Submitted by Amol shivaji Rasal on 29 June, 2020 - 12:16
ओल्या कोरड्या जखमांवर आज मीठ चोळूनी गेली ती
नागिणीची चाल तिची अन कात टाकूनी गेली ती..
भरलेल्या या जखमांवरती कुणी कसा आघात करावा
तो तयार नव्हता घात सोसाया मात देऊनी गेली ती...
सुटका यातून करेल कशी तो आठवणींचे जाळे हे..
तयार झाला दिस उजडला अन रात देऊनी गेली ती..
चवदार जेवण खाण्यासाठी केला होता हट्ट उरी
सपक पांढरा होता तसाच भात देऊनी गेली ती..
राजा होता राष्ट्राचा तो जगावर तो राज्य करी..
जग घेतले राष्ट्र घेतले प्रांत देऊनी गेली ती..
अपेक्षा करू नका तुम्हीही सांगून गेले बुद्ध जरी..
आठवणींचा दिवा पेटतो वात देऊनी गेली ती..
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा