Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 10 January, 2020 - 07:34
प्रेम थांबते
********
युगो युगी
प्रेम थांबते
वाट पाहाता
वाटच होते ॥
विना अपेक्षा
कधी कुठल्या
जळणारी ती
ज्योत होते ॥
गीता मधले
शब्द हरवती
सूर सुने ते
करून जाती ॥
तरीही कंपण
देहा मधले
अनुभूतीचे
स्पंदन होती ॥
शोध सुखाचा
खुळा नसतो
अंतरातील
हुंकार असतो ॥
आनंदाच्या
सरीते आवतन
आनंदाचा
सागर करतो ॥
क्षण अपूर्ण
जगण्यातला
पूर्णत्वाचे
क्षेम मागतो ॥
अन् जीवाच्या
जगण्यातला
दिप संजीवक
प्रदिप्त होतो॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा