Submitted by सुप्रिया जाधव. on 4 October, 2020 - 14:42
उन्हावर भाळल्याने भरदुपारी
हिरे माळून आली सर दुपारी
तुझा मेसेज नाही फोन नाही
कसा आलास तू लवकर दुपारी
समस्यांनो पळा, बाहेर खेळा
निजू द्या ना मला क्षणभर दुपारी
मनाचा चाळते अल्बम जरासा
चढत जातो स्मृतींचा ज्वर.. दुपारी
कधी होऊन शेजारीण माझी
मला मी मागते साखर दुपारी
जसा सुट्टीतला दंगा मुलांचा
तशी ही शांतता मनभर दुपारी
उलटते सुरकुत्यांविण रात्र सारी
तरी मी बदलते चादर दुपारी
दुपारी वास्तवाचे ऊन्ह पडते
सुकव आयुष्य दोरीवर दुपारी
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान!
खूप छान!
दुपारी वास्तवाचे ऊन्ह पडते
दुपारी वास्तवाचे ऊन्ह पडते
सुकव आयुष्य दोरीवर दुपारी <<< खूप आवडला ... अख्खी गझल सुरेख आहे
द्वैत, अनुमोदन !
द्वैत, अनुमोदन !
तेजो, द्वैत, नादिशा मनःपूर्वक
तेजो, द्वैत, नादिशा मनःपूर्वक धन्यवाद
खूप सुंदर गझल... सुप्रियाजी.
खूप सुंदर गझल... सुप्रियाजी.