुन्नासारख्या लोकांचं वाईट वागणं खटकत नाही ... पण ज्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा असते असे लोक वाईट वर्तन करू लागतात ते पाहवत नाही .
सेकन्ड सिझन बघण्याचा मुहुर्त
सेकन्ड सिझन बघण्याचा मुहुर्त लागला एकदाचा, एक तो दद्दाचा ट्रॅक सोडला तर हा सिझन जास्त आवडला , बरेच नविन पात्र आणि लिन्क्स अॅड झाल्यात पण तिसरा सिझन आणायचा तर हे होणारच होत. पहिला सिझन अतिव हिन्सा, न्युड्,सेक्स सिन याचीच भरताड होती त्यामूले जास्तच डार्क होता. यात दोन्ही थोड मेलोडाउन वाटल, कालिन भैय्या डॉक्टरकडे जातात ते किवा दद्दाचा ट्रॅक बहुधा थोड ह्युमर एलिमेन्ट यावा साठीच असावा.सरप्राइझ एलिमेन्ट मात्र कमी वाटला. मोस्ट ऑफ सगळेच सिन आधि प्रिडिक्ट करता येतात.
अॅड झालेल्या लिन्क्स मधले सगळेच कलाकार एकसे एक बढकर एक आहेत तरी मुन्ना ट्रिपाठी,बिना आणि कालिन भय्या इज द बेस्ट.
मुन्नाच माधवि समोर इमोशनल होण, व्यक्त होण ते सीन एकदम मुन्नाच्या टिपिकल शिवराळ आणि दे धडक इमेजला छेद देवुन जाणारे.
ऱोबिन च पात्र एकदम भारी पण खुप सारे नविन कलाकार आल्याने गर्दित सगळ्यानाच न्याय मिळत नाही अस काहीस झालय.
नेट फ्लिक्सने नेक्स्ट सिझन अनाउन्स केलाय आता पुढे किती ट्विस्ट येतात ते बघायच.
नेट फ्लिक्सने नेक्स्ट सिझन
नेट फ्लिक्सने नेक्स्ट सिझन अनाउन्स केलाय आता पुढे किती ट्विस्ट येतात ते बघायच. अमॅझॉन प्राईम ने असे म्हणायचे का तुम्हाला?
दद्दाचा ट्रॅक मला तरी आवडला. पुढच्या सिझनसाठी नक्की कोण गेला (छोटा की बडा) ते सरप्राईस ठेवले आहे. सिझन २ मध्ये विनोदी सिन खूपच आहेत. त्यामुळे मजा आली पहाताना...
चुकुन प्राइम च्या एवजि
चुकुन प्राइम च्या एवजि नेटफ्लिक्स लिहले गेले
छोटे च गेला असं वाटलं
छोटे च गेला असं वाटलं
पण इतक्या किरकोळ गोष्टीसाठी थेट सकख्या मेहुण्याला आणि मुलाला मारायचं म्हणजे फारच ओढून ताणून झालं
छोटे च गेला असं वाटलं
छोटे च गेला असं वाटलं
> शेवटचा एपिसोडची शेवटची १० मिनिटे शेवटपर्यंत परत एकदा पहा...पोस्ट क्रेडीट्स सकट
मला तर वाटतय त्या जुळ्यांचा
मला तर वाटतय त्या जुळ्यांचा झोल असणार काहीतरी. कोण खरच वाचलाय आणि तो कोण म्हणून आपल्या समोर यणार तिसर्या सीझन मध्ये काय माहिती.
स्पॉयलर
स्पॉयलर
बडे गेलाय. अंगठी फिरवता येत नाहीये
स्पॉयलर
स्पॉयलर
बडे गेला असेल तरी छोटे पुढे बडे म्हणून समोर येणार नाही असे नाही. नहीतरी बडेची बायको कुठे ओळखते त्याला आधी?
**** स्पॉयलर ****
**** स्पॉयलर ****
>>बडे गेला असेल तरी छोटे पुढे बडे म्हणून समोर येणार नाही असे नाही. नहीतरी बडेची बायको कुठे ओळखते त्याला आधी?<< +१
शिवाय बडेचं कॅरेक्टर अजिबात पुढच्या सिझनमधे नेण्यालायक न्हवतं. जास्तीत जास्त त्याने दद्दाची गादी चालवली असती, पण सद्ध्याचा दद्दा ढासुं आहे. आणि छोटे रेबल असल्याने पुढच्या सिझनमधे रंगत आणु शकतो...
मला दोघेही पुढच्या सिझनमध्ये
मला दोघेही पुढच्या सिझनमध्ये असलेले चालले असते...
Pages