Submitted by धीरज on 20 July, 2020 - 06:18
माझा भाचा नुकताच १२ वी ची परीक्षा ७३ % घेऊन पास झाला (सायन्स).
फक्त इंजिनिरिंग आणि डॉक्टर हे पर्याय सोडून आणखी पर्यायांची माहिती हवी आहे.
स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली तर छान. १२वी नंतर कुठल्या परीक्षा देऊ शकतो?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकमत ऑक्सिजन करीअर स्पेशल
लोकमत ऑक्सिजन करीअर स्पेशल
2018 & 2019
ई-पेपर्स मिळाले तर बघा
कारण जवळ जवळ त्या सिरीज मध्ये 40-45
क्षेत्रांची माहिती आहे
स्पर्धापरीक्षांचे क्षेत्र
स्पर्धापरीक्षांचे क्षेत्र सध्या फार अनप्रेडिक्टेबल आहे. अधिकारी व्हायच्या नादात उमेदीची अनेक वर्षे वाया घातलेली मुले पाहिली आहेत. आधी व्यवस्थित करिअर ऑप्शन तयार करून ठेवावा आणि मगच याचा विचार करावा. बरेचजण नोकरी करता करता यशस्वी झालेले आहेत. माबोवरती जिद्दु सनदी अधिकारी आहेत त्यांना विचारून बघा. मी एकदा त्यांच्या हाफिसात जाऊन आलोय
Biology आणि mathematics असे
Biology आणि mathematics असे दोन्ही विषय घेऊन 12 वी दिली आहे असं दिसतंय.. तर biotechnology, pharmacy, Bsc,MSc करून संशोधन असे अनेक पर्याय आहेत..
त्यात जर neet, cet देणार असेल तर ICER चा पर्याय पण चांगला आहे
सर्व प्रतिसादकांचे मनापासून
सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार. ह्याची खरंच मदत होईल.
उपलब्ध संधी काय आहेत या
उपलब्ध संधी काय आहेत या पेक्षा माझ्या पाल्याची Apptitude , Intelligence , Personality and Skills तपासून सायकोलॉजीस्ट ने सुचवलेले पर्याय शिवाय पाल्याचा कल याची सांगड घालून पुढील शिक्षण घेणे हे जास्त शास्त्रीय आहे.
मला जाहीरात करायची नाही. पण मी अशी टेस्ट माझ्या असोसीएट कंपनीच्या सहायाने घेतो आणि त्याचा रिपोर्ट समजाऊन सांगतो व करीयर पाथ निवडण्यासाठी कौन्सेलींग करतो.
आपण आवश्यकते नुसार संपर्क करा . फोन ९७६३९२२१७६