डेमॉनिक पझेशन खरे असते का?

Submitted by केशव तुलसी on 27 August, 2020 - 12:16

डेमॉनिक पझेशन् अर्थात पिशाच्चबाधा हा प्रकार खरा असतो का? हा धागा अमानवीयमध्ये येतो पण त्या धाग्यावर अवांतर चर्चा होते म्हणून इथे विचारत आहे.
अनेक चांगले लोक /कुटुंबे अचानक विचित्र वागायला लागतात.हसता खेळता परिवार काही वर्षात धुळीला मिळालेला पाहीला आहे. नेहमी हसतमुख असलेले लोक अचानक प्रचंड रागिट चिडके होतात .व्यसनाच्या नादाला लागून खाक होतात.यातल्या प्रत्येकाला घडतेय ते वाईट घडतेय हे माहीत असते पण काहीतरी असते जे त्यांना मागे खेचत असते व पुन्हा पुन्हा निराशा, चीड ,राग यांच्या खोल गर्तेत ढकलत असते.
युट्युवर यावर अनेक व्हिडियो आहेत.पण आपल्या इथल्या भारतीय कॉन्टेक्सवर चर्चा झालेली आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Shamans, Mystics and Doctors हे डॉ. सुधीर कक्कर यांचे पुस्तक किंवा त्याचा "औषधं, उतारे आणि आशीर्वाद" हे पुस्तक वाचा.
म्हणजे पिशाच्चबाधा कशी नसते पण तरी लोक त्यावर विश्वास का ठेवतात आणि त्याचे उपचार का करवतात दोन्ही गोष्टी कळतील.

आमच्या गावात एकाला भूतबाधा झाली होती. घरच्यांनी एका बाबाला बोलावलं. बाबा हातात झाडू , माळ वैगरे घेऊन आला आणि त्या पोराला विचारलं सांग कोण आहेस? कुठल्या झाडावरून आलास? आणि जी काय त्या पोराला झाडूने झोडपायला सुरवात केली विचारू नका. तो पोरगा बिचारा गेलो गेलो परत नाही येणार ओरडत होता. दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं तर त्याने सांगितलं की तो नाटक करत होता कारण त्या दिवशी त्याचा गणिताचा पेपर होता. पेपरला जाण्यापासून वाचण्यासाठी त्याने अंगात आल्याचं नाटक केलं. पण बाबाने त्याला असा धु धु धुतला की त्यापेक्षा नापास होणं परवडलं असतं.

भूत वगैरे असं काही नसतं. हे फक्त सिनेमा आणि मनोरंजनासाठी बनवले गेलेले आहे.
माणूस जेव्हा ईमोशनली वीक आणि कुठल्याही दडपणाखाली असतो, तेव्हा तो कुठल्याही illogical things वर विश्वास ठेवतो.
That's why Baba's are more famous than scientist in india.
Individuals can check how many Baba's we know and how many scientist we know.??

केशव तुलसी , तुमचं मत लिहा की आधी.
हा धागा अमानवीयमध्ये येतो पण त्या धाग्यावर अवांतर चर्चा होते म्हणून इथे विचारत आहे > या वाक्यातील आत्मविश्वास आणि आशावाद आवडला

असेल नसेल माहिती नाही। रादर हा आपापल्या मतांचा, विश्वासाची प्रश्न।
परंतु संबंधित पिडित व्यक्कीला एकदा वैद्यकीय मदत जरूर द्या। मानसशास्त्रज्ञ, काऊन्सिलर्स, काही औषधे यांचा नक्की उपयोग होऊ शकेल।