मी जसा आणि जेवढा आहे

Submitted by अविनाश राजे on 7 August, 2020 - 11:56

मी जसा आणि जेवढा आहे
हा पाहा, इथे उघडा आहे!

नेत्री माझ्या नभ बिंबलेले
माझा उर बघ केवढा आहे

ओढतो जो सतत पाय माझे
अंतरी एक खेकड़ा आहे

अस बलिष्ठ तू कितीही दैवा
हिऱ्याचा मीही तुकडा आहे

क्लिष्ट जरी ग्रंथ जीवनाचा
मी अभ्यासतो हर धडा आहे

Group content visibility: 
Use group defaults